Ayurvedik vanaspati information in Marathi । आयुर्वेदिक वनस्पतींचे गुणधर्म !

आयुर्वेद हा शब्दच आपल्याला निसर्गाशी जोडत असतो. प्रकृती आणि प्रवृत्ती याचे सविस्तर लेखन आपल्याला आयुर्वेदात सापडते. आयुर्वेदिक वनस्पती या अशाच प्रकारे मानवाला त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीशी जोडतात. अनेक नानाविध वनस्पतींचा उल्लेख भारतीय प्राचीन ग्रंथात आलेला आहे. अशाच ५ वनस्पतींची माहिती आपण आज घेणार आहोत. या वनस्पतींनी मानवी आरोग्यात महत्वाचे स्थान मिळवले आहे.

१. अडुळसा –

अडुळसा ही सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती आशियाई देशांत आढळते. प्रामुख्याने भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत ही वनस्पती आढळते. महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर या वनस्पतीची लागवड करतात. अडुळसा २.५ मीटर उंचीपर्यंत वाढते. पाने मध्यम आकाराची व लांबट असतात.

• औषधी गुणधर्म –

– अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधी उपयोगात आणली जातात.

– कफ, दमा, खोकला आणि श्वसन या प्रकारातील आजारांवर अडुळसा औषध मोठ्या
प्रमाणावर वापरतात.

– दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात
असावा, अशी आयुर्वेदात नोंद आहे.

– पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो.

– पानांचा उपयोग हृदयाच्या आजारांत केला जातो.

२. आवळा

हिंदीत आमला किंवा आँवला या नावाने या वनस्पतीला ओळखले जाते. आवळा चवीला तुरट व आंबट असतो. हे फळ अत्यंत औषधी आहे.आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. ते एक उत्तम रसायन आहे. आवळा हा अनेक समस्यांवर गुणकारी आहे. आवळा हे कोरडवाहू फळपीक आहे. या फळामध्ये ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. आवळा भाजला, उकडवला, अंबावला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाहीत.

• औषधी उपयोग –

– आवळ्याचा अर्क अन्य तेलात मिसळून केसाला लावायचे तेल बनवतात.आवळ्यात असलेले पाच रस (मधुर, अम्ल, तिक्त, कटू, तुरट) बऱ्याच आजारांवर
गुणकारी आहेत.

– कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व आवश्यक रस मिळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

– आवळा प्रामुख्याने पुष्टीवर्धक आणि शक्तिवर्धक आहे. याचा उपयोग च्यवनप्राश बनवण्यात देखील केला जातो.

– आवळासेवनाने शरीरातील पित्त कमी होण्यास मदत होते.

३. गवती चहा

गवती चहा ही एक तृणवर्गीय सुवासिक वनस्पती आहे. ही वनस्पती महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. या वनस्पतीचे औषधी गुणधर्म खूप आहेत. पण प्रामुख्याने चहाबरोबर या वनस्पतीची पाने उकळली जातात. या वनस्पतीचे तेलदेखील अनेक विकारांवर गुणकारी आहे.

•औषधी उपयोग –

– तेल उत्तेजक व शामक असल्यामुळे जंतनाशक, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे.

– सांधेदुखी असल्यास हे तेल मालीश करण्यासाठी वापरतात.

– कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.

– या वनस्पतीचा काढा ज्वरनाशक आहे.

४. ज्येष्ठमध –

ही दक्षिण युरोपात व आशियात आढळणारी कडधान्यवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीच्या मुळांपासून गोडसर चवीचा अर्क मिळतो.

• औषधी उपयोग –

– ज्येष्ठमध शक्तिवर्धक आहे. ते अशक्तपणा दूर करते.

– ज्येष्ठमध सेवनाने कफ दूर होतो.

– ज्येष्ठमधाच्या रस घेतल्याने स्वरभंग दूर होऊ शकतो.

– अशक्तपणा असल्यास ज्येष्ठमधाचा तुकडा बारीक कुटून ते चूर्ण मध किंवा तूपातून जेवणापूर्वी खाण्यास द्यावे.

५. निरगुडी

बऱ्याच अजीर्ण आजारांवर ही वनस्पती गुणकारी आहे. या वनस्पतीचे तेल देखील उपयोगात आणले जाते. निरगुडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. छोटा निरगुडीचा वृक्ष ३ ते ७ मीटरपर्यंत वाढतो. कोवळ्या फांद्यावर, पानांच्या खालच्या बाजुला व मंजिऱ्यांवर पांढरे केस असतात

• औषधी उपयोग –

– स्नायु शिथिल आणि मोकळे होण्यासाठी या वनस्पतीच्या तेलाचा उपयोग करतात.

– स्नायूंचे दुखणे तसेच शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. संधिवात, त्वचा रोग, डोकेदुखी, इ. आजारांमध्ये देखील गुणकारी आहे.

– आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या रोगांसाठी निरगुडी शिलाजिताबरोबर दिल्यास चांगले असते.

Leave a Comment