Latest Marathi News | Daily Marathi News |
ऍशेस कसोटी _ तिसरा दिवस _
तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला अन् इंग्लंडच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. इंग्लंड मोठी धावसंख्या उभारेल अशी अपेक्षा होती. परंतु अवघ्या ४७ धावांत त्यांनी ६ गडी गमावले.
कालच्या २७८/४ या धावसंख्येवरून पुढे खेळाला सुरुवात करत इंग्लंडने आपले खेळाडू पटापट गमावले आणि त्यांचा डाव ३२५ धावांवर आटोपला. या डावात ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्कने सर्वाधिक ३ बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. वॉर्नर आणि ख्वाजाने मजबूत अर्धशतकी सलामी दिली. जम बसला असे वाटले असतानाच वॉर्नर २५ धावांवर जोश टाँगचा बळी ठरला. टाँगने त्याला पायचीत केले.
वॉर्नर गेल्यानंतर लबुशेन खेळपट्टीवर आला. त्याने आणि ख्वाजाने मिळून दुसऱ्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या. लबुशेन ३० धावांवर बाद झाला. त्याला जेम्स अँडरसनने हॅरी ब्रूकद्वारा झेलबाद करवले. संघाचा स्कोअर १३० असताना पाऊसाने हजेरी लावली आणि खेळ सुरूच झाला नाही.
ख्वाजा ५८ (१२३) आणि स्मिथ ६ (२४) धावांवर नाबाद आहेत. इंग्लंडतर्फे अँडरसन आणि टाँगने प्रत्येकी एक – एक बळी घेतला. चौथा दिवस हा दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण दिवस असणार आहे.
ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल तर इंग्लंडदेखील ऑस्ट्रेलियाला कमी धावसंख्येत रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.