प्रस्तुत लेखात गूगल अॅडसेन्स विषयी मराठी माहिती (AdSense meaning in Marathi) सांगण्यात आलेली आहे. यामध्ये अॅडसेन्स म्हणजे काय या मुद्द्याची विस्तृतपणे चर्चा करण्यात आलेली आहे.
ब्लॉगिंग आणि जाहिरात –
गूगल आणि इंटरनेट या बाबी आता सर्वांच्या माहितीच्या झालेल्या आहेत. इंटरनेटचा वापर करून आज सर्व प्रकारच्या ऑनलाईन स्तरावर जाहिराती करून पैसे कमावणे खूपच सोप्पे झालेले आहे. डिजिटल मार्केटिंगचा एक महत्त्वाचा भाग म्हणून व्यावसायिक पद्धतीच्या ब्लॉगिंगला सध्या जोरदार मागणी आहे.
डिजिटल मार्केटिंग करताना व्यवसाय अथवा माहितीच्या प्रसारासाठी वेबसाईट असणे अति महत्त्वाचे आहे. त्या वेबसाईटवर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या लेखाला (article) ब्लॉग असे म्हटले जाते. तो ब्लॉग सेवा अथवा वस्तूच्या जाहिरातीसाठी असू शकतो. काही ब्लॉग उत्तम माहिती / ज्ञान देणारे देखील असू शकतात.
ब्लॉगिंगची सुरुवात झाली होती तेव्हा सर्व बाबतीत माहिती प्रदर्शित करणे असा त्याचा हेतू होता. परंतु आता त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेले आहे. इंटरनेट माध्यमातून वेबसाईटवर ब्लॉग प्रदर्शित करून जाहिरात करणे आणि त्यातून नफा मिळवणे असा नवीन पैसे कमावण्याचा मार्ग तयार झालेला आहे.
अॅडसेन्स म्हणजे काय? What is AdSense in Marathi?
वेबसाईट अथवा ब्लॉगला जाहिराती पुरविण्याचे काम विविध जाहिरात करणाऱ्या कंपन्या करत असतात. जाहिरातीसाठी डिजिटल स्तरावर सर्वात अग्रगण्य असलेले नाव म्हणजे गूगल अॅडसेन्स! गूगल हे फक्त आता सर्च इंजिन म्हणून कार्यरत नाही तर ऑनलाईन मार्केटिंगच्या प्रत्येक क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहे.
आपली वेबसाईट किंवा ब्लॉग असेल तर गूगल
अॅडसेन्स तर्फे त्या ब्लॉगवरून जाहिरात प्रदर्शित होऊ शकते. वेबसाईट मालकाला ब्लॉगमधून पैसे कमवायचे असल्यास AdSense account उघडावे लागते आणि ते मालकाच्या ईमेल अकाउंटला जॉईन केले जाते.
एक व्यक्ती एकच अॅडसेन्स अकाउंट खोलू शकतो. त्यासाठी गूगल तर्फे त्या व्यक्तीचे ओळखपत्र आणि address व्हेरिफिकेशन देखील होत असते. एकदा गूगल टीम कडून ओळख पटली की आपले अॅडसेन्स खाते चालू केले जाते.
अॅडसेन्सद्वारे पैसे कसे कमावले जातात?
वेबसाईट चालवताना किंवा ब्लॉगिंग करताना आपल्याला जास्तीत जास्त visits कसे मिळू शकतील याचा विचार करावा लागतो. लोक इंटरनेटवर कोणता किवर्ड (keyword) सर्च करतात त्यानुसार आपला ब्लॉग प्रदर्शित असावा लागतो. असे असेल तर आपल्या वेबसाईटचा rank पहिल्या काही गूगल पेजेस वर येऊ शकतो.
एकदा का गूगलवर आपली वेबसाईट झळकली की त्यावर लोक भेट देतात. म्हणजेच त्या ब्लॉगवर क्लिक करतात. आता त्या ब्लॉगवर अॅडसेन्सतर्फे जाहिरात केलेली असते. जर लोकांना जाहिरात आपल्या फायद्याची वाटली तर ते जाहिरातीवर क्लिक करतात.
लोकांकडून केल्या जाणाऱ्या अशा क्लिक मार्फत आपल्याला गूगल अॅडसेन्स त्यांच्या फायद्याचा काही भाग आपल्याला देतात. तो मिळणारा नफा हा अमेरिकन डॉलरमध्ये असतो. त्यामध्ये प्रामुख्याने पेमेंट हे ऑनलाईन स्वरूपाचे असते म्हणून आपल्याला आपली बँक डिटेल्स गूगलला द्यावी लागतात.
जो व्यक्ती वेबसाईटला भेट देणार आहे त्याला जाहिरात दिसणे अत्यावश्यक आहे नाहीतर तो क्लिक कसा काय करणार? यासाठी हेडर, फुटर किंवा ब्लॉगच्या मध्यभागी जाहिरात आपण प्लेस करू शकतो. जाहिरातीचा कोड असतो तो जाहिरात हवी असेल अशा जागेवर टाकावा लागतो. जर हा मार्ग अवघड वाटत असेल ऑटो एडस् हा ऑप्शनदेखील उपयुक्त ठरतो.
तुम्हाला गूगल अॅडसेन्स – मराठी माहिती (AdSense meaning in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…