रुग्णवाहिकेअभावी अभिनेत्रीचा मृत्यू

काही घटना अशा अनाकलनीय घडतात की ज्यांचा पाठपुरावा करणे आणि त्यातील सत्यता जाणणे अवघड होऊन जाते. हिंगोली जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. पूजा झुंजार असे नाव असलेल्या अभिनेत्रीचा मृत्यू याचेच उदाहरण आहे. प्रकृती व अचानक उद्भवलेली संकटे यामुळे तिचा मृत्यू झाला असा सर्वांचा समज आहे.

रुग्णवाहिका जर लवकर आली असती तर कदाचित तिचे प्राण वाचू शकले असते. परंतु केलेल्या प्रयत्नांना कुणीही नाकारू शकत नव्हते. स्थानिक नातेवाईकांची मदत आणि डॉक्टरांचे प्रयत्न हे अतुलनीय होते परंतु काळाचा घाला या अभिनेत्रीवर आला आणि सर्वकाही समाप्त झाले.

घटनाक्रम-

१. हिंगोली जिल्ह्यातील घटना. पूजा झुंजार असे या मराठी अभिनेत्रीचे नाव. २ मराठी चित्रपटात काम केलेले आहे.
२. अचानक पोटात कळा येऊ लागल्याने प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला नेण्यात आले.
३. तिथे तिने मुलाला जन्म दिला पण लहान मुलाचा मृत्यू झाला आणि तिची प्रकृती खूप खालावली.
४. डॉक्टरांनी शहरात नेण्याचा सल्ला दिला.
५. हिंगोली जिल्ह्यात शहरातील दवाखान्या पासून अभिनेत्रीचे ठिकाण ४० किलोमीटर लांब होते.
६. यादरम्यान रुग्णवाहिका आणताना उशीर झाल्याने त्या अभिनेत्रीचा मृत्यू झाला.
७. नातेवाईक या सर्व घटनेत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला जबाबदार धरत आहेत.

सत्य काय?

सत्य काय हे फक्त नातेवाईक आणि डॉक्टरच जाणतात. प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्याने रुग्णवाहिकाच मृत्यूला जबाबदार आहे? का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्या बाबतीत सर्व जण स्वतःचे तर्क व कूतर्क लावत आहेत.

हे सुद्धा वाचा- “देव सगळ्यांच्या जोड्या वरच बनवतो” सगळ्यात मोठी अफवा!

Leave a Comment