प्रस्तुत लेख हा रिंकू सिंग या क्रिकेटपटू विषयी मराठी माहिती आहे. आयपीएलमधील त्याची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय अशी असल्याने त्याच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेणे सर्वांनाच आवडेल.
रिंकू सिंग _ Rinku Singh Information in Marathi _
रातोरात प्रसिद्ध झालेले अनेक लोक आपण पाहिले आहेत, यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे ते नाव म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स संघातील स्टार क्रिकेटर रिंकू सिंग!
आयपीएलच्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या 5 चेंडूत सलग 5 षटकार ठोकणारा हा खेळाडू आता चर्चेचा विषय ठरला आहे.
रिंकू सिंगचा जीवन परिचय _
रिंकू सिंग हा भारतातील उत्तरप्रदेश राज्यातील आहे. रिंकू सिंगचे संपूर्ण नाव ठाकूर रिंकू खानचंद्र सिंग असे आहे. त्याचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 मध्ये अलिगढ, उत्तरप्रदेश मध्ये झाला. त्याच्या आईचे नाव विनादेवी सिंग असून त्या गृहिणी आहेत तर वडिलांचे नाव खानचंद्र सिंग आहे.
रिंकू सिंगला एक भाऊ आणि एक बहिण आहे. एकाचे नाव जितू सिंग असून तो ऑटो रिक्षा चालवायचे काम करत असे तर बहिणीचे नाव नेहा सिंग आहे. रिंकू सिंगने अलिगढ मधूनच शिक्षण घेतले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तो नववीपर्यंतच शिक्षण घेऊ शकला.
रिंकू सिंगची क्रिकेट कारकीर्द
घरची परिस्थिती नाजूक असताना देखील रिंकू त्याच्या स्वप्नानसोबत बिलगून राहिला आणि क्रिकेट खेळत राहिला. त्याच्या मेहनतीच्या जोरावर 5 मार्च 2014 रोजी उत्तरप्रदेशच्या देशांतर्गत संघाच्यावतीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
त्याने पहिल्याच सामन्यात खूप चांगली कामगिरी बजावली. या सामन्यात रिंकुने 84 धावांची खेळी केली. देशांतर्गत संघातून खेळताना रिंकुला उत्तरप्रदेशच्या अंडर 19 आणि अंडर 23 संघातही खेळण्याची संधी मिळाली.
5 नोहेंबर 2016 रोजी रिंकूने रणजी ट्रॉफीचा पहिला सामना खेळला. रणजी ट्रॉफीच्या 2016-2017 च्या हंगामात रिंकू सिंगने 40 सामन्यांमध्ये प्रभावी एकूण 2875 धावा केल्या. दरम्यान रिंकुनेही सर्वाधिक 163 धावा केल्या.
2017 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर रिंकूचे भाग्य खऱ्या अर्थाने पालटले. KKR ने रिंकुवर बोली लावून त्याला खरेदी केले. त्यानंतर रिंकू खऱ्या अर्थाने गरिबीतून बाहेर आला.
2017 मध्ये पंजाब टीमने दहा लाखांच्या बेस प्राईसवर रिंकूला खरेदी केलं, त्यावर्षी तो एकच मॅच खेळू शकला. 2018 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने रिंकू सोबत करार केला.2018 मध्ये KKR ने रींकुला खरेदी केला मात्र तो टीममध्ये आपली जागा नाही बनवू शकला.
2022 च्या आयपीएलमध्ये मात्र रिंकूने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने आपली जागा बनवली. काही महत्त्वपूर्ण सामन्यांत उत्तम कामगिरी बजावत त्याने फिनिशर म्हणून आपले स्थान KKR संघात मजबूत केलेले आहे.
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात रिंकूने 5 चेंडूत सलग पाच षटकार खेचत सामना जिंकून दिल्याने त्याचे नाव संपूर्ण क्रिकेट विश्वात प्रसिद्ध झाले.
तुम्हाला रिंकू सिंग विषयी दिलेली मराठी माहिती (Rinku Singh Marathi Mahiti) आवडल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…