विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मानवी जीवनात उपयोग होण्यामागे अभियंता हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. अभियंता या पदाचा पुरस्कार व्हावा आणि त्याचे महत्त्व सर्वांना समजावे यासाठी अभियंता दिन साजरा केला जातो.
प्रस्तुत लेख हा अभियंता दिन (Engineers Day Marathi Nibandh 10 Oli) या विषयावर आधारित १० ओळींचा मराठी निबंध आहे. या निबंधात अभियंता दिनाचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे तसेच तो कधी व कसा साजरा केला जातो या मुद्द्यांची चर्चा करण्यात आलेली आहे.
अभियंता दिन – १० ओळी मराठी निबंध | Abhiyanta Din 10 Oli Nibandh Marathi |
१. महान भारतीय अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजे १५ सप्टेंबर या दिवशी अभियंता दिवस साजरा केला जातो.
२. जलविकास क्षेत्रातील अभियंता म्हणून एम. विश्वेश्वरय्या यांची कामगिरी ही असाधारण स्वरूपाची होती.
३. जलसिंचन, नदी – बंधारे, धरण अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांतील एम. विश्वेश्वरय्या यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते.
४. कोणताही वैज्ञानिक नियम किंवा तांत्रिक शोध हा दैनंदिन जीवनात उपयोगात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अभियंते करत असतात.
५. औद्योगिक क्षेत्रात अभियंता कार्यरत असल्यामुळे तंत्रज्ञान विकास शक्य झालेला आहे.
६. अभियंत्याचे महत्त्व जाणून अभियंता दिनादिवशी सर्व अभियंत्यांचे अभिनंदन केले जाते व त्यांच्या कार्याचा पुरस्कार केला जातो.
७. अभियंता दिनादिवशी औद्योगिक क्षेत्रात सर्व अभियंत्यांना त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करून देऊन त्यांचा सन्मान केला जातो.
८. शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था तसेच अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये अभियंता दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
९. अभियंता दिनादिवशी एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते आणि त्यांच्या
जीवनकार्याबद्दल विद्यार्थी भाषण व निबंध सादर करतात.
१०. अभियंता दिनादिवशी विविध सांस्कृतिक व अभियांत्रिकी उपक्रम देखील साजरे केले जातात.
तुम्हाला अभियंता दिन हा १० ओळींचा मराठी निबंध (Engineers Day 10 Lines Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…