सध्या बोलणे कमी आणि मोबाईल वर चॅटिंग जास्त केले जाते. सकाळ, दुपार आणि रात्री फक्त संदेश आणि संदेश! त्याचा विचार करूनच प्रस्तुत लेखात शुभ दुपार संदेश (Good Afternoon Quotes) मांडलेले आहेत जे तुमची दुपार आनंदी आणि प्रसन्न करून जातील.
Good Afternoon Quotes, Messages In Marathi | शुभ दुपार संदेश |
मन चंचल आहे, परंतु जगण्यातून चंचलतेचा अनुभव घेण्यासाठी स्वभाव स्थिर असणे गरजेचे आहे.
🌺💐Good Afternoon💐🌺
वेळेची आणि जीवनाची किंमत कळण्यासाठी कामाचे नियोजन पार पाडून दाखवा… दुपारचा आनंद घ्या आणि कार्यमग्न राहा.
🌺💐Good Afternoon💐🌺
स्वतःच्या कामात संपूर्ण तीव्रता आणि समर्पण असल्यास आपण जीवनाचा सुखद अनुभव घेऊ शकतो.
🌺💐Good Afternoon💐🌺
ऊन आणि पाऊस हे दोन्ही परस्परविरोधी जाणवतात तर थंडी ही त्यांचा मध्य असते. तसेच प्रत्येक ऋतूत दुपार ही वेगवेगळी असली तरी सकाळ आणि रात्रीचा तो मध्य असतो.
🌺💐Good Afternoon💐🌺
अस्तित्व कोणत्याच स्वरूपात काहीही वेगळे नाही. फक्त आपला अहंकार आणि स्वार्थी वृत्ती स्वतःला वेगळे मानते. त्यातूनच खरे दुःख आणि पीडा अनुभवात येते. त्यामुळे एका सुखी जीवनाची आशा करताना नेहमी सर्वांप्रती एकतेची आणि समानतेची वागणूक ठेवा…
🌺💐Good Afternoon💐🌺
आयुष्याचा मध्य हा दुपारप्रमाणे असतो. तप्त आणि ज्वलंत!
🌺💐Good Afternoon💐🌺
आनंद दिल्याने आनंद, सुख दिल्याने सुख तर ध्यान दिल्याने ध्यान वाढते.
🌺💐Good Afternoon💐🌺
सूर्याचा प्रत्येक किरण कितीतरी ऊर्जावान असतो. तसेच स्वतःचे आयुष्य देखील उर्जावान असले पाहिजे. तेव्हाच निसर्गाशी समतोल राखत एक स्फूर्तिदायी जीवन आपण जगू शकतो.
🌺💐Good Afternoon💐🌺
काळजी आणि भीती या दोन्हीत फरक आहे. घेतली जाणारी काळजी ही बोलल्या जाणाऱ्या भीतीपेक्षा श्रेष्ठ असते.
🌺💐Good Afternoon💐🌺
विचारांचा झंझावात हा प्रखरतेने जीवनाच्या मध्यावर आढळतो जशी संपूर्ण तप्त ऊर्जा आपल्याला दुपारी जाणवते.
🌺💐Good Afternoon💐🌺
जिव्हाळा हा आंतरिक असतो. तो जाणवतो. त्याची वाच्यता केल्यास मात्र स्वतंत्रता नाहीशी होऊ शकते.
🌺💐Good Afternoon💐🌺
दुपार ही कर्तव्याची आणि संघर्षाची वेळ असते. जशी उष्णता आणि ऊर्जा आपल्याला वातावरणात आढळते तशीच कर्माची ऊर्जा आपल्या जीवनात देखील असली पाहिजे.
🌺💐Good Afternoon💐🌺
दुपारी आळस दाखवलात तर संघर्षाला तुम्ही टाळत असता. जीवनाच्या मध्यात जेव्हा संघर्ष असतो, तेव्हा जर मागे हटलात तर जीवनाचा शेवट हा दुःखमय असेल, हे ध्यानात ठेवा.
🌺💐Good Afternoon💐🌺
जीवनात सर्व ऋतु आणि सर्व काळ समाविष्ट आहेत. हसरी सकाळ, संघर्षमय दुपार, संयमी सायंकाळ आणि शांत रात्र, असे सर्व काही एकत्र मिळून जीवन बनत असते.
🌺💐Good Afternoon💐🌺
मैत्री फुलावी आणि जीवन घडत जावे.
🌺💐Good Afternoon💐🌺
ध्येय नेहमी आटोक्यातील ठरवा… ते पूर्ण झाल्यानंतर पुढचे ध्येय ठरवा.
🌺💐Good Afternoon💐🌺
कर्माची सुसंगतता जीवनात असली पाहिजे. सकाळचे कर्म, दुपारचे कर्म आणि रात्रीचे कर्म हे वेगवेगळे असणे अपेक्षित असते.
🌺💐Good Afternoon💐🌺
प्रेम आयुष्यात नेहमीच प्रथम असले पाहिजे. जीवनाची प्राथमिकताच तुमचे कर्म निश्चित करेल आणि ते कर्म करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळत राहील.
🌺💐Good Afternoon💐🌺
सदा सर्वदा शिक्षणाची आस मनात जागवा. वेळ कोणतीही असो, परिस्थिती कशीही असो, नवीन काही ना काही शिकत राहणे हे माणसाचे कर्तव्य आहे.
🌺💐Good Afternoon💐🌺
जीवन आंतरिकदृष्ट्या सर्वकाळ एकच आहे, याची जाणीव झाली की पूर्ण दिवस आल्हाददायक वाटतो.
🌺💐Good Afternoon💐🌺
सुख आणि दुःख ही मानसिक स्थिती असते. रात्र संपल्यानंतर जशी सकाळ, दुपार आणि सायंकाळ होत असते तसेच मनाची स्थिती देखील वारंवार बदलत राहते.
🌺💐Good Afternoon💐🌺
जर जीवनाच्या सुरुवातीला कष्ट सहन केले नाहीत तर जीवनाच्या उत्तरार्धात संघर्ष अपेक्षित आणि अटळ आहे.
🌺💐Good Afternoon💐🌺
सुख मिळवण्यासाठी नाही तर संघर्षासाठी प्रयत्न करा. संघर्षातून विकास आहे आणि सुख हा त्याचा परिणाम आहे.
🌺💐Good Afternoon💐🌺
आनंदाचा झरा वाहू लागला की सर्व काळ आणि सर्व वेळ हे एकसारखे वाटतात.
🌺💐Good Afternoon💐🌺
जीवनाचा मध्य म्हणजे दिवसाची दुपार समजा. जेवढा प्रखर सूर्यप्रकाश जाणवतो तेवढीच प्रखर कार्याची तीव्रता असली पाहिजे.
🌺💐Good Afternoon💐🌺
कर्माची व्याख्या ही व्यक्ती परत्वे वेगवेगळी असते. काहीजण अकर्मातून कर्म जाणतात तर काहीजण कर्मातून अकर्म जाणतात.
🌺💐Good Afternoon💐🌺
जीवनात सुखाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. सुख अथवा दुःख मिळेल हे परिस्थिती आणि दुसऱ्या व्यक्तींवर अवलंबून आहे. आनंदी आणि प्रसन्न राहणे हे मात्र तुमच्या हातात आहे.
🌺💐Good Afternoon💐🌺
संपूर्ण सुविचार वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला जर शुभ दुपार संदेश (Good Afternoon quotes in Marathi) आवडले असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…