हळदी कुंकू लावणे ही प्रथा आपण वारंवार आपल्या आसपास बघत असतो परंतु त्याचे महत्त्व आणि धार्मिक संकल्पना काय आहे हे अनेकांना माहीत नसते. प्रस्तुत लेखात आम्ही हळदी कुंकू प्रथेबद्दल माहिती (Haldi Kunku Information In Marathi) दिली आहे.
हळदी कुंकू प्रथा माहिती | Haldi Kunku Marathi Mahiti |
लहानपणापासून आपण सर्वजण प्रत्येक सणाला विशिष्ट काही प्रथा साजऱ्या करत असतो. त्यामध्ये नारळ फोडणे, नैवेद्य दाखवणे, अगरबत्ती लावणे, झाडांची पाने फुले अर्पण करणे, हळदी कुंकू लावणे असे विविध उपक्रम सार्वजनिकरित्या साजरे केले जातात.
हळदी कुंकू लावणे ही प्रथा विशेष करून महिलांशी निगडित आहे. भारतीय समाजात आणि महाराष्ट्रात देखील स्त्री ही लग्नानंतर एका विशिष्ट कार्यभार पद्धतीने वागवली जाते. त्यामध्ये पतीचे लेणे म्हणजे सौभाग्य जसे की मंगळसूत्र, कपाळी कुंकू, पायातील बोटांत जोडवी, हातात बांगड्या हे सर्व शरीरावर परिधान केले जाते.
धार्मिक संकल्पनेनुसार जेथे कुंकू लावले जाते तेथे प्रत्येक मानवाचे आज्ञा चक्र असते. त्या चक्रावर जर सतत स्पर्श होत राहिला आणि त्याचवेळी जी आज्ञा दिलेली असते त्याचा कधीही विसर पडत नाही. भारतीय स्त्री ही कधीही एकटी असल्याचा इतिहास नाही. तिला अर्धांगिनी म्हणूनच ओळखले जाते.
पती हा परमेश्वर असणे आणि पतीशी कायम सलगी ठेवणे हे सहज घडू शकत नाही त्यासाठी खूप मोठी परंपरा आणि संस्कृती हिंदू धर्मात पाळली गेली आहे. लग्नावेळी आणि त्यानंतर आयुष्यभर कपाळी कुंकू लावणे म्हणजे पतीशी एकनिष्ठ राहणे आणि पतीला न सोडण्याची भावना वृद्धिंगत केली जाते.
एकदा लग्न झाल्यानंतर स्त्रीची जी कर्तव्ये आहेत आणि तिचा जसा स्वभाव आहे तो कुटुंबात सहजरित्या सांभाळला जातो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात आणि समाजात सुवासिनी महिला एकत्र आल्या की हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात.
हळदी कुंकू लावणे हे प्रत्येक वेळी आज्ञा चक्रावर स्पर्श करीत राहणे याचे द्योतक आहे. तसेच ओटी भरणे, पान सुपारी देणे अशी प्रथा देखील हिंदू धर्मात साजरी केली जाते. भारतात प्रत्येक महिन्यात दोन तरी सण असतातच त्यामुळे त्या सणांवेळी महिला वर्ग आपापल्या पद्धतीने काही प्रथा निभावत असतो. त्यामध्ये हळदी कुंकू लावणे हे नियोजितच असते.
चैत्र गौरी, वटपौर्णिमा, गुढीपाडवा, मकर संक्रांत, गौरी गणपती, विजयादशमी, शारदीय नवरात्र, दिवाळी लक्ष्मीपूजन, नागपंचमी, सत्यनारायण पूजा, मार्गशीर्ष गुरुवार व्रत, अशा सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक सणांमध्ये हळदी कुंकू लावलेच जाते.
भारतीय हिंदू स्त्री ही फक्त स्त्री तत्व नाही तर ती जगण्याचे,उत्साहाचे आणि उत्सवाचे प्रतिक आहे. हळदी कुंकू लावणे ही त्यामधीलच एक कृती आहे. त्या कृतीचे धार्मिक, आध्यात्मिक, आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
तुम्हाला हळदी कुंकू माहिती (Haldi Kunku Information In Marathi) हा लेख कसा वाटला त्याबद्दल तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा..
Haladi kunku he pati chya dirghayushasathi kele jate ka?
Yes