ढोकळा थोडासा आंबट अशा चवीचा नाश्त्यासाठी खूपच उत्तम असा पदार्थ आहे. ढोकळा खाताना जसा हळूहळू खावा लागतो नाहीतर घास लागतो. त्याप्रमाणे बनवताना देखील काळजी घ्यावी लागते. नाहीतर पीठ खाल्ल्यागत वाटते. उत्तम प्रकारे आपण ढोकळा कसा बनवू शकतो याची माहिती आम्ही या recipe in Marathi मध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की याचा लाभ घेऊ शकता आणि नाश्त्याचा बेत करू शकता.
Dhokala recipe ingredients
साहित्य
१. बेसन पीठ १ वाटी
२. रवा २ चमचे.
३. ताक १ वाटी
४. तेल १ चमचा
५. खायचा सोडा २ चमचे. ( किंवा इनो )
६. साखर १ चमचा.
७. २ चमचे लिंबाचा रस
८. थोडेसे पाणी
९. हळद २ चमचे
१०. आले आणि मिरची पेस्ट – २ चमचे
११. चवीपुरते मीठ
फोडणीसाठी साहित्य :
१. तेल १ चमचा
२. मोहरी अर्धा चमचा
३. हिंग अर्धा चमचा
४. हिरव्या मिरच्या – २
Dhokala Recipe in Marathi process
कृती :
१. बेसन पीठ , रवा, साखर, आले – मिरची पेस्ट, हळद, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा तेल , चवीपुरते मीठ हे सर्व साहित्य घेऊन एकत्र मिसळा.
२. ताक टाका.
३. तयार झालेले मिश्रण बाजूला ठेवावे.
४. एक मोठा टोप घ्यावा त्यात २ ग्लास पाणी ओतावे. तो टोप आता गॅसवर ठेवा.
५.. एक लहानसे भांडे घ्या.( मोठ्या टोपात बसेल असे) त्याला आतून तेल लावा.
६. आता तयार केलेल्या मिश्रणात सोडा किंवा इनो टाका. पटापट मिश्रण ढवळून घ्या. मिश्रण फसफसते. हे मिश्रण तेल लावलेल्या छोट्या भांड्यात ओतून घ्या.
७. आता हे भांडे गॅसवर ठेवलेल्या मोठ्या टोपात ठेवा. वरून कापड लावलेले झाकण ठेवा.
८. कमीत कमी २० मिनिटे वाफ काढावी. वाफ कापडाला लागेल व पाण्याचे थेंब मिश्रणात पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
९. झाकण उचलू नये. अंदाज घेऊनच योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करा. पाणी उकळून संपले तर ढोकळा भांड्यात करपू शकतो.
१०. आता दुसऱ्या शेगडीवर फोडणीसाठी अर्धा चमचा तेल, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हिंग व मोहरी टाकावी. फोडणी थोडी थंड होऊ द्यावी.
११. एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा साखर घ्यावी. हे मिश्रण फोडणीत टाकावे.
१२. सर्व फोडणी आता वेगळ्या भांड्यात काढून घ्या. १५ मिनिटांनी गॅस बंद करा. ढोकळा थोडा थंड झाला की सुरीने कापून घ्यावा. आता फोडणी ढोकळ्यात हळूहळू पसरावी. ढोकळा आता चटणीबरोबर सर्व्ह करू शकता.
टोमॅटोची चटणी किंवा चिंचेच्या पाण्याबरोबर ढोकळा छान लागतो.
टीप –
- मोठ्या टोपा ऐवजी तुम्ही झाकण असलेला पॅन वापरू शकता.
- खायच्या सोड्याऐवजी ईनो वापरला तरी चालेल.