धकाधकीच्या जीवनात आज कोणाकडेच स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये. असे असताना आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ही चिंताजनक बाब आहे.आपले केमिकल्स, गोळ्या यांचे सेवन अशा प्रमाणात वाढले आहे की आपण साधेसुधे घरगुती उपाय करणे विसरूनच जातो. आपल्याला चटकन रिझल्ट हवा असल्याने आपण हे उपाय करतो परंतु त्याचे दीर्घकालीन वाईट परिणाम आपल्याला माहित नसतात.
आज मी तुम्हाला गुळवेल (Giloy) या आयुर्वेदिक वनस्पतीबद्दल माहिती देणार आहे जी वाचून तुम्ही नक्कीच तुमच्या बागेत, परिसरात, गुळवेलची लागवड कराल. इंग्रजीमध्ये गिलोय या नावाने प्रसिद्ध असलेल्या या वनस्पतीचे आयुर्वेदिक गुणधर्म आता पूर्ण जगभरात पसरू लागले आहेत. परंतु खूप हजार वर्षांपूर्वीच आयुर्वेदात गुळवेल या वनस्पतीबद्दल लिहून ठेवले आहे.
अशा या बहुउपयोगी “गुळवेल” वनस्पतीबद्दल आपण सविस्तर पणे जाणून घेणार आहोत. गुळवेलाचे सेवन कसे करावे? किती प्रमाणात करावे? याबद्दल देखील आढावा घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे त्याचे फायदे व दुष्परिणाम देखील सांगण्यात आले आहेत.
Table of Contents
• गुळवेल किंवा गुळवेल सत्त्व म्हणजे काय? (What is Giloy or Giloy satva)
गुळवेल म्हणजेच गुडुची वनस्पती. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया ( Tinospora cordifolia) असे आहे. या वनस्पतीला अमृतवेल असेही म्हणतात. या वनस्पतीच्या सत्त्वाचा वापर विविध प्रकारच्या औषधात केला जातो. गुळवेल सत्त्व असे देखील याला म्हटले जाते.
उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये म्हणजे दक्षिण आशियामध्ये ही वनस्पती आढळते. ह्यात प्रामुख्याने भारत, श्रीलंका आणि म्यानमार या देशांचा समावेश होतो.
ह्या वनस्पतीला अमृतवेल असेही म्हणतात. या वनस्पतीच्या सत्त्वाचा वापर औषध म्हणून केला जातो. ज्याला गुळवेलसत्त्व असे म्हंटले जाते.
महाराष्ट्रामध्ये गुळवेल ही वनस्पती सर्वत्र आढळते. गुळवेल हा आकाराने मोठा असतो. मोठ्या झाडांवर किंवा कुंपणावर देखील पसरते. या वनस्पतीचे खोड खूप जाड असते. पान हे हृदयाकृती असते. पाने हाताला गुळगुळीत जाणवतात आणि फुले ही पिवळी हिरवी अशी असतात. फळे ही छोटी गोलाकार आकारात असतात. फुले व फळे येण्याचा काळ हा साधारणतः नोव्हेंबर ते जून दरम्यान असतो.
• गुळवेल घनवटी ( Giloy Ghanvati )
- गुळवेल वेलीचे सत्व काढून त्यापासून गोळ्या बनवल्या जातात त्याला गुळवेल घनवटी असे म्हटले जाते.
- गूळवेलाचा प्रथम अर्क काढला जातो. या अर्कालाच आयुर्वेदामध्ये ‘ घन ‘ असे संबोधले जाते. घन बनवण्यासाठी गुळवेलाच्या फांद्या वेगळ्या काढून कुटतात. थोड्या वेळासाठी त्या पाण्यात ठेवल्या जातात.
- थोडे समरस झाल्यावर त्यापासून काढा बनवला जातो. काढा नंतर गरम करून घट्ट होईपर्यंत उकळला जातो. या सर्व प्रक्रियेला वेळ द्यावा लागतो.
- घट्ट झाल्यावर काढा उन्हात ठेवला जातो. गोळ्या बनवल्या जातील असा घट्ट झाल्यावर त्याला व्यवस्थित उन्हातून काढून बाजूला घेतात. नंतर घनवटी म्हणजेच गोळ्या बनवल्या जातात.
- गुळवेल उष्णता शामक असल्याने सर्व प्रकारच्या तापांमध्ये गुणकारी आहे. ही घनवटी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते. तसेच घनवटी बुद्धिवर्धक, शक्तिवर्धक आणि आयुवर्धक आहे. तसेच कावीळ, त्वचारोग, खोकला, भूक न लागणे या आजारांवर देखील गुळवेल घनवटी उपयोगी आहे.
• गुळवेल – उपयोग आणि औषधी गुणधर्म
गुळवेल वनस्पतीचा औषधी उपयोग खूप प्रकारे केला जातो. खाली काही आजारांची माहिती दिलेली आहे ज्यामध्ये गुळवेल वापरला जाऊ शकतो.
आयुर्वेदिक संदर्भ आणि आधुनिक मेडिकल प्रमाणित असे गुणधर्म गुळवेल दर्शवते.
१. रोगप्रतिकारशक्ती
गुळवेलीचे सेवन म्हणजे घनवटी किंवा काढा घेतल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. साथीचे आजार तुम्हाला सहजासहजी होणारच नाहीत.
२. मधुमेह
गुळवेलमध्ये हाइपोग्लिसीमिक हे साखर कमी करणारे घटक असतात. या घटकांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते. ज्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात येऊ शकतो. मधुमेही गुळवेल काढा नियमित सल्ल्यानुसार घेऊ शकतात.
३. ताप
जीर्ण ताप तसेच कोणत्याही तापात गुळवेल म्हणजे वरदानच आहे. तापावरील औषधांमध्ये याचा उपयोग केला जातो.
४. पचनक्रिया सुधारते.
पचनक्रिया बिघडण्यामागे खूप कारणे आहेत. परंतु त्यावर एक रामबाण उपाय म्हणजे गुळवेल. पचनक्रिया सुधारणे आणि शरीरातील विषाणू बाहेर टाकण्याचे काम गुळवेल करते. घन वटी किंवा काढा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्यास पोट बिघडण्याच्या समस्येपासून कायमची सुटका मिळवू शकता.
५. खोकला
खोकला खूप जुना असल्यास तुम्ही गुळवेल घेऊ शकता. काढा दररोज घेतल्यास काही दिवसातच खोकल्यापासून सुटका मिळते.
६. दृष्टी सुधारते
गुळवेल उगाळून तो काढा किंवा त्यातील वरवरचे पाणी डोळ्याला लावल्यास दृष्टी सुधारते. सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या समस्या दूर होतात. चष्म्याचा नंबर देखील कमी झाल्याचा खूप लोकांचा अनुभव आहे. आवळा रस आणि गुळवेल काढा एकत्र करून प्यायल्यास नजर तीक्ष्ण होते.
• गुळवेलाचे फायदे –
- पचनक्रिया सुधारून रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
- स्मरणशक्ती सुधारते
- कावीळ आजारात गुणकारी. कावीळ आजारात आलेला अशक्तपणा गुळवेल घेतल्याने दूर होतो.
- हातापायांची जळजळ थांबवते.
- पोटाच्या सर्व तक्रारींवर गुणकारी.
- सर्व रक्तदोष दूर करते. त्यामुळे त्वचाविकार बरे होण्यास मदत होते.
• गुळवेलाच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम –
- या वनस्पतीचे दुष्परिणाम काहीच नाहीत. परंतु अति सेवन टाळावे आणि विविध काळात जर दुसरे उपचार चालू असतील तर याचे सेवन टाळा.
- कोणत्याही प्रकारे गुळवेलाचे सेवन पूर्ण माहितीनुसार करा नाहीतर दुष्परिणाम होतीलच .
- अति केल्याने पोटाचा त्रास उद्भवू शकतो.
- मधुमेहाचे उपचार चालू असतील तर गुळवेलाचे सेवन करू नका.
• गुळवेल काढा ( giloy juice )
गुळवेलाची वनस्पती पूर्णपणे न तोडता त्याचा मांसल भाग म्हणजेच खोड आणावे. त्याला कुटून घ्यावे. कुटताना जास्त रस वाया जाऊ देऊ नये. कुटलेली साल, त्याचे छोटे छोटे तुकडे करून एका कपात घ्यावी. एका छोट्या भांड्यात पाणी घ्यावे. पाण्यात कुटलेली साल टाकावी. हे मिश्रण उकळून घ्यावे. हा काढा खूप कडू असतो.
टीप :
(” अमृता ” असे संबोधन असलेली ही वनस्पती अत्यंत लाभदायक आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच याचे सेवन करावे. दिलेली सर्व माहिती संदर्भानुसार आहे.)