Shevga information in Marathi | शेवगा झाड माहिती आणि लागवड.

शेवगा लागवड महाराष्ट्रात आता रुजू लागली आहे. व्यापारी दृष्टीने शेवग्याची लागवड मागील काही वर्षात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली आहे. अनेक दृष्टिकोन तपासल्यावर केली जाणारी ही लागवड कशी फायदेशीर आहे आणि शेवगा झाडाबद्दल सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. या पिकाची लागवड दक्षिण भारतात प्रामुख्याने केली जाते.

शेवगा जर तुम्ही विकत घ्यायला गेला तर त्याचे दर सुद्धा तरकारी भाजी प्रमाणे स्थिर असतात किंवा वाढतात. शेवगा हा स्थिर उत्पन्न देणारा एक मार्ग बनला आहे. आता तंत्रज्ञान आणि दळणवळण वाढल्याने तुम्ही तुमचा शेवगा मोठ्या बाजारपेठेत देखील विकू शकता.

Table of Contents

सुधारित शेवग्याच्या जाती :

ओडिसी –
शेंगा जाड असतात. या शेंगांना बाजारभाव देखील चांगला आहे. शेंगांचे उत्पन्न तसे कमी आहे परंतु वर्षातून दोनदा बहर येतो. वर्षाला एका झाडापासून ३० किलो पर्यंत शेंगा मिळतात.

पी के एम-१ (कोईमतूर-१) आणि
पी के एम-२ (कोईमतूर-२) –
या जातीच्या शेंगा पौष्टिक असतात आणि काढणीचा काळ देखील लवकर असतो. या शेंगा तामिळनाडू कृषी विद्यापीठातर्फे प्रसारित केल्या जातात.

भाग्या (के. डी. एम.- ०१) –
या शेंगांची चव उत्तम असून २५० शेंगा प्रती झाड एका वर्षात मिळतात.कर्नाटकातील बागलकोट कृषी विद्यापीठातर्फे ही जात प्रसारित केली जाते.

कोकण रुचिरा – उत्पादन भरपूर मिळते. एका झाडापासून एका वर्षात ४० किलोपर्यंत उत्पन्न मिळते. या शेंगा कोकण कृषी विद्यापीठा तर्फे प्रसारित केल्या जातात.

• शेवगा लागवड प्रकल्प –

हा प्रकल्प तुम्हाला योग्य उत्पन्न मिळवून देईलच शिवाय शेवग्याची पाने, फुले सतत गळत असल्याने जमिनीचा कस आणि पोत टिकून रहण्यासाठी राहते. जास्त रासायनिक खते, कीटकनाशके मारायची गरज नसते. खालील मुद्दे तुम्हाला लागवडी दरम्यान उपयोगी पडतील.

१. हवामान –

तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नसले पाहिजे. नाहीतर फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होते. या झाडास लागणाऱ्या फुलांची संख्या जास्त असते. परंतु गळण्याचे प्रमाण जास्त असल्याने तुम्हाला याची लागवड समशीतोष्ण किंवा दमट हवामानात करावी लागेल. तापमान ३५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नसले पाहिजे तसेच अतिथंड प्रदेशात देखील हे झाड लावू नये.

• जमीन व लागवडीचा काळ –

जमीन निवडताना जास्त काळवट जमीन निवडू नये. पाण्याचा योग्य निचरा होईल अशा प्रकारची जमीन निवडावी. जून – जुलै महिन्यात कोरडवाहू जमीन किंवा कमी पावसाच्या क्षेत्रात शेवग्याची लागवड उत्तम ठरते.

अति पावसाच्या क्षेत्रात तुम्ही ही लागवड पुढे ढकलू शकता. साधारणतः ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये लागवड करून घ्यावी. उत्पन्नाच्या दृष्टीने लागवड करावयाची
असल्यास २ फूट खोल खड्डे खणावे. त्यामध्ये शेणखत आणि अन्य रासायनिक खत ( कृषी माल विक्रेता मार्गदर्शनानुसार ) टाकावे. दोन झाडांतील अंतर २.५ × २.५ मी. ठेवावे. जमिनीचा पोत चांगला असल्यास हे अंतर वाढवावे. ३.० × ३.० मी. ठेवावे.

• काढणीचा काळ

शेवगा जातीनुसार जास्तीत जास्त ५ – ६ महिन्यांत झाडाला शेंगा येतात. त्यानंतर तोडणी ३ ते ४ महिने असते. शेंगा मांसल, हिरव्यागार आणि मध्यम अवस्थेत तोडव्या. त्यांना कोवळा शेवगा म्हटले जाते. याला बाजारात मागणी देखील असते. शेंगा टिकवण्यासाठी ओल्या कापडात, पोत्यात गुंडाळून ठेवाव्या. एका वर्षात एका झाडापासून साधारणतः ३० किलोपर्यंत शेंगा मिळतात. जमीन पोषक असेल तर जास्त प्रमाणात पण शेंगा मिळू शकतात.

• घ्यावयाची काळजी – शेवगा बियाणे मिळाल्यानंतर १ महिन्याच्या आत लागवड झाली पाहिजे. प्रथमतः बियाणे छोट्या पिशवीत लावावी. रोपे छोटी असतानाच शेतात लावावी.

1 thought on “Shevga information in Marathi | शेवगा झाड माहिती आणि लागवड.”

Leave a Comment