मकरसंक्रांत सण मराठी माहिती! Makarsankrant Information In Marathi ।

प्रस्तुत लेखात मकरसंक्रांत सण मराठी माहिती (Makarsankrant Information In Marathi) दिलेली आहे. मकर संक्रांत दिवस, त्याचे भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व या लेखात सांगण्यात आलेले आहे.

मकरसंक्रांत हा सण भारतात विविध नावांनी प्रसिद्ध आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्त्व ठेवणारा हा सण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे जानेवारी महिन्यात येतो.

भारतातील पौष महिन्यात येणारा हा सण एक शेतीसंबंधित सण आहे. या सणाचे सांस्कृतिक महत्त्व खूप आहे. या दिवसांमध्ये उगवलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात.

हरभरा, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ असे सर्व पदार्थ देवाला अर्पण करतात. हिंदू पंचांगाप्रमाणे या सणाचा महिना पौष आहे.

मकरसंक्रांत सण । Makarsankrant Marathi Mahiti

• नैसर्गिक किंवा भौगोलिक महत्त्व – Geographical Importance of Makar Sankrant ।

डिसेंबर महिन्याच्या शेवटी सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यावर इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षात, काही दिवसात सूर्य मकर राशीत संक्रमण करत असतो.

डिसेंबर २१, २२ तारखेनंतर सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो, म्हणजे सूर्याचे उत्तरायण २१, २२ तारखेपासून सुरू झालेले असते.

उत्तरायण म्हणजे त्या तारखेपासून सूर्य उगवण्याची दिशा थोडी-थोडी उत्तरेकडे सरकलेली आपल्याला दिसते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य पूर्णपणे मकर राशीत प्रवेश करतो हा दिवस हिंदू धर्मामध्ये एक पवित्र दिवस मानला गेला आहे.

• ऐतिहासिक संदर्भ – Makar Sankrant History


महाभारतात पितामह भीष्म बाणांच्या शय्येवर पडले असताना उत्तरायणाची वाट बघत होते. त्यांना इच्छामरण हे वरदान प्राप्त असल्याने त्यांनी आपल्या मरण्यासाठी उत्तरायणाचा काळ निवडला होता. प्राचीन काळापासून उत्तरायण हा काळ दक्षिणायनापेक्षा शुभ समजला गेला आहे.

संक्रांत हा शब्द म्हणजे एक देवता मानली गेली आहे. ही देवता येताना प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. तिचे वाहन कधी हत्ती, कधी गाढव, तर कधी डुक्कर असते अशी समजूत आहे.

• भोगी । Bhogi Information ।

संक्रांतीअगोदरचा दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा केला जातो. या हवामानात  उपलब्ध असणाऱ्या सर्व शेंगभाज्या, फळभाज्या आणि तीळ यांची एकत्र अशी मिश्र भाजी बनवली जाते.

तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ आवर्जून केले जातात. महाराष्ट्रात मकरसंक्रांत हा सण तीन दिवस साजरा केला जातो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असे हे तीन दिवस आहेत.

संक्रांतीच्या दिवशी सर्व कुटुंबीयांना, आप्तेष्टांना व शेजारी-पाजारी सर्वांना तिळगुळ वाटले जातात. “तिळगुळ घ्या गोड बोला” असे बोलले जाते. तिळगुळ वाटण्यातून सर्वांप्रती असणारा स्नेहभाव व प्रेमभाव दर्शविला जातो.

स्त्रियांसाठी या दिवसापासून हळदी – कुंकू लावण्याची सुरुवात होते. हळदी कुंकू लावण्याचा शेवट “रथसप्तमी” या दिवशी होतो संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांसाठी काळी साडी नेसण्याची प्रथा आहे.

• मकर संक्रांतीचे आरोग्य महत्त्व । Health Importance Of Makar Sankranti ।

संक्रांतीसाठी तीळ हा खूप महत्त्वाचा पदार्थ आहे. हा काळ थंडीचा असल्याने व सूर्याची किरणे कमी तीव्रतेचे असल्याने शरीरात उष्णतेची गरज भासते.

ही उष्णता नैसर्गिकरित्या उष्णता असणाऱ्या पदार्थातून मिळवली जाते, म्हणून या दिवशी बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, पावटे गाजर व विविध शेंगभाज्या अशा सर्व शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात.

तीळात खूप स्निग्धता असल्याने त्याचा वापर तिळगुळ बनवण्यात करतात. स्नेहाची गोडी वाढावी म्हणून तिळगुळ बनवले जातात. येथे स्नेह म्हणजे तीळ असे अभिप्रेत आहे, तर गूळ हा गोड पदार्थ म्हणून प्रचलित आहे.


• सांस्कृतिक प्रथा । Makar Sankrant Cultural Events ।


नवविवाहित वधूचे हळदीकुंकू विवाहानंतरच्या प्रथम मकरसंक्रांतीला करण्याची प्रथा आहे. या दिवशी वधूला काळी साडी भेट दिली जाते.

हलव्याचे दागिने मुलीला व जावयाला देऊन त्यांचे कौतुक केले जाते. काही ठिकाणी जावयाला भेटवस्तू देखील दिली जाते. लहान मुलांना देखील मकर संक्रांति दिवशी काळे कपडे घालतात. हे काळे कपडे शुभ मानले गेले आहे.

विविध खाद्यपदार्थांनी म्हणजे मुलांना आवडतील अशा खाद्यपदार्थांनी त्यांची बोरन्हाण केले जाते. आत्ताच्या काळात बर्फी, चॉकलेट या पदार्थांनी बोरन्हान केली जाते. याला लूट असेही म्हणतात. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हान केली जाते.

मकरसंक्रांत सण मराठी माहिती (Makarsankranti Information in Marathi) हा लेख कसा वाटला याबद्दल नक्की comment करा.

हे सुद्धा वाचा- 151+ Famous Marathi Quotes | मराठी सुविचार संग्रह

Leave a Comment