प्रस्तुत लेख हा शिक्षक दिन – १० ओळींचा मराठी निबंध (10 lines Essay on Teachers Day in Marathi) आहे. अत्यंत मुद्देसूद स्वरूपात हा निबंध मांडण्यात आलेला आहे. लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त असा हा निबंध आहे.
शिक्षक दिन – १० ओळी मराठी निबंध | 10 lines Essay on Teachers Day in Marathi |
1. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजे ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो.
2. भारतात सर्व शाळांमध्ये आणि इतरही शैक्षणिक क्षेत्रांमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो.
3. आई वडीलांनंतर शिक्षकच हे विद्यार्थ्यांचे दुसरे पालक असतात.
4. मुलांचे व्यक्तिगत आणि सामाजिक भवितव्य निर्माण करण्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो.
5. शिक्षक दिनी शिक्षकांच्या कर्तुत्वाचा योग्य सन्मान केला जातो.
6. अक्षर ओळखीपासून ते उदात्त जीवन जगण्याची प्रेरणा मिळेपर्यंत शिक्षक आपल्याला सहाय्यक ठरतात.
7. शिक्षकदिनी भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम सुद्धा आयोजित केले जातात.
8. शाळेत विद्यार्थीच शिक्षक बनून तासिका घेतात आणि दिवसाच्या शेवटी त्यांच्या शिकवणीचे मूल्यांकन केले जाते.
9. शिक्षक दिनी सर्व प्रकारे विविध उपक्रमांतून शिक्षकांप्रती आभार व्यक्त केले जातात.
10. शिक्षक आपल्याला ज्ञानदानाचे सर्वोत्तम कार्य करत असतात.
तुम्हाला शिक्षक दिन १० ओळींचा मराठी निबंध (10 lines Essay on Teachers Day in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…