भारताने शेवटच्या दिवशी अप्रतिम खेळ करत चौथी कसोटी जिंकलेली आहे. भारत मालिकेत आता 2-1 ने आघाडीवर आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ संपला तेव्हा इंग्लंड 77 / 0 अशा धावसंख्येवर होता.
पाचव्या दिवशी संथ सुरुवात करत बर्न्स आणि हमीदने शतकी भागीदारी केली. दोघांनीही अर्धशतके झळकावली. शार्दुलने बर्न्सचा अडथळा दूर केला आणि त्यानंतर मलान धावचीत झाला. इंग्लंड अशा परिस्थितीतून नंतर सावरलाच नाही.
बुमराह आणि जडेजा यांनी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. जडेजा आणि बुमराहने महत्त्वपूर्ण 2 – 2 बळी टिपले. शार्दुलने पुन्हा एकदा रूटची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. त्यानंतर उमेश यादवने इंग्लंडची तळातील फलंदाजी संपवली.
सामना इंग्लंडच्या बाजूने झुकतो की काय असे वाटत असतानाच भारतीय गोलंदाजीने भन्नाट प्रदर्शन करत इंग्लंडचा डाव 204 धावांत गुंडाळला. भारताने 163 धावांनी विजय मिळवत मालिकेत आता 2 – 1 अशी आघाडी घेतलेली आहे.
संक्षिप्त धावफलक –
पहिला डाव : भारत – 191 , इंग्लंड – 290
दुसरा डाव : भारत – 466 , इंग्लंड – 204
भारत विजयी (163 धावा)
सामनावीर रोहित शर्मा –
सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माने झळकवलेल्या शतकामुळे भारताला मजबुती प्राप्त झाली होती. त्यानंतर भारताला 466 धावांचा डोंगर उभा करता आला. त्याच्या या अद्वितीय खेळीमुळे त्याला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला.
या सामन्यातील विजयामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वातून भारतीय संघाचे अभिनंदन होत आहे. भारतीय गोलंदाजी ही संघाची ताकद बनत चालली आहे. मालिकेतील दुसरा आणि चौथा हे सामने गोलंदाजीच्या जोरावर जिंकलेले आहेत.