मानवासाठी पाण्याचा असलेला उपयोग पाहून आपण सतत म्हणत असतो की पाणी हेच जीवन आहे. पाण्याचे महत्त्व आणि उपयोग स्पष्ट करणारा पाणी हेच जीवन हा मराठी निबंध (Water Is Life Essay In Marathi) प्रस्तुत लेखात मांडण्यात आलेला आहे.
पाणी हेच जीवन | Water Essay in Marathi
पाणी हेच जीवन आहे हे आपण कसे काय जाणून घेऊ शकतो? त्यासाठी आपल्या जीवनात पाण्याचा असलेला उपयोग आणि महत्त्व सर्वप्रथम समजले पाहिजे. “पाणी नसते तर” अशी कल्पना जरी केली तरी “पाणी हेच जीवन आहे” याचा प्रत्यय येऊ शकेल.
निसर्गात सुद्धा पाण्याच्या मदतीने जलचक्र प्रक्रिया घडून येत असते. समुद्रातील आणि इतर भूभागातील पाण्याचे बाष्पीभवन सूर्यप्रकाशामुळे होत असते. त्याचा परिणाम म्हणून थोड्या शीतल वातावरणामुळे पाऊस पडत असतो. पृथ्वीवर माणूस आणि इतर सजीव सृष्टी पाऊसाची आतुरतेने वाट पाहत असतात.
आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याची नितांत गरज भासत असते. त्यामध्ये पाणी पिणे, अंघोळ करणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, घर आणि परिसर स्वच्छ करणे यासाठी पाणी वापरात येत असते.
पावसाळ्यात पडणारे पाऊसाचे पाणी हे वर्षभर विविध पाण्याच्या स्त्रोतांत साठून राहते. तसेच मानवाने विहिरी आणि सरोवरे देखील निर्माण केली ज्यामुळे पाण्याची कमतरता होत नाही. याशिवाय पाण्याचा एक उत्तम स्रोत म्हणजे नदी!
नदीतील पाणी शेवटी समुद्राला जाऊन मिळते. अशा नदीच्या पाण्याचा उपयोग शेती, सिंचन आणि पिण्यासाठी होत असतो. मानवाने नेहमी वाहत्या पाण्याचा उपयोग छान केलेला आहे. कारण वाहते पाणी हे स्वच्छ असते. त्या पाण्याचा वापर दैनंदिन कामासाठी होऊ शकतो.
पाणी हे सर्व मानव जातीला आणि पशू पक्षांना पिण्यासाठी उपयोगात येत असल्याने त्याचे शुद्धतम स्वरूप गरजेचे असते. डॉक्टर आणि आहारतज्ञ देखील असा नेहमी सल्ला देतात की शुद्ध पाणी प्या, आजारी असल्यास पाणी उकळून प्या.
पाणी शुद्ध अथवा उकळून पिल्याने आपल्या शरीरात पाण्यामार्फत जंतू प्रवेश करत नाहीत. त्यामुळे तहान भागवण्यासाठी कसलेही पाणी पिऊन चालणार नाही. पाणी व्यवस्थित हाताळले गेल्याने आपल्या शरीरावर त्याचा विधायक परिणाम जाणवतो.
पाण्याचा वापर आपण इतरही पदार्थ, औषधे, आणि रसायने बनवण्यासाठी करत असतो. तसेच आपल्या परिसराची स्वच्छता पाण्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने राखली जाऊ शकते. तसेच इतर पाळीव प्राणी व जनावरे यांसाठी सुद्धा आपण उत्तम पाण्याची सोय करून ठेवत असतो.
पाण्याचे उपयोग पाहता पाणी हे असे तत्व आहे ज्याची मानवी जीवनात आणि निसर्गात अत्यंत
आवश्यकता आहे. संपूर्ण पृथ्वीवर जेवढा पाणीसाठा आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्या शरीरात देखील पाणी आहे.
भौतिक जीवन जगत असताना पाणी अत्यंत गरजेचे आहे. एकवेळ जेवण नसेल तर माणूस जिवंत राहील पण पाण्याशिवाय जिवंत राहू शकणार नाही. त्यामुळेच निसर्ग, पशुपक्षी आणि मानव या सर्वांसाठी पाणी हेच जीवन आहे.
तुम्हाला पाणी हेच जीवन हा मराठी निबंध (Water Is Life Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…
Nice and helpfull