नाम व नामाचे प्रकार – शब्दांच्या जाती| Noun and Its Types in Marathi |

मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना आपणास नाम व नामाचे प्रकार (Noun and Its Types in Marathi) माहीत असले पाहिजेत. नाम ही शब्दाची जात असून त्याचे व्यवस्थित विश्लेषण आणि विविध प्रकार या लेखात सांगण्यात आलेले आहेत.

नाम म्हणजे काय –

नाम : एखाद्या व्यक्तीला, वस्तूला किंवा  स्थळाला जे विशिष्ट नाव दिलेले असते त्यास     “नाम” असे म्हणतात.

नामाचे प्रकार कोणते –

मराठी व्याकरणामध्ये नामाचे तीन प्रकार आहेत.
१) सामान्य नाम
२) विशेष नाम
३) भाववाचक नाम
 
१) सामान्य नाम – एकाच जातीच्या घटकांतील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला ‘सामान्य नाम’ असे म्हणतात.
        
उदाहरणार्थ – मुलगा, पर्वत, नदी, शहर, प्राणी, पक्षी.

मराठी भाषेत पदार्थवाचक आणि समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जातात.

२) विशेषनाम : ज्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा अथवा प्राण्याचा बोध होतो . त्यास “विशेषनाम” असे म्हणतात.

उदाहरणार्थ – अरुण, हिमालय, गंगा, मुंबई, वाघ, मोर इत्यादी.
  
३) भाववाचक नाम : ज्या नामातून एखादी वस्तू, प्राणी अथवा व्यक्तीमधील गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्यास “भाववाचक नाम” असे म्हणतात.

उदाहरणार्थ – चांगला, वाईट, उत्साह, अप्रतिम, आनंद, दुःख.
                                   

नाम व नामाचे प्रकार (Noun and Its Types in Marathi) हा लेख तुम्हाला आवडला असल्यास तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका…

Leave a Comment