प्रस्तुत लेख हा ध्वनिप्रदूषण विषयावर मराठी निबंध (Noise Pollution Essay in Marathi) आहे. सध्या मानवी अराजकतेमुळे ध्वनि प्रदूषण खूप वाढले आहे. त्याची कारणे, लक्षणे, आणि प्रतिबंधक उपाय काय असू शकतील, अशा सर्व बाबींचे वर्णन या निबंधात करायचे असते.
ध्वनिप्रदूषण निबंध मराठी | Dhwani Pradushan Marathi Nibandh |
प्रदूषण ही एक गंभीर समस्या मानवाला भेडसावत आहे. मागील दोन दशकांत प्रदूषणाचे घातक परिणाम आपण भोगलेले आहेत. यामध्ये जलप्रदूषण, वायुप्रदूषण, भुप्रदुषण, आणि ध्वनिप्रदूषण असे प्रमुख प्रकार सांगता येतील. त्यामध्ये ध्वनिप्रदूषण ही समस्या सध्या खूपच नुकसानकारक ठरत आहे.
ध्वनिप्रदूषण आपणास विविध मार्गे जाणवत असते. आवाजाचा गोंगाट सातत्याने होत असल्याने कान आणि मेंदू यांवर विपरीत परिणाम होत आहेत. दिवस सुरू झाल्यापासून रात्र होईपर्यंत सततचे बोलणे आणि ऐकणे होत आहे. ध्वनि प्रदूषणात विविध प्रकारची यंत्रे, गाड्या, उद्योग, आदींचा समावेश आहे.
ध्वनिप्रदूषण हा मुख्यत्वे आवाजाचा होणारा अतिरेक आहे. ध्वनि प्रदूषणाची खूप सारी कारणे सांगता येतील. इलेक्ट्रॉनिक साधनांचा वाढता वापर, औद्योगिक यंत्रे आणि गाड्यांचे सततचे आवाज, स्पीकर्सचा आवाज, फटाक्यांचे आवाज अशी काही प्रमुख कारणे आहेत.
सध्या कोणताही व्यक्ती मोबाईल आणि टेलिव्हिजन सातत्याने हाताळत आहे. त्यातून येणारा आवाज हा सातत्याने कानांवर आघात करत असतो. सातत्याने अशा उपकरणांचा वापर करणारा व्यक्ती काही काळानंतर बहिरा होऊ शकतो.
सध्या उद्योगांची वाढलेली संख्या ही सुद्धा ध्वनि प्रदूषणास कारणीभूत आहे. कारखाने, उद्योगसंस्था यांमध्ये मोठ्या आवाजात यांत्रिक उपकरणे चालू असतात. त्यांचा कामगारांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत असतो. शहरी भागात तर मानव तसेच पशूपक्षी देखील ध्वनि प्रदूषणाचे बळी ठरत आहेत.
ध्वनि प्रदूषणाचे प्रमुख लक्षण म्हणजे कर्णबधिरता! मानवी कान हे अति संवेदनशील असल्याने आवाजाचा अतिरेक हा कानाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम घडवतो. संशोधनात तर असे आढळले आहे की ध्वनि प्रदूषणाचा मेंदूवर देखील घातक परिणाम होत असतो.
ध्वनि प्रदूषणामुळे मानवाची स्मरण आणि श्रवणशक्ती कमजोर होत असल्याने साहजिकच व्यक्ती आरोग्यदायी अनुभव करत नाही. आपण आसपास कितीतरी लोक असे पाहतो ज्यांनी ऐकण्यासाठी कानात श्रवणयंत्र घातलेली असतात. तो ध्वनि प्रदूषणाचाच परिणाम आहे.
ध्वनि प्रदूषणावर काय उपाय असू शकतील, त्याचा सारासार विचार झाला पाहिजे. जगण्यातील स्पर्धा, लोकसंख्या वाढ, पाश्चिमात्य जीवनशैलीचा अंगिकार अशी काही समूळ कारणे आहेत ज्यांचा परिणाम म्हणून जगण्यातील शांतता निघून गेली आहे आणि गोंगाट करणाऱ्या साधनांचा वापर वाढलेला आहे.
मानवाला शांत आयुष्य जगण्यासाठी आणि व्यर्थ स्पर्धा न करण्यासाठी तशा स्वरूपाचे शिक्षण लहानपणापासून दिले गेले पाहिजे. ध्वनि प्रदूषणाबद्दल जनजागृती केली पाहिजे. मोठ्या आवाजासाठी काही नियम आणि अटी लागू करायला हव्यात ज्यामुळे ध्वनिप्रदूषण आटोक्यात येऊ शकेल.
वरील निबंध हा 300 शब्दांचा ध्वनिप्रदूषण निबंध आहे. यापुढील ध्वनिप्रदूषण निबंध हा 1000 शब्दांचा आहे.
निबंध क्र. 2 | ध्वनिप्रदूषण निबंध मराठी – 1000 शब्द |
1000 शब्दांचा निबंध लिहताना ध्वनि प्रदूषणाचे विस्तृत वर्णन करायचे असते. त्यासाठी निबंध लिहताना पुढील मुद्दे उपयोगात येऊ शकतील.
• प्रस्तावना
• प्रदूषणाचे प्रकार
• प्रदूषणाची कारणे
• प्रदूषणाची लक्षणे / दुष्परिणाम
• प्रदूषणावर उपाययोजना
ध्वनिप्रदूषण मराठी निबंध । Sound/Noise Pollution Essay In Marathi |
• ध्वनिप्रदूषण प्रस्तावना –
सध्या मानवी जीवनातील स्पर्धेमुळे अराजकता वाढलेली आहे. त्याचे परिणाम मात्र निसर्गात आणि वातावरणात जाणवत आहेत. प्रदूषण ही एक अशीच समस्या आहे की ज्यामुळे सद्यस्थितीत विनाशक परिणाम भोगावे लागत आहेत.
प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत जसे की जलप्रदूषण, वायुप्रदूषण, भुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण! जल, वायू, आणि भूमी प्रदूषणास प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना केलेल्या असतात, परंतु ध्वनिप्रदूषण ही अशी समस्या आहे ज्याचा परिणाम तर जाणवतो पण उपाययोजना मात्र आढळत नाहीत.
मानवी जीवनातील शांतता निघून गेली आहे. सर्वजण सततची धावपळ करत आहेत. त्या धावपळीचा परिणाम असा आहे की जेव्हा शांत होण्याची गरज असते तेव्हाच माणूस स्वतःला खूप साऱ्या मनोरंजनात अडकवून घेतो.
असे मनोरंजन करवून घेताना कान आणि डोळ्यांचा वापर हमखास होतोच होतो. सतत व्यस्त राहणे आणि काहीतरी ऐकत राहणे हा दैनंदिन उपक्रमच झालेला आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण हे वैयक्तिक स्तरावर घातक ठरत आहे.
• ध्वनि प्रदूषणाचे प्रकार –
ध्वनिप्रदूषण होण्यासाठी कोणकोणते स्रोत कारणीभूत आहेत त्यावरून ध्वनिप्रदूषण विभाजित करता येईल. ध्वनिप्रदूषण हे वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर होत असते.
व्यक्ती स्वतःहून जर मोठा आवाज सतत ऐकत असेल तर तो ध्वनि प्रदूषणास स्वतःच कारणीभूत ठरतो. एखादा व्यक्ती मोबाईल, टेलिव्हिजनचा वापर सातत्याने करत असेल आणि त्यांचा आवाज उच्च स्तरावर ठेऊन ती साधने उपयोगात आणत असेल तर ऐकण्याची क्षमता कालांतराने कमी होऊ शकते.
दुसरा प्रकार म्हणजे सामाजिक स्तरावरचे ध्वनिप्रदूषण, ज्यामध्ये व्यक्ती संबंधित नसतो तर समाजातील व्यवस्था आणि उद्योगधंदे ध्वनि प्रदूषणास कारणीभूत ठरतात.
• ध्वनि प्रदूषणाची कारणे –
ध्वनिप्रदूषण सद्यस्थितीत भयंकर प्रमाणावर जाणवत आहे. इलेक्ट्रॉनिक साधने, यांत्रिक उपकरणे, वाढते उद्योग व त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मशिन्स, वाहने, अशा सततच्या गोंगाटामुळे मानवी संवेदना कमकुवत बनत चालली आहे.
मोबाईलचा वापर संवादासाठी होत असल्याने आज सर्वजण फोनवर बोलणे पसंद करतात. त्यामुळे मोबाईलच्या वापराने कान असक्षम बनत चालले आहेत. तसेच संगीत ऐकताना आणि गेम्स खेळताना तरुण पिढी सतत हेडफोन्सचा वापर करत आहे.
टेलिव्हिजनचा आवाज चढवून मालिका अथवा चित्रपट पाहणे, घरात साऊंड सिस्टम बसवून मोठ्या आवाजात गाणी ऐकणे अशा सवयी सध्या जडलेल्या आहेत. त्यामुळे घरातसुद्धा शांती राहिलेली नाही.
उद्योग धंद्यात यांत्रिकीकरण वाढल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादक मशिन्स, इंजिन, व जनरेटर्स यांचा वापर वाढला आहे. त्यांचा चालू स्थितीतील आवाज खूपच कर्कश असा असतो.
जीवनात सततची व्यस्तता असल्याने आपण सतत बोलत राहणे हेदेखील ध्वनिप्रदूषण आहे. सतत बोलल्याने सतत विचार केला जातो. मनातून एक आवाज सातत्याने येऊ लागतो. त्या आवाजाला ऐकण्याऐवजी आपण इतर साधनांचा वापर करून हिंसात्मक चित्रपट पाहतो व गोंगाट निर्माण करणारी गाणी ऐकत राहतो.
अशा मनोरंजनाची एकदा सवय लागली की त्यापासून सुटका मिळत नाही. मग आपण आपल्याच सवयीने ऐकण्याची क्षमता क्षीण करत जातो. याशिवाय चोवीस तास चालणारे उद्योग आणि वाहनांची सततची रेलचेल हीदेखील ध्वनि प्रदूषणात समाविष्ट आहे.
मार्केटमध्ये सतत कोणता ना कोणता आवाज चालूच असतो. स्पिकर (DJ) मोठ्या आवाजात लावला जातो, कोणाची तरी मिरवणूक काढली जाते त्यामध्ये कर्णकर्कश संगीत ऐकले जाते. सांस्कृतिक कार्यक्रम असेल तरीही तो शांततेत पार पाडला जात नाही.
अशा सर्व कार्यक्रमासाठी फटाक्यांची आतषबाजी आलीच, वाहनांची सततची धाव आलीच, त्यामुळे वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण या बाबी नित्याच्याच आहेत.
• ध्वनि प्रदूषणाची लक्षणे / दुष्परिणाम –
मानवी संवेदना ही इंद्रियांच्या क्षमतेवर अवलंबून असते. ऐकण्याची क्षमता चांगली असल्याने माणूस ऐकेल ते लक्षात ठेवू शकतो आणि बोलू शकतो. परंतु ध्वनिप्रदूषण वाढल्याने ऐकण्याची क्षमता कमी होत चाललेली आहे.
मानवी कान 40 डेसिबल एवढा आवाज ऐकू शकतात. त्या प्रमाणापेक्षा जास्त आवाज जर सातत्याने ऐकला तर माणसाला बहिरेपणा येऊ शकतो. वाहनाच्या हॉर्नचा आवाज, फटाक्यांचा आवाज, साऊंड सिस्टमचा आवाज 40 डेसिबलपेक्षा कितीतरी अधिक असतो.
अति तीव्रतेच्या आवाजाने आपले कान तर दुखतातच शिवाय मेंदूवर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आपली स्मरणशक्ती आणि एकाग्रता आपण गमावू शकतो. मोठ्या आवाजाच्या दचक्याने हृदयविकाराचा झटका आल्याची सुद्धा काही उदाहरणे आहेत.
मानवी आरोग्यावर ध्वनि प्रदूषणाचे विपरीत परिणाम होतातच शिवाय प्राणी-पक्षी आणि इतर सजीव देखील त्यापासून वाचलेले नाहीत. एखादे मोठे विमानतळ असेल तर विमानाच्या घातक आवाजाने त्या परिसरातील अनेक वन्यजीव स्थलांतर करताना दिसून येतात.
फटाक्यांचा आवाज कोणत्याच प्राण्याला सहन होत नाही. तसेच मिरवणुकीतील स्पीकर्सचा आवाज ऐकल्यावर पाळीव प्राणी पुरते घाबरून जात असतात. त्यामुळे मानवी जीवनासोबत प्राणीमात्रांनाही घातक ठरणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली पाहिजेत.
• ध्वनि प्रदूषण उपाययोजना –
लोकसंख्या वाढ झाल्याने आणि तंत्रज्ञानाचा बेसुमार वापर होत असल्याने औद्योगिक क्षेत्र खूप विकसित झाले. त्याचा दुष्परिणाम म्हणून ध्वनिप्रदूषण होऊ लागले आहे. ध्वनि प्रदूषणाची कारणे आणि उपाय शोधताना आपल्याला सारासार विचार करावा लागेल. तरच आपण ही समस्या मुळापासून नष्ट करू शकू.
सर्वप्रथम आपली जीवनशैली आपल्याला पहावी लागेल ज्यामध्ये अति आवाज करणाऱ्या आणि कानांना ईजा पोचवणाऱ्या साधनांचा वापर कमी करावा लागेल. सामाजिक स्तरावर जास्त आवाज करणाऱ्या मशिन्स आणि साधनांवर काही अटी आणि नियम लागू केले पाहिजेत.
पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण न करता एक स्वस्थ आणि समृद्ध जीवनशैली आपण विकसित करायला हवी ज्यामध्ये अति गोंगाट करणे म्हणजे आयुष्य जगणे नाही तर शांत व आनंदी राहणे, जीवनाला ज्ञानाची दिशा देण्याचा प्रयत्न करणे या बाबी जीवन घडवण्यामध्ये जास्त महत्त्वाच्या आहेत, अशी समज विकसित करायला हवी.
तुम्हाला ध्वनिप्रदूषण हा मराठी निबंध (Noise Pollution Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…धन्यवाद!
वरील निबंध Sound Pollution Essay in Marathi हा keyword वापरून देखील सर्च केला जातो.