प्रस्तुत लेख हा धुलिवंदन (Dhulivandan Mahiti Marathi) या सणाविषयी माहिती देणारा लेख आहे. धुलिवंदन सणाचे महत्त्व आणि तो कसा साजरा केला जातो याचे वर्णन या लेखात करण्यात आलेले आहे.
धुलिवंदन (धुळवड) माहिती मराठी | Dhulvad Marathi Mahiti | Dhulivandan Information In Marathi |
• महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक आणि परंपरेने नटलेले राज्य आहे. आपल्या राज्यात विविध प्रकारचे सण – उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात. धुलिवंदन हा सण देखील त्यापैकीच एक प्रकार आहे.
• धुलिवंदन हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. प्रतीकात्मक होलिका दहन केल्यानंतर त्याची राख लावण्याची परंपरा या दिवशी असते.
• होळी साजरी केलेल्या ठिकाणी स्त्रिया घरातील पाणी हंड्यात, घागरीत भरून ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापवले जाते. त्या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालण्याची प्रथा आहे. लहान मुलांसाठी व सर्वांसाठीच ते पाणी लाभदायक असल्याचे मानले जाते.
• तापवलेले पाणी होळीच्या राखेत टाकून ती राख सर्व अंगाला आणि कपाळी लावून मोठी माणसे स्नान करतात. या प्रथेचा संबंध कामदहनाशी जोडला जातो.
• परंपरेनुसार होळीच्या दिवसापासून उत्तर भारतात नवीन वर्ष सुरू होते. उत्तर भारतात कालांतराने होळीलाच रंगपंचमीच्या स्वरूपात बघितलेले आहे. होळी व त्यानंतरच्या दिवशी सर्व लोक एकमेकांना रंग लावून हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात मात्र होळीचे पवित्र भस्म अंगाला लावण्याची प्रथा आहे.
• होळी आणि धुलिवंदन हे सामाजिक स्तरावर साजरे केले जाणारे सण आहेत. त्यामुळे समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने हे सण साजरे करायला हवेत.
• शिमगा / होळी वेळी सर्वांनी बोंबलायची आणि ओरडायची एक वेगळीच प्रथा रूढ झालेली आहे. काही ठिकाणी अश्लील शब्द उच्चारून शंखनाद देखील केला जातो. होलिका दहन होत असताना सर्व स्त्रिया नैवेद्य, हळदी – कुंकू आणि नारळ होळीत अर्पण करतात. अर्पण केलेले सर्व घटक हे जळून खाक होतात. मग दुसऱ्या दिवशी तयार झालेली राख ही वंदनीय मानून शरीरावर लावणे अशी एकंदरीत प्रथा आहे.
• महाराष्ट्रात होळी हा सण होळी पौर्णिमा ते रंगपंचमीच्या दिवसापर्यंत साजरा केला जाणारा सण आहे. त्यामध्येच होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते.
तुम्हाला धुलीवंदन – मराठी माहिती (Dhulivandan Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा..