आजचा आठवा आयपीएल सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज या दोन्ही संघांत वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रात्री ठीक ७:३० वाजता खेळवला जाणार आहे.
पंजाब आणि कोलकाता हे दोन्ही संघ यावेळी अत्यंत मजबूत दिसत आहेत. कोलकाताने चेन्नई विरूध्द पहिला सामना जिंकला आणि आरसीबी विरूध्द दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करला. परंतु पंजाबने आरसीबीला पहिल्याच सामन्यात धूळ चारत आपला विजयी वाटचाल सुरू केली.
श्रेयस विरूध्द मयंक –
श्रेयस अय्यर हा शांत आणि संयमी कर्णधार आहे तर मयंक हा धडाकेबाज आणि जोशिला कर्णधार आहे. मयंकची फलंदाजी म्हणजे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी असते तर अय्यर हा संयमी आणि गरज पडल्यास आतिषबाजी करणारा फलंदाज आहे.
कोलकाताचे रायडर्स विरूध्द पंजाबचे किंग्ज –
कोलकाता संघाची बाजू श्रेयस अय्यरने कर्णधारपद सांभाळल्या पासून मजबूत झालेली आहे. संघात अनेक मॅच एकहाती जिंकून देणारे खेळाडू आहेत. त्यामध्ये रसेल, वेंकटेश अय्यर, नरिन, वरुण चक्रवर्ती, राणा अशा खेळाडूंचा समावेश आहे.
पंजाबने यावर्षी मयंक अगरवालला कर्णधारपद सोपवलेले आहे आणि लिलावात लिविंगस्टोन, धवन, ओडीयन स्मिथ अशा भक्कम खेळाडूंचा आपल्या संघात समावेश करून घेतला. पंजाबचा संघ कोणत्याही मजबूत संघाला पराभवाचा धक्का देऊ शकतो.
पंजाबमध्ये सुरूवातीपासूनच धडाकेबाज फलंदाज आहेत. त्याचा प्रत्यय आपल्याला आरसीबी विरुद्धच्या सामन्यात आलेलाच आहे. त्यामुळे पंजाब विरूध्द कोलकाता ही दोन नवख्या आणि जिगरबाज कर्णधारांच्या नेतृत्वाची झुंज असणार आहे. गूगल सर्च इंजिनवर एक्स्पर्टच्या मते पंजाबचे जिंकण्याचे चान्सेस ५५% आहेत तर कोलकाताचे ४५% आहेत.