बिग बॉस मराठी २

‘बिग बॉस मराठी 2’ च्या घराबद्दल नेहमीच उत्कंठा लागून राहिलेली असते. तसेच कार्यक्रमात उत्तरोत्तर रंग चढत आहे. कलाकारांचे स्वभाव, भांडणं यामुळे ‘बिग बॉस मराठी 2’ ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.आतापर्यंत बिग बॉसचे ४ दिवस पूर्ण झाले असून या चार दिवसांमध्ये स्पर्धकांमध्ये मतभेद, गटबाजी अशा अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या.

बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच बिग बॉसचं घर हे पहिल्यांदाच संपूर्णपणे बंदिस्त असून स्पर्धकांना मोकळे आकाश तसेच सूर्यप्रकाश पाहता येणार नाही. बिग बॉसच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घर पाहायला मिळत आहे.हे घर चहुबाजूंनी कॅमेराने सुसज्ज असून यातील सदस्यांच्या प्रत्येक हालचालीवर हा कॅमेरा लक्ष ठेऊन आहे.

बिग बॉसच्या घरावरती मोकळं आकाश दिसत असून हे खरंखुरं आकाश नसून आकाशाचा पोस्टर लावल्याचं दिसून येत आहे. घराभोवती जागोजागी आकर्षक सजावट असून घरात काही अँटिक वस्तू असून त्या या घराच्या सुंदरतेमध्ये आणखी रंग भरत आहेत. पण स्पर्धकांना मात्र पुढचे 100 दिवस बाहेरचं जग पाहता येणार नाही

बिग बॉसच्या स्पर्धकांप्रमाणे बिग बॉसचं घर सुद्धा सर्वत्र चर्चेचा विषय आहे. आता या घरात स्पर्धक कोणत्या गोष्टी करणारआणि काय काय नाट्य घडणार यासाठी बिग बॉस मराठी 2 पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Source-marathi.peepingmoon.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here