त्वचा आणि केसांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, येथे वाचा टिप्स.

उन्हाळा असो,हिवाळा असो किंवा पावसाळा, आपल्या त्वचेची आणि केसांची निगा राखणे फार आवश्यक आहे.तसेच प्रदूषणापासून वाचण्यासाठी सुद्धा आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते.

आपण घराच्या आत राहत असु किंवा बाहेर, प्रदूषण प्रत्येक ठिकाणी आढळते. आपल्याला अशा वातावरणात त्वचा आणि केस यांची खास काळजी घ्यावी लागते. एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर आणि मायक्रोवेव्हमधून बाहेर येणारे गॅस आपल्या त्वचेवर आणि केसांवर प्रहार करतात.

यासर्वांपासुन वाचण्यासाठी काही खास टिप्स-

१. आपली त्वचा आणि केस क्लंजिंग, टोनिंग आणि मायश्चराइजिंग करावे.

२. केसांना पुरेस पोषण द्या म्हणजे ते रुक्ष आणि खराब होणार नाहीत. यामध्ये खोबरेल तेल किंवा आवळा यांचा समावेश करावा.

३. बाहेर जाताना आपल्या केसांना प्रदूषनापासुन वाचवण्यासाठी विशेष स्प्रे वापरावा. यामुळे तुमचे केस रुक्ष होणार नाहीत.

४. आपल्या त्वचेवर सनस्क्रीन, एलो वेरा जेल किंवा इतर संरक्षणात्मक क्रीम वापरा. यामुळे आपली त्वचा 6-7 तास प्रदूषणापासून सुरक्षित राहते.

५. नियमितपणे स्क्रब वापरा. यामुळे त्वचेतील घाण निक्षुन जाते व त्वचा स्वच्छ आणि तजेलदार बनते.

६. त्वचा कोमल आणि मऊ ठेवण्यासाठी ग्लो पॅक वापरा. याचा वापर तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता.

Leave a Comment