किती सुंदर सुंदर हे जग ज्याने निर्मियले – प्रार्थना | Kiti Sundar Sundar he |

प्रार्थनेने मनुष्य घडत जात असतो. जे शब्द आणि भावना आपण व्यक्त करतो तसाच आपला स्वभाव निर्मित होत असतो. त्यामुळे शालेय जीवनात प्रार्थनेला खूप महत्त्व दिले जाते. प्रत्येक शाळेची सुरुवातच प्रार्थनेने होत असते. प्रार्थना म्हणणे हा अत्यंत छान संस्कार आहे.

आम्ही या लेखात अशीच एक शालेय प्रार्थना घेऊन आलेलो आहोत. किती सुंदर सुंदर हे जग ज्याने निर्मियले (Kiti Sundar Sundar he Lyrics in Marathi) या प्रार्थनेचे बोल तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. चला तर मग पाहुयात काय आहेत या प्रार्थनेचे बोल….

किती सुंदर सुंदर हे जग ज्याने निर्मियले – बोल | Kiti Sundar Sundar he Lyrics  |

किती सुंदर सुंदर हे जग ज्याने निर्मियले
त्या परमेशाला रे वाहूया शब्द फुले
सृष्टीचा हाच खरा पालनकर्ता रे
खरोखरीच हा सुखकारक अन् विघ्नविनाशक रे
किती सुंदर सुंदर हे…

हा सूर्य पहा आभाळी, हो भाळी
जसे भगिनीच्या कुंकू दिसे हो कपाळी
देतो हा सर्वांना प्रकाश शक्ती रे…
खरोखरीच हा सुखकारक अन् विघ्नविनाशक रे
किती सुंदर सुंदर हे…

हा चंद्र असे अभिमानी, हो मानी
म्हणे आहे मी नक्षत्रांचा स्वामी
तरी नाही मनी याच्या अहंभाव काही रे…
खरोखरीच हा सुखकारक अन् विघ्नविनाशक रे
किती सुंदर सुंदर हे…

ही सरिता अन् हा वारा, हो वारा
ही धरती वाहे भार जगाचा सारा
चंद्र, सूर्य, सरिता अन् वारा तुझीच रूपे रे…
खरोखरीच हा सुखकारक अन् विघ्नविनाशक रे
किती सुंदर सुंदर हे…

किती सुंदर सुंदर हे जग ज्याने निर्मियले (Kiti Sundar Sundar He Lyrics) ही प्रार्थना तुम्हाला लेखी स्वरूपात आवडली असेल तर नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment