आरटी-पीसीआर, अँटीजेन आणि अँटीबॉडी टेस्ट | RT PCR, Antigen, Antibody Tests

सध्या कोविड 19 रोगासाठी विविध प्रकारच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग झालाय की नाही हे ओळखण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या आरटी-पीसीआर, रॅपिड अँटीजेन आणि रॅपिड अँटीबॉडी या चाचण्यांबद्दल सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ने (ICMR) कोव्हिडच्या चाचण्यांसंबंधी विशिष्ट नियम ठरवले आहेत. त्या नियमांतर्गत तीन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात.

• आरटी – पीसीआर चाचणी (RT-PCR Test)

• रॅपिड अँटीजेन चाचणी (Rapid Antigen Test)

• रॅपिड अँटीबॉडी चाचणी (Rapid Antibody Test)

RT-PCR Test म्हणजे काय?
(RT-PCR Test Information in Marathi)

Real Time Reverse Transcription Polymerase Chain Reaction.

या चाचणीला स्वॉब टेस्ट असंही म्हणतात. या टेस्टसाठी निर्जंतुक केलेला स्वॉब नाकात घालून सँपल घेतलं जातं आणि त्यावर चाचणी करण्यात येते.

त्या सँपलची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. त्या तपासणीसाठी 2 ते 5 तासांचा कालावधी लागू शकतो. म्हणजेच अति काळजीपूर्वक तपासणी झाल्यानंतर एका दिवसात याचा रिपोर्ट मिळू शकतो.

RT-PCR चाचणी ही कोरोना बाधित चाचणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ICMR ने या चाचणीला टेस्टिंगचा “गोल्ड स्टँडर्ड” असं नाव दिलंय.

शरीरातील कमी जास्त प्रमाणातील कोरोना संसर्ग या चाचणीमार्फत कळू शकतो.

रॅपिड अँटीजेन टेस्ट (Antigen Test) म्हणजे काय?

अँटीजेन म्हणजे बाहेरून आलेला घटक. तो घटक आपल्या मानवी शरीरातील नसल्याचे लगेच समजते.

कोरोना विषाणू संसर्ग झाला असेल तर या चाचणीत लगेच समजते. RT-PCR चाचणी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ या चाचणीला लागत नाही. स्वॉब सँपल प्रयोगशाळेत न्यावं लागत नाही. जागेवरच त्याची चाचणी करता येऊ शकते.

सध्या या किट्सचा वापर सर्वात जास्त केला जातोय. ही टेस्ट किट्स तुलनेने स्वस्त असतात. लवकर रिपोर्ट मिळतो आणि वापरायला देखील सोप्पी असतात.

या टेस्टमधून कधीकधी चुकीचा रिपोर्ट येऊ शकतो. त्यामुळे ICMR ने सांगितलंय की कोरोना ची लक्षणे आढळली असता आणि अँटीजेन टेस्ट जर निगेटिव्ह आली तर RT-PCR चाचणी देखील करून घ्यावी. पॉझिटिव्ह निकालांसाठी वेगळी RT-PCR टेस्ट करून घेण्याची गरज नाही.

रॅपिड अँटीबॉडी टेस्ट म्हणजे काय?
(Rapid Antibody Test Information in Marathi)

शरीरात संसर्ग झालेल्या विषाणूशी लढण्यासाठी शरीरात प्लाझ्माद्वारे पेशी तयार होत असतात. या पेशी विषाणूंवर जाऊन चिकटतात. यामुळे विषाणूंची निर्मिती थांबते आणि शरीरातील संसर्ग थांबतो.

अँटीबॉडी चाचणीमध्ये व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. विषाणूंना मारण्यासाठी पेशींमध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत का? ते या चाचणीद्वारे तपासले जाते. जर अँटीबॉडीज तयार झाल्या असतील तर कोरोना संसर्ग होऊन गेलेला आहे असे निदान केले जाते.

कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात अशा चाचण्या होणे खूप गरजेचे आहे असे ICMR ने सुचवले आहे. तसेच कोरोना संसर्गातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा सध्याच्या कोरोना बाधित रुग्णांना देऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या उपचार पद्धतीला “प्लाझ्मा थेरपी” असे नाव देण्यात आलेले आहे.

Leave a Comment