प्रस्तुत लेखात सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट (Saving Account & Current Account in Marathi) म्हणजे काय आणि त्या दोन्हीतील फरक सांगण्यात आलेला आहे.
सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट म्हणजे काय? What is Saving Account and Current Account in Marathi |
बँकेत खाते उघडताना अथवा इतर बँकिंग कामात आपल्याला खात्याचा प्रकार विचारला जातो, त्यामध्ये सेविंग आणि करंट अकाउंट असे दोन प्रकार पाहायला मिळतात.
सेविंग अकाउंट म्हणजे जमा/बचत खाते, तर करंट अकाउंट म्हणजे चालू खाते.
सेविंग खाते उघडताना आपल्याला काळजी घ्यावी लागते की आपले बँकेत पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच पैशांचा व्यवहार दैनंदिन पातळीवर होणार नाही.
सामान्य लोक बचत खाते खोलतात कारण त्यांचे व्यवहार जास्त नसतात आणि जमा होणारी रक्कम ही नियमित असते. प्रत्येक बँक या खात्यावर एक निर्धारीत व्याजदर देत असते. त्यामुळे सामान्य लोकांची बचत झालेली रक्कम ही प्रत्येक वर्षी वाढत असते.
करंट अकाउंट मध्ये नियमित आणि सतत व्यवहार होत असतात. मोठमोठे उद्योगपती, कंपन्या आणि संस्था यांची करंट अकाउंट्स असतात कारण त्यांचे transactions हे मोठे असतात. त्यांचे व्यवहार दररोज होत असतात.
सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट मधील फरक – Difference between Saving Account and Current Account –
दोन्ही खात्यातील मुख्यत्वे तीन फरक सांगता येतील.
१. सेविंग अकाउंटवर आपल्याला वार्षिक व्याजदर (३% – ६%) मिळतो पण करंट अकाउंटवर व्याजदर मिळत नाही.
२. सेविंग अकाउंटला आर्थिक व्यवहाराची मर्यादा असते परंतु करंट अकाउंटला आर्थिक व्यवहाराची मर्यादा नसते.
३. सेविंग अकाउंटला बँकेचे पासबुक मिळते तर करंट अकाउंटला पासबुक मिळत नाही.
सामान्य लोक, विद्यार्थी, नोकरदार, आणि छोटे व्यावसायिक यांच्यासाठी सेविंग अकाउंट हा पर्याय उत्तम ठरतो तर मोठमोठे व्यापारी, उद्योगपती, उद्योगधंदे, संस्था यांच्यासाठी करंट अकाउंट हा पर्याय योग्य ठरतो.
तुम्हाला सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट म्हणजे काय (Saving Account & Current Account) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत आम्हाला कळवा…