प्रस्तुत लेख हा चित्ता या प्राण्याविषयी मराठी माहिती (Leopard Information In Marathi) आहे. चित्ता प्राण्याचे जीवन, राहणीमान आणि त्याची वैशिष्ट्ये अशा बाबींची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.
चित्ता माहिती मराठी | Leopard (Cheetah) Marathi Mahiti | Panther Information in Marathi |
चित्ता हा मार्जार कुळातील सस्तन प्राणी आहे. सर्वात वेगाने धावणारा प्राणी म्हणून चित्ता या प्राण्याची ओळख आहे. सर्वसाधारणपणे तो मानवाच्या किमान तिप्पट गतीने पळू शकतो. चित्त्याचे शास्त्रीय नाव ॲकिनोनिक्स जुबेटस (Acinonyx jubatus) असे आहे.
सध्याच्या काळात भारतात चित्ता जास्त संख्येने अस्तित्वात नाही. राजेमहाराजे यांच्या शिकारीच्या छंदामुळे भारतातील चित्ते नामशेष होत गेले. भारतीय चित्त्याला आशियाई चित्ता असे म्हटले जाते.
शरीररचना –
चित्त्याच्या संपूर्ण शरीरावर भरीव काळे ठिपके असतात. त्याच्या फक्त पोटावर आणि पायावर असे भरीव काळे ठिपके आढळत नाहीत. त्याच्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली रेषा असतात त्या अश्रुसारख्या दिसून येतात. त्याचे शरीर हे लांब सडक असते. त्याची छाती खोल, पाय लवचिक आणि डोके लहान असते.
चित्ता हा मांजरासारखा दिसतो. त्याचा आवाज देखील मांजरासारखाच असतो. त्याचे आयुर्मान १४ ते १५ वर्षे इतके असते. चित्ता हा सर्व जगभरात वेगाचे प्रतिक मानला जात असल्याने ज्या गतिशिल वस्तू किंवा यंत्रे असतील त्यांना चित्त्याची उपमा दिली जाते.
राहणीमान –
चित्ता हा मांसाहारी प्राणी आहे. तो सर्वाधिक हरीण, ससा व झेब्रा या प्राण्यांची शिकार करतो. शिकार करत असताना त्याला वेगाने धावणे गरजेचे असते. त्यावेळी तो ताशी १२० किमी वेगाने धावत असतो. सावज पकडण्यासाठी आणि दिशा बदलण्यासाठी तो शेपटीचा उपयोग करत असतो.
चित्ता गवताळ प्रदेशात किंवा झुडुपात राहणे पसंत करतो. तो उष्ण वातावरणात राहू शकतो. चित्ता हा झाडावर देखील राहू शकतो. नर चित्ता हा एकटा शिकार करत नाही परंतु मादी चित्ता ही एकटी शिकार करते.
चित्ता हा सकाळी लवकर किंवा सायंकाळी शिकार करतो. तो कितीही वेगाने धावत असला तरी देखील तो त्याच्या शिकारीचा एक ते दीड मिनिट पाठलाग करतो आणि शिकार शक्य नसल्यास तो त्या शिकारीचा पाठलाग करत नाही.
तुम्हाला चित्ता प्राण्याविषयी मराठी माहिती (Leopard Information In Marathi) आवडली असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा…