दारातील तुळसच सांगते “तुमच्या घरावर संकट येणार आहे”

tulasi

आपल्या धर्मग्रंथांमध्ये तुळशीचे स्थान सर्वोच्च मानले गेले आहे, आरोग्याच्या दृष्टीने बहुगुणी असणारी हि तुळस आपल्या घरासाठी तसेच कुटुंबासाठी सुद्धा उपयुक्त अशीच आहे. परंतु हीच तुळस तुमच्यावर उध्दभवणाऱ्या संकटाचे द्योतक सुद्धा आहे. हे बऱ्याच जणांना माहित नसेल. याचबद्दल आज आपण माहिती मिळवणार आहोत.

तुम्ही कधीतरी असं पाहिलं असेल कि जर आपल्या घरात, कुटूंबात किंवा आजूबाजूला काही समस्या उद्भवली तर त्याचा सर्वप्रथम परिणाम दारातील तुळशीवर होतो. तुम्ही त्या झाडाची किती जरी काळजी घेतली तरी हळूहळू ते सुकण्यास सुरवात होते. तुळशीची वनस्पती अशी आहे की ती तुम्हाला आधीच सांगेल की तुम्हाला किंवा तुमच्या कुटूंबाला काही अडचण येऊ शकते.

पुराण आणि शास्त्रानुसार लक्ष्मी म्हणजेच तुळस असे मानले जाते. मग ज्या घरात त्रास किंवा संकट येणार आहे अशा घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही. कारण जिथे गरीबी, अशांतता किंवा दुःख आहे तेथे लक्ष्मी वास करत नाही. त्यामुळेच सकाळी आपल्या घरात तुळशीची पूजा केली जाते. जर ज्योतिषशास्त्रानुसार पाहिले गेले तर हे सर्व बुध या ग्रहांमुळे होते. कारण बुध ह्या ग्रहाचा हिरव्या रंगावर परिणाम होतो आणि बुध वनस्पती कारक ग्रह मानला जातो. बुध हा एक असा ग्रह आहे जो इतर ग्रहांचा चांगला किंवा वाईट प्रभाव तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. जर एखादा ग्रह अशुभ परिणाम देत असेल तर त्याचा बुध घटकांवरही अशुभ परिणाम होतो.

“जर एखाद्या ग्रहाने शुभ परिणाम दिले तर त्याच्या शुभ परिणामामुळे तुळशीची वनस्पती वाढतच राहते आणि याचा आपल्या घरावर देखील शुभ परिणाम होतो”

तुम्ही कधी हे हि अनुभवले असेल कि कधी कधी तुळस वाढतच जाते. यालाच तुमच्या घरी सुखाचा वास आहे असे समजले जाते. याच्याच उलट जर तुळस सुखत असेल तर घरात दुःख आणि दारिद्र्याचा वास आहे असे समजले जाते. आपले पूर्वज देखील यावरूनच संकटाचा अंदाज बांधत असत. आणि याचा उल्लेख पुराणात देखील आढळतो.

जर दररोज रिकाम्या पोटावर तुळशीची चार पाने खाल्ली तर मधुमेह, रक्त विकार, वात, पित्त इत्यादी दोष नाहीसे होतात. जर आपण तुळशीजवळ पवित्रा लावून रोज काही वेळ बसलो तर आपल्याला श्वसन रोग, दमा इत्यादीपासून मुक्ती मिळू शकते. घरात एक तुळशीच्या रोपाची उपस्थिती चिकित्सकासारखीच असते. तसेच तुळस हि वास्तुचे दोष दूर करण्यास देखील सक्षम असते. तुळस हि जन्मापासून मृत्यूपर्यंत उपयुक्त आहे.

आपण कधी असा विचार केला आहे का, कि आपल्या घरातील सर्व दोष दूर करून आपले जीवन निरोगी आणि आनंदी बनविण्यास तुळस हि किती सक्षम आहे. रसायन शास्त्रात देखील याचा उल्लेख आवर्जून केला जातो.

हे हि वाचा- जास्त टीव्ही बघत असाल तर तयार व्हा या परिणामांना सामोरे जायला…