पाटण तालुक्यात प्रतिवर्षी होणारा पाऊस हा बाकी विभागाच्या तुलनेत जास्तच असतो. पाटण तालुक्यातील तारळे विभाग हा अतिवृष्टीचा म्हणून ओळखला जातो. यावर्षी सलग पाच महिने पाऊस असल्याने शेतीचे नुकसानदेखील मोठ्या प्रमाणावर झाले आहे. दरवर्षी पंधराशे ते दोन हजार मिलिमीटर पडणारा पाऊस हा जास्तच आहे. परंतु यावर्षी गाठलेला उच्चांक म्हणजे ३५०० मिलिमीटर पाऊस.
महत्त्वाचे मुद्दे :
– रेकॉर्डब्रेक ३५०० मिलिमीटर पावसाची नोंद.
– २०१३ पासून ठेवलेल्या नोंदीनुसार यावर्षी तारळे भागात सर्वात जास्त पाऊस.
– १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट – दहा दिवसात तेराशे मिलिमीटर पाऊस.
– ५ ऑगस्ट रोजी विक्रमी २२० मिलिमीटर पाऊस.
– तारळी धरणाचे दरवाजे पाच वेळा उघडावे लागले.
– पालमध्ये दोन वेळा घरात पाणी घुसण्याचा प्रसंग.
– शेतीचे व घरांचे जास्त प्रमाणात नुकसान.
मागील आठवड्यात असे वाटत होते की पाऊसाची सांगता झाली परंतु हा परतीचा पाऊस चांगलाच तग धरून आहे. आगामी काळात याचे नियोजन होणे गरजेचे आहे. तारळी धरण पूर्णवेळ भरलेलेच आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ओढे नद्या नाले दुथडी भरून वाहत होते.
हे सुद्धा वाचा- दिवसाची एक विधायक सुरुवात पहाटेच..!