Pav Bhaji recipe in Marathi | झणझणीत पाव भाजी रेसिपी मराठीमध्ये!
नुसतं पाव भाजी म्हटलं तरी अनेक जणांच्या तोंडाला पाणी सुटतं. हॉटेल मध्ये किंवा गाड्यावर खाताना त्याची चव काही निराळीच असते. Pav bhaji recipe बनवण्यासाठी एकदम सोप्पी आहे. अचानक नाश्त्यासाठी अनेक पाहुणे आले असता तुम्ही नक्कीच पाव भाजीचा बेत करू शकता. तासभर लागणाऱ्या वेळेत तुम्ही उत्तम शेफ कसे आहात हे स्वतःलाच समजेल.
Pav bhaji recipe Ingredients | साहित्य
१. उकडलेले बटाटे : ३-४
२. कांदा बारीक चिरून : ५-६
३. टोमॅटो बारीक चिरलेले : ५-६
४. ढोबळी मिरची बारीक चिरलेली- १०० ग्रॅम
५. वाटाणे – १०० ग्रॅम
६. हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली – २
७. लसूण बारीक वाटलेला – १
८. तेल २ चमचे.
९. लाल तिखट २ चमचे
१०. पाव भाजी मसाला – २ चमचे
११. जिरे अर्धा चमचा
१२. लिंबू – २
१३. मीठ
१४. लोणी (बटर)
१५. कोथिंबीर
Pav Bhaji Recipe Process | कृती:
१. उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. टोमॅटो, कांदा, मिरच्या, लसूण, ढोबळी मिरची बारीक करून घ्या.
२. एका भांड्यात २ चमचे तेल घ्या. मंद आचेवर थोडे गरम होऊ द्या.
३. बारीक चिरलेला कांदा व जिरे तेलात टाका. कांदा लालसर होईपर्यंत परतावा. कांदा करपू द्यायचा नाही.
४. थोड्या वेळाने बारीक केलेला लसूण टाकावा.
५. मिश्रण चांगले परतल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो टाकावा.
६. सर्व मिश्रण एकजीव झाले की त्यात चिरलेली ढोबळी मिरची घालावी.
७. आता थोडे पाणी टाकावे, ढोबळी मिरची शिजवून घ्यावी. झाकण ठेवावे.
८. थोड्या वेळाने त्यात कुस्करलेले बटाटे आणि पाणी टाकावे.
९. मीठ, लाल तिखट आणि पाव भाजी मसालालागलेच टाकून घ्यावे.
१०. सर्व मिश्रण चांगले एकत्र ढवळून घ्या. ( पाव भाजी एकजीव करण्यासाठी वापरण्यात येणारे भांडे वापरू शकता)
११. झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यावे. शिजल्यानंतर वाटाणे घालावेत. आता भाजी उकळू द्यावी.
१२. स्वादानुसार मीठ टाकू शकता.
१३. शेवटी त्यामध्ये कोथिंबीर, लिंबाचा रस आणि लोणी टाकून पावासोबत सर्व्ह करावी.
टीप – लाल तिखट योग्य प्रमाणात वापरावे. अगोदरच मिरची, लसूण, पाव भाजी मसाला असल्याने भाजी भडकू शकते.
तर हि पाव भाजी रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.
हे सुद्धा वाचा- Chicken Dum Biryani Recipe in Marathi | आस्वाद घेऊन तर पहा.