बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीसाठी खेळत असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत या उभय संघांतील पहिला कसोटी सामना नागपूर येथे खेळवला जात आहे.
ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात अवघ्या १७७ धावांवर ऑल आऊट केल्यानंतर भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ४०० धावा झालेल्या आहेत. त्यामध्ये जडेजा आणि अक्षर पटेल यांची अर्धशतके तर रोहित शर्माचे शतक समाविष्ट आहे.
सामन्याचा तिसरा दिवस – मोहम्मद शमीची घणाघाती खेळी ; ऑस्ट्रेलिया २२३ धावांनी पिछाडीवर
मोहम्मद शमी फलंदाजीसाठी आला तेव्हा असे वाटत होते की भारताचा डाव लगेच संपुष्टात येईल परंतु तसे न घडता मोहम्मद शमी व अक्षर पटेल यांनी ५२ धावांची भागीदारी केली आणि अक्षरशः ऑस्ट्रेलिया संघाला या सामन्यात परत येण्याची सर्व दारे बंद करून टाकली.
मोहम्मद शमीने ४७ चेंडूत ३७ धावांची खेळी केली ज्यामध्ये २ चौकार तर ३ षटकारांचा समावेश आहे. सामन्यादरम्यान शमीची खेळी पाहून सर्व प्रेक्षकांनी त्याच्या फटकेबाजीचा मनमुराद आनंद लुटला.
भारताने ४०० धावा केल्या आणि तब्बल २२३ धावांची आघाडी घेतली. पदार्पण करत असलेल्या मर्फी या फिरकीपटूने ७ बळी घेत आपली प्रतिमा उंचावली.