अभियंता दिन २०२३ – मराठी माहिती • Engineer’s Day 2023 •

• भारतात प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर या दिवशी अभियंता दिन साजरा केला जातो. भारताचे महान अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस आहे.

• एम. विश्वेश्वरय्या यांच्या अतुल्य योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन हा भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये आणि अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचा बहुमूल्य असा वाटा आहे.

• देशभरात बांधलेल्या अनेक नद्यांची धरणे आणि पूल यशस्वी करण्यात विश्वेश्वरय्या यांचे प्रयत्न यशस्वी ठरलेले होते. देशातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न कोणीही विसरू शकणार नाही.

• भारत सरकारने १९६८ मध्ये डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्म तारखेला ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा असे घोषित केले. तेव्हापासून दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो.

• एम. विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात झाला. अभियंता म्हणून काम पाहताना डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी देशात अनेक धरणे बांधलेली आहेत. म्हैसूरमधील कृष्णराज सागर धरण, पुण्यातील खडकवासला जलाशय आणि ग्वाल्हेरमधील तिग्रा धरण या प्रमुख धरणांचा समावेश आहे.

• हैदराबाद शहर बनवण्यामागे विश्वेश्वरय्या यांनाच श्रेय जाते. त्या शहराची पूर संरक्षण प्रणाली खूपच प्रसिध्द झाली. तसेच विशाखापट्टणम बंदराचे समुद्रापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी विकसित केलेली यंत्रणा देखील यशस्वी ठरली होती. त्याव्यतिरिक्त कारखाने, बँका, महाविद्यालये अशा कितीतरी रचना त्यांच्या हातून घडलेल्या आहेत.

विविध देशांमध्ये अभियंता दिन (Abhiyanta Din) साजरा केला जातो –

अभियंता दिन हा केवळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये देखील साजरा केला जातो. त्याची तपशीलवार माहिती खाली देण्यात आलेली आहे.

२४ फेब्रुवारी – इराण

२० मार्च – बेल्जियम

१६ जून – अर्जेंटिना

७ मे – बांगलादेश

१५ जून – इटली

१४ सप्टेंबर – रोमानिया

५ डिसेंबर – तुर्की

अभियंत्यांचे योगदान हे कोणत्याही देशाच्या वैज्ञानिक व भौतिक प्रगतीसाठी मोलाचे ठरत असते. त्यामुळे अभियंत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अभियंता दिन हा मुख्यत्वे साजरा केला जातो.

तुम्हाला अभियंता दिन मराठी माहिती (Engineer’s Day Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment