भोगी हा सण का व कसा साजरा करतात याबद्दलची सर्व माहिती आपण भोगी सण मराठी माहिती (Bhogi Information In Marathi) या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणे हे आपले कर्तव्य आहे. त्याच निमित्ताने प्रत्येक सण व प्रथा ही का व कशी साजरी केली जाते याबद्दलचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही घेऊन आलो आहोत भोगी या सणाविषयी खूपच रंजक आणि महत्त्वपूर्ण माहिती!
भोगी सण – २०२१ | Bhogi Information In Marathi | मकरसंक्रांत २०२१ |
मकर संक्रांतीचे तीन महत्त्वपूर्ण दिवस असतात. त्यामध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात. भोगी शब्दानुसार या सणाला “उपभोगाचा सण” असे देखील म्हटले जाते.
भोगी – आहार महत्त्व | Food Importance on Bhogi |
जानेवारी महिन्यात ज्या ज्या भाज्या, पिके उपलब्ध असतात, त्या सर्वांची मिळून एक भाजी तयार केली जाते. त्यामध्ये आवर्जून तीळ कुटून टाकले जातात.
वाल, पावटा, घेवडा, वाटाणा जे काही शेतात पिकेल त्याचा मसाले भात तयार केला जातो.
सर्व भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी ही या दिवशी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. त्यामध्ये चाकवत, वांगे, बोर, गाजर, ओला हरभरा, घेवड्याच्या शेंगा अशा भाज्यांचा समावेश असतो.
तीळयुक्त बाजरीची भाकरी ही या दिवशीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल.
हा काळ थंडीचा असल्याने शरीरात अतिरिक्त ऊर्जेची गरज भासत असते. म्हणून बाजरी आणि तीळ हे दोन्ही घटक उष्ण असल्याने त्यांचा आहारात समावेश केला जातो.
भोगी सण कसा साजरा करावा?
भोगी हा सण उपभोगाचा सण असल्याने या दिवशी आहार आणि सौख्य उपभोगण्याची प्रथा आहे.
सकाळी लवकर उठून स्त्रिया अभ्यंगस्नान करतात. नवीन अलंकार परिधान करतात. घरासमोर रांगोळी काढतात आणि उपभोगाचे प्रतिक असणाऱ्या इंद्रदेवाची पूजा केली जाते.
त्यानंतर जेवणात तीळयुक्त बाजरीची भाकरी, सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी, मसाले(फोडणी) भात, मुगडाळ, दही – लोणी, असा सर्वगुण संपन्न, उर्जादायक, उष्णता निर्माण करणारा आहार घेतला जातो.
भोगीला सुगड पुजण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी “वाण पूजन प्रथा” असेही म्हटले जाते. यामध्ये पाच छोटी मडकी पुजली जातात. या पाच मडक्यांत भाजी – भाकरी ठेवले जाते. सुगडांतील भाजी – भाकरी प्रसाद म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला खायची प्रथा आहे.
संक्रांतीच्या दिवशी या सुगडांचा सवाष्णी स्त्रियांना ववसा असतो. त्यानंतर ओटी भरणी आणि हळदी – कुंकू असे कार्यक्रम घेतले जातात.
वाचकांसाठी थोडेसे –
भोगी सण माहिती (Bhogi Information In Marathi) हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा… त्याबद्दल तुमचा अभिप्राय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा… धन्यवाद!
Thankyou
It helped me in school
thats nice