प्रस्तुत लेख हा मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ स्पष्ट करणारा लेख आहे. या लेखात अत्यंत प्रचलित असणाऱ्या म्हणींचा समावेश करण्यात आलेला आहे. या लेखात स्पष्ट करण्यात आलेल्या म्हणी आपल्याला आयुष्यात खूपच उपयोगी ठरतील अशी आशा…
मराठी म्हणी _ Marathi Mhani _
• अति तेथे माती
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे हितावह ठरत नसते.
• अतिशहाणा त्याचा बैल रिकामा
अति शहाणपण दाखवल्यास लोकोपयोगी कार्य करण्याची वृत्ती निर्माण होत नाही आणि लोकही मदत घेणे सोडून देतात मग ती परिस्थिती स्वतःसाठी नुकसानकारक ठरत असते.
• असतील शिते तर जमतील भुते
आपल्याजवळ पैसे, संपत्ती, भौतिक वस्तू असतील तर लोक आपल्या शेजारी जमाव करतात आणि तसे नसेल तर मात्र दूर होतात.
• अंथरूण पाहून पाय पसरावे
आपल्या ऐपतीप्रमाणे जीवन जगावे. अतिहव्यास किंवा अति खर्च करू नये.
• अडला नारायण गाढवाचे पाय धरी
गरजेसमयी मोठ्या लोकांनाही मूर्खांची मनधरणी करावी लागते.
• आयत्या बिळावर नागोबा
दुसऱ्याच्या मेहनतीचा लाभ स्वतः करून घेणे.
• आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
आपण कार्य करत असलेल्या क्षेत्रात नेहमीच अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होत असतो.
• असंगासी संग आणि प्राणाशी गाठ
दुर्जन लोकांशी संगत केल्यास आपलेच नुकसान होत असते प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.
• आधी पोटोबा मग विठोबा
सर्वप्रथम शारिरीक भूक भागवली जाते आणि नंतर देवदेव केला जातो.
• आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
एखादे कार्य करताना उल्हास नसणे आणि ते काम न करण्यासाठी कारण सापडणे.
• आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार
स्वतःजवळ नसलेल्या गोष्टी आपण इतरांना देऊ शकणार नाही.
• अंगापेक्षा बोंगा मोठा
खऱ्या गोष्टीपेक्षा त्याचे अवडंबरच मोठे करून सांगितले जाते.
• आपला हात जगन्नाथ
मेहनतीची संधी न सोडता स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणे.
• इकडे आड तिकडे विहिर
दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.
• आंधळे दळते नि कुत्रे पिठ खाते
मेहनत एकाची आणि लाभ दुसऱ्याचा.
• उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
उतावळेपणामुळे गडबड आणि मूर्खपणा करणे.
• उचलली जीभ लावली टाळ्याला
बोलण्यातील लकब आणि कला जाणून न घेता नुसतीच बडबड करणे.
• उथळ पाण्याला खळखळाट फार
कोणत्याही क्षेत्रात ज्ञानाची आणि अनुभवाची कमतरता असल्यास ती कमतरता भरून काढण्यासाठी एखादी व्यक्ती खूप बढाया मारताना दिसते.
• उंदराला मांजर साक्ष
वाईट कृत्य करत असताना एकमेकांचे साक्षी बनणे.
• एक ना धड भाराभर चिंध्या
एकाच वेळी अनेक गोष्ठी करण्याचा प्रयत्न कोणतीच गोष्ट पूर्ण होऊ देत नाही. सर्वच गोष्टी अर्धवट राहतात.
तुम्हाला मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ (Marathi Mhani ani Tyanche Arth) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा...