Veg Kolhapuri Recipe in Marathi । झणझणीत व्हेज कोल्हापुरी रेसिपी मराठीमध्ये!

ढाबे आणि हॉटेल्समध्ये पनीरनंतर कुठला पदार्थ प्रसिध्द झाला तर तो व्हेज कोल्हापुरी आहे. शाकाहारी लोक आवर्जून व्हेज कोल्हापुरी मागवतात. असा हा पदार्थ खूप चमचमीत आणि झणझणीत लागतो. थोडा तिखट असल्याने सोबत टोमॅटो किंवा कोशिंबीर खायला घ्यावी. जेवणाची मस्त मज्जा येते. आज आपण घरगुती मस्त व्हेज कोल्हापुरी बनवायला शिकणार आहोत की ज्यामध्ये खूप कमी कष्ट आहेत आणि चवीला देखील उत्तम बनते.

Veg kolhapuri recipe Ingredients –
साहित्य:

१. २ कांदे बारीक चिरून

२. २ टोमॅटो बारीक चिरून

३. गाजराचे बारीक तुकडे – अर्धा वाटी.

४. बटाटयाचे मोठे तुकडे – १ वाटी

५. फरसबीचे तुकडे – पाव वाटी

६. हिरवे वाटाणे – अर्धा वाटी

७. फ्लॉवरचे मध्यम तुकडे – १ वाटी

८. आले – लसूण पेस्ट – २ चमचे.

९. चिमुटभर वेलची पावडर, लवंग पावडर, दालचिनी पावडर, जायफळ पावडर

१०. अर्धा चमचा बडीशेप.

११. हळद – अर्धा चमचा

१२. लाल तिखट – २ चमचे

१३. कोल्हापूरी मसाला – २ चमचे.

१४. तेल – ३ चमचे

१५. जिरे

१६. मीठ

Veg Kolhapuri Recipe Process –
कृती –

१. कढईत तेल घ्या. त्यात आले – लसूण पेस्ट परतून घ्या. बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. लाल तिखट आणि टोमॅटो घालावा. मीठ टाकावे. सर्व मसाला एकजीव चांगला परतून घ्यावा. हा मसाला थंड होऊ द्यावा.

२. हा मसाला नंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावा.

३. कढईत तेल गरम करा. त्यात हळद आणि जिरे टाकावे. बटाटे, वाटाणे, गाजर, फ्लॉवर आणि फरसबी टाकावी. थोडे पाणी टाकून मस्तपैकी शिजू द्यावे.

४. शिजल्यावर त्यात अगोदरचा टोमॅटो – कांदा मसाला टाकावा. मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.

५. मिश्रणाला थोडी उकळी येऊ द्यावी. त्यामध्ये चिमुटभर वेलची पावडर, लवंग पावडर, दालचिनी पावडर, जायफळ पावडर, आणि बडीशेप टाकावी. आता सर्व मिश्रण एकत्र थोडे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे. चवीपुरते मीठ टाकावे.

६. सर्व टाकलेले पदार्थ शिजले का ? ते पाहावे. नंतर झाकण ठेवून १० – १५ मिनिटे मिश्रणातल्या वाफा काढून घ्याव्या. आता मस्तपैकी भाकरी, रोटी किंवा चपाती बरोबर ही भाजी सर्व्ह करावी.

टीप:

१. व्हेज कोल्हापुरी भाजी तिखटच असल्याने आवडीनुसार लाल तिखटाचे प्रमाण कमी-जास्त करावे.

२. खाऊचा लाल रंग वापरू शकता. भाजी मस्तपैकी लालसर दिसते.

Leave a Comment