आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष देणे अवघड होऊन बसले आहे. घराबाहेर दहा – बारा तास काम आणि परत घरी येणे त्यात परत झोप, यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे जमत नाही. सकाळी एकदा ब्रश केल्यानंतर नंतर कधीही दिवसभर आपण दाताकडे लक्ष देत नाही. एखाद्या दिवशी सुट्टी असल्यास तेवढ्यापुरते आपले दात पिवळे झाल्याची जाणीव आपल्याला होते, परंतु काही वेदना नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हे दुर्लक्ष आपल्याला महागात पडू शकते. काही दिवसांनी आपले दात किडू शकतात.
दाताच्या आतील बाजूने पिवळा थर साचत जातो. यामुळे आपण वारंवार डॉक्टरकडे जाऊन दात स्वच्छ करतो. यावर उपाय म्हणून आम्ही तुम्हाला आज काही घरगुती आणि नैसर्गिक पद्धती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्वतःचे दात चमत्कारीकरित्या पांढरे करू शकता.
• दात पिवळे होण्याची प्रमुख कारणे –
१. तंबाखूचे सेवन, सिगारेट, पौष्टिक आहार न घेणे, दातांची स्वच्छता न करणे यामुळे दातांचा पिवळेपणा वाढतो.
२. ब्रशचा उपयोग वरचेवर गडबडीत केला जातो.
३. टूथपेस्ट व्यतिरिक्त कुठलेच दुसरे माध्यम दात स्वच्छ करण्यासाठी वापरले जात नाही.
४. जेवल्यानंतर दातांची स्वच्छता केली जात नाही.
• घरगुती उपाय –
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी काही घरगुती व नैसर्गिक वस्तूंचा वापर करता येतो. या पदार्थांमधील गुणधर्म हे जंतुनाशक असतात, ज्यामुळे दातांची स्वच्छता तर होतेच शिवाय ते चमकू पण लागतात. हे पदार्थ कोणते आहेत, ते कसे वापरावेत, यासंदर्भातील माहिती आपण घेणार आहोत.
१. दातांवर बेकिंग सोडा लावल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो.
२. संत्र्याचे साल वाळवून पावडर बनवून दातांवर लावल्याने दातांची चमक वाढते.
३. ऑलिव्ह ऑइल दातांवर लावावे. आणि पाच मिनिटांनंतर पाण्याने धुवावे. यामुळे दात चमकतात.
४. ब्रश केल्यानंतर दातांवर खोबरेल तेल लावल्यास दातांची चमक टिकते.
५. स्ट्रॉबेरी बारीक करून पेस्ट बनवून त्याने दातांची हलक्या हाताने मालिश केल्याने दात चमकतात.
६. सफरचंदाचा पल्प दातांवर घासल्याने दात स्वच्छ होतात.
७. सुकामेवा, कडधान्ये, फळे खावीत, जेणेकरून तुम्हाला जास्त चावून खावे लागेल. चावून खाल्ल्याने दातांचा पांढरेपणा वाढतो.
८. लिंबाचे साल दातांवर घासल्याने दातांची चमक वाढते.
याचा अर्थ असा की, ज्या पदार्थात जास्त प्रथिने, क आणि ड जीवनसत्त्व आहे असे पदार्थ दातांवर घासावे किंवा ते चांगले चावून खावे.
हे सुद्धा वाचा- त्वचा आणि केसांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, येथे वाचा टिप्स.