प्रस्तुत लेखात मोर पक्षाविषयी मराठी माहिती (Peacock Information In Marathi) देण्यात आलेली आहे. मोर हा सुंदर व आकर्षक पक्षी आहे. त्याच्याविषयी सर्व प्रकारचे मूलभूत वर्णन या लेखात केलेले आहे.
मोर पक्षी माहिती | Mor Marathi Marathi |
निसर्गामध्ये विविध पक्षी व पक्ष्यांच्या जाती आढळतात काही पक्षी इतके सुंदर आणि मनमोहक असतात की त्यांचे सौंदर्य पाहतच रहावेसे वाटते. मोर हा दिसण्यात सुंदर व आकर्षक असून तो भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो.
मोर हा किडे, साप, उंदीर यांना खाद्य म्हणून खातो म्हणून त्याला मानवाचा मित्रही म्हटले जाते. त्यासोबतच मोर धान्य, बीया, फळे, तसेच शिजलेले अन्न सुद्धा खातात.
मोराला पाऊस खूप आवडतो म्हणून रिमझिम पावसाच्या वेळी मोर नेहमी नाचताना दिसतात. यावेळी मोराचे सौंदर्य बघण्यासारखे असते तो आपला पिसारा फुलवून लांडोरीला आपल्याकडे आकर्षित करत असतो.
मोराला प्राचीन काळापासूनच खूप महत्त्वाचे स्थान आहे, कारण मोराचे पीस हे भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावरती असते. मोर माता सरस्वतीचे आणि कार्तिक देवाचे वाहन आहे. त्यामुळे काहीजण मोराची पूजा सुद्धा करतात.
मोराचे सुंदर रूप आणि रंग पाहून मोराला पैठणी या मराठी महावस्त्रावर स्थान देण्यात आले आहे. मोर हा सौंदर्याचे प्रतिक समजला जातो. मेहंदी आणि रांगोळीत मोराला विशेष स्थान आहे.
मोर माळरानावर अथवा जंगलात आढळतो. त्याचे ओरडणे आपण खूप दुरून देखील ऐकू शकतो. मोर हा सहसा एकटा वावरणारा पक्षी आहे. त्याला इतर प्राणी पक्षी अथवा माणसाची साथ आवडत नाही. इतर प्राणी पक्षी जवळ येताच तो दूर निघून जातो.
आत्तापर्यंत प्रत्येक कला प्रकारात मोराला विशेष स्थान देण्यात आलेले आहे. नृत्य, योगा, संगीत, चित्रकला, शिल्पकला, अशा विविध माध्यमांतून मोराचे अप्रतिम वर्णन केलेले आहे.
मोराची शरीररचना –
विविध रंगाच्या पिसांनी सौंदर्यपूर्ण असलेला मोर हा पक्षी इतर पक्षांच्या तुलनेत मोठा असतो. मोराची लांबी साधारणतः 200 ते 250 सेंटिमीटर असते तर मोराचे व वजन पाच ते सहा किलो असते. मोर पक्षी असला तरी फक्त 25 फूट उंच उडू शकतो. त्याचे आयुर्मान 15 ते 20 वर्षांचे असते.
मोराच्या डोक्यावर तुरा असतो. त्याची मान उंच असते. त्याचे शरीर करड्या, जांभळ्या – निळ्या रंगाचे असते. मोरांच्या नर जातीला “मोर” तर मादी जातीला “लांडोर” म्हटले जाते. मोराच्या शरीरावर आकर्षक पंख / पिसारा असतो, त्या पंखांना मोरपीस असे म्हटले जाते. मोराला पिसारा असतो तर लांडोरीला पिसारा नसतो.
तुम्हाला मोर मराठी माहिती (Peacock Information In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…