प्रस्तुत लेख हा दिवाळी 10 ओळी मराठी निबंध (Diwali 10 Oli Marathi Nibandh) आहे. दिवाळी या सणाबद्दल माहिती सांगणारा हा निबंध अत्यंत मुद्देसूद वाक्यरचनेत मांडलेला आहे.
दिवाळी निबंध 10 ओळी | Diwali 10 Lines Essay In Marathi |
1) भारतात सर्वच सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. त्यापैकीच एक प्रमुख सण म्हणजे दिवाळी!
2) दिवाळीला “दिपावली” असे देखील म्हणतात. हा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई असते.
3) आश्विन महिन्याचा शेवट आणि कार्तिक महिन्याची सुरुवात, असे या सणाचे दिवस असतात.
4) धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे दिवाळीचे प्रमुख दिवस साजरे केले जातात.
5) दिवाळीसाठी खाद्यपदार्थ, आकाशकंदील, रांगोळी, फटाके, सुगंधित उटणे, साबण, पणत्या इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाते.
6) दिवाळी अगोदर तिखट-गोड खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यामध्ये लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंज्या, चिवडा असे काही मुख्य पदार्थ असतातच.
7) दिवाळीत भल्या पहाटे लवकर उठून सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते.
8) दिवाळीत नवीन कपडे परिधान करून फटाके वाजवणे आणि नाश्त्याला गोड-तिखट असा फराळ करणे हे सर्वांनाच आवडते.
9) घरातील मुली आणि स्त्रिया घरापुढे छानशी रांगोळी काढतात.
10) दिवाळीचा सण भरपूर आनंद, रोषणाई, सुख आणि समाधान घेऊन येत असतो.
तुम्हाला दिवाळी हा 10 ओळींचा मराठी निबंध (Diwali 10 Oli Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…