प्रस्तुत लेख हा गेंडा या प्राण्याविषयी मराठी माहिती (Rhino Information in Marathi) आहे. गेंड्याची शरीररचना, त्याचे राहणीमान, आणि त्याचे वास्तव्य अशा बाबींची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.
गेंडा माहिती मराठी | Genda Marathi Mahiti |
गेंड्याचे शास्त्रीय नाव ऱ्हाईनोसेरॉस युनिकॉर्नी असे आहे. गेंडा हा शाकाहारी प्राणी आहे. त्याच्या पायाला तीन खुरे असतात. तो आकाराने बराच मोठा प्राणी आहे.
गेंडा हा गवताळ प्रदेश, घनदाट जंगले अशा ठिकाणी राहणे पसंत करतो. तो आकाराने जरी मोठा असला, त्यामधे कितीही ताकद असली तरी सुध्दा तो कोणत्याही प्राण्यांची शिकार करत नाही.
शरीररचना –
गेंड्याची त्वचा ही जाड असते. शरीरावर केस नसतात, त्वचेवर घड्या पडलेल्या दिसतात. त्याचे शरीर मजबूत, डोके आकाराने मोठे, त्यावर एकच शिंग, आखूड पाय, पायाला तीन बोटे, शेपटीच्या टोकाला दाट केस, डोळे लहान अशी त्याची शरीररचना असते.
राहणीमान –
झाडाची पाने, गवत, डहाळ्या हे त्याचे खाद्य असते. शरीराने मजबूत, त्वचा जाड असल्यामुळे कोणताही अन्य प्राणी त्याची शिकार करू शकत नाही. हा प्राणी आफ्रिका, आशिया किनाऱ्याच्या बेटांवर आढळतो.
गेंड्याचे विविध प्रकार आहेत. ते म्हणजे काळा गेंडा, पांढरा गेंडा, भारतीय गेंडा. काळा गेंडा व पांढरा गेंडा हे दोन प्रकार आफ्रिकेत आढळून येतात. काळा गेंडा हा गवताळ प्रदेशात राहणे पसंत करतो. गेंडा या प्रजातीमधील पांढरा गेंडा हा आकाराने मोठा असतो. काही प्रजातीच्या गेंड्यांना दोन शिंगे असतात.
गेंड्यामध्ये गंध घेण्याची व ऐकण्याची कला विकसित आहे परंतु त्याच्याकडे पाहण्याची कला विकसित नाही. त्याला स्पष्ट दिसत नाही. त्याच्यावर जर कोणी हल्ला केला तर तो शिंगाने त्या हल्ल्याचा प्रतिकार करतो. भूतलावर हत्तीनंतर गेंडा हा सर्वात जाड प्राणी आहे. त्याचे आयुर्मान ४० ते ५० वर्ष इतके असते.
लेखन सौजन्य – प्रिती पवार
तुम्हाला गेंडा मराठी माहिती (Rhino Information in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत आम्हाला कळवा…