प्रस्तुत लेख हा क्रिप्टोकरन्सी (Crypto Currency), बिटकॉईन (Bitcoin) आणि ब्लॉकचेन (Blockchain) विषयी संपूर्ण माहिती देणारा लेख आहे.
क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन आणि ब्लॉकचेन या तिन्ही संकल्पना नवीनच रुजू झालेल्या आहेत. त्यामुळे या लेखातील त्यांची प्राथमिक स्वरूपाची माहिती तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोगी आणि गुंतवणुकीविषयी शंकानिरसन करणारी ठरेल.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? What is CryptoCurrency in Marathi?
क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलन. आभासी चलन हे खरोखर अस्तित्वात नसते. त्याला आपण डिजिटल किंवा व्हर्च्युअल करन्सी म्हणू शकतो.
प्रत्येक देशाचे जे चलन प्रचलित असते त्यापेक्षा हे चलन वेगळ्या प्रकारे उपयोगात येत असते. हे चलन फक्त “ऑनलाईन” स्वरूपात उपलब्ध असते. कोणत्याही देशाचे सरकार हे चलन छापत नाही अथवा तयार करत नाही.
जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टो करन्सीज आहेत. बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश अशा विविध क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत.
क्रिप्टो करन्सीची निर्मिती मायनिंगद्वारे होते आणि ब्लॉकचेन मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात.
बिटकॉईन म्हणजे काय? What Is Bitcoin In Marathi?
बिटकॉईन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. रुपया, डॉलर प्रमाणेच हे एक चलन आहे पण ते आभासी चलन आहे. ते ऑनलाईन उपलब्ध असते आणि संगणकीय कोडद्वारे एनक्रिप्टेड (लॉक) केलेले असते.
स्वतःकडील पैशांद्वारे ते चलन ऑनलाईन विकत घेता येते. चलन विकत घेतल्यावर एक वॉलेट तयार होतं ज्यामध्ये आपण चलन साठवू शकतो.
अशा प्रत्येक खरेदीवर एक ब्लॉक तयार होतो. या प्रक्रियेस “मायनिंग” असे संबोधले जाते. जेवढे जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील, तेवढे अधिक ब्लॉक बनतील आणि तेवढीच अधिक माईनिंग होईल.
बिटकॉईनचे व्यवहार ऑनलाईन होतात आणि हे व्यवहार एका ब्लॉकचेन नेटवर्कवर असलेल्या दोन व्यक्तींमध्ये होतात, त्यावर इतर कोणाचेही नियंत्रण नसते. हे व्यवहार दोन अकाऊंट दरम्यान होतात. तेथे कोणताही मध्यस्थ नसतो.
बिटकॉइन्सकडे सर्वजण गुंतवणूक म्हणून पाहतात कारण या बिटकॉईन्सचं मूल्य वाढत आहे आणि सतत बदलत आहे. त्यामुळे मोठे रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे.
बिटकॉईनचे दोन प्रकार पडतात – क्लासिक बिटकॉईन, आणि दुसरा म्हणजे हार्डफोर्क बिटकॉईन कॅश.
बिटकॉईनचे फायदे काय? Benefits of Bitcoin In Marathi |
ऑनलाईन पैशांची देवाणघेवाण सहज शक्य होते. क्रेडिट, डेबिट कार्डची गरज भासत नाही. सुरुवातीला फक्त वॉलेट बनवायला एक ऑनलाईन व्यवहार करावा लागतो.
कुठलाही व्यवहार केवळ दोन अकाऊंट्स दरम्यान होतो. इथे मध्यस्थाची गरज नाही.
बिटकॉईनचे व्यवहार कमीत कमी वेळात आणि कधीही करू शकतो. बँकांच्या सुट्या, राष्ट्रीय सुट्टया यांचा काहीही परिणाम त्यावर होत नाही.
बिटकॉईन पैसे एन्क्रिप्टेड स्वरुपात असतात म्हणजेच कॉम्प्युटर कोडेड असतात. ते बिटकॉईन यंत्रणा चालवणाऱ्यांनाही माहीत नसतात.
ब्लॉकचेन म्हणजे काय? What is Blockchain in Marathi?
क्रिप्टोकरन्सीसाठी ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान वापरलं जातं. ब्लॉकचेन म्हणजे रेकॉर्ड्सची लिस्ट. तुम्ही केलेले व्यवहार ब्लॉक स्वरूपात रियल टाईममध्ये साठवले जातात.
ती सर्व माहिती एकदा रेकॉर्ड झाल्यानंतर बदलता येत नाही, म्हणजेच कुलूप लावलेल्या पेटीप्रमाणे एक ब्लॉक असतो. त्यामुळे हे व्यवहार अतिशय सुरक्षित असतात.
ऑनलाईन व्यवहारांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान सगळ्यात सुरक्षित मानलं जात आहे आणि ही यंत्रणा हॅक करणे अशक्य आहे.
हा गुप्त व्यवहार फक्त दोन अकाउंट्समधील असतो त्यामुळे त्यावर इतर कोणाचेही नियंत्रण नसते.
संपूर्ण लेख हा क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन आणि ब्लॉकचेन विषयी प्राथमिक स्वरूपाची माहिती (Crypto Currency, Bitcoin & Blockchain Information In Marathi) आहे. ती आवडल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा…