प्रस्तुत लेखात शब्दांच्या जाती (Parts Of Speech In Marathi) दिलेल्या आहेत. मराठी व्याकरण अभ्यासताना विद्यार्थ्यांना शब्दांच्या जाती माहीत असणे खूप गरजेचे आहे.
शब्दांच्या जाती मराठी | Shabdanchya Jaati Marathi |
मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या आठ जाती आहेत.
१) नाम
२) सर्वनाम
३) विशेषण
४) क्रियापद
५) क्रियाविशेषण
६) शब्दयोगी अव्यय
७) उभयान्वयी अव्यय
८) केवलप्रयोगी अव्यय
१) नाम : वस्तू, व्यक्ती, स्थान, पदार्थ यांचे ठेवलेले नाव म्हणजेच “नाम” होय.
उदाहरणार्थ : मुंबई , राम ,पुस्तक.
२) सर्वनाम : नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास “सर्वनाम” असे म्हणतात.
उदाहरणार्थ : मी, तो, तू, ते, स्वतः, तुम्ही, हा , कोणी, जो.
३) विशेषण : नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे “विशेषण” होय.
उदाहरणार्थ : छोटा , मोठा , चांगला ,कठीण , वाईट.
४) क्रियापद : या शब्दातून क्रिया (कृती) व्यक्त होते किंवा जे शब्द स्थिती व्यक्त करतात त्या शब्दांना “क्रियापद” म्हणतात.
उदाहरणार्थ : चालणे, बोलणे, ऐकणे.
५) क्रियाविशेषण : वाक्यातील क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास “क्रियाविशेषण” असे म्हणतात.
उदाहरणार्थ : वारंवार , खूप , नेहमी, दररोज , नित्यनेमाने.
६) शब्दयोगी अव्यय : नाम किंवा सर्वनामाच्या पूर्वी ज्या शब्दांचा उपयोग केला जातो त्यास “शब्दयोगी अव्यय” असे म्हणतात. नाम किंवा सर्वनामाचा दुसऱ्या शब्दांशी संबंध पूर्वस्थितीने दर्शवला जातो.
उदाहरणार्थ : बसल्यामुळे, परवा ,केव्हाच.
७) उभयान्वयी अव्यय : दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणारे शब्द “उभयान्वयी अव्यय” म्हणून ओळखले जातात
उदाहरणार्थ : त्यासाठी, व , आणि, शिवाय, परंतु.
८) केवलप्रयोगी अव्यय : एखादी तीव्र भावना किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी जो शब्द वाक्यामध्ये वापरला जातो त्यास “केवलप्रयोगी अव्यय” असे म्हणतात.
उदाहरणार्थ : अरेरे, बापरे, शाब्बास.
तुम्हाला शब्दांच्या जाती – मराठी व्याकरण (Parts Of Speech In Marathi) हा लेख आवडला असल्यास तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…