शिक्षण - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 19 Oct 2023 05:42:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 शिक्षण - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 गुलाबाची आत्मकथा निबंध • Gulabachi Atmkatha Nibandh • https://dailymarathinews.com/gulabachi-autobiography-essay-in-marathi-gulabachi-atmakatha-nibandh/ https://dailymarathinews.com/gulabachi-autobiography-essay-in-marathi-gulabachi-atmakatha-nibandh/#respond Thu, 19 Oct 2023 04:43:42 +0000 https://dailymarathinews.com/?p=6043 आपल्या सर्वांना गुलाबाचे फूल परिचित आहेच. गुलाबाच्या फुलाची सुंदरता आणि महत्त्व ओळखूनच मानवाने त्याला फुलांच्या राजाची उपमा दिलेली आहे.

The post गुलाबाची आत्मकथा निबंध • Gulabachi Atmkatha Nibandh • appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तावना –

आपल्या सर्वांना गुलाबाचे फूल परिचित आहेच. गुलाबाच्या फुलाची सुंदरता आणि महत्त्व ओळखूनच मानवाने त्याला फुलांच्या राजाची उपमा दिलेली आहे. प्रस्तुत लेख हा गुलाबाची आत्मकथा या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे.

गुलाबाचे अस्तित्व हे अत्यंत कमी कालावधीसाठी असले तरी ते अत्यंत जिवंत व समग्र असे भासत असते, अशा आशयाचा हा निबंध आपल्यातील संवेदना जागृत करणारा आहे.

गुलाबाच्या फुलाची आत्मकथा मराठी निबंध | Gulabachya Fulachi Atmkatha Nibandh Marathi |

सभोवताली घडलेल्या घटनांचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. अशा घटनांतून आपल्याला जे अनुभव मिळतात तेच आपले जीवन घडवत असतात. अशाच घटनांचा समावेश आणि माझी असलेली समज या आत्मकथेत मी सांगणार आहे. मी कोण? अहो मी फुलांचा राजा गुलाब!

जुन्या गुलाबांनी मला सांगितले त्याप्रमाणे श्री. अभ्यंकर यांनी गुलाबाचे झाड कुंडीत लावले आणि काही दिवसांनी त्याला बागेत जागा मिळाली. बागेत लावल्यानंतर गुलाबाला खरेखुरे जीवन लाभले असे म्हणावे लागेल. लागवडीनंतर माझा जन्म हा एक वर्षानंतर झाला.

मी सर्वप्रथम कळी म्हणून अस्तित्वात आलो तेव्हा माझे डोळे मिटलेले होते. परंतु अत्यंत आल्हाददायक असे स्वतःचेच बंद असलेले अस्तित्व मला जाणवत होते. हवेच्या माऱ्याने मी फक्त इकडेतिकडे डोलत होतो. कळी कधी खुलते फक्त याचीच वाट मी पाहत होतो.

पहाटे – पहाटे कळी खुलली अन् मी फूल म्हणून अस्तित्वात आलो. अगदी कोवळे असे फूल जसे छोटेसे मूल! सूर्याच्या किरणांचा स्पर्श होताच मी उबदार झालो आणि जीवनाची सुरुवात झाली असे वाटू लागले. मी सर्वत्र कुतूहल दृष्टीने पाहू लागलो.

माझ्या शेजारी माझे अनेक बंधू देखील उमललेले मला दिसले. त्यांना पाहून अत्यानंद झाला. माझ्या झाडाशेजारी मोगरा आणि जास्वंद देखील अगदी दिमाखात उमललेले मला दिसत होते. तेव्हा एक माळी आला आणि आम्हाला जल प्रदान केले. तो माळी मला छान मनुष्य वाटला.

सकाळ निघून गेल्यानंतर बागेतील श्री गणेशाच्या मंदिरात लोक दर्शनासाठी येऊ लागले. सोबतच लहान मुली देखील येत होत्या. मुली फुलांशेजारी येऊन फुले तोडण्याचा प्रयत्न करत होत्या. मी उंचीवर असल्याने त्यांच्या हाताला लागत नव्हतो. जी फुले थोड्या कमी उंचीवर होती त्यांना त्या मुलींनी तोडलेच!

मुली निघून जाताच मला शांत – शांत वाटू लागले. काही वेळाने मंदिरातील पुजारी येऊन बागेतील अनेक फुलांना तोडून घेऊन गेला. मी थोडा लहान असल्याने त्याने मला तोडले नाही. परंतु काल जन्मलेल्या फुलांना त्याने अगदी निर्दयीपणे तोडून नेले. मला आणि बागेतील इतर फुलांना असह्य अशा वेदना जाणवल्या.

आपल्यासोबत देखील उद्या असेच होणार आहे याची जाणीव मनात खोलवर रुतली. तरीही मी सौंदर्याने भारलेल्या अशा बागेत जिवंत आहे ही भावना खूपच छान होती. दुपारचे ऊन झेलत आणि बागेतील मोठ्या झाडांना न्याहाळत असताना मला सर्व प्रकृती मंगल भासू लागली.

प्राकृतिक औदार्य आणि मनुष्याची हिंसा या दोन्ही भावना खूपच विपरीत अशा जाणवल्या. जीवनाचा अधिकार निसर्गाने बहाल केलेला असताना मनुष्य अगदीच संवेदनहीन होऊन कशी काय अशी हिंसा करू शकतो, या प्रश्नाने देखील माझे मन दुखावले.

सायंकाळ होताच अगदी रम्य असा अनुभव आला. सकाळी उडून गेलेले पक्षी निवाऱ्यासाठी आपापल्या घरट्यात परतत होते. त्यांचे बोल मनाला खूप प्रसन्न करत होते. मावळत्या दिनकराला पाहताना आपलेही जीवन असेच समाप्त होईल यावी जाणीव तीव्र झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी बागेतील प्रवेश बंद होता. बागेतील रस्त्याचे काम होणार असल्याने इतर लोकांना प्रवेश नव्हता. हे समजताच मी अगदी आनंदाने हेलकावे घेऊ लागलो. माझा गुलाबी रंग हा अजूनच खुलला आहे असे शेजारील फुलेच बोलू लागली. मी त्या दिवशी स्वच्छंदपणे जगलो, डोललो आणि अगदी कोमेजलो देखील!

माझे शारिरीक अस्तित्व हे कितीही सुंदर असले तरी ते मला कधीकधी पूर्णतः जगता येत नाही. जर मी पूर्ण जगलोच तरी माझा जिवंतपणा हा अत्यल्प असतो. असे असले तरी पूर्ण समग्रतेने जगण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी अस्तित्वाचा ऋणी राहीन.


तुम्हाला गुलाबाची आत्मकथा हा मराठी निबंध (Gulabachi Atmkatha Nibandh Marathi) आवडला अशी आशा…संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल खूप – खूप धन्यवाद!

The post गुलाबाची आत्मकथा निबंध • Gulabachi Atmkatha Nibandh • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/gulabachi-autobiography-essay-in-marathi-gulabachi-atmakatha-nibandh/feed/ 0 6043
इंग्रजी बोलायला कसे शिकाल? https://dailymarathinews.com/how-to-speak-english/ https://dailymarathinews.com/how-to-speak-english/#respond Fri, 29 Sep 2023 12:42:40 +0000 https://dailymarathinews.com/?p=6027 आज इंग्रजी भाषा बोलता येणे हे अत्यंत गरजेचे झालेले आहे. कोणताही जॉब असेल किंवा व्यवसाय असेल त्याठिकाणी बऱ्यापैकी इंग्रजी भाषेचा वापर होऊ लागलेला आहे.

The post इंग्रजी बोलायला कसे शिकाल? appeared first on Daily Marathi News.

]]>
आज इंग्रजी भाषा बोलता येणे हे अत्यंत गरजेचे झालेले आहे. कोणताही जॉब असेल किंवा व्यवसाय असेल त्याठिकाणी बऱ्यापैकी इंग्रजी भाषेचा वापर होऊ लागलेला आहे. ती गरज लक्षात घेऊन आम्ही या लेखात अशा पद्धतींचा समावेश केलेला आहे ज्यांमुळे तुमचे इंग्रजी भाषा कौशल्य वाढेल…

इंग्रजी संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी सातत्यपूर्ण सराव गरजेचा असतो. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या विविध पद्धतींचा वापर करू शकता…

1. व्यापक वाचन –

शब्दसंग्रह आणि वाक्य रचना समजून घेण्यासाठी पुस्तके, लेख आणि इतर लिखित साहित्य वाचा.

2. सक्रियपणे ऐका –

इंग्रजी टीव्ही शो, चित्रपट पहा किंवा पॉडकास्ट ऐका, उच्चार आणि स्वरावर लक्ष केंद्रित करा.

3. नियमितपणे बोला –

आत्मविश्वास आणि ओघ वाढवण्यासाठी स्थानिक भाषिक किंवा भाषा विनिमय भागीदारांशी संभाषणात व्यस्त रहा.

4. नियमितपणे लिहा –

लिखित स्वरूपात विचार व्यक्त करण्याचा सराव करण्यासाठी जर्नल ठेवा, ईमेल लिहा किंवा ऑनलाइन मंचांमध्ये व्यस्त रहा.

5. व्याकरण आणि शब्दसंग्रह जाणून घ्या –

इंग्रजी व्याकरणाच्या नियमांचा अभ्यास करा. अचूकता आणि अभिव्यक्ती सुधारण्यासाठी तुमचा शब्दसंग्रह विस्तृत करा.

6. कोर्स घ्या –

संरचित सूचना आणि फीडबॅक प्राप्त करण्यासाठी, वैयक्तिकरित्या किंवा ऑनलाइन, इंग्रजी भाषेच्या कोर्समध्ये नावनोंदणी करण्याचा विचार करा.

7. भाषा शिक्षण अॅप्स वापरा –

भाषा शिकण्याचे अॅप्स वापरा जे परस्पर सराव, प्रश्नमंजुषा आणि उच्चारण पद्धती देतात.

8. इंग्रजी रेकॉर्ड करा –

तुमचे भाषण रेकॉर्ड करा आणि सुधारण्यासाठी प्रयत्न करा. इंग्रजी भाषेतील उच्चार आणि स्वर ओळखण्यासाठी नियमितपणे इंग्रजी रेकॉर्ड करून ऐका.

9. सार्वजनिक बोलण्याचा सराव करा –

सादरीकरण आणि उच्चार कौशल्ये सुधारण्यासाठी सार्वजनिक बोलण्याच्या गटात सामील व्हा किंवा कार्यशाळांमध्ये सहभागी व्हा.

10. अभिप्राय घ्या –

सामर्थ्य आणि कमकुवतता ओळखण्यासाठी शिक्षक, समवयस्क किंवा भाषा भागीदारांकडून अभिप्राय विचारा, नंतर त्या सुधारण्यासाठी कार्य करा.

सातत्य आणि संयम हे महत्त्वाचे आहेत. तुमची शिकण्याची शैली आणि उद्दिष्टांसाठी तुमचा दृष्टिकोन तयार करा. तुम्हाला या टीप्स अवडल्या असतील तर नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post इंग्रजी बोलायला कसे शिकाल? appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/how-to-speak-english/feed/ 0 6027
गणेश चतुर्थी – मराठी माहिती | Ganesh Chaturthi Marathi Mahiti | https://dailymarathinews.com/ganesh-chaturthi-marathi-information-ganesh-chaturthi-marathi-mahiti/ https://dailymarathinews.com/ganesh-chaturthi-marathi-information-ganesh-chaturthi-marathi-mahiti/#respond Mon, 28 Aug 2023 04:10:04 +0000 https://dailymarathinews.com/?p=5967 गणेश चतुर्थीचा उत्सव हा सर्वांचा आवडता उत्सव आहे. भगवान गणेशाची प्रतिष्ठापना करून त्याची दहा दिवस मनोभावे पूजा केली जाते.

The post गणेश चतुर्थी – मराठी माहिती | Ganesh Chaturthi Marathi Mahiti | appeared first on Daily Marathi News.

]]>
गणेश चतुर्थीचा उत्सव हा सर्वांचा आवडता उत्सव आहे. भगवान गणेशाची प्रतिष्ठापना करून त्याची दहा दिवस मनोभावे पूजा केली जाते. अशा या गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) उत्सवाविषयी आपण या लेखात मराठी माहिती (Marathi Mahiti) जाणून घेणार आहोत.

गणेश चतुर्थी – मराठी माहिती • Ganesh Chaturthi Information in Marathi •

• गणेश चतुर्थी हा भारतीय हिंदू संस्कृतीतील महत्वपूर्ण उत्सव आहे. विनायक, एकदंत, गणपती, गणेश, विघ्नहर्ता, गणराया – अशा विविध नावांनी परिचित असलेल्या गणपतीची पूजा या उत्सवात केली जाते.

• पूजास्थळी गणपतीच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना केली जाते. श्री गणेशाच्या पायांत जास्वंद पुष्प, कुंकू, सुपारी, दुर्वा आणि निवेदनासाठी मोदक ठेवतात. त्यानंतर मंत्रे, स्तोत्रे, आरती आणि विधिमान पूजा केली जाते.

• श्री गणेश चतुर्थी हा उत्सव भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीला साजरा केला जातो. ते एक धार्मिक व्रत सुद्धा आहे.

• गणपतीच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. या उत्सवाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, गणेशाची मनोभावे पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते.

• गणपती देवाला मोदक खूप आवडतात. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. पूजनाचे ताट त्यासमोर मांडले जाते. जास्वंदीचे फुल आणि दुर्वा यादेखील मूर्तीसमोर वाहिल्या जातात.

• “गणपती बाप्पा… मोरया” असा गणपतीचा नामघोष करत आरतीला सुरुवात होत असते. प्रत्येक कुटुंबाच्या मान्यतेनुसार आणि गरजेनुसार गणपतीच्या मूर्तीचे पूजन केले जात असते.

• गणपती हा सर्व गणांचा अधिपती आहे असे म्हटले जाते. त्याच्या स्वरूपाचे रूपांतर होत गेलेले आहे आणि पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. गणपती शेजारी आपण उंदीर बसलेला पाहतो. त्याचे कारण म्हणजे गणपतीचे वाहन हे उंदीर आहे.

• भारतीय लोक कौटुंबिक स्तरावर गणेशाची पूजा करतच असतात परंतु सामाजिक स्तरावर एकत्र येण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव देखील साजरा केला जातो. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो.

• लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात १८९४ साली केली. त्यावेळी गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जात असत.

• आधुनिक महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे स्वरूप बदललेले आपण पाहतो. सध्या आधुनिकता आणि तंत्रज्ञान यांचा पुरेपूर वापर गणेश उत्सवात केला जातो.

• सार्वजनिक स्तरावर डेकोरेशन, डीजे सिस्टीम, स्पीकर्स, मोठ्या उंचीची गणेश मूर्ती अशा बाबी वापरात आणल्या जातात. गणेश आगमन आणि गणेश विसर्जन अशा वेळी सर्रास मोठ्या गाजावाजात बाप्पाची मिरवणूक काढली जाते.

तुम्हाला गणेश चतुर्थी – मराठी माहिती (Ganesh chaturthi Mahiti Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post गणेश चतुर्थी – मराठी माहिती | Ganesh Chaturthi Marathi Mahiti | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/ganesh-chaturthi-marathi-information-ganesh-chaturthi-marathi-mahiti/feed/ 0 5967
नागपंचमी – मराठी माहिती • Naag Panchami Mahiti Marathi • https://dailymarathinews.com/naagpanchami-marathi-information-naag-panchami-mahiti-marathi/ https://dailymarathinews.com/naagpanchami-marathi-information-naag-panchami-mahiti-marathi/#respond Sun, 20 Aug 2023 06:18:37 +0000 https://dailymarathinews.com/?p=5958 नागपंचमी हा सण कसा साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व या लेखात अत्यंत मुद्देसुद पद्धतीने मांडण्यात आलेले आहे.

The post नागपंचमी – मराठी माहिती • Naag Panchami Mahiti Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा नागपंचमी (Naag Panchami) या सणाविषयी मराठी माहिती (Marathi Mahiti) देणारा लेख आहे. नागपंचमी हा सण कसा साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व या लेखात अत्यंत मुद्देसुद पद्धतीने मांडण्यात आलेले आहे.

नागपंचमी माहिती मराठी _ Naag Panchami Information In Marathi

• नागपंचमी या सणाला नागाची पूजा केली जाते. हा सण श्रावण महिन्यातील शुध्द पंचमीला साजरा केला जातो.

• नागपंचमी दिवशी शेतात नांगरणे, खणणे, कापणे अशा कोणत्याही प्रकारचे काम केले जात नाही. त्यादिवशी नागदेवतेला ईजा होऊ नये आणि त्याचे पूजन व्हावे असा हेतू त्यामागील आहे.

• कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुना नदीतून सुरक्षित वर येतात तो दिवस श्रावण शुध्द पंचमीचा होता. त्यामुळे नागपंचमी हा सण त्या दिवशी साजरा केला जातो अशी मान्यता आहे.

• नागपंचमी सणाला नागाच्या मूर्तीला किंवा खऱ्या नागाला दुधाचा अथवा खिरीचा नैवेद्य दाखवला जातो.

• शेष, वासुकी, कम्बल, धृतराष्ट्र, पद्मनाभ तक्षक, शंखपाल आणि कालिया या आठ प्रकारच्या नागांची या दिवशी पूजा केली जाते. तसेच भविष्योत्तर पुराणात मणिभद्रक, ऐरावत, कार्कोटक आणि धनंजय या इतरही नागांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

नागाचे महत्त्व –

• नाग हा वेगवेगळ्या रंगांचा असतो. त्यामध्ये करडा, हिरवा, पिवळा, काळा असेही रंग आढळतात. नागाच्या बचावासाठी प्रकृतीनुसार त्याच्या तोंडात विषाची निर्मिती होत असते.

• नागाचे विष हे मनुष्यासाठी धोकादायक असल्याने नागापासून माणूस विशेष सावधानता बाळगत असतो. ही सावधानता नागपंचमी सणाला देखील दिसून येते. काही ठिकाणी गारुडी नागाला घेऊन येतात तेव्हा अनेक लोक नागापासून दूर – दूर राहून पूजन करतात.

• मनुष्याची ध्यानक्षमता नाग ओळखू शकतो. जो व्यक्ती ध्यान आणि अध्यात्मिक गती प्राप्त करत असतो तेव्हा नाग तेथे उपस्थित होत असतात. म्हणजेच अध्यात्मिक संवेदनशीलता ही नागात नैसर्गिकरीत्या उपलब्ध असल्याने मनुष्याने त्याला पूजनीय मानले.

• तसेच अध्यात्मिक प्रक्रियेत कुंडलिनी ऊर्जा हे नागाचेच प्रतिक मानले गेले आहे. नाग हा कितीतरी अर्थाने मानवाच्या संवेदनशीलतेला जवळीक साधत असल्याने प्राचीन काळापासून मनुष्य त्याची पूजा करत आलेला आहे.

स्त्रियांसाठी नागपंचमी सण _

• नागपंचमी सणाच्या निमित्ताने भाऊ आपल्या विवाहित बहिणीला तिच्या माहेरी घेऊन जात असतो. नागपंचमीला स्त्रिया उपवास पकडतात तसेच हातावर मेंदी देखील काढतात.

• घराची साफसफाई केली जाते. घराच्या अंगणात सुंदर अशी रांगोळी काढली जाते. भिंतीवर तसेच अंगणात नागाची चित्रे काढली जातात. सणावेळी जिवंत नाग, वारूळ अथवा नागाच्या मूर्तीची पूजा केली जाते. नागपंचमी दिवशी पुरणपोळीचे गोड जेवण बनवले जाते.

• सणादिवशी नागदेवतेची पूजा झाल्यानंतर स्त्रिया झाडाला दोर बांधून झोके घेतात. झिम्मा – फुगडी, पिंगा असे खेळ खेळतात तसेच फेर धरून नाचतात. उखाणे, गप्पा, गाणी, नृत्य अशा विविध प्रकारे स्त्रिया या दिवशी व्यक्त होत असतात.

तुम्हाला नागपंचमी – माहिती मराठी (Naag Panchami Mahiti Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post नागपंचमी – मराठी माहिती • Naag Panchami Mahiti Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/naagpanchami-marathi-information-naag-panchami-mahiti-marathi/feed/ 0 5958
मराठी म्हणी संग्रह आणि अर्थ _ https://dailymarathinews.com/marathi-money-collection-and-meaning-_/ https://dailymarathinews.com/marathi-money-collection-and-meaning-_/#respond Tue, 20 Jun 2023 04:57:57 +0000 https://dailymarathinews.com/?p=5838 प्रस्तुत लेख हा मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ स्पष्ट करणारा लेख आहे. या लेखात अत्यंत प्रचलित असणाऱ्या म्हणींचा समावेश करण्यात आलेला आहे.

The post मराठी म्हणी संग्रह आणि अर्थ _ appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ स्पष्ट करणारा लेख आहे. या लेखात अत्यंत प्रचलित असणाऱ्या म्हणींचा समावेश करण्यात आलेला आहे. या लेखात स्पष्ट करण्यात आलेल्या म्हणी आपल्याला आयुष्यात खूपच उपयोगी ठरतील अशी आशा…

मराठी म्हणी _ Marathi Mhani _

अति तेथे माती

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे हितावह ठरत नसते.

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा

अति शहाणपण दाखवल्यास लोकोपयोगी कार्य करण्याची वृत्ती निर्माण होत नाही आणि लोकही मदत घेणे सोडून देतात मग ती परिस्थिती स्वतःसाठी नुकसानकारक ठरत असते.

असतील शिते तर जमतील भुते

आपल्याजवळ पैसे, संपत्ती, भौतिक वस्तू असतील तर लोक आपल्या शेजारी जमाव करतात आणि तसे नसेल तर मात्र दूर होतात.

अंथरूण पाहून पाय पसरावे

आपल्या ऐपतीप्रमाणे जीवन जगावे. अतिहव्यास किंवा अति खर्च करू नये.

अडला नारायण गाढवाचे पाय धरी

गरजेसमयी मोठ्या लोकांनाही मूर्खांची मनधरणी करावी लागते.

आयत्या बिळावर नागोबा

दुसऱ्याच्या मेहनतीचा लाभ स्वतः करून घेणे.

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे

आपण कार्य करत असलेल्या क्षेत्रात नेहमीच अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होत असतो.

असंगासी संग आणि प्राणाशी गाठ

दुर्जन लोकांशी संगत केल्यास आपलेच नुकसान होत असते प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.

आधी पोटोबा मग विठोबा

सर्वप्रथम शारिरीक भूक भागवली जाते आणि नंतर देवदेव केला जातो.

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

एखादे कार्य करताना उल्हास नसणे आणि ते काम न करण्यासाठी कारण सापडणे.

आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार

स्वतःजवळ नसलेल्या गोष्टी आपण इतरांना देऊ शकणार नाही.

अंगापेक्षा बोंगा मोठा

खऱ्या गोष्टीपेक्षा त्याचे अवडंबरच मोठे करून सांगितले जाते.

आपला हात जगन्नाथ

मेहनतीची संधी न सोडता स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणे.

इकडे आड तिकडे विहिर

दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.

आंधळे दळते नि कुत्रे पिठ खाते

मेहनत एकाची आणि लाभ दुसऱ्याचा.

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

उतावळेपणामुळे गडबड आणि मूर्खपणा करणे.

उचलली जीभ लावली टाळ्याला

बोलण्यातील लकब आणि कला जाणून न घेता नुसतीच बडबड करणे.

उथळ पाण्याला खळखळाट फार

कोणत्याही क्षेत्रात ज्ञानाची आणि अनुभवाची कमतरता असल्यास ती कमतरता भरून काढण्यासाठी एखादी व्यक्ती खूप बढाया मारताना दिसते.

उंदराला मांजर साक्ष

वाईट कृत्य करत असताना एकमेकांचे साक्षी बनणे.

एक ना धड भाराभर चिंध्या

एकाच वेळी अनेक गोष्ठी करण्याचा प्रयत्न कोणतीच गोष्ट पूर्ण होऊ देत नाही. सर्वच गोष्टी अर्धवट राहतात.

तुम्हाला मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ (Marathi Mhani ani Tyanche Arth) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा...

The post मराठी म्हणी संग्रह आणि अर्थ _ appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/marathi-money-collection-and-meaning-_/feed/ 0 5838
रिंकू सिंग _ मराठी माहिती _ व्यक्तिविशेष https://dailymarathinews.com/rinku-singh-_-marathi-information-_-personal/ https://dailymarathinews.com/rinku-singh-_-marathi-information-_-personal/#respond Sun, 28 May 2023 10:29:02 +0000 https://dailymarathinews.com/?p=5772 आयपीएलमधील त्याची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय अशी असल्याने त्याच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेणे सर्वांनाच आवडेल.

The post रिंकू सिंग _ मराठी माहिती _ व्यक्तिविशेष appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा रिंकू सिंग या क्रिकेटपटू विषयी मराठी माहिती आहे. आयपीएलमधील त्याची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय अशी असल्याने त्याच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेणे सर्वांनाच आवडेल.

रिंकू सिंग _ Rinku Singh Information in Marathi _

रातोरात प्रसिद्ध झालेले अनेक लोक आपण पाहिले आहेत, यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे ते नाव म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स संघातील स्टार क्रिकेटर रिंकू सिंग!

आयपीएलच्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या 5 चेंडूत सलग 5 षटकार ठोकणारा हा खेळाडू आता चर्चेचा विषय ठरला आहे.

रिंकू सिंगचा जीवन परिचय _

रिंकू सिंग हा भारतातील उत्तरप्रदेश राज्यातील आहे. रिंकू सिंगचे संपूर्ण नाव ठाकूर रिंकू खानचंद्र सिंग असे आहे. त्याचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 मध्ये अलिगढ, उत्तरप्रदेश मध्ये झाला. त्याच्या आईचे नाव विनादेवी सिंग असून त्या गृहिणी आहेत तर वडिलांचे नाव खानचंद्र सिंग आहे.

रिंकू सिंगला एक भाऊ आणि एक बहिण आहे. एकाचे नाव जितू सिंग असून तो ऑटो रिक्षा चालवायचे काम करत असे तर बहिणीचे नाव नेहा सिंग आहे. रिंकू सिंगने अलिगढ मधूनच शिक्षण घेतले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तो नववीपर्यंतच शिक्षण घेऊ शकला.

रिंकू सिंगची क्रिकेट कारकीर्द

घरची परिस्थिती नाजूक असताना देखील रिंकू त्याच्या स्वप्नानसोबत बिलगून राहिला आणि क्रिकेट खेळत राहिला. त्याच्या मेहनतीच्या जोरावर 5 मार्च 2014 रोजी उत्तरप्रदेशच्या देशांतर्गत संघाच्यावतीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्याने पहिल्याच सामन्यात खूप चांगली कामगिरी बजावली. या सामन्यात रिंकुने 84 धावांची खेळी केली. देशांतर्गत संघातून खेळताना रिंकुला उत्तरप्रदेशच्या अंडर 19 आणि अंडर 23 संघातही खेळण्याची संधी मिळाली.

5 नोहेंबर 2016 रोजी रिंकूने रणजी ट्रॉफीचा पहिला सामना खेळला. रणजी ट्रॉफीच्या 2016-2017 च्या हंगामात रिंकू सिंगने 40 सामन्यांमध्ये प्रभावी एकूण 2875 धावा केल्या. दरम्यान रिंकुनेही सर्वाधिक 163 धावा केल्या.

2017 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर रिंकूचे भाग्य खऱ्या अर्थाने पालटले. KKR ने रिंकुवर बोली लावून त्याला खरेदी केले. त्यानंतर रिंकू खऱ्या अर्थाने गरिबीतून बाहेर आला.

2017 मध्ये पंजाब टीमने दहा लाखांच्या बेस प्राईसवर रिंकूला खरेदी केलं, त्यावर्षी तो एकच मॅच खेळू शकला. 2018 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने रिंकू सोबत करार केला.2018 मध्ये KKR ने रींकुला खरेदी केला मात्र तो टीममध्ये आपली जागा नाही बनवू शकला.

2022 च्या आयपीएलमध्ये मात्र रिंकूने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने आपली जागा बनवली. काही महत्त्वपूर्ण सामन्यांत उत्तम कामगिरी बजावत त्याने फिनिशर म्हणून आपले स्थान KKR संघात मजबूत केलेले आहे.

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात रिंकूने 5 चेंडूत सलग पाच षटकार खेचत सामना जिंकून दिल्याने त्याचे नाव संपूर्ण क्रिकेट विश्वात प्रसिद्ध झाले.

तुम्हाला रिंकू सिंग विषयी दिलेली मराठी माहिती (Rinku Singh Marathi Mahiti) आवडल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post रिंकू सिंग _ मराठी माहिती _ व्यक्तिविशेष appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/rinku-singh-_-marathi-information-_-personal/feed/ 0 5772
कोरफड – मराठी माहिती • Korfad Marathi Mahiti • https://dailymarathinews.com/korfad-marathi-mahiti-korfad-marathi-mahiti/ https://dailymarathinews.com/korfad-marathi-mahiti-korfad-marathi-mahiti/#respond Fri, 19 May 2023 05:05:02 +0000 https://dailymarathinews.com/?p=5753 कोरफड वनस्पतीची प्राथमिक माहिती, तिचे उपयोग व फायदे या लेखात सांगण्यात आलेले आहेत.

The post कोरफड – मराठी माहिती • Korfad Marathi Mahiti • appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा कोरफड (Korfad Marathi Mahiti) या वनस्पतीविषयी मराठी माहिती देणारा लेख आहे. कोरफड वनस्पतीची प्राथमिक माहिती, तिचे उपयोग व फायदे या लेखात सांगण्यात आलेले आहेत.

कोरफड वनस्पती माहिती मराठी • Korfad Vanaspati Marathi Mahiti •

• कोरफड ही सर्वसाधारणपणे एक औषधी वनस्पती आहे. कोरफडीला संस्कृतमध्ये कुमारी तर इंग्रजीत ॲलो (Aloe) असे म्हटले जाते.

• कोरफड ही वनस्पती दक्षिण भारतात रानटी अवस्थेतही आढळते. वेस्ट इंडीज देशात कोरफडीचे प्रमाण अत्यधिक आहे.

• कोरफड वनस्पती म्हणजे मजबूत पानांचा गुच्छ असतो. ते पान म्हणजे एक जाड, मांसल काटेरी दात असलेला भाग असतो. ते पान टोकदार असते. त्याचा रंग हिरवा असतो. कोरफडीचे खोड आखूड असून तिची मुळे खूप खोलवर रुजलेली नसतात.

• ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यांत पानांवर पिवळसर केशरी रंगाच्या फुलांचा फुलोरा येतो. फुलांचे बोंडे हे अनेकबीजी असतात.

• ॲलो कुळातील कोरफड ही एक प्रजात आहे. कोरफडीचा रस आरोग्यदायी असतो. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, फाॅलिक ॲसिड ई. घटक असतात आणि  झिंक, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असतात.

• कोरफडीचा समावेश रोजच्या आहारात झाल्यास शरीराला पोषक घटक मिळतात. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रस घेतला जावा असा सल्ला वैद्य देतात.

• कोरफडीमध्ये ॲलोईन, बार्बलाई, शर्करा, एन्झाईम व इतर औषधी रसायने असतात. ते सर्व घटक शारिरीक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी मदत करतात. ‘कुमारी आसव’ नामक औषध देखील कोरफडीपासून बनवले जाते.

• कोरफडीचा रस हा भूक वाढवतो. त्याची पाने ही रेचक, कृमिनाशक आहेत. तसेच ती पाने कडवट असतात आणि ती पाने थंडावा देखील प्रदान करतात.

• मानवी डोळे, यकृत, श्वासनलीका इत्यादी अवयवांच्या विकारांवर कोरफड उपयुक्त आहे. त्वचेच्या समस्या, भाजलेला भाग, हिमदाह इत्यादींसाठी कोरफडीचा गर वापरला जातो.

• चेहर्‍याच्या समस्या, सौदर्यप्रसाधनांत तसेच केसांच्या आरोग्यावर उपाय म्हणून कोरफड वापरली जाते.

तुम्हाला कोरफड – मराठी माहिती (Korfad Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post कोरफड – मराठी माहिती • Korfad Marathi Mahiti • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/korfad-marathi-mahiti-korfad-marathi-mahiti/feed/ 0 5753
जागतिक परिचारिका दिन मराठी माहिती • World Nurses Day https://dailymarathinews.com/world-nurses-day-2023/ https://dailymarathinews.com/world-nurses-day-2023/#respond Thu, 11 May 2023 04:08:07 +0000 https://dailymarathinews.com/?p=5743 १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.

The post जागतिक परिचारिका दिन मराठी माहिती • World Nurses Day appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा जागतिक परिचारिका दिन (World Nurses Day) याविषयी माहिती देणारा लेख आहे. हा दिवस १२ मे ला सर्वत्र साजरा केला जातो.

जागतिक परिचारिका दिन _ World Nurses Day

• परिचारिका ( नर्स ) ही व्यक्ती आपल्या अगदी ओळखीची असते. आपण जेव्हा वैद्यकीय मदत घेत असतो तेव्हा त्याठिकाणी आपल्याला रुग्णसेवा करत असलेल्या परिचारिका दिसतात.

• परिचारिका म्हणून काम करणारी स्त्री ही ममता भाव ठेवून रुग्णांची सेवा करत असते. हे काम अत्यंत समाजोपयोगी असल्याने त्याचा सन्मान म्हणून जागतिक स्तरावर परिचारिका दिन साजरा केला जातो.

• १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करणारी परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे.

• जेथे जेथे परिचारिका काम करत असतात तेथे तेथे हा दिन अगदी सहजपणे साजरा केला जातो. परिचारिकेला योग्य तो सन्मान देऊन त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. शिवाय सांस्कृतिक कलेचा आविष्कार देखील काही ठिकाणी दाखवला जातो. सोशल मीडियाचा वापर करून सर्वत्र या दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात.

• 2019 मध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीत असंख्य लोकांनी आपले प्राण गमावले परंतु त्याहीपेक्षा कित्येक पटीने लोकांचे प्राण देखील वाचवले गेले. तेव्हा काम करणारे वैद्य आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या परिचारिका यांचे महत्त्व हे विषद करणे अशक्य आहे.

• सध्या परिचारिका म्हणून अनेक स्त्रिया आपले काम निवडत आहेत. परिचारिका म्हणून काम करून त्या रुग्णसेवा करत आहेत. त्यांचा योग्य तो सन्मान होणे अत्यंत गरजेचे आहे आणि जागतिक परिचारिका दिन हा अगदी उत्साहात साजरा होणे आवश्यक आहे.

• समाजातील प्रत्येक घटक हा परिचारिका दिनाशी जोडला जाणे आवश्यक आहे तेव्हाच सर्वांना परिचारिकेची सेवा व महत्त्व समजण्यात मदत होईल.

तुम्हाला जागतिक परिचारिका दिन (International Nurses Day) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा …

The post जागतिक परिचारिका दिन मराठी माहिती • World Nurses Day appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/world-nurses-day-2023/feed/ 0 5743
तुळस _ मराठी माहिती • Tulas Mahiti Marathi • https://dailymarathinews.com/tulas-_-marathi-information-tulas-mahiti-marathi/ https://dailymarathinews.com/tulas-_-marathi-information-tulas-mahiti-marathi/#respond Sun, 07 May 2023 05:23:53 +0000 https://dailymarathinews.com/?p=5740 तुळस या वनस्पतीचे महत्त्व लक्षात घेता आपल्याला त्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. चला तर मग पाहुयात तुळस वनस्पतीची माहिती!

The post तुळस _ मराठी माहिती • Tulas Mahiti Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेखात तुळस (Tulas) या बहुपयोगी वनस्पतीविषयी माहिती सांगितलेली आहे. तुळस या वनस्पतीचे महत्त्व लक्षात घेता आपल्याला त्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. चला तर मग पाहुयात तुळस वनस्पतीची माहिती!

तुळस माहिती मराठी _ Basil Information in Marathi

• तुळस वनस्पतीचे शास्त्रीय नाव ऑसिमम सॅंक्टम (Ocimum sanctum) आहे तर इंग्रजी भाषेत तुळशीला बेसिल (Basil) असे संबोधतात. तुळस ही पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे.

• तुळशीची रोपे आशिया, आफ्रिका व युरोप या खंडांमध्ये आढळतात. तुळशीची उंची साधारणतः ३० ते १२० सेमी एवढी असते.

• तुळशीची पाने लंबगोलाकार व टोकदार असतात. तुळशीची पाने खोकला आणि घशाच्या आजारांवर अत्यंत गुणकारी असतात.

• तुळशीच्या फुलाला मंजिरी म्हणतात. फुलांमध्येच तुळशीच्या बिया आढळतात. त्यापासून संगुधी तेल देखील बनवले जाते.

• तुळस वनस्पतीपासून जास्तीत जास्त ऑक्सिजन सोडला जातो. त्यामुळे भारतात तरी प्रत्येक घरासमोर तुळस असणे हे अत्यंत पवित्र आणि मांगल्याचे समजले जाते.

• भारतीय स्त्रिया देवदेवतांचे पूजन करून झाल्यावर तुळशीची सुद्धा पूजा करतात. सण समारंभ असल्यास पहाटे पहाटे तुळशीला पवित्र पाणी वाहिले जाते.

• तुळशीची माळ परिधान करणे, तुळशीचे लग्न लावणे, तुळशीचा काढा पिणे, व्यक्तीच्या मृतदेहावर तुलसीपत्र ठेवणे अशा विविध प्रथा तुळशी संबंधी प्रसिध्द आहेत. तसेच सकाळी व सायंकाळी तुळशीपुढे धूप – अगरबत्ती व दिवाही लावला जातो.

• तुळस ही थोडी कडवट चवीची असते. शारिरीक रोगराई व विविध प्रकारच्या कीटकांच्या प्रादुर्भावामध्ये तुळशीची पाने उपयोगी ठरतात.

तुळशीचे प्रकार –

विविध प्रदेशांतील तुळशीच्या जातींवरून तुळशीचे प्रकार पडलेले आहेत. औषधी तुळस, कापूर तुळस, लवंग तुळस, काळी तुळस, कृष्ण तुळस, रान तुळस असे तुळशीचे प्रकार प्रामुख्याने सांगता येतील.


तुम्हाला तुळस – मराठी माहिती (Tulas Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post तुळस _ मराठी माहिती • Tulas Mahiti Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/tulas-_-marathi-information-tulas-mahiti-marathi/feed/ 0 5740
गुडफ्रायडे – नक्की काय घडले या दिवशी? https://dailymarathinews.com/what-happened-on-good-friday/ https://dailymarathinews.com/what-happened-on-good-friday/#respond Fri, 07 Apr 2023 08:38:53 +0000 https://dailymarathinews.com/?p=5697 ख्रिश्चन बांधव गुडफ्रायडे या दिवशी चर्चमध्ये जातात. प्रभू येशूंच स्मरण करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात.

The post गुडफ्रायडे – नक्की काय घडले या दिवशी? appeared first on Daily Marathi News.

]]>
ख्रिश्चन धर्मीय लोकांत गुडफ्रायडे हा दिवस अत्यंत शुभ व पवित्र समजला जातो. गुड फ्रायडे या दिवसाचं नक्की गुपित काय आहे आणि त्यामागे कोणतं रहस्य व कोणती घटना आहे ते आपण जाणून घेणार आहोत या लेखात…

ख्रिश्चन बांधव गुडफ्रायडे या दिवशी चर्चमध्ये जातात. प्रभू येशूंच स्मरण करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. गुडफ्रायडे या दिवशी ख्रिस्ती धर्मात सामाजिक कार्य देखील केले जाते. अशा पद्धतीने साजरा करण्यात येणारा हा दिवस काही विशिष्ट महत्त्व देखील ठेवतो.

काय घडले गुडफ्रायडे या दिवशी?

भगवान येशुंनी ज्या दिवशी मरण स्वीकारले म्हणजेच ज्या दिवशी त्यांना सुळावर चढवून मृत्यु देण्यात आला, तो दिवस शुक्रवार होता. त्याला गुड फ्रायडे असे संबोधले जाते कारण तो जरी आपल्याला हिंसात्मक दिवस वाटत असला तरी त्यामुळे प्रेम आणि शांतीचा संदेश संपूर्ण जगभरात पसरला गेलेला आहे.

प्रभू येशू ख्रिस्त यांना ज्यावेळी वधस्तंभावर खिळवण्यात आले त्यावेळी देखील त्यांच्या चेहऱ्यावर शांती झकळत होती. कोणत्याही प्रकारची वेदना आणि कष्ट त्यांच्या देहबोलीवरून जाणवत नव्हती. त्यांनी मृत्युला कवटाळत स्वतःच्या मारेकऱ्यांसाठी देखील “ईश्वरा यांना माफ कर, त्यांना माहीत नाही की ते काय करत आहेत” अशी प्रार्थना केली.

मरणयातना भोगत असतानाही त्यांनी मारेकऱ्यांसाठी प्रार्थना केली असल्याने ते ईश्वराचे पुत्र होते हे स्पष्ट होते. या घटनेनंतर मानवी इतिहासात येशू ख्रिस्त हे अत्यंत सकारात्मक प्रभाव सोडू शकले.

प्रभू येशू ख्रिस्त यांचा मृत्यू हा प्रेमपूर्ण आणि सकारात्मक भावनेने विश्वभरात ओळखला जावा यासाठी शुक्रवार या दिनाला “गुड फ्रायडे” किंवा “होली डे” असे संबोधले जाते.

काही ठिकाणी या दिनाला “ब्लॅक डे” असे देखील संबोधले जाते. येशू ख्रिस्त हे दैवी पुरुष असतानाही त्यांना वेदनादायक मृत्यु देण्यात आला. त्यामुळे बहुतांश लोक या दिवसाला “ब्लॅक डे” म्हणजे “काळा दिवस” मानतात.

गुडफ्रायडे या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त यांनी दिलेली शिकवण वाचली जाते. बायबलमधील वचने समजून घेण्याचा आणि अंगिकारण्याचा प्रयत्न केला जातो. चर्चमध्ये जाऊन मनोभावे प्रार्थना केली जाते. अशाप्रकारे गुड फ्रायडे हा दिवस अत्यंत शुभ भावनेने साजरा केला जातो.

The post गुडफ्रायडे – नक्की काय घडले या दिवशी? appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/what-happened-on-good-friday/feed/ 0 5697