मराठी भाषण Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 04 Mar 2023 04:37:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 मराठी भाषण Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 वार्षिक स्नेहसंमेलन समारोह _ स्वागत भाषण _ https://dailymarathinews.com/annual-affection-conference-function-_-welcome-speech-_/ https://dailymarathinews.com/annual-affection-conference-function-_-welcome-speech-_/#respond Sat, 04 Mar 2023 04:31:06 +0000 https://dailymarathinews.com/?p=5626 आज इस मंच पर एकत्रित हुए सभी शिक्षकों, गैर-शिक्षण कर्मचारियों और प्राचार्यों के साथ-साथ सभी छात्रों और उनके अभिभावकों को मेरा प्रणाम!

The post वार्षिक स्नेहसंमेलन समारोह _ स्वागत भाषण _ appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख वार्षिक स्नेहसम्मेलन कार्यक्रम में दिया गया स्वागत भाषण (Welcome Speech in hindi) है। यह एक सामयिक और सामान्य भाषण है। आप इसे अवसर के अनुसार बदल सकते हैं …

उद्घाटन भाषण • स्वागत भाषण • Annual Function welcome Speech in hindi

आज इस मंच पर एकत्रित हुए सभी शिक्षकों, गैर-शिक्षण कर्मचारियों और प्राचार्यों के साथ-साथ सभी छात्रों और उनके अभिभावकों को मेरा प्रणाम!

मैं कार्यक्रम शुरू करने को लेकर बहुत उत्साहित हूं। हम सभी को गर्व है कि हमारे शैक्षिक परिसर में हर साल इस तरह का भव्य आयोजन किया जाता है।

पूरा कार्यक्रम बेहद सांस्कृतिक स्वरूप का होगा। जिसमें छात्र वक्तृत्व कला, संगीत, नृत्य, नाटक जैसी विभिन्न कलाओं का प्रदर्शन करेंगे।

साथ ही इस वर्ष विभिन्न क्षेत्रों, प्रतियोगी परीक्षाओं, खेल प्रतियोगिताओं में सफलता प्राप्त करने वाले विद्यार्थियों के लिए अभिनंदन का भी आयोजन किया गया है।

यह कहना होगा कि वार्षिक स्नेहसमेलन कार्यक्रम न केवल छात्रों का कलात्मक प्रदर्शन है बल्कि एक सांस्कृतिक कार्यक्रम भी है जिसमें गांव के सभी माता-पिता, शिक्षक और नागरिक भाग लेते हैं।

कार्यक्रम का उद्देश्य माता-पिता को यह भी बताना है कि शैक्षणिक वर्ष के दौरान उनका बच्चा कैसे प्रगति कर रहा है और इसके बारे में शिक्षकों और स्कूल के कर्मचारियों से पूछें।

अगर माता-पिता और नागरिक शिक्षा के बारे में कुछ सुझाव देना चाहते हैं, तो वे ऐसा कर सकते हैं। मैं आपका अधिक समय न लेते हुए आप सभी को विदा करता हूं और कार्यक्रम प्रारंभ करने की बोली लगाता हूं। धन्यवाद!

अगर आपको यह लेख वार्षिक स्नेह सम्मेलन _ इनॉगरल स्पीच (Inaugural Speech Annual Function in hindi) पसंद आया हो तो कमेंट बॉक्स में अपनी प्रतिक्रिया दें…

The post वार्षिक स्नेहसंमेलन समारोह _ स्वागत भाषण _ appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/annual-affection-conference-function-_-welcome-speech-_/feed/ 0 5626
पतसंस्था उद्घाटन भाषण • Patsanstha Udghatan Bhashan • https://dailymarathinews.com/patsanstha-opening-speech-patsanstha-udghatan-bhashan/ https://dailymarathinews.com/patsanstha-opening-speech-patsanstha-udghatan-bhashan/#respond Fri, 24 Feb 2023 06:22:19 +0000 https://dailymarathinews.com/?p=5607 पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी करण्यात येणाऱ्या भाषणाविषयी विस्तृत स्वरूपाची माहिती या लेखात दिलेली आहे.

The post पतसंस्था उद्घाटन भाषण • Patsanstha Udghatan Bhashan • appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा पतसंस्था उद्घाटन भाषण (Patsanstha Udghatan Bhashan) याविषयीचा मराठी लेख आहे. पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी करण्यात येणाऱ्या भाषणाची विस्तृत स्वरूपाची मुद्देसूद माहिती या लेखात दिलेली आहे.

पतसंस्था उद्घाटन भाषण | Pat sanstha Udghatan Bhashan (Welcome Speech)

मी ज्ञानराज उदयभान जाधव. मला पतसंस्थेच्या उद्घाटनाची संधी दिलीत त्याबद्दल मी पतसंस्थेच्या कार्यकारी मंडळाचे तसेच पतसंस्थेशी निगडित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि भाषणाला सुरुवात करतो.

आपण बचत करण्यासाठी बँकेचा पर्याय निवडत असतो. त्याप्रमाणेच पतसंस्थेतदेखील आपण आपली बचत करू शकतो.

बँकेप्रमाणे सहकारी पतसंस्था या देखील कर्जपुरवठा करत असतात. सभासद असलेल्या लोकांची आर्थिक गरज भागवत असतात. त्यामुळे अत्यंत प्रभावी आणि लोकोपयोगी कार्य हे पत संस्थेमार्फत होत असते, याची जाणीव सर्वांना असायला हवी.

ग्रामीण विभाग, शहरी व निमशहरी विभाग अशा सर्व स्तरांतील लोकांना पतपुरवठा व्हावा या उद्देशाने पतसंस्था निर्मिती होत असते. अडीअडचणीच्या काळात कुटुंबांना आर्थिक चणचण भासू नये यासाठी पतसंस्था कधीही मदतीसाठी तयारच असते.

या संस्थेचे संस्थापक, संचालक यांची पतसंस्थेविषयी असणारी जबाबदारी देखील तेवढीच महत्त्वपूर्ण पद्धतीची असते. सर्व सभासद व पदाधिकारी यांनी स्वतःची ओळख व कार्य ओळखून या पतसंस्थेच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.

सहकारी पतसंस्था या मदत, जबाबदारी, लोकशाही, एकता, समानता अशा मूल्यांवर आधारित असल्याने तेथील नियम व अटी या सर्वांनाच लागू होतात. तेथील नियमांची अमंलबजावणी सर्वांमार्फत व्हावी आणि पतसंस्था ही भविष्यात देखील विकसित होत राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना!

अशा सर्व बाबींचा विचार केल्यावर एखादी पतसंस्था निर्माण होणे हे खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल. तर आजच्या उद्घाटन प्रसंगी सर्व सभासदांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

तसेच सर्वांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होऊन व्यक्ती व कुटुंबाचा विकास हा येणाऱ्या काळात या पतसंस्थेमार्फत व्हावा ही सदिच्छा! मी पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानून भाषण संपवतो! नमस्कार!

तुम्हाला पतसंस्था उद्घाटन भाषण (Patsanstha Udghatan Bhashan) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post पतसंस्था उद्घाटन भाषण • Patsanstha Udghatan Bhashan • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/patsanstha-opening-speech-patsanstha-udghatan-bhashan/feed/ 0 5607
वार्षिक स्नेहसंमेलन – उद्घाटन भाषण – Annual Function Welcome Speech https://dailymarathinews.com/annual-function-welcome-speech/ https://dailymarathinews.com/annual-function-welcome-speech/#respond Sun, 05 Feb 2023 04:51:48 +0000 https://dailymarathinews.com/?p=5475 आज या व्यासपीठावर जमलेले सर्व शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक तसेच सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक अशा सर्वांना माझा नमस्कार!

The post वार्षिक स्नेहसंमेलन – उद्घाटन भाषण – Annual Function Welcome Speech appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा वार्षिक स्नेहसंमेलन ( Annual Function) कार्यक्रमावेळी करण्यात येणारे उद्घाटन भाषण (Welcome Speech) आहे. एक मुद्देसूद स्वरूपाचे आणि सामाईक असे हे भाषण आहे. प्रसंगानुरूप तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता…

उद्घाटन भाषण • Welcome Speech (Annual Day Speech)

आज या व्यासपीठावर जमलेले सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक तसेच सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक अशा सर्वांना माझा नमस्कार!

कार्यक्रमाची सुरुवात करताना मला खूपच उत्साह जाणवत आहे. असा भव्यदिव्य कार्यक्रम हा प्रत्येक वर्षी आपल्या शैक्षणिक संकुलात आयोजित केला जातो याचा आपल्या सर्वानाच रास्त अभिमान आहे.

संपूर्ण कार्यक्रम हा अगदीच सांस्कृतिक स्वरूपाचा असेल. ज्यामध्ये वक्तृत्व, संगीत, नृत्य, नाट्य असे विविध कलाविष्कार विद्यार्थी सादर करतील.

त्याशिवाय यावर्षी विविध क्षेत्रांत, स्पर्धा परीक्षांत, क्रीडा स्पर्धांत ज्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले त्यांचा सत्कार देखील आयोजित करण्यात आलेला आहे.

वार्षिक स्नेहसंमेलन हा कार्यक्रम म्हणजे फक्त विद्यार्थ्यांचा कलाविष्कार नसून सर्व पालक, शिक्षक, गावचे नागरिक अशा सर्वांचाच सहभाग असलेला सांस्कृतिक स्वरूपाचा कार्यक्रम आहे असे म्हणावे लागेल.

आपला पाल्य शैक्षणिक वर्षात कशी प्रगती करतो आहे याची जाणीव पालकांना व्हावी व त्यांनी शिक्षकांना व शालेय कर्मचाऱ्यांना त्याबद्दल विचारणा करावी असाही उद्देश्य या कार्यक्रमाचा आहे.

पालकांना व नागरिकांना शिक्षणाबद्दल काही सूचना करावयाच्या असतील तर ते करू शकतात. तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हा सर्वांचा निरोप घेतो आणि कार्यक्रमाला सुरुवात व्हावी अशा सूचना देतो. धन्यवाद!

तुम्हाला वार्षिक स्नेहसंमेलन – उद्घाटन भाषण (Annual Function Welcome Speech In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post वार्षिक स्नेहसंमेलन – उद्घाटन भाषण – Annual Function Welcome Speech appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/annual-function-welcome-speech/feed/ 0 5475
प्रजासत्ताक दिन भाषण [2023] • Republic Day Speech in Marathi • https://dailymarathinews.com/republic-day-speech-2023-republic-day-speech-in-marathi/ https://dailymarathinews.com/republic-day-speech-2023-republic-day-speech-in-marathi/#respond Tue, 24 Jan 2023 05:54:33 +0000 https://dailymarathinews.com/?p=5431 या भाषणात प्रजासत्ताक दिनाचा इतिहास, महत्त्व, आणि तो कसा व का साजरा केला जातो याचे विस्तृत वर्णन केलेले आहे.

The post प्रजासत्ताक दिन भाषण [2023] • Republic Day Speech in Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा प्रजासत्ताक दिनाविषयी मराठी भाषण (Republic Day Essay in Marathi) आहे. या भाषणात प्रजासत्ताक दिनाचा इतिहास, महत्त्व, आणि तो कसा व का साजरा केला जातो याचे विस्तृत वर्णन केलेले आहे.

प्रजासत्ताक दिन – मराठी भाषण | Prajasattak Din Bhashan Marathi

अध्यक्ष महोदय, उपस्थित मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व येथे जमलेले सर्व विद्यार्थी व नागरिक अशा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार!

२६ जानेवारी ही तारीख आपण प्रजासत्ताक दिन म्हणून संपुर्ण देशभर साजरी करतो. या दिवशी प्रत्येक भारतीय हा देशासाठी अभिमानाची भावना बाळगतो. २६ जानेवारी या दिवशीचा इतिहास काय आहे ते सर्वप्रथम जाणून घेऊयात.

भारताच्या संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाला मान्यता दिली. त्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले.

भारतीय राज्यघटना संपूर्ण देशभर अंमलात आलेला दिवस म्हणून २६ जानेवारी या दिवशी संपूर्ण देशात ध्वजारोहण करून भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली जाते.

भारताला एक संपूर्ण स्वतंत्र राष्ट्र म्हणून या दिवसापासून कायदेशीरदृष्ट्या चालना मिळाली. अनेक महत्त्वाचे कायदे आणि नियम आपल्या देशात लागू करण्यात आले. या दिवसापासून भारताला एक अशी कायदेप्रणाली मिळाली जी संपूर्ण देशवासीयांच्या जीवनाला प्रेरित करणारी होती.

दरवर्षी २६ जानेवारी दिवशी प्रत्येक सरकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत असतो. यावेळी तेथील कर्मचारी हा संपूर्ण कार्यक्रम पूर्णत्वास नेत असतात. शाळा – महाविद्यालयांत सर्व विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ – नागरिक या सोहळ्यात सामील होत असतात.

भारतीय सुरक्षा दल संचलन आणि विविध प्रादेशिक विभाग व राज्ये यांचे सांस्कृतिक संचलन यावेळी होत असते. भारतीय राष्ट्रपती या सर्व संचलनकर्त्यांची मानवंदना स्वीकारतात.

२६ जानेवारी या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. या दिनाला राष्ट्रीय दिन म्हणून स्थान दिले गेले आहे.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. संपुर्ण भाषण ऐकल्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

तुम्हाला प्रजासत्ताक दिन हे मराठी भाषण (Republic Day Speech in Marathi) आवडले असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post प्रजासत्ताक दिन भाषण [2023] • Republic Day Speech in Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/republic-day-speech-2023-republic-day-speech-in-marathi/feed/ 0 5431
शेतकरी खरेदी – विक्री केंद्र उद्घाटन भाषण | https://dailymarathinews.com/shetkari-kharedi-sales-center-inaugural-address/ https://dailymarathinews.com/shetkari-kharedi-sales-center-inaugural-address/#respond Sun, 16 Oct 2022 03:27:19 +0000 https://dailymarathinews.com/?p=5069 आर्थिक संपन्नता प्राप्त होण्यासाठी शेतीविषयक योग्य सल्ला आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. असे मार्गदर्शन मिळाले आणि तंत्रज्ञानाची योग्य साथ

The post शेतकरी खरेदी – विक्री केंद्र उद्घाटन भाषण | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तावना –

सर्वप्रथम मला आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! येथे जमलेले सर्व मान्यवर लोक, इतर क्षेत्रातील पदाधिकारी, कृषी सेवा केंद्राचे मालक तसेच उपस्थित सर्व लोक अशा सर्वांना माझा नमस्कार!

कृषी सेवा केंद्र / शेतकरी खरेदी विक्री केंद्र – उद्घाटन भाषण

कोणताही व्यवसाय असो तो जर लोकांचे भले करत असेल, लोकांची मदत करत असेल तर त्याची भरभराट होणे निश्चित असते. लोकांचा विश्वास संपादन करून तो व्यवसाय करणारी व्यक्ती येणाऱ्या भविष्यात मोठी बनत असते. स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करत असते.

देशात हरितक्रांती झाल्यापासून कृषी सल्लागार आणि कृषी सेवा केंद्रांची गरज निर्माण झालेली दिसून येते. आपले महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य असल्याने कृषी संबंधित सर्व व्यवसाय हे विकास करतच असतात आणि करतही आहेत.

व्यवसायाचा प्रत्यक्ष फायदा हा शेतकऱ्यांना पोहचणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना लाभ पोहचला तर आपला शेतकरी वर्ग विकसित होऊ शकतो. शेतकरी वर्ग जर विकसित झाला तर आपला समाज व महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर जाऊ शकते.

शेती करण्याचा दृष्टिकोन हा फक्त उपजीविका पूर्ण होणे हा नसला पाहिजे तर त्यातून आपली आर्थिक वाढ देखील अपेक्षित आहे. आपण जी पिके पिकवतो आणि बाजारातील जी गरज आहे यातील अंतर जर कमी झाले तर आपला शेतकरी बांधव नक्कीच विकास करू शकतो.

आर्थिक संपन्नता प्राप्त होण्यासाठी शेतीविषयक योग्य सल्ला आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. असे मार्गदर्शन मिळाले आणि तंत्रज्ञानाची योग्य साथ लाभली तर शेतकरी वर्ग सुखी होऊ शकतो.

कृषी सेवा केंद्र हे जर शेतकऱ्यांना लाभ पोहचवू शकले तर कोणताही शेतकरी आत्महत्या करण्याचा विचारही करणार नाही आणि सातत्याने प्रगती करतच राहील. त्यामुळे पुनश्च एकदा आपला समाज हा एक आर्थिक संपन्नता आणि स्थिरता प्राप्त करू शकेल.

शेवट –

उद्घाटनाच्या शुभप्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल आणि माझे विचार शांतपणे ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार!

The post शेतकरी खरेदी – विक्री केंद्र उद्घाटन भाषण | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/shetkari-kharedi-sales-center-inaugural-address/feed/ 0 5069
तंबाखूचे दुष्परिणाम – मराठी भाषण  |Tambakhuche Dushparinam Bhashan Marathi | https://dailymarathinews.com/marathi-speech-tambakhuche-dushparinam-bhashan-marathi/ https://dailymarathinews.com/marathi-speech-tambakhuche-dushparinam-bhashan-marathi/#respond Tue, 06 Sep 2022 07:28:45 +0000 https://dailymarathinews.com/?p=4959 तंबाखू सेवन केल्याने मानवी आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो याबद्दल माहिती या भाषणात दिलेली आहे.

The post तंबाखूचे दुष्परिणाम – मराठी भाषण  |Tambakhuche Dushparinam Bhashan Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम (Tambakhuche Dushparinam Marathi Speech) या विषयावर आधारित एक मराठी भाषण आहे. तंबाखू सेवन केल्याने मानवी आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो याबद्दल माहिती या भाषणात दिलेली आहे.

तंबाखूचे खाण्याचे तोटे – मराठी भाषण | Tambakhu Khanyache Tote – Marathi Bhashan |

प्रस्तावना –

अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग, आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, आज मी तुम्हाला तंबाखूचे दुष्परिणाम या विषयावर आधारित एक भाषण सादर करणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती…

भाषण –

मनुष्याच्या विकासात शारिरीक आरोग्य हे एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यासंदर्भात शारिरीक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी आपल्याला काही घातक सवयींपासून अगोदरच दूर राहावे लागते. तंबाखूचे सेवन ही देखील अशी एक घातक सवय आहे ज्यामुळे मनुष्याच्या आरोग्यात बाधा निर्माण होत असते.

तंबाखूच्या सेवनामुळे आजपर्यंत कितीतरी लोकांना स्वतःचे प्राण गमवावे लागलेले आहेत. सुरुवातीला मज्जा म्हणून जडलेली सवय ही कालांतराने अत्यंत घातक परिणाम घडवून आणत असल्याने मनुष्याने त्यापासून अगोदरच सावध असणे गरजेचे आहे.

संपूर्ण जगभरात तंबाखू खाण्याचे प्रमाण जास्त असल्याने दर 8 सेकंदाला एका व्यक्तीचा त्यामुळे मृत्यू होत आहे. तंबाखूमुळे विकार जडण्याची प्रक्रिया ही खूप मंदगतीने होत असल्याने बहुतेकदा आपण ती सवय टाळण्याचा प्रयत्न करत नाही.

तंबाखूच्या सेवनाने उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. छातीत दुखणे, हृदय विकाराचा झटका येणे, मेंदूचे विकार असे अन्य विकार देखील जडू शकतात.तंबाखूच्या सेवनाने तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा किंवा किडनीचा कर्करोग होऊ शकतो.

तंबाखू ही शरीरासाठी घातक आहे याची जाणीव लहानपणीच करून देणे ही एक सामजिक गरज आहे. एकदा सवय लागल्यानंतर ती सोडणे ही खूप अवघड गोष्ट असल्याने ती अगोदरच लावून न घेणे केव्हाही श्रेयस्कर ठरते.

तारुण्यात असताना आपल्याला अनेक व्यसने आकर्षित करत असतात. आपल्याकडून आसपास असणाऱ्या लोकांचे अनुकरण केले जाते. त्यामुळे त्यांच्या सवयी देखील आपल्याला जडू शकतात. मज्जा आणि आनंद या बाबींचा खोटा आधार घेऊन व्यसनांची जाहिरात सर्वत्र केली जाते.

काही प्रसिद्ध अभिनेते आणि खेळाडू अशा जाहिराती सातत्याने करत असतात. त्यामुळे अविकसित बुद्धी आणि चंचल मनाची तरुणाई अशा जाहिरातींचे बळी पडतात. परिणामी तंबाखू, गुटखा, दारू, सिगारेट अशा व्यसनांची सवय लावून घेतात.

पूर्वीचा समाज हा अशिक्षित असल्याने तंबाखूचे व्यसन ही अत्यंत सामान्य गोष्ट होती. परंतु जसजसे वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित होत गेले तसतसे मानवाला समजू लागले की तंबाखूचे व्यसन हे अनेक आरोग्याच्या समस्यांना निमंत्रण असू शकते.

आजचे युग हे माहिती युग आहे. इंटरनेटचा वापर करून तुम्ही तंबाखूच्या अन्य घातक परिणामांची माहिती मिळवू शकता. स्वतःच्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर करून सुरुवातीलाच तंबाखूचे सेवन न करण्याचा निर्णय घेऊ शकता.

तंबाखूने आपले आरोग्य तर बिघडतेच त्याशिवाय आणखी इतर व्यसने करण्याची तलफ देखील जागृत होते. परिणामी आपले आयुष्य हे निराशेच्या गर्द छायेत जाऊन विसावते. त्याचा परिणाम आपल्या कुटुंबियांना आणि समाजाला सहन करावा लागतो.

तंबाखू सेवन करण्याचे तोटे लक्षात घेता आपली सामजिक व वैयक्तिक जबाबदारी आणखीनच वाढते. तंबाखू विरोधी जनजागृती करणे, तंबाखूचे व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणे, व्यसन करण्यापेक्षा इतर उदात्त गोष्टीने व्यक्तिमत्त्व भारावलेले असणे, अशा बाबी आपण समाजात रुजवू शकतो.

आपले मन जर चांगल्या सवयी आणि उत्तम व्यक्तींच्या संगतीने व्याप्त झाले तर आपल्याला देखील एका आनंदी आणि यशस्वी जीवनाची विधायक मुल्ये समजू लागतील. अशा विधायक आणि नैतिक मुल्यांचा आधार घेऊन आपण तंबाखू आणि अन्य व्यसनांना आपल्यापासून कायमचे दूर ठेवू शकतो.

तंबाखूचे दुष्परिणाम हे मराठी भाषण (Tambakhuche Dushparinam Bhashan Marathi) सर्वांनी शांतचित्ताने ऐकल्याने मी सर्व मान्यवर व्यक्ती व श्रोत्यांचा आभारी आहे. धन्यवाद!

The post तंबाखूचे दुष्परिणाम – मराठी भाषण  |Tambakhuche Dushparinam Bhashan Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/marathi-speech-tambakhuche-dushparinam-bhashan-marathi/feed/ 0 4959
स्वच्छता दिन – मराठी भाषण | Swachhata Din Marathi Bhashan | https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%a3/ https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%a3/#respond Wed, 22 Sep 2021 06:45:55 +0000 https://dailymarathinews.com/?p=2548 प्रस्तुत लेख हा स्वच्छता दिन - मराठी भाषण आहे. या भाषणातून स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट होते. विद्यार्थ्यांना भाषणासाठी प्रस्तुत

The post स्वच्छता दिन – मराठी भाषण | Swachhata Din Marathi Bhashan | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा स्वच्छता दिन – मराठी भाषण (Swacchata Din Marathi Bhashan) आहे. या भाषणातून स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट होते. विद्यार्थ्यांना भाषणासाठी प्रस्तुत विषयाचे लिखाण आणि पाठांतर अत्यंत उपयुक्त ठरेल.

स्वच्छता दिन – मराठी भाषण | Swachhata Din Speech In Marathi |

चला करूया आपण परिसराची स्वच्छता,    
घेऊया न कचरा करण्याची दक्षता,
ठेवूया परिसर नेहमी योग्य,
तरच मिळेल निरोगी आरोग्य!

स्वच्छता हे असे काम नाही जे पैसे कमवण्यासाठी केले जाऊ शकेल, ही तर चांगली सवय आहे जी आपण लावून घेतली तर आपल्याला एक निरोगी आणि स्वस्त जीवन जगण्यास मदत होईल.

जगण्यात स्वच्छता हा गुण उतरवण्यासाठी एका मोठ्या जबाबदारीच्या रूपात प्रत्येकाने या कार्याचे अनुकरण करायला पाहिजे. अशा स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट होण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी म्हणजेच 2 ऑक्टोबर या दिवशी स्वच्छता दिन साजरा केला जातो.

स्वच्छता दिनी संपूर्ण देशात स्वच्छता मोहीम राबवली जाते. यामध्ये आपले घर, परिसर, शाळा, इतर शासकीय आणि खाजगी कार्यालये आणि संस्था अशी ठिकाणे स्वच्छ करण्याचा उपक्रम असतो. विविध शाळांमध्ये विद्यार्थी स्वच्छता जागृतीसाठी फेरी देखील काढतात.

स्वच्छता दिनी भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, कला क्रिडा स्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. ज्यामध्ये सर्व कार्यक्रमांचा प्रमुख विषय “स्वच्छता” असतो. त्या सर्व स्पर्धांद्वारे स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट केले जाते.

स्वच्छता ही कोणाच्या दबावाखाली येऊन करण्यासारखे काम नाही. आपल्याला निरोगी आणि स्वस्त जीवनासाठी ही अत्यंत गरजेची सवय आहे. आपल्याला दैनंदिन जीवनात स्वच्छता अंगी बाळगलीच पाहिजे.

स्वच्छ पर्यावरण आणि आदर्श जीवनशैली विकसित होण्यासाठी प्रत्येकाने ही सवय लावून घेतलीच पाहिजे. स्वच्छता ही समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. आपण सर्वांनी स्वच्छता हेच ध्येय मानले पाहिजे आणि त्याचे महत्त्व व गरज समजून घेतली पाहिजे.

समाजात स्वच्छता नसल्याने गंभीर परिस्थिती उत्पन्न होऊ शकते. अस्वच्छ परिसरामुळे कचरा व्यवस्थापन ही बाब सातत्याने समोर येऊ लागली आहे. सरकार आणि सामाजिक यंत्रणा त्यासाठी कार्यरत असतेच पण व्यक्तिगत स्तरावर देखील स्वच्छतेबाबत सजग राहिले पाहिजे.

आपले मन स्वच्छ तर आपले घर स्वच्छ,  आपले घर स्वच्छ तर आपला परिसर स्वच्छ!

या उक्तीप्रमाणे स्वच्छता राखण्याची जबाबदारी  स्वतःपासून सुरू करावी लागेल. त्यासाठी “मी स्वतः परिसर अस्वच्छ ठेवणार नाही” असा प्रण प्रत्येकाने करायला हवा. स्वच्छता दिनी प्रत्येकाने संकल्पशील बनुयात आणि म्हणुयात…

झाडू असेल प्रत्येकाच्या हाती,   
करूया आपल्या परिसराची प्रगती,
होईल मग स्वच्छ भारताची निर्मिती,
कारण स्वच्छता हीच खरी संपत्ती!

लेखन सौजन्य – निकिता पवार (सातारा)

तुम्हाला स्वच्छता दिन मराठी भाषण (Swachhata Din Marathi Bhashan)
आवडले असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post स्वच्छता दिन – मराठी भाषण | Swachhata Din Marathi Bhashan | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%a3/feed/ 0 2548
लालबहादूर शास्त्री – मराठी भाषण | Marathi Bhashan https://dailymarathinews.com/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/ https://dailymarathinews.com/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/#respond Tue, 21 Sep 2021 09:32:34 +0000 https://dailymarathinews.com/?p=2544 प्रस्तुत लेख हा लालबहादुर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित मराठी भाषण आहे. विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असे हे भाषण

The post लालबहादूर शास्त्री – मराठी भाषण | Marathi Bhashan appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा लालबहादुर शास्त्री (Lal bahadur Shastri Speech In Marathi) यांच्या जीवनावर आधारित मराठी भाषण आहे. विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असे हे भाषण अत्यंत मुद्देसूद आणि विस्तारपूर्वक मांडलेले आहे.

लालबहादूर शास्त्री भाषण मराठी | Lal bahadur Shastri Marathi Bhashan |

“जय जवान जय किसान” ही घोषणा देऊन सर्व देशवासीयांचे बळ सेनादलामागे उभे करणारे, युद्धात पाकिस्तानला खडे चारुन भारताचा मान व शान जगात वाढविणारे असे स्वाभिमानी, विनयशील, कणखर परंतु उदार मनाचे थोर देशभक्त म्हणजे लालबहादूर शास्त्री होय.

उत्तर प्रदेशमधील मोगलसराई या गावी एका गरीब कुटुंबात दोन ऑक्टोबर 1904 रोजी लाल बहादूर यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदाप्रसाद श्रीवास्तव तर आईचे नाव रामदुलारी होते. शारदा प्रसाद प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शास्त्रींच्या जन्माच्या 18 महिन्यानंतरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

लालबहादूर शाळेत मन लावून अभ्यास करायचे. अभ्यासात हुशार असल्यामुळे लालबहादूर यांनी मॅट्रिक झाल्यानंतर बनारस विद्यापीठात प्रवेश घेऊन तत्वज्ञान या विषयात “शास्त्री “ही पदवी मिळवली. पुढे तेच त्यांचे आडनाव बनून लालबहादूर शास्त्री भारतभर विख्यात झाले.

राजकीय आणि व्यक्तिगत आयुष्यात गांधीजींच्या विचारांचा त्यांच्या मनावर फारच प्रभाव पडला. ऐन तारुण्यात त्यांनी खूप पैसे मिळवून ऐष आरामात राहण्यापेक्षा देशसेवेला वाहून नेण्याचे ठरविले. भारत सेवक समाज या सेवाभावी संस्थेचे ते सक्रिय सभासद झाले.

शास्त्रींनी महात्मा गांधीजींच्या सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला. 1921 मधील असहयोग आंदोलन, 1930 मधील दांडीयात्रा,1942 मधील भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘लाल बहादूर शास्त्री’ होय.

“मूर्ती लहान पण कीर्ती महान” या उक्तीचा प्रत्यय घडवून देणारे लालबहादूर शास्त्री हे एक महान नेतृत्व होते. आपल्या देशाप्रती समर्पित सेवेमुळे लालबहादूर शास्त्री निष्ठा आणि समतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी सामान्य लोकांची भावना समजून घेऊन खऱ्या अर्थाने त्यांचे मित्रच बनले.

अनेक लहान मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. देश स्वतंत्र झाल्यावर ते दिल्लीत आले. देशाचे गृहमंत्री, वाणिज्य मंत्री, रेल्वेमंत्री, म्हणून काम करताना त्यांच्या सचोटीपूर्ण आणि कार्यक्षम नेतृत्वाने ते लोकप्रिय झाले.

शास्त्रींनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. अशा विनयशील व्यक्तीच्या मागे त्यांचे गुरु महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. शास्त्री नेहमी म्हणत असत की कठोर मेहनत ही प्रार्थनेसमान आहे. अशा उदार मनाच्या थोर देशभक्ताने भारतीय संस्कृतीचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व केले.

तुम्हाला लालबहादूर शास्त्री – मराठी भाषण (Lal bahadur Shastri Speech In Marathi) आवडले असल्यास तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा… धन्यवाद!

The post लालबहादूर शास्त्री – मराठी भाषण | Marathi Bhashan appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/feed/ 0 2544
महात्मा गांधी मराठी भाषण | Mahatma Gandhi Speech In Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%a3/ https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%a3/#respond Tue, 21 Sep 2021 07:32:47 +0000 https://dailymarathinews.com/?p=2522 प्रस्तुत लेख हा महात्मा गांधी मराठी भाषण आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनावर भाषण करणे, हा उपक्रम शालेय जीवनात विद्यार्थ्यांना असतो.

The post महात्मा गांधी मराठी भाषण | Mahatma Gandhi Speech In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा महात्मा गांधी मराठी भाषण (Mahatma Gandhi Speech In Marathi) आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनावर भाषण करणे, हा उपक्रम शालेय जीवनात विद्यार्थ्यांना असतो. विद्यार्थी अत्यंत मुद्देसूद आणि विस्तारपूर्वक प्रस्तुत भाषण सादर करू शकतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.

महात्मा गांधी भाषण मराठी | Mahatma Gandhi Marathi Bhashan |

“नमन स्वीकारा आमुचे
बापू तुम्ही महात्मा
भारताच्या भवितव्यासाठी
तुमचा अमर आत्मा”

महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा, हातात काठी ,आणि अंगावर परिधान केलेले ते पांढरे शुभ्र वस्त्र! महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना “महात्मा” ही उपाधी दिली.

महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ “महान आत्मा” असा आहे. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते.

त्यांची आई अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्री होत्या. त्यांच्या या स्वभावाचा परिणाम गांधीजींवर पडला आणि त्यांच्या मूल्यांनी पुढे चालूनच गांधीजींच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट होत गेल्या. सन 1883 मध्ये साडे तेरा वर्षाच्या वयात त्यांचे लग्न कस्तुरबा यांच्याशी करण्यात आले.

महात्मा गांधींनी स्वतःचे जीवन हे सत्याच्या प्रयोगासाठी खर्ची घातले. गांधीजी आफ्रिकेत वकिली करण्यासाठी गेले पण तेथे हिंदू बांधवांवर अन्याय दूर करण्यासाठी धडपडले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. शेतकरी, कामगार यांच्यासाठी त्यांनी संघर्ष केला. ते नेहमी अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करत असत.

गांधीजींनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. इ.स. १९२१ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर देशव्यापी चळवळी उभ्या केल्या. इ.स. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मीठ कराविरोधात पायी चालत दांडी यात्रा काढली. या यात्रेत हजारो भारतीय जनतेचा सहभाग होता.

अहिंसा… जेव्हा आपण अहिंसेबाबत बोलतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला “बापू” हे नाव आठवते. महात्मा गांधी यांनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला स्वतःच्या जीवनातून अहिंसेचा अर्थ समजावून सांगितला.

आपल्या समाजात एका मोठ्या समूहाला अस्पृश्य म्हटले जात होते. गांधीजींनी या समूहाला “हरीजन” असे संबोधून त्यांचा मान वाढीस लावला. असे हे थोर अहिंसावादी व्यक्तिमत्त्व ३० जानेवारी १९४८ रोजी अनंतात विलीन झाले. महात्मा गांधींबद्दल शेवटी एवढेच बोलू इच्छितो की,
       
एक महात्मा होऊनी गेला,
आयुष्य अपुले देऊन गेला…
या भूमीच्या सेवेसाठी,
बलिदान प्राणाचे देऊनी गेला…
आक्रंदिते ही भारत भूमी,
सुपुत्र भूमीचा हरवूनी गेला…
आठवा त्याला, जागवा स्मृती,
कोहिनूर तो हरपुनी गेला…

लेखन सौजन्य – निकिता पवार (सातारा)

तुम्हाला महात्मा गांधी मराठी भाषण (Mahatma Gandhi Speech In Marathi) आवडले असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post महात्मा गांधी मराठी भाषण | Mahatma Gandhi Speech In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%a3/feed/ 0 2522