घरचा वैद्य । Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 12 Oct 2023 05:45:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 घरचा वैद्य । Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 दातांची काळजी कशी घ्याल? https://dailymarathinews.com/how-to-take-care-of-teeth/ https://dailymarathinews.com/how-to-take-care-of-teeth/#respond Sun, 08 Oct 2023 07:27:46 +0000 https://dailymarathinews.com/?p=6033 दातांना कीड लागणे, त्यांची झीज होणे, दात पिवळे पडणे असे दातांचे काही साधारणतः आढळणारे विकार आहेत.

The post दातांची काळजी कशी घ्याल? appeared first on Daily Marathi News.

]]>
शरीरातील सर्व अवयव चांगले कार्यरत असतील तर आपण स्वस्थ अनुभव करत असतो. त्यामुळे शरीरातील प्रत्येक अवयव कसा काय निकामी होऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो याचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.

दात हा देखील महत्त्वाचा अवयव आहे. दातांचे विकार होऊ नयेत म्हणून काळजी घेणे हेही तेवढेच महत्त्वाचे ठरते. तोंडात हिरड्या आणि दात असे दोन प्रकारचे अवयव असतात. त्यांची काळजी घेण्यासाठी होणाऱ्या विकारांबद्दल योग्य स्वरूपाची माहिती असणे गरजेचे आहे.

हिरड्या, जीभ या अत्यंत संवेदनशील तर दात हे टणक असतात. दातांचे प्रमुख कार्य म्हणजे तोंडातले पदार्थ ठीक पद्धतीने चावून खाणे. दातांना कीड लागणे, त्यांची झीज होणे, दात पिवळे पडणे असे दातांचे काही साधारणतः आढळणारे विकार आहेत.

ते विकार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा त्यांची योग्यप्रकारे काळजीच घेतलेली बरी ठरते. त्यामध्ये खालील बाबींचा अथवा सवयींचा लाभ तुम्हाला होऊ शकतो.

• दातांची साफसफाई –

आपण दररोज ब्रश करतो. परंतु निष्काळजीपणाने केलेला ब्रश हा कधीही घातक ठरू शकतो. त्यामुळे हिरड्यांना दुखापत होऊ शकते किंवा दात व्यवस्थित साफ होणार नाहीत.

दात पिवळे पडले असल्यास वेळोवेळी ते दंतरोगतज्ञाकडून साफ करून घेणे आवश्यक आहे. जशी आपण शरीराची स्वच्छता नियमित ठेवतो तशीच दातांची स्वच्छता देखील ठेवायला हवी.

• दातांची वेळोवेळी तपासणी –

दात वर्षातून दोनदा तरी तपासून घ्यावेत जेणेकरून आपले दुर्लक्ष झाले तरी दातांची योग्य ती काळजी घेतली जाईल. सध्या दातांचा दवाखाना हा ठिकठिकाणी उपलब्ध असल्याने आपण डॉक्टरचा सल्ला नक्कीच घेऊ शकतो.

• अति कठीण पदार्थ टाळणे –

चावायला कठीण असणारे अथवा शिळे झालेले खाद्यपदार्थ टाळावेत. तसे खाद्य पदार्थ खाल्ल्यास आपल्या दातांची झीज होऊ शकते आणि हिरड्यांचे आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते.

• दातांचे विकार लगेच दूर करणे –

एखादा दात किडला असला तर तो दात भरता येतो, ती कीड खोलवर गेली असली आणि दात ठणकत असला तर दंतनलिका उपचार (रुट कॅनल ट्रीटमेंट) करुन घ्यावी. त्यामध्ये दातावर एक दातासारखी कॅप लावण्याचा सल्ला दिला जातो.

काहीवेळा गंभीर कीड असेल तर त्या परिस्थितीत दात काढावा लागतो आणि दुसरा नकली दात बसवता येतो. परंतु अशा उपचारात हिरड्या मजबूत असणे गरजेचे राहते.

• व्यसन टाळणे आणि पोषक आहार घेणे –

आपला आहार हा पोषक असायला हवा. ज्यामुळे शरीरातील सर्व अवयव हे स्वस्थ राहू शकतील अगदी दात आणि हिरड्या देखील! त्याशिवाय कोणताही घातक पदार्थ (व्यसन) चावून खाणे टाळावे. दातांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरेल.

दात स्वच्छ राहावेत म्हणून नियमित असाव्या अशा सोप्प्या सवयी –

१. दिवसातून दोनदा ब्रश करावा.

२. जेवणानंतर पाण्याने गुळणी / कुल्ला करावा.

३. आठवड्याला दातांचे निरीक्षण करावे. (आरशात पहावेत)

तुम्हाला दातांची काळजी कशी घ्याल हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post दातांची काळजी कशी घ्याल? appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/how-to-take-care-of-teeth/feed/ 0 6033
क्रोध व्यवस्थापन – रागावर नियंत्रण कसे ठेवावे (How to Control Anger) https://dailymarathinews.com/anger-management-how-to-control-anger-how-to-control-anger/ https://dailymarathinews.com/anger-management-how-to-control-anger-how-to-control-anger/#respond Wed, 13 Sep 2023 10:39:09 +0000 https://dailymarathinews.com/?p=6011 क्रोध (राग) आल्यावर आपण लगेच प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो परंतु थोडासा अवधी दिल्यास आणि संयम ठेवल्यास आपल्याला क्रोध व्यवस्थापन करता येऊ शकते.

The post क्रोध व्यवस्थापन – रागावर नियंत्रण कसे ठेवावे (How to Control Anger) appeared first on Daily Marathi News.

]]>
क्रोध (राग) आल्यावर आपण लगेच प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो परंतु थोडासा अवधी दिल्यास आणि संयम ठेवल्यास आपल्याला क्रोध व्यवस्थापन करता येऊ शकते.

राग नियंत्रित करण्यासाठी ट्रिगर ओळखणे, दीर्घ श्वास घेणे, त्याक्षणी एखाद्याशी बोलणे यासारख्या बाबी उपयोगात आणता येतील. माइंडफुलनेस आणि विश्रांती तंत्राचा सराव केल्याने देखील राग प्रभावीपणे नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते.

रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाली दिलेले मुद्दे विचारात आणता येतील.

१. ट्रिगर ओळखा –

कोणत्या परिस्थितीत तुम्ही रागावता किंवा कोणते विचार तुमचा राग वाढवतात याकडे लक्ष द्या. त्यासाठी एकांतात वेळ व्यतित करा. एकदा का ट्रिगर ओळखले की क्रोध करण्याची परिस्थिती उद्भवताच तुम्हाला काय करायला हवे याची जाणीव होते तसेच तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया चांगल्या प्रकारे मांडू शकता.

२. दीर्घ श्वास घ्या –

जेव्हा तुम्हाला राग वाढत आहे असे वाटत असेल तेव्हा हळू, खोल श्वास घ्या. आपल्या नाकातून खोलवर श्वास घ्या, काही सेकंद धरून ठेवा आणि नंतर आपल्या तोंडातून हळूहळू श्वास सोडा. हे तुमच्या शरीराच्या तणावाच्या प्रतिसादाला शांत करण्यात मदत करू शकते.

३. क्रमांक मोजा –

दीर्घ श्वास घेणे जमले नाही तर मनातल्या मनात क्रमांक मोजणे हे देखील फायदेशीर ठरू शकेल. त्यासाठी प्रतिक्रिया देण्यापूर्वी विराम द्या आणि एक ते दहा मोजा. हा छोटा विराम तुम्हाला तुमचे विचार गोळा करण्यासाठी आणि अधिक योग्य प्रतिसाद निवडण्यासाठी वेळ देऊ शकतात.

४. विधाने वापरा –

क्रोध केल्यानंतर परिणाम काय होत असतात हे आपल्याला माहीत असते. दुसऱ्याला त्रास होतो की नाही ते माहीत नाही परंतु स्वतःला मात्र त्याचा त्रास नेहमीच जाणवतो. त्यासाठी “क्रोधाचे दुष्परिणाम मी जाणतो”, “ही वेळही निघून जाईल”, “मला संयम ठेवावाच लागेल” अशा काही विधानांचा वापर तुम्ही करू शकता.

५. माइंडफुलनेसचा सराव करा –

माइंडफुलनेसमध्ये क्षणात उपस्थित राहणे आणि निर्णय न घेता तुमचे विचार आणि भावनांचे निरीक्षण करणे समाविष्ट आहे. ध्यानधारणा आणि दीर्घ श्वासोच्छ्वास यासारख्या माइंडफुलनेस तंत्रे तुम्हाला तुमच्या भावनांबद्दल अधिक जागरूक होण्यास आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यात मदत करू शकतात.

६. शारीरिक हालचाल –

अंगभूत तणाव दूर करण्यासाठी व्यायाम, चालणे किंवा योग यासारख्या शारीरिक क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा. शारीरिक हालचालींमुळे तणाव आणि राग कमी होण्यास मदत होते.

७. एक ब्रेक घ्या –

जर तुम्ही तणावग्रस्त परिस्थितीत असाल, तर तात्पुरते दूर जाण्यास हरकत नाही. स्वतःला या परिस्थितीतून काढून टाकल्याने राग वाढणे टाळता येऊ शकते.

८. आधार घ्या –

तुमच्या रागाबद्दल मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा थेरपिस्टशी बोला. काहीवेळा, तुम्‍हाला विश्‍वास असलेल्या कोणाशी तुमच्‍या भावनांची चर्चा केल्‍याने तुम्‍हाला वेगळा दृष्टीकोन मिळू शकतो आणि तुम्‍हाला उपाय शोधण्‍यात मदत होते.

९. समस्या सोडवणे –

तुम्हाला कशामुळे राग येतो यावर विचार करण्याऐवजी, उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करा. मूळ समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्ही कोणती व्यावहारिक पावले उचलू शकता ते ओळखा.

१०. विनोद वापरा –

कधीकधी, एखाद्या परिस्थितीत विनोद शोधल्याने तणाव कमी होतो. तथापि, इतरांना कमी लेखणारे किंवा त्यांच्या भावना नाकारणारे विनोद वापरू नका.

११. विश्रांती तंत्राचा सराव करा –

खोल श्वासोच्छ्वास, प्रगतीशील स्नायू शिथिलता आणि व्हिज्युअलायझेशन या बाबी तणाव आणि राग कमी करण्यात मदत करू शकतात. या तंत्रांचा नियमित सराव कालांतराने त्यांना अधिक प्रभावी बनवू शकतो आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

१२. निरोगी जीवनशैली –

पुरेशी झोप घेणे, संतुलित जेवण घेणे आणि तुमच्या दैनंदिन जीवनातील ताणतणावांचे व्यवस्थापन हे चांगले भावनिक नियमन करण्यात योगदान देऊ शकते.

१३. व्यावसायिक मदतीचा विचार करा –

जर तुमचा राग सतत नियंत्रित करणे कठीण होत असेल आणि तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होत असेल, तर मानसिक आरोग्य व्यावसायिकाची मदत घेण्याचा विचार करा. ते तयार केलेली रणनीती आणि समर्थन देऊ शकतात.

लक्षात ठेवा, रागावर नियंत्रण ठेवणे हे एक कौशल्य आहे ज्यासाठी वेळ आणि सराव लागतो. स्वतःशी धीर धरा आणि तुमचा राग अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी अगदी लहान लहान गोष्टी ध्यानात घ्या…

तुम्हाला क्रोध व्यवस्थापन (Anger Management) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post क्रोध व्यवस्थापन – रागावर नियंत्रण कसे ठेवावे (How to Control Anger) appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/anger-management-how-to-control-anger-how-to-control-anger/feed/ 0 6011
उपवास _ तथ्य आणि मिथ्य _ https://dailymarathinews.com/fasting-_-fact-and-false-_/ https://dailymarathinews.com/fasting-_-fact-and-false-_/#respond Mon, 03 Apr 2023 12:05:40 +0000 https://dailymarathinews.com/?p=5690 उपवास म्हणजे फक्त 'उदरभरण न करणे' हा एकच अर्थ पकडला जात नाही. उपवास असेल त्या दिवशी मौन व्रत धारण करणे, स्वतःसोबत वेळ घालवणे

The post उपवास _ तथ्य आणि मिथ्य _ appeared first on Daily Marathi News.

]]>
आपल्या भारतीय संस्कृतीत उपवासाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. महिलांचे उपवास हे आयुष्यभर चालूच असतात. पुरुषही त्यामागोमाग कधी कधी उपवास पकडत असतात. उपवासाला एवढे महत्त्व का दिले जाते आणि उपवास पकडण्यातील तथ्य काय आहेत ही आपण आज जाणून घेणार आहोत.

उपवास म्हणजे काय?

उपवास म्हणजे फक्त ‘उदरभरण न करणे’ हा एकच अर्थ पकडला जात नाही. उपवास असेल त्या दिवशी मौन व्रत धारण करणे, स्वतःसोबत वेळ घालवणे, एकांत साधणे, चिंतन करणे असेही अनेक प्रकार उपवासात येत असतात.

उपवास पकडल्याने शारिरीक स्वास्थ्य लाभतेच शिवाय उपवास हा एखाद्या इच्छेची पूर्तता होण्यासाठी देखील पकडला जातो. उपवासादिवशी इच्छेचा वारंवार पाठपुरावा केल्याने आणि चिंतन केल्याने इच्छा पूर्ण होण्यासाठीचा अपेक्षित मार्ग सापडतो अशी धारणा आहे.

उपवासा दिवशीचा आहार –

अपवासादिवशी केला जाणारा आहार हे एक मोठे मिथ्यच आहे. अनेक पदार्थांचे मार्केटिंग करून ते पदार्थ उपवासाचा आहार म्हणून खपवले जातात. आहारातील पदार्थांचा समावेश हा हलकाफुलका आणि अशक्तपणा जाणवणार नाही असा असावा.

आपण आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे पाहतो जेथे उपवास पकडला जातो परंतु त्यामागचे कारण जाणून घेतले जात नाही आणि उपवासाचा पदार्थ हाच पोटभरून खाल्ला जातो. खाल्ला जाणारा पदार्थ हा कधी कधी आरोग्यदायी नसतो देखील!

आणखी एक प्रसंग म्हणजे उपवास हा देवी देवतेच्या नावाखाली फक्त भीतीदायक स्थितीत पकडला जातो. उपवासाला स्वतःची आहे ती शारिरीक आणि मानसिक स्थिती सुधारावी असे अपेक्षित असते. याउलट उपवास सुटला तर देवी कोपेल, नाराज होईल, काहीतरी बरेवाईट होईल इ. प्रकारच्या भिती देखील दाखवल्या जातात.

काही शारिरीक व्याधी निर्माण झाल्यास त्यामागील कारणे जाणून न घेता सरळसरळ उपवास पकडण्यास सांगितला जातो. त्यामुळे उपवास ही लाभदायक बाब न ठरता एक प्रथा पडून जाते.

उपवासाचे शारिरीक फायदे –

उपवासाला आपण अत्यल्प आहार घेत असल्याने किंवा आहारच घेत नसल्याने पचन संस्थेला आवश्यक असणाऱ्या आरामाची पूर्तता होते. शरीरातील सर्व विषारी घटक त्यादिवशी बाहेर पडतात आणि आंतरिक प्रक्रिया सुरळीत पद्धतीने पार पडण्यास मदत होते.

जवळजवळ सर्व रोगांचे कारण हे पोटातून सुरू होत असते. उपवास पकडल्याने पोटाची कोणतीच तक्रार राहत नाही आणि आपण शारिरीक व्याधिंतून बाहेर पडत असतो. उपवासाला जर आपण भगवंताचे स्मरण करत असू, पूजापाठ करत असू तर मानसिक शांतता व आत्मिक समाधान देखील प्राप्त होते.

टीप – उपवास करताना अपवासा मागचे कारण जाणून घ्यावे आणि मगच उपवास धरावा. शारिरीक कष्टातून बाहेर पडायचे असेल, मनातील इच्छापूर्ती करायची असेल, अध्यात्मिक साधनेचा भाग म्हणून उपवास करायचा असेल, वजन कमी करायचे असेल अशा अनेक पद्धतीची कारणे आपण स्वतः समजून घेऊन योग्य त्या सल्ल्यानुसार उपवास केला तरच फायदेशीर ठरू शकेल.

The post उपवास _ तथ्य आणि मिथ्य _ appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/fasting-_-fact-and-false-_/feed/ 0 5690
चिंता आणि नैराश्य का वाढते आहे? https://dailymarathinews.com/increased-anxiety-and-depression/ https://dailymarathinews.com/increased-anxiety-and-depression/#respond Sun, 02 Apr 2023 09:04:22 +0000 https://dailymarathinews.com/?p=5687 मानवाचे जीवन सध्या आहे त्याप्रमाणे यापूर्वी कधीही सुखदायक आणि आरामदायक नव्हते. तरीही सध्याची पिढी ही संपूर्णतः स्वस्थ आहे असे आपण म्हणू शकत नाही.

The post चिंता आणि नैराश्य का वाढते आहे? appeared first on Daily Marathi News.

]]>
मानवाचे जीवन सध्या आहे त्याप्रमाणे यापूर्वी कधीही सुखदायक आणि आरामदायक नव्हते. तरीही सध्याची पिढी ही संपूर्णतः स्वस्थ आहे असे आपण म्हणू शकत नाही. सध्या सर्व वैद्यकीय सुविधा असतानाही आपण एक उल्हासित आणि आनंदीत जीवन जगत नाहीये ही वस्तुस्थिती आहे.

आनंदीत व स्वस्थ जगण्यासाठी आपल्याला शारिरीक व मानसिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील. शरीर व मनाचे नियम जाणून घ्यावे लागतील. त्यांचा स्वभाव जाणून घ्यावा लागेल. त्यानंतर योग्य कृती व सवयी अंमलात आणाव्या लागतील.

तत्पूर्वी या लेखाचा जो मुख्य मुद्दा आहे तो जाणून घेऊयात. मानवी जीवनात चिंता व नैराश्य का पसरलेले आहे, या प्रश्नाचे उत्तर हे आपल्या दैनंदिन सवयी आणि आपली आयुष्याची समज यामध्ये सामावलेले आहे.

दैनंदिन सवयी –

पूर्वी जीवन चालवण्यासाठी भरपूर कष्ट केले जायचे. यंत्रसामग्री व दळणवळणाची साधने नसल्याने मनुष्याला कष्ट केल्याविना पर्याय नसायचा. त्यामुळे मनुष्याची शारिरीक हालचाल नियमित होत असे व सर्व शारिरीक प्रक्रिया देखील नैसर्गिक नियमांनुसार होत असत.

याउलट सध्या आपण सातत्याने काम करत नाही किंवा आपले काम हे बैठ्या स्वरूपाचे झालेले आहे. अशाने शारिरीक शिथिलता व आळस वाढीस लागलेला आहे. परिणामी मानसिक आणि भावनिक निचरा होणे शक्य होत नसते.

शरीर चंचल राहत नसल्याने मन मात्र भविष्यात आणि भूतकाळात रमत राहते. शारिरीक परिश्रम आणि दैनंदिन कष्ट अनुभवात नसल्याने संघर्ष करण्यास मन नकार देत असते. परिणामी कोणत्याही प्रसंगी आणि थोड्या आव्हानात्मक परिस्थितीत आपण घाबरतो. त्यानंतर चिंता आणि नैराश्य आपल्याला घेरते.

जीवनाची ऊर्जा प्रवाहित नसल्याने आपले मन हे साचलेल्या डबक्यासारखे होत असते. वारंवार भूतकाळ व भविष्यकाळ आपल्याला सतावतो. आपल्याच मानसिक संकल्पना आपला विकास होऊ देत नाहीत.

आयुष्याची समज –

आपल्याला चांगले जीवन जगायचे असल्यास आणि चिंता, भीती, नैराश्य अशा गोष्टी टाळायच्या असतील तर आपण आयुष्याची समज वाढवायला हवी. जीवनाचे काही प्राथमिक स्वरूपाचे नियम आहेत ते समजून घ्यायला हवेत.

पुस्तक वाचन, व्यायाम, खेळ, ट्रेकिंग, चालणे, विधायक स्वरूपाचे व्हिडिओज व मुलाखती पाहणे अशा विविध प्रकारच्या सवयी आपण आपल्या जीवनात लावून घेऊ शकतो ज्यांनी आपले शरीर व मन सुदृढ होऊ शकेल. मगच आपल्या आयुष्याची समज वाढू शकते आणि जीवनाचा अनुभव प्रगाढ होऊ शकतो.

त्यानंतर चिंता आणि नैराश्य अशा बाबी आपल्या जीवनात नसतीलच शिवाय उत्साह आणि उत्फुल्लता आपले जीवन अधिकच सुखकर आणि आनंदी बनवून जाईल.

The post चिंता आणि नैराश्य का वाढते आहे? appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/increased-anxiety-and-depression/feed/ 0 5687
अक्रोड खाण्याचे फायदे – माहित आहेत का? https://dailymarathinews.com/akrod-khanayache-fayde/ https://dailymarathinews.com/akrod-khanayache-fayde/#respond Fri, 25 Nov 2022 04:14:06 +0000 https://dailymarathinews.com/?p=5151 अक्रोड खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. अक्रोड खाल्ल्याने शरीरातील सर्व जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघत असते.

The post अक्रोड खाण्याचे फायदे – माहित आहेत का? appeared first on Daily Marathi News.

]]>
• अक्रोड खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. अक्रोड खाल्ल्याने शरीरातील सर्व जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघत असते.

• प्रस्तुत लेख हा अक्रोड खाण्याचे काय फायदे आहेत याविषयी माहिती देणारा लेख आहे. तुम्ही संपूर्ण लेख वाचला तर नक्कीच तुम्हाला फायदेशीर माहिती जाणून घेता येईल.

अक्रोड खाण्याचे फायदे – Health Benefits of walnuts in Marathi

१) अक्रोडमध्ये मेंदूला गती देणारे सर्व प्रकारचे घटक असल्याने अक्रोड सेवनाने आपल्या मेंदूला चालना मिळते. आपली स्मरणशक्ती चांगली बनते.

२) थायरॉईडची समस्या असणाऱ्या लोकांना अक्रोड खाणे ही फायदेशीर गोष्ट आहे.

३) अक्रोडमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, तांबे, फॉस्फरस, मॅग्नेशियम, ओमेगा 3 फॅटी एसिड असे घटक असतात. त्यामुळे शारिरीक झीज देखील भरून निघत असते.

४) अक्रोडमध्ये पॉलीफेनॉल इलाजिटानिन्स हे घटक आढळतात जे तुम्हाला कॅन्सर होण्यापासून वाचवतात.

५) अक्रोड रिकाम्या पोटी सेवन केल्याने मधुमेहाचा धोका टाळता येतो.

६) अक्रोडमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने अक्रोड सेवन करणाऱ्याचे वजन नियंत्रणात राहते.

७) सुका मेवा (dryfruits) या प्रकारात अक्रोडचा समावेश होत असतो. त्यामुळे त्याचे पचन व्यवस्थित होते आणि अक्रोड नियमित सेवन केल्यास कोणताच शारिरीक धोका उद्भवत नाही.

८) अक्रोडमध्ये ओमेगा 3 हे फॅटी एसिड असल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राहते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते व परिणामी ह्रदयाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.

९) अक्रोडमध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिडमुळे हाडांचे आणि दातांचे आरोग्य सुधारते तसेच शारिरीक ऊर्जा सुद्धा वाढते.

१०) अक्रोडमध्ये प्रथिने आणि खनिजांचा समावेश असल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहते.

तुम्हाला अक्रोड खाण्याचे फायदे (Akrod Khanyache Fayde) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post अक्रोड खाण्याचे फायदे – माहित आहेत का? appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/akrod-khanayache-fayde/feed/ 0 5151
व्यायामाचे फायदे – Vyayamache Fayde https://dailymarathinews.com/benefits-of-gymnastics/ https://dailymarathinews.com/benefits-of-gymnastics/#respond Thu, 13 Oct 2022 04:21:14 +0000 https://dailymarathinews.com/?p=5059 व्यायाम अनेक जणांना खूप बोअरिंग वाटतो. परंतु व्यायाम करण्याचे महत्त्व आणि फायदे जाणून घेतले तर आपल्याला नियमित व्यायाम करावासा वाटेलच!

The post व्यायामाचे फायदे – Vyayamache Fayde appeared first on Daily Marathi News.

]]>
व्यायाम अनेक जणांना खूप बोअरिंग वाटतो. परंतु व्यायाम करण्याचे महत्त्व आणि फायदे जाणून घेतले तर आपल्याला नियमित व्यायाम करावासा वाटेलच! प्रस्तुत लेखात व्यायामाचे फायदे (Vyayamache Fayde) सांगण्यात आलेले आहेत. दिलेल्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी आशा…

व्यायाम करण्याचे फायदे | Benefits of Exercise in Marathi |

१. शारिरीक वाढ

व्यायाम करताना जरी थोड्या वेदना होत असल्या तरी त्यानंतर अत्यंत उत्साह जाणवतो. शरीरात ताकद आणि ऊर्जा संचारते. शारिरीक स्नायू मजबूत बनतात आणि वाढीस लागतात. परिणामी वजन आणि उंची वाढते.

२. रोगप्रतिकारक शक्ती

आपल्या सभोवताली बदलणारे हवामान हे कधी कधी आजाराला निमंत्रण देणारे ठरते. तसेच संसर्गजन्य आजार देखील आपले आरोग्य बिघडवू शकतात. त्यांना प्रतिकार म्हणून आपली रोगप्रतिकारक शक्ती कामी येते.

व्यायाम केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागते. तसेच शरीराच्या अंतर्गत झालेले बिघाड देखील व्यवस्थित होतात.

३. रक्ताभिसरण

व्यायाम करताना अतिरिक्त श्वासोच्छवास होत असल्याने जास्त प्रमाणात ऑक्सिजन शरीरात घेतला जातो. रक्त शुद्ध होते तसेच रक्त प्रवाह देखील सुधारतो. त्यामुळे एकूणच रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते.

४. पचनक्रिया

मानसिक व शारिरीक स्वास्थ्य हे बहुतांश प्रमाणात आपल्या पचन प्रक्रियेवर अवलंबून असते. आपण खाल्लेले अन्न व्यवस्थित पचले तर आपला दिवस एकदम उत्साही व्यतित होत असतो.

व्यायाम केल्याने पचनसंस्था क्रियाशील बनते. सर्व पाचकतत्त्वे व्यवस्थित उत्सर्जित होतात. परिणामी आपले पचन सुधारते. तथापि जेवण केल्यानंतर व्यायाम करणे टाळावे.

५. त्वचा

नियमित व्यायाम केल्याने शरीरातील विषारी घटक घामावाटे बाहेर फेकले जातात. त्यामुळे त्वचा टवटवीत राहण्यास मदत होते. त्वचा टवटवीत राखण्यासाठी अन्य सौंदर्य प्रसाधने वापरावी लागत नाहीत.

मानसिक स्वास्थ्य

एका निरोगी शरिरातच एक निरोगी मन वास करत असते. नियमित व्यायाम केल्याने शारिरीक समस्या दूर होऊन उत्साह जाणवतो. आपले शरीर निरोगी बनत जाते. शारिरीक क्रिया व्यवस्थित झाल्या की मन प्रसन्न राहू लागते. म्हणजेच आपले मानसिक स्वास्थ्य सुधारते.

• व्यायाम करताना घ्यावयाची काळजी –

१. व्यायामासाठी प्रशिक्षक निवडावा.

२. व्यायाम करताना अति करू नये. शरीर प्रक्रिया व रचना समजून घेऊन हळूहळू सुरुवात करावी.

३. आहारात देखील सल्ल्यानुसार योग्य तो बदल करावा.

तुम्हाला व्यायामाचे फायदे (Vyayamache Fayde) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post व्यायामाचे फायदे – Vyayamache Fayde appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/benefits-of-gymnastics/feed/ 0 5059
लम्पी रोग – मराठी माहिती | Lampi Rog Mahiti Marathi https://dailymarathinews.com/lampi-rog-marathi-mahiti-lampi-rog-mahiti-marathi/ https://dailymarathinews.com/lampi-rog-marathi-mahiti-lampi-rog-mahiti-marathi/#respond Sun, 11 Sep 2022 13:23:11 +0000 https://dailymarathinews.com/?p=4992 लम्पी (Lampi) या संसर्गजन्य रोगाने सर्वत्र थैमान घातले आहे परंतु आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर या रोगाला आपण रोखू शकतो

The post लम्पी रोग – मराठी माहिती | Lampi Rog Mahiti Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
लम्पी (Lampi) या संसर्गजन्य रोगाने सर्वत्र थैमान घातले आहे परंतु आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर या रोगाला आपण रोखू शकतो आणि आपल्या गाई, म्हशी व इतर जनावरांना या आजारापासून सुरक्षित ठेवू शकतो.

लम्पी रोग काय आहे व तो कसा होतो?
What is Lampi Virus in Marathi?

लम्पी हा रोग विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. LSD कैपरोपॉक्सी वायरसमुळे लम्पी हा रोग होतो. याच विषाणूला निथीलिंग वायरस असेही म्हणतात.

सर्वप्रथम १९२९ मध्ये दक्षिण आफ्रिका तर त्यानंतर २०१२ मध्ये रुस येथे आढळला होता. भारतात त्याचा प्रादुर्भाव २०१९ मध्ये ओडिसा राज्यात झाला होता.

लम्पी रोगाची लक्षणे – Symptoms of Lampi Disease

• जनावरांच्या अंगावर छोट्या आकाराचे फोड तयार होतात. जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते. फोड हळूहळू आकाराने मोठे होत जातात.

• फोड हे प्रामुख्याने कपाळ, शेपूट, पोटाचा भाग, शरीराचा वरील भाग यांवर दिसून येतात. फोड काही काळाने पिकतात आणि स्त्रवतात. तापामुळे जनावर कमी खाद्य ग्रहण करते.

लम्पी या रोगाचा प्रसार कसा होतो?

• रोगग्रस्त जनावराच्या अंगावरील फोड्या पिकून जेव्हा स्त्रवतात तेव्हा त्यांच्या अंगावर बसणाऱ्या माश्या, डास व इतर कीटक यांमुळे या रोगाचा प्रसार होतो.

• रोगग्रस्त जनावराच्या शरीरावरून एखादा कीटक जेव्हा दुसऱ्या जनावराच्या शरीरावर जाऊन बसतो तेव्हा लम्पी रोगाचा प्रसार होण्याची शक्यता वाढते.

• रोगग्रस्त जनावराचा दुसऱ्या जनावरास स्पर्श झाल्यास लम्पी रोगाचा संसर्ग होतो.

लम्पी या रोगावरील उपाय योजना काय आहेत?

• गोठ्याची नियमित स्वच्छता राखावी जेणेकरून डासांचा आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये. गोठ्यातील पाणी साठा नियमित स्वच्छ असावा.

• गोठ्यात कडुलिंबाच्या पानांचा धूर करणे.

• सोडियम हायपोप्लोराइड फवारावे जेणेकरून डास, पिसू, ढेकूण यांचा प्रादुर्भाव होणार नाही.

• जनावरास ताप जाणवल्यास किंवा फोड आढळल्यास लगेच पशुवैद्यकीय दवाखान्यात न्यावे किंवा जनावरांच्या डॉक्टरांना तपासणीसाठी बोलवावे.

तुम्हाला लम्पी रोगाबद्दल मराठी माहिती (Lampi Disease In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post लम्पी रोग – मराठी माहिती | Lampi Rog Mahiti Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/lampi-rog-marathi-mahiti-lampi-rog-mahiti-marathi/feed/ 0 4992
किटो डाएट – मराठी माहिती | Keto Diet Information In Marathi | https://dailymarathinews.com/keto-diet-in-marathi/ https://dailymarathinews.com/keto-diet-in-marathi/#respond Wed, 18 May 2022 07:27:25 +0000 https://dailymarathinews.com/?p=3833 मागील काही वर्षांत मानवी आहारात वेगवेगळ्या संकल्पना निर्माण झालेल्या आहेत त्यापैकीच एक प्रसिद्ध अशी आहार संकल्पना म्हणजे किटो डाएट!

The post किटो डाएट – मराठी माहिती | Keto Diet Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा किटो डाएट – मराठी माहिती (Keto Diet Marathi Mahiti) आहे. मागील काही वर्षांत मानवी आहारात वेगवेगळ्या संकल्पना निर्माण झालेल्या आहेत त्यापैकीच एक प्रसिद्ध अशी आहार संकल्पना म्हणजे किटो डाएट!

दिवसेंदिवस वैद्यकीय ज्ञान विकसित होत असल्याने आपल्याला नियमितपणे मानवी जीवनशैली आणि आहारात बदल पहावयास मिळत आहेत. वैद्यकीय संशोधन आणि आहारात केले जाणारे बदल हे पाश्चिमात्य देशांतून ग्रहण केले जात आहेत.

डाएट संकल्पना भारतात कधीच प्रचलित नव्हती. योग्य आहार विहार आणि शारिरीक कष्ट असल्याने भारतात आहाराची संकल्पना खूपच वेगळी आहे. परंतु विज्ञान – तंत्रज्ञान विकास आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी कष्ट कमी झालेले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मानव बैठे काम करू लागला आहे.

बैठ्या कामामुळे शारिरीक स्वास्थ्य योग्य प्रमाणात राखणे अवघड झाले आहे. त्यामुळेच डाएट केल्याने आपण नक्कीच आरोग्याविषयी जागरूक राहू शकतो. त्याचाच एक भाग म्हणजे किटो डाएटविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

किटो डाएट म्हणजे काय | Keto Diet meaning In Marathi |

• कमी कर्बोदके आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ समाविष्ट असलेल्या आहाराला किटो डाएट असे म्हणतात. म्हणजेच मॉडर्न भाषेत म्हणायचं तर कार्बोहायड्रेटच प्रमाण अतिशय कमी आणि फैट्सचे प्रमाण अतिशय जास्त अशा स्वरूपाचा आहार म्हणजे किटो डाएट!

• किटो डाएट म्हणजे केटोजेनिक डाएट अशी या आहाराची व्याख्या आहे. आपल्या शरीराची ऊर्जाशक्ती ही केटोजेनिक पदार्थांवर अवलंबून असते. त्यामुळे गरज पडल्यास चरबीयुक्त पदार्थ जास्त खाणे आणि कर्बोदकेयुक्त पदार्थ कमी ग्रहण करणे अशा प्रकारचा आहार नियोजित केला जातो.

• प्रथिनांचे मध्यम प्रमाणात सेवन करणे अपेक्षित असते. तसेच निवडक भाज्या आहारात समाविष्ट कराव्या लागतात. या आहारात फळांचे सेवन केले जात नाही.

किटो डाएटमध्ये सेवन केले जाणारे पदार्थ | Keto Diet Plan In Marathi |

जास्त चरबीयुक्त आणि मध्यम प्रोटीनयुक्त असे पदार्थ किटो डाएटमध्ये सेवन केले जातात. उदा. मांस, मासे, अंडी, बदाम, काजू, अक्रोड, शेंगदाणे, डाळी, चीज, नारळपाणी इत्यादी.

किलो डाएटमध्ये सेवन न केले जाणारे पदार्थ |Keto Diet plan In Marathi |

असे पदार्थ ज्यांच्यावर प्रक्रिया करण्यात आलेली आहे तसेच कर्बोदकेयुक्त असलेला आणि गोड पदार्थ असलेला आहार टाळावा. या आहारात फळेसुद्धा टाळली जातात. उदा. धान्ये, कडधान्ये, फळे, पालेभाज्या इत्यादी.

किटो डाएटचे फायदे | Benefits Of Keto Diet In Marathi

• किटो डाएटमध्ये आपल्या शरीरातील चरबी ऊर्जा स्वरूपात वापरली जाते. त्यामुळे वजन वाढलेले असेल तर ते कमी होते आणि कमी असेल तर वाढते.

• किटो डाएटमुळे मधुमेहाची समस्या उद्भवत नसते.

• किटो डाएटमुळे कोलेस्टेरोलची पातळी सुधारते.

• किटो डाएट केल्याने आपल्या शरीरात भरपुर उर्जा निर्माण होत असते.

• योग्य व्यायाम आणि किटो डाएट केल्याने आपले वजन प्रमाणात येऊ शकते. आपल्याला हाय ब्लड प्रेशरची समस्या उद्भवत नसते.

• किटो डाएट हा कर्करोगापासून आपला बचाव करू शकतो. तसेच ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात राहत असतो.

किटो डाएटचे तोटे | Keto Diet Disadvantages In Marathi |

• किटो डाएटमध्ये आपण काही कालावधीसाठी वेगळ्या पद्धतीचा आहार सेवन करत असतो त्यामुळे त्या आहारात आपल्या मनानुसार बदल करणे किंवा तसा आहार सोडून देणे हे शरीरास घातक ठरू शकते. काहीवेळा वजन वाढले जाऊ शकते.

• किटो डाएटमध्ये आपण चरबीयुक्त पदार्थ जास्त सेवन करत असल्याने कोलेस्टेरोलचे प्रमाण वाढून रक्त धमन्या ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशावेळी योग्य पद्धतीने आहार पचवला जाणे आवश्यक आहे त्यामुळे योग्य प्रकारच्या व्यायामाची देखील गरज आहे.

• किटो डाएटमध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्याने लो शुगरची समस्या उद्भवू शकते.

• जास्त चरबीयुक्त आहार घेतल्याने किडनी स्टोनच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

• किटो डाएट संपूर्णपणे अंमलात न आणता हळूहळू त्याचे अनुसरण करावे. एकदम काही बदल केल्यास आपल्या पचनसंस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

केटोसिस म्हणजे काय? Ketosis meaning in Marathi / Keto Body In Marathi

शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी जेव्हा पुरेशी कर्बोदके उपलब्ध नसतात तेव्हा केटोसिस ही प्रक्रिया घडून येत असते.

*टीप – लेखात किटो डाएटबद्दल जी माहिती दिलेली आहे त्याचे अनुसरण अंधाधुंदी करू नये. डाएटमध्ये बदल करण्याअगोदर डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

तुम्हाला किटो डाएट – मराठी माहिती (Keto Diet Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post किटो डाएट – मराठी माहिती | Keto Diet Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/keto-diet-in-marathi/feed/ 0 3833
जागतिक आरोग्य संघटना (WHO) – मराठी माहिती | https://dailymarathinews.com/who-in-marathi/ https://dailymarathinews.com/who-in-marathi/#respond Sun, 30 Jan 2022 05:43:07 +0000 https://dailymarathinews.com/?p=3165 प्रस्तुत लेख हा जागतिक आरोग्य संघटना या विषयावर आधारित मराठी माहिती आहे. या लेखात या संस्थेची स्थापना, कार्य आणि उद्देश्य अशा बाबींची

The post जागतिक आरोग्य संघटना (WHO) – मराठी माहिती | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation Marathi Mahiti) या विषयावर आधारित मराठी माहिती आहे. या लेखात या संस्थेची स्थापना, कार्य आणि उद्देश्य अशा बाबींची चर्चा करण्यात आलेली आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO meaning In MarathI) –

सर्व देशांत साहचर्य वाढून आपापसांत कोणताही कलह निर्माण न होता मैत्रीपूर्ण व्यवहार वाढावा यासाठी संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली. या संघटनेच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आरोग्य संस्था (World Health Organisation) कार्यरत आहे.

WHO व्यतिरिक्त UNESCO, World Bank, IMF या संस्था देखील संयुक्त राष्ट्रांच्या निगराणी खाली काम करतात. जागतिक आरोग्य संस्था ही आरोग्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करते.

जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी झाली. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व देशांतील सक्षम आणि कर्तबगार लोक या संस्थेशी निगडित असतात. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जेनेव्हा (स्विझरलँड) येथे आहे.

संपूर्ण जगभरात ६ मुख्य कार्यालये आणि १५० विभागीय कार्यालये आहेत. भारतातील मुख्यालय हे दिल्ली येथे आहे. ७ एप्रिल रोजी या संस्थेची स्थापना झाल्याने या दिवशीच “जागतिक आरोग्य दिन” साजरा केला जातो.

उद्देश्य –

• जगातील सर्व देशांत आरोग्य संदर्भात सहकार्य आणि साहचर्य वाढले पाहिजे. गरीब देशांना महामारीच्या काळात मदत व्हावी म्हणजेच वैद्यकीय औषधे, सेवा आणि आर्थिक निधी या बाबींचा पुरवठा करता यावा.

• उत्तम आरोग्य संबंधित कोणतेही तंत्रज्ञान, वस्तू, यंत्रे अथवा उपचार पद्धती उपलब्ध असेल तर तिचा लाभ प्रत्येक व्यक्ती, समाज आणि राष्ट्राला देता यावा.

• आरोग्य संबंधित कोणीही स्वतःला वाटेल तसे उपचार न करता संशोधनातून सिद्ध झालेल्या उपचार पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे जेणेकरून कोणाचे नुकसान होणार नाही. त्यासाठी तशी नियमावली आणि उपचार पद्धती तयार करणे.

• प्रत्येक देशाला विशिष्ट आजाराबद्दल नियमावली पुरवणे आणि त्यासंदर्भात सूचना प्रदान करणे. जाहीर केलेल्या सूचना व नियमांचे पालन प्रत्येक स्तरावर होण्यासाठी तशी यंत्रणा स्थापन करून योग्य व्यवस्थापन करणे.

संशोधन कार्य –

• कमीत कमी वेळेत असाध्य किंवा दुर्धर आजारांवर परिणामकारक उपचार पद्धती विकसित करणे. त्यासाठी योग्य प्रकारे संशोधन पद्धतीचा अवलंब करणे.

• महामारीवर लवकरात लवकर औषध / लस उपलब्ध करून देणे. आत्तापर्यंत पोलिओ, ईबोला आणि स्मॉल पॉक्स या असाध्य आजारांवर मात करण्यात WHO या संघटनेने यश मिळवलेले आहे.

• कोरोना या विषाणूविरोधी देखील ज्या लसी तयार झाल्या त्यांना मान्यता देण्याचे काम जागतिक आरोग्य संघटनेने केले. या महामारी वेळी या संस्थेने जाहीर केलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन केल्याचे निदर्शनास आले.

अत्यंत महत्त्वाचे अनेकदा विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)

प्रश्न १) WHO चा full form काय आहे?
उत्तर – World Health Organisation

प्रश्न २) जागतिक आरोग्य संघटनेसाठी निधी कसा गोळा केला जातो?
उत्तर – संशोधन, औषधनिर्मिती आणि वैद्यकीय यंत्रनिर्मीती अशा विविध कार्यांसाठी लागणारा निधी हा सभासद असणाऱ्या देशांकडून प्रत्येक वर्षी गोळा केला जातो.

प्रश्न ३) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जेनेव्हा, स्विझरलँड या देशात आहे.

तुम्हाला जागतिक आरोग्य संघटना (WHO) – मराठी माहिती (WHO Information In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नोंदवा…

The post जागतिक आरोग्य संघटना (WHO) – मराठी माहिती | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/who-in-marathi/feed/ 0 3165
शरीरातील कॅल्शियम वाढवणारे अन्नपदार्थ | Calcium Food in Marathi | https://dailymarathinews.com/calcium-food-list-in-marathi/ https://dailymarathinews.com/calcium-food-list-in-marathi/#respond Sun, 05 Dec 2021 10:18:48 +0000 https://dailymarathinews.com/?p=2910 शरीरातील हाडे, स्नायू व दात मजबूत राहण्यासाठी कॅल्शिअम आवश्यक असते. संपूर्ण लेखात आपण कॅल्शिअम वाढवणाऱ्या घटकांची माहिती घेणार आहोत.

The post शरीरातील कॅल्शियम वाढवणारे अन्नपदार्थ | Calcium Food in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
कॅल्शियम हा शरीराला अत्यंत आवश्यक असा घटक आहे. शरीराला बळकटी आणि मजबुती प्रदान करण्याचे काम कॅल्शिअम मार्फत होत असते. शरीरातील हाडे, स्नायू व दात मजबूत राहण्यासाठी कॅल्शिअम आवश्यक असते. संपूर्ण लेखात आपण कॅल्शिअम वाढवणाऱ्या घटकांची (Calcium Food in Marathi) माहिती घेणार आहोत.

कॅल्शियम वाढवणारे पदार्थ – Calcium Foods List in Marathi

शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी शरीराला पोषक अन्नाची आणि नियमित व्यायामाची गरज असते. पोषक घटकांची कमतरता झाल्यास शरीरात वेगवेगळ्या व्याधी निर्माण होत असतात. संपूर्ण पोषण आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजांचा योग्य प्रमाणात समावेश असणे अत्यावश्यक आहे.

फायबर, लोह, प्रोटीन्स, सोडियम, पोटॅशियम यांप्रमाणेच कॅल्शिअम हा घटक देखील शरीरास आवश्यक असतो. कॅल्शिअमची कमतरता ही कोणत्याही वयात जाणवू शकते. मुलांच्या सर्वांगीण विकासात कॅल्शिअम महत्त्वाची भूमिका बजावते.

प्रौढ व्यक्तींमध्ये हातापायाला मुंग्या येणे, हाडे दुखणे, दातांची समस्या आणि स्नायू दुखी अशा प्रकारच्या शारीरिक व्याधी आढळतात. अशा व्याधी न होण्यासाठी शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरून निघणे अत्यावश्यक आहे.

खालील अन्नपदार्थांमध्ये कॅल्शिअम तसेच इतर पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीर स्वस्थ अनुभव करू शकते.

• दूध –

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शिअमचा उत्तम स्रोत आहेत. लहानपणापासून आपण नेहमी दुधाचे सेवन करत आलेलो आहोत. दूध हा संपूर्ण आहार आहे असे म्हटले जाते कारण यामध्ये शरीरासाठी लागणारे सर्व पोषक घटक असतात.

लहानपणी शरीर वाढत असताना हाडांच्या मजबुतीसाठी दुधाचे सेवन करणे अत्यंत गरजेचे असते. तसेच प्रौढ वयात कॅल्शिअमची कमतरता जाणवल्यास दूध हा उत्तम पर्याय असू शकेल.

• पनीर –

पनीर हा दुग्धजन्य पदार्थ आहे. पनीरमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. हाडे आणि स्नायूंच्या बळकटीसाठी पनीरचे सेवन अत्यंत लाभदायक ठरेल.

• सुका मेवा –

सुका मेवा म्हणजे ड्राय फ्रुट्स. अत्यंत महाग विक्री असल्याने सुका मेवा जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही परंतु त्याचे आरोग्यदायी लाभ जाणून घेतल्यास नक्कीच आपण पैशांचा विचार करणार नाही. सुका मेवा हा अति प्रमाणात सेवन करू नये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचे सेवन करावे.

सुक्या मेव्यात प्रथिने, कॅल्शिअम, अत्यंत आवश्यक अशी सूक्ष्म खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचे प्रमाण भरपूर असल्याने सुका मेवा हा आहारात घ्यायला सुरुवात करावीच. शेंगदाणे, बदाम, जर्दाळू, मनुका, काजू असे काही सुक्या मेव्याचे पदार्थ आहेत जे कॅल्शिअमचा उत्तम स्रोत मानले जातात.

• भाज्या –

हिरव्या भाज्या हा कॅल्शिअमचा उत्तम स्रोत आहे. पालक, मेथी, आणि पुदिना यांमध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. लोह, फायबर अशा पोषकतत्वांसह कॅल्शिअम देखील विपुल प्रमाणात असल्याने हिरव्या पालेभाज्या नियमित खाल्ल्यास अनेक आरोग्यदायी लाभ होऊ शकतील.

ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर आणि गाजर अशा इतर प्रकारच्या भाज्यांमध्ये सुद्धा कॅल्शिअम भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.

• सोयाबीन –

कॅल्शिअमचा सर्वात उत्तम शाकाहारी स्त्रोत म्हणजे सोयाबीन. जे लोक प्राणीजन्य आहार घेत नाहीत त्यांनी नक्कीच सोयाबीनचा आहारात समावेश करावा. दुधाचा पर्याय म्हणून सोयाबीनला पाहिले जाते. सोयाबीनचे नियमित सेवन हे हाडांना मजबुती प्रदान करते.

• अंडी –

शरीरातील प्रोटीन आणि कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्याचे काम अंडी करतात. जे नियमित व्यायाम करतात त्यांच्यासाठी तर अंडी हा अत्यंत पोषक पदार्थ आहे. अंडी हा स्वभावाने उष्ण असल्याने त्याचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

• सॅल्मन मासा –

सर्व प्रकारचे मांस आणि मासे हे कॅल्शिअमचा उत्तम स्रोत आहेत. त्यामध्ये सॅल्मन मासा हे विशेष उदाहरण देता येईल ज्यामध्ये कॅल्शिअम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. शरीराला बळकटी प्राप्त होण्यासाठी सॅल्मन मासा सेवन केल्यास उत्तम ठरेल.

(कोणतेही मांसाहारी सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. उत्तम आरोग्यासाठी किती प्रमाणात मांसाहार असावा याबद्दल डॉक्टर योग्य प्रकारे सांगू शकतील.)

• अंजीर

अंजीर या फळाचे सेवन नियमित केल्याने शरीराला चांगल्या प्रमाणात कॅल्शियम प्राप्त होते. अंजीर फळातील फॉस्फरस आणि कॅल्शियम हे दोन घटक हांडाना मजबुती प्रदान करतात.

• लिंबूवर्गीय फळे –

संत्री, मोसंबी, द्राक्षे आणि आवळा ही फळे व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त कॅल्शिअमने देखील समृध्द असतात. त्यामुळे मानवी त्वचेसाठी आणि हाडांसाठी या फळांचे सेवन म्हणजे वरदानच ठरते. शिवाय या पदार्थांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

• टोमॅटो –

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही टोमॅटोचे सेवन सुरू केल्यास अत्यंत लाभ होईल.

• तिळ –

तिळ हा उष्णतावर्धक पदार्थ आहे. तिळामध्ये प्रथिनांचे आणि कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. शरीरात कॅल्शिअम कमतरतेमुळे जर थकवा जाणवत असेल तर तिळाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.

कॅल्शियमचे अन्य स्त्रोत :

मसाले – जिरे, लवंग आणि काळी मिरी.
डाळी – राजमा, मूग, मसूर आणि चणे.
धान्ये – बाजरी, गहू आणि नाचणी.
फळे – आंबा, नारळ, अननस, टरबूज.
सुका मेवा – बदाम, पिस्ता, अक्रोड.

अधिक वेळा विचारले जाणारे प्रश्न – Frequently Asked Questions

• कॅल्शियम काय आहे? – What Is Calcium In Marathi

शरीरातील हाडे आणि दात यांच्या बळकटीसाठी अत्यंत आवश्यक असणारे खनिज म्हणजे कॅल्शिअम! बहुतांश कॅल्शिअम हे हाडे आणि दातांमध्ये असते. एक ते दोन टक्के कॅल्शिअम हे इतरत्र शरीरात जसे की रक्त, स्नायू आणि पेशी द्रवामध्ये उपलब्ध असते.

• कॅल्शिअमच्या कमतरतेची लक्षणे काय आहेत? What are the symptoms of calcium deficiency?

मानवी शरीरात हाडे आणि सांध्यांची रचना असते. त्यांच्या बळकटीसाठी कॅल्शिअम अत्यंत आवश्यक आहे. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यास समजावे की कॅल्शिअमची कमतरता आहे.

स्नायूदुखी आणि दातांच्या समस्येत देखील कॅल्शिअमची कमतरता हे कारण असू शकते. कधीकधी योग्य आहार घेऊन सुद्धा शरीरात थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तरी कॅल्शिअम कमी झाले आहे असे आपण म्हणू शकतो.

• कॅल्शियम का आवश्यक आहे? Why Calcium is Important in Marathi

शरीरातील हाडे आणि स्नायूंच्या बळकटीसाठी कॅल्शिअम अत्यंत आवश्यक आहे. कॅल्शिअमचे शरीरातील प्रमाण योग्य असल्यास मज्जासंस्था सुरळीत कार्य करते.

शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होणे, स्नायू मजबूत ठेवणे, हृदयगती साधारण ठेवणे, शरीरातील रसायने सक्रिय करणे, वजन संतुलन, रक्त गोठणे, अशा विविध शारिरीक क्रियांमध्ये कॅल्शिअम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

• कॅल्शियम वाढवणारे पदार्थ कोणकोणते आहेत? – Calcium Foods List in Marathi

दूध, पनीर, अंडी, सोयाबीन, हिरव्या भाज्या, सुका मेवा, संत्री, आवळा, शेंगा, मसूर, सॅल्मन मासा, टोमॅटो, अंजीर, डाळी आणि तीळ अशा विविध प्रकारच्या अन्नपदार्थांमध्ये विपुल प्रमाणात कॅल्शिअम असते.

जिरे, लवंग आणि काळी मिरी हे कॅल्शियमयुक्त मसाले पदार्थ आहेत. तसेच राजमा, मूग व चणे या डाळींमध्ये आणि बाजरी, गहू, व नाचणी या धान्यांमध्ये देखील कॅल्शिअम असते.

तुम्हाला कॅल्शिअम वाढवणारे अन्नपदार्थ (Calcium Food List In Marathi) हा लेख आवडला असल्यास तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post शरीरातील कॅल्शियम वाढवणारे अन्नपदार्थ | Calcium Food in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/calcium-food-list-in-marathi/feed/ 0 2910