मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sun, 19 Feb 2023 04:00:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 शिक्षणातील बदलता दृष्कोन – मराठी निबंध https://dailymarathinews.com/changing-outlook-on-education-marathi-essay/ https://dailymarathinews.com/changing-outlook-on-education-marathi-essay/#respond Sun, 19 Feb 2023 04:00:18 +0000 https://dailymarathinews.com/?p=5577 आधुनिक युगात होत चाललेले बदल हे शिक्षण क्षेत्रावर प्रभाव टाकत आहेत. त्यामधील समस्या व उपाय काय असू शकतील याची चर्चा शिक्षणातील बदलता दृष्टिकोन या निबंधात केलेली आहे.

The post शिक्षणातील बदलता दृष्कोन – मराठी निबंध appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा शिक्षणातील बदलता दृष्टिकोन (Shikshanatil Badalta Drushtikon Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे.

आधुनिक युगात होत चाललेले बदल हे शिक्षण क्षेत्रावर प्रभाव टाकत आहेत. त्यामधील समस्या व उपाय काय असू शकतील याची चर्चा शिक्षणातील बदलता दृष्टिकोन या निबंधात केलेली आहे.

शिक्षणातील बदलता दृष्टिकोन निबंध मराठी | Shikshanatil Badalta Drushtikon Nibandh Marathi |

सध्या विद्यार्थी व तंत्रज्ञान यांची चांगलीच मैत्री झाल्याने विद्यार्थी हे शैक्षणिक बदल इच्छित आहेत. शिक्षण माणसाला घडवते हे अगदी सत्य असले तरी जबरदस्ती शिक्षणाचा आटापिटा होतोय याची जाणीव विद्यार्थ्यांना होऊ लागलेली आहे. म्हणजेच शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे आपण सध्या जीवनात जी प्रगती अनुभवत आहोत तिला आधार बनवूनच यापुढील कारकीर्द घडवली जाऊ शकते असा विश्वास शालेय मुलांना देखील वाटतो आहे. त्यामुळे अत्यंत प्रभावी असलेले पुस्तकी शिक्षण हे देखील विद्यार्थ्यांना नकोसे वाटते आहे.

विद्यार्थी आता मोबाईल, संगणक आणि इतर तांत्रिक उपकरणे वापरू लागल्याने दैनंदिन जीवनात सक्षमपणे व्यवहार आणि इतर उपयोगी कामे करू शकत आहेत. पुस्तकी गुणवत्ता व त्याचे कागदी प्रमाणपत्र हे कितपत योग्यपणे विद्यार्थ्यांची हुशारी ठरवू शकेल याबद्दलची जागरुकता निर्माण होऊ लागली आहे.

भविष्याची वाटचाल ओळखून जर शिक्षणाचा पाया कल्पकरित्या निर्मिला गेला तर शिक्षण हे सर्वांनाच प्रिय वाटू शकेल. तंत्रज्ञान विकसित झाल्याने त्याचा वापर आता शैक्षणिक उपक्रमांत होऊ शकतो व ते विद्यार्थ्यांना कितीतरी रंजक वाटू शकेल.

शारिरीक, मानसिक व बौद्धिक क्षमता यांचा विकास करणे हे देखील आवश्यक असल्याने तंत्रज्ञानाचा फक्त प्रभावी वापर करणे गरजेचे ठरेल. असा वापर केल्याने शिक्षण हे अति सोयीस्कर होईल आणि शिक्षणाचा उद्देश्यही पूर्ण होऊ शकेल.

विद्यार्थ्यांचे मन हे अपरिपक्व असल्याने ते लगेच भरकटू शकते. त्यामुळे त्यांना स्वभावाच्या विपरीत सवयी लागण्याच्या दाट शक्यता आहेत. तसे होऊ नये यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहण्याची दृष्टी त्यांच्यात निर्माण व्हायला हवी. तशा उद्देश्याने शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध असायला हवी.

शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण घटक ठरतील. शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रयत्न व सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो. तेव्हाच विद्यार्थी शिक्षणात रस घेऊन अभ्यास, खेळ, कला अशा विविध क्षेत्रांत सहभागी होतील.

शिक्षणातील रस निघून गेल्यास विद्यार्थी हे तंत्रज्ञानाच्या जाळ्यात असे काही गुरफटत जातील की त्यातून बाहेर पडणे हे त्यांच्यासाठी अशक्यप्राय बाब असेल. त्यासाठी भविष्यातील तोटे व धोके ओळखून सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा शिक्षणाप्रती असलेला दृष्टिकोन बदलणे आवश्यक ठरेल.

तुम्हाला शिक्षणातील बदलता दृष्टिकोन (Shikshanatil Badalta Drushtikon Nibandh Marathi) हा मराठी निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post शिक्षणातील बदलता दृष्कोन – मराठी निबंध appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/changing-outlook-on-education-marathi-essay/feed/ 0 5577
आरसा नसता तर – मराठी निबंध • Aarasa Nasta Tar Nibandh Marathi • https://dailymarathinews.com/aarasa-nasta-tar-marathi-essay-aarasa-nasta-tar-nibandh-marathi/ https://dailymarathinews.com/aarasa-nasta-tar-marathi-essay-aarasa-nasta-tar-nibandh-marathi/#respond Sun, 22 Jan 2023 06:05:48 +0000 https://dailymarathinews.com/?p=5416 जर आरसा नसेल तर आपले भौतिक जीवन कसे असेल आणि कोणकोणत्या घटना घडतील व घडणार नाहीत अशा बाबींचे विस्तृत वर्णन या निबंधात केलेले आहे.

The post आरसा नसता तर – मराठी निबंध • Aarasa Nasta Tar Nibandh Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा आरसा नसता तर (Aarsa Nasta Tar Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. जर आरसा नसेल तर आपले भौतिक जीवन कसे असेल आणि कोणकोणत्या घटना घडतील व घडणार नाहीत अशा बाबींचे विस्तृत वर्णन या निबंधात केलेले आहे.

आरसा नसता तर निबंध मराठी | Aarasa Nasta Tar Nibandh Marathi

आज सकाळी माझ्या चेहऱ्याला जखम झाली आणि मी ती आरशात पाहिली. आरशात पाहून त्यावर मलम लावून थोडा आराम केला. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला. आत्ता आरसा होता म्हणून मला जखमेवर उपचार करणे शक्य झाले. परंतु जर आरसा नसताच तर काय झाले असते…

आरसा नसता तर आपण कसे दिसतो, आपली हालचाल कशी होते, आपली सुंदरता – कुरूपता अशा बाबी आपल्याला समजल्या नसत्या. आरसा नसता तर आपण आपल्या चेहऱ्याची व शरीराची व्यवस्थित काळजी घेतलीच नसती.

आरसा प्रत्येक व्यक्तीसाठी खूप उपयुक्त ठरत असतो. आपण कसे दिसतो, कसा पेहराव करतो यावरून सध्या आपले व्यक्तिमत्त्व पारखले जात असल्याने प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या सौंदर्याची काळजी घेत आहे. त्यामुळे आरशाचे महत्त्व खूपच वाढलेले आहे.

आपण सुंदर आणि नीटनेटके दिसावे अशी प्रत्येकाची इच्छा असल्याने बाजारात सौंदर्य प्रसाधनांची रेलचेल असते. ही सौंदर्य प्रसाधने आपण आरशाच्या मदतीनेच शरीरभर थोपत असतो. आरसा नसता तर सौंदर्य प्रसाधने कोणी विकतच घेतली नसती.

आज केशकर्तनालय, ब्युटी पार्लर्स, हॉटेल्स, मोठमोठे मॉल्स अशा सर्व ठिकाणी चकचकीत आरशांची सजावटच केलेली असते. आपले शरीर सुंदर असो की नसो, प्रत्येकजण हा आरशांत स्वतःला पाहून सुंदरतेचा दिलासा मात्र देत असतो. आरसा नसता तर अशा ठिकाणांचे महत्त्वच राहिले नसते.

सध्या प्रत्येकाच्या घरी आरसा आहे. काहींच्या घरी तर प्रत्येक खोलीत आरसा असतो. कोणालाही न पाहवणारे असे आपले नखरे, नृत्य आणि वेडेवाकडे चाळे आपण आरशात पाहूनच करत असतो. आरसा नसता तर असे नखरे आपण केलेच नसते.

आरसा असल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वात बरेच बदल झालेले आहेत. प्रत्येक मनुष्य केस, त्वचा आणि इतर शारिरीक अवयवांची काळजी घेऊ लागला आहे. स्वतःचे वागणे आणि असणे हे आपण आरशातच न्याहाळत असल्याने आरसा नसेल तर आपल्या शारिरीक अस्तित्वाची दिशा नक्कीच बदलून जाईल.

आरसा नसता तर काही फायदेही झाले असते. सध्या व्यक्ती आंतरिक सौंदर्यापेक्षा फक्त  शारिरीक सौंदर्याला महत्त्व देऊ लागला आहे. त्यामुळे शारिरीक अस्तित्व खूपच मजबूत होऊन स्वतःला सुंदर दाखवण्याची जणू स्पर्धाच सुरू झालेली आहे. आरसा नसेल तर या गोष्टी घडणारच नाहीत.

तुम्हाला आरसा नसता तर हा मराठी निबंध (Aarasa Nasta Tar Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post आरसा नसता तर – मराठी निबंध • Aarasa Nasta Tar Nibandh Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/aarasa-nasta-tar-marathi-essay-aarasa-nasta-tar-nibandh-marathi/feed/ 0 5416
स्वच्छतेचे महत्त्व मराठी निबंध | Swachhateche Mahattva Marathi Nibandh | https://dailymarathinews.com/cleanliness-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/cleanliness-essay-in-marathi/#respond Mon, 11 Oct 2021 06:57:47 +0000 https://dailymarathinews.com/?p=1759 स्वच्छता म्हणजे एकप्रकारे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. स्वच्छतेचे महत्त्व (Swachhateche Mahattva) जाणून घेतल्याने आपण सुंदरतेचे पाईक बनत असतो. त्यामुळे आपल्या समाजाची आणि देशाची प्रगती होत असते ...

Read moreस्वच्छतेचे महत्त्व मराठी निबंध | Swachhateche Mahattva Marathi Nibandh |

The post स्वच्छतेचे महत्त्व मराठी निबंध | Swachhateche Mahattva Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
स्वच्छता म्हणजे एकप्रकारे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. स्वच्छतेचे महत्त्व (Swachhateche Mahattva) जाणून घेतल्याने आपण सुंदरतेचे पाईक बनत असतो. त्यामुळे आपल्या समाजाची आणि देशाची प्रगती होत असते आणि आपणही खऱ्या अर्थाने प्रगत होत असतो.

विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळून येण्यासाठी “स्वच्छता” या विषयावर निबंध लिहायला लावतात. वास्तविक परिस्थिती आहे तशी दर्शवणे आणि काल्पनिक विस्तार न करणे अशा बाबी या निबंधात अपेक्षित आहेत.

चला तर मग पाहुयात कसा लिहायचा स्वच्छतेचे महत्त्व हा मराठी निबंध (Swachhateche Mahattva Marathi Nibandh)

स्वच्छतेचे महत्त्व मराठी निबंध ! Importance Of Cleanliness Marathi Essay |

मानवी जीवनात स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. आपले अस्तित्त्व हे इतर प्राण्यांपेक्षा अति संवेदनशील आहे. त्यांना परिसर स्वच्छतेची गरज भासत नाही, परंतु माणूस मात्र स्वच्छतेने बांधला गेला आहे. स्वच्छता नसेल तर मानवी आरोग्यात बाधा निर्माण होते.

शरीर स्वच्छ न ठेवता आपण राहू लागलो, तर शरीराचा दुर्गंध येऊ लागतो. तसेच घरातील साफसफाई केली नाही तर रोगराई, आजार, अस्वच्छता आसपास पसरते. त्यामुळे शरीर आणि परिसर स्वच्छ राखणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

परिसरात स्वच्छता नसेल तर गंभीर परिस्थिती उत्पन्न होऊ शकते. साथीचे रोग आणि प्रदूषण अशा समस्या डोके वर काढतात. त्यामुळे कचरा व्यवस्थापन ही बाब सातत्याने कृतीत आणावी लागते. त्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत असते, पण व्यक्तिगत स्तरावर देखील स्वच्छतेबाबत सजग असणे गरजेचे आहे.

कचरा व्यवस्थापन केल्याने घर आणि परिसर स्वच्छता राखली जाऊ शकते. त्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा व्यवस्थापन हे दोन वेगवेगळे घटक असू शकतात. निरुपयोगी व सुका कचरा आपल्याला जाळता येऊ शकतो आणि ओला कचरा आपण जैविक खतासाठी वापरू शकतो.

स्वच्छतेबाबतचे उपक्रम आणि नियम हे सर्वजण पाळू शकतील असे असले पाहिजेत. जसे की सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, परिसर अस्वच्छ न ठेवणे, अशा काही उपक्रमांची अंमलबजावणी आपण सामाजिक स्तरावर करू शकतो.

परिसरातील स्वच्छता म्हणजे पर्यावरणातील सर्व घटक स्वच्छ असणे होय. नदी, नाले, डोंगर, जमीन, हवा प्रदूषित होऊ न देणे हे देखील स्वच्छतेचेच काम आहे. अशा कृतीतून आपण एका स्वच्छ समाजाची, गावाची, आणि शहराची निर्मिती करू शकतो.

स्वच्छता नसल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. अस्वच्छतेमुळे असे संसर्गजन्य आजार पसरतात ज्यामुळे संपूर्ण समाज सातत्याने रोगी बनत जातो. त्याचे परिणाम इतर प्राण्यांवर आणि वातावरणावर देखील होत असतात.

मानवी पिढी जर स्वच्छतेबाबत जागरूक नसेल तर येणारी पुढची पिढीही तशीच असू शकते. साफसफाई न करता अस्वच्छ राहणे हे वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर होऊ लागते. त्याचा परिणाम म्हणून एक रुग्ण मानसिकता विकसित होत जाते.

नियमित स्वच्छता ठेवली गेली तर प्रसन्न वातावरणाची निर्मिती होते. व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा हा सर्व जीवनात अंगिकारला जातो. सर्वांना स्वच्छतेची जाणीव होते. अशा जाणिवेतून आपण एक स्वच्छ, सुंदर आणि सृजनशील समाज घडवू शकतो.

तुम्हाला स्वच्छतेचे महत्त्व मराठी निबंध (Swacchateche Mahattva Marathi Nibandh) कसा वाटला ? त्याबद्दल नक्की तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा…

The post स्वच्छतेचे महत्त्व मराठी निबंध | Swachhateche Mahattva Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/cleanliness-essay-in-marathi/feed/ 0 1759
ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे निबंध | Online Shikshan Nibandh | https://dailymarathinews.com/%e0%a4%91%e0%a4%a8%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%86/ https://dailymarathinews.com/%e0%a4%91%e0%a4%a8%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%86/#respond Thu, 07 Oct 2021 08:35:02 +0000 https://dailymarathinews.com/?p=2639 सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्याचे फायदे आणि तोटे स्पष्ट करणारा ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे हा मराठी निबंध

The post ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे निबंध | Online Shikshan Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्याचे फायदे आणि तोटे स्पष्ट करणारा ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे हा मराठी निबंध (Online Shikshan Fayde ani Tote Nibandh) प्रस्तुत लेखात मांडण्यात आलेला आहे.

ऑनलाईन शिक्षण – फायदे आणि तोटे | Online Education Advantages and Disadvantages |

ऑनलाईन शिक्षण घेत असताना विद्यार्थी नेहमी एकाग्रतेने समजून घेतायेत की नाही हाच मूळ प्रश्न आहे. ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावे लागतील तरच अशा प्रकारचे शिक्षण हे भविष्यातील शिक्षण होऊ शकेल.

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे सर्वप्रथम जाणून घेऊयात. सर्व प्रकारची माहिती ऑनलाईन उपलब्ध झाल्याने शिक्षण सुद्धा ऑनलाईन देता येऊ शकते हे सध्या स्पष्ट झाले आहे. विद्यार्थी मोबाईल, हेडफोन्स आणि इंटरनेट सुविधा अशा गोष्टींनी ऑनलाईन शिक्षण सहज घेऊ शकतो.

प्रत्येक शिक्षक सध्या विशिष्ट व्हिडिओ ऍप द्वारे विद्यार्थ्यांशी संपर्कात येत आहेत. त्यावरच ऑनलाईन क्लास सुरू होत आहे. शिक्षक आपल्या स्वतःच्या घरी आणि विद्यार्थी आपल्या घरी! म्हणजेच घरबसल्या शिक्षण सुरू झालेले आहे.

इंटरनेट सुविधा असल्याने शिक्षण तसेच इतरही सामान्य ज्ञान मुबलक स्वरूपात आपण मोबाईलवर वाचू अथवा पाहू शकतो. सर्व पुस्तके आणि त्यातील स्वाध्याय शिक्षक ऑनलाईन लिंक शेअर करून च विद्यार्थ्यांना देतात. विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन च नोंद केली जाते.

ऑनलाईन शिक्षण घेता येऊ शकते तर ऑनलाईन परीक्षा सुद्धा देता येऊ शकते. विद्यार्थी घरूनच पेपर सोडवून त्याचे फोटो काढून शिक्षकांना ऑनलाईन सबमिट करतात. त्यामुळे शिक्षणातील परीक्षेचा आणि बैठकीचा वेळ वाचला असे म्हणता येईल.

ऑनलाईन शिक्षणाचे तोटे देखील जाणून घ्यायला हवेत. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नसते त्यामुळे आपण पाहतो की शाळेत विविध उपक्रम सुद्धा घेतले जातात ज्यांद्वारे व्यक्तिमत्त्व विकास शक्य होत असतो. ऑनलाईन शिक्षणात अशा विकासाची उणीव नक्कीच भासते.

शाळेत खेळ, कला, तसेच इतर सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात त्यावेळी विद्यार्थी नव्याने काहीतरी शिकत असतो. त्याचे नवनवीन मित्र बनत असतात. वागणूक, स्वभाव, नैतिकता तसेच व्यवहारज्ञान या सर्व गोष्टी तो शाळेत शिकत असतो परंतु ऑनलाईन शिक्षणात अशा उपक्र मांची उणीव जाणवते.

मोबाईल आणि इंटरनेट सुविधा सतत वापरल्याने विद्यार्थ्यांना त्याचे व्यसन जडू शकते. विद्यार्थी तासनतास मोबाईल च घेऊन बसतील ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर, मानेवर, आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय सोशल मीडियाचा वापर सातत्याने करणे याचीही शक्यता नाकारता येत नाही.

शाळेत गेल्यावर मित्र – मैत्रिणी आणि शिक्षकांचा सहवास लाभत असतो. त्यांच्या सहवासाने विद्यार्थी घडत असतात. असा सहवास ऑनलाईन शिक्षणात जाणवत नाही. त्यामुळे ऑनलाईन माध्यमाचा गरजेपुरता उपयोग करणे फायदेशीर ठरेल आणि शाळा नियमित सुरू असलेल्या सर्वांनाच आवडतील.

तुम्हाला ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे हा मराठी निबंध (Online Shikshanache Fayde ani Tote Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे निबंध | Online Shikshan Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%91%e0%a4%a8%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%86/feed/ 0 2639
पाण्याचे महत्त्व – मराठी निबंध | Importance of Water Essay In Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8/ https://dailymarathinews.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8/#respond Sun, 03 Oct 2021 04:47:01 +0000 https://dailymarathinews.com/?p=2609 पाणी हेच जीवन आहे असे आपण वारंवार ऐकत आलेलो आहे. अशा पाण्याचे महत्त्व काय आहे, हे पाण्याचे महत्त्व या मराठी निबंधात

The post पाण्याचे महत्त्व – मराठी निबंध | Importance of Water Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
पाणी हेच जीवन आहे असे आपण वारंवार ऐकत आलेलो आहे. त्याला जीवन का म्हटले आहे, आणि अशा पाण्याचे महत्त्व काय आहे, हे पाण्याचे महत्त्व या मराठी निबंधात (Importance of Water Essay In Marathi) स्पष्ट करण्यात आलेले आहे.

पाण्याचे महत्त्व निबंध मराठी | पाणी हेच जीवन | Panyache Mahattva Marathi Nibandh |

मानवी जीवनात आणि संपूर्ण सजीव सृष्टीसाठी पाण्याचे महत्त्व अपरंपार आहे. संपूर्ण पृथ्वीवर जवळपास ७० टक्के पाणीसाठा आहे. प्रत्येक वर्षी जलचक्र प्रक्रियेने पाऊस पडत असतो आणि पाण्याचा वापर पृथ्वीवर होत असतो.

वृक्ष, पशुपक्षी आणि मानव अशा सर्व प्रकारच्या सजीवांसाठी पाण्याचा उपयोग होत असतो. अन्ननिर्मिती प्रक्रिया, शरीर स्वच्छता आणि तहान भागवण्यासाठी पाण्याचा वापर होत आलेला आहे. जलचर प्राणी हे तर पाण्यातच निवास करत आपले जीवन जगत असतात.

पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक तत्त्व आहे. निसर्गात त्याचे अस्तित्व विपुल प्रमाणात आहे. पृथ्वीवर जीवन निर्मिती होण्यासाठी आणि तेच जीवन चालू ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे. सजीवांचे पालनपोषण आणि उदरभरण होण्यासाठी पाण्याची गरज आहेच.

मानवी जीवन हे संपूर्णतः पाण्यावर आधारित आहे. आपल्या शरीरातसुद्धा सत्तर टक्के पाणी आहे. पाण्यामुळे आपण आपल्या शरीराची स्वच्छता राखू शकतो. इतर दैनंदिन कामे जसे की कपडे धुणे, जेवण बनवणे, घर व परिसर स्वच्छ करणे यासाठी पाण्याचा उपयोग होत असतो.

माणूस अन्ननिर्मिती करण्यासाठी शेती करत असतो. संपूर्ण शेतीची कामे पाण्यावरच अवलंबून आहेत. पाऊस अथवा पाण्याचा साठा नियमित उपलब्ध असेल तर आपण व्यवस्थित शेती करून अन्नधान्य उत्पन्न करू शकतो.

आपण अन्न ग्रहण न करता काही दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय जगू शकत नाही. शरीरशुद्धी आणि इतर शारीरिक प्रक्रिया पाण्यामुळे सुरळीत घडतात. गरम, कोमट आणि थंड अशा विविध तापमान असणाऱ्या पाण्याचा उपयोग माणूस आवश्यकतेनुसार करत असतो.

पाण्याचे उपयोग आणि महत्त्व समजून घेऊन पाणी हेच जीवन आहे असे आपण म्हणू शकतो. पाणी ग्रहण करताना आणि त्याचा उपयोग करताना अत्यंत काळजीपूर्वक करावा. अनेक रोग पाण्यामुळे बरे होऊ शकतात तर अनेक रोगांची लागण देखील पाण्यामुळेच होत असते.

पाणी हा एकमेव घटक असेल ज्याचा उपयोग मानवासाठी सर्वच प्रकारे होत असतो. तो वापरत असलेल्या भौतिक वस्तूंच्या निर्मिती प्रक्रियेत सुद्धा पाण्याचा उपयोग होतो. अशा प्रकारे जीवन निर्मिती आणि जीवन घडवणाऱ्या पाण्याला आपल्या अस्तित्वात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

तुम्हाला पाण्याचे महत्त्व हा मराठी निबंध (Importance of Water Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post पाण्याचे महत्त्व – मराठी निबंध | Importance of Water Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8/feed/ 0 2609
शिक्षक दिन – मराठी निबंध | Teachers Day Essay In Marathi | https://dailymarathinews.com/teachers-day-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/teachers-day-essay-in-marathi/#respond Sun, 22 Aug 2021 03:16:55 +0000 https://dailymarathinews.com/?p=2448 शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट करणारा शिक्षक दिन हा निबंध विद्यार्थ्यांना शालेय जीवनात लिहावा लागतो.

The post शिक्षक दिन – मराठी निबंध | Teachers Day Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
संपूर्ण जगभरात शिक्षक दिन हा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. “जागतिक शिक्षक दिन” हा ५ ऑक्टोबर तर भारतात “राष्ट्रीय शिक्षक दिन” हा ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

शिक्षक दिनाचे महत्त्व आणि शिक्षक दिन कसा साजरा केला जातो, याचे स्पष्टीकरण देणारा शिक्षक दिन हा निबंध (Teachers Day Essay In Marathi) विद्यार्थ्यांना शालेय जीवनात लिहावा लागतो.

शिक्षक दिन निबंध मराठीमध्ये | Teachers Day Marathi Nibandh |

आई वडीलांनंतर शिक्षकच हे विद्यार्थ्यांचे दुसरे पालक असतात. विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यामागे शिक्षकांचे खूप मोठे योगदान असते. अशा योगदानाचा आणि शिक्षकांच्या परिश्रमाचा योग्य सन्मान व्हावा म्हणून भारतात प्रत्येक वर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. ते नेहमी शिक्षणाला महत्त्व देत असत. ते स्वतः एक दार्शनिक आणि उत्तम शिक्षक होते. शिक्षक दिनी त्यांच्या जीवन कर्तुत्वाचा योग्य तो सन्मान केला जातो.

भारतात सर्व शाळांमध्ये आणि इतरही शैक्षणिक क्षेत्रांमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. सध्या कार्यरत असणाऱ्या तसेच निवृत्त झालेल्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन यथायोग्य आदर सत्कार केला जातो. तसेच शिक्षकदिनी विद्यार्थ्यांद्वारे विविध उपक्रम साजरे केले जातात.

कला क्षेत्रातील काही उपक्रम म्हणून रांगोळी, चित्रकला, नृत्य, नाटक स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि विविध खेळांच्या स्पर्धांचे नियोजन सुद्धा केले जाते. वर्गात काही विद्यार्थीच शिक्षक बनून तासिका घेतात आणि दिवसाच्या शेवटी त्यांच्या शिकवणीचे मूल्यांकन केले जाते.

शिक्षकदिनी भाषण आणि निबंध स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात. ज्यामध्ये एखाद्या मान्यवर व्यक्तीचे सुद्धा भाषण समाविष्ट असते. निबंधाचे आणि भाषणाचे विषय देखील शैक्षणिक क्षेत्राशी निगडित असतात. अशा प्रकारे सर्व उपक्रमांतून शिक्षकांप्रती आभार व्यक्त केले जातात.

लहानपणी मुलं शिक्षकांकडून सर्व काही आत्मसात करत असतात. त्यांना अक्षर ओळखीपासून ते उदात्त जीवन जगण्याची प्रेरणा देईपर्यंत शिक्षक सहाय्यक ठरतात. त्यांचे व्यक्तिगत आणि सामाजिक भवितव्य निर्माण करण्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो.

देशातील भविष्यातील पिढी निर्माण करण्याचे महान कार्य शिक्षक करत असतात. आजची मुले ही साक्षर बनून स्वतःसाठी एक उत्तम काम निवडतात. ते काम योग्यरित्या पार पाडून देशाचा विकासच घडवत असतात. 

अशा प्रकारे नैतिक, वैयक्तिक आणि सामाजिक विकास साधायचा असेल तर मुले शिक्षित होणे फार गरजेचे आहे. त्या दृष्टीने शिक्षकांचे कर्तृत्व आणखीनच महत्त्वपूर्ण बनते. शिक्षकांच्या अशा क कर्तुत्वाप्रती आपण सर्वजण नतमस्तक होऊयात आणि शिक्षकदिनी त्यांना सन्मान देऊयात.

तुम्हाला शिक्षक दिन हा मराठी निबंध (Teachers Day Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post शिक्षक दिन – मराठी निबंध | Teachers Day Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/teachers-day-essay-in-marathi/feed/ 0 2448
स्वातंत्र्यदिन – मराठी निबंध 2 | Independence Day Essay In Marathi | https://dailymarathinews.com/independence-day-essay-in-marathi-2/ https://dailymarathinews.com/independence-day-essay-in-marathi-2/#respond Sat, 07 Aug 2021 04:13:02 +0000 https://dailymarathinews.com/?p=2432 संपूर्ण भारतात स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. स्वातंत्र्यदिन कसा साजरा केला जातो, त्या संपूर्ण दिवसाचे वर्णन स्वातंत्र्यदिन या मराठी निबंधात (Independence Day ...

Read moreस्वातंत्र्यदिन – मराठी निबंध 2 | Independence Day Essay In Marathi |

The post स्वातंत्र्यदिन – मराठी निबंध 2 | Independence Day Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
संपूर्ण भारतात स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. स्वातंत्र्यदिन कसा साजरा केला जातो, त्या संपूर्ण दिवसाचे वर्णन स्वातंत्र्यदिन या मराठी निबंधात (Independence Day Essay In Marathi) करावयाचे असते.

१५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन निबंध | Swatantrya Din Marathi Nibandh |

दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. तो दिवस संपूर्ण भारतात स्वांतत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. सर्व वयोगटातील भारतीय लोक हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा करतात.

शाळा, सरकारी कार्यालये आणि संस्था अशा सर्व ठिकाणी भारतीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत असतो. ज्यामध्ये सकाळी सर्व कर्मचारी लोक आणि नागरिक मिळून भारतीय झेंड्याला अभिवादन करतात आणि मानवंदना देतात.

शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर मुलांकडून विविध उपक्रम साजरे केले जातात. झेंडावंदन स्थळी रांगोळी काढली जाते, पुष्पे वाहिली जातात. शाळेत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. त्यानंतर राष्ट्रगीत आणि समुहगीते सादर केली जातात.

स्वातंत्र्यदिनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रभातफेरी काढली जाते. विविध प्रकारच्या देशभक्तीपर आणि प्रेरणादायी घोषणा दिल्या जातात. कला, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात ज्यांनी अतुल्य असे यश प्राप्त केले असेल त्यांचा देखील सत्कार केला जातो.

शिक्षक अथवा उपस्थित मान्यवर स्वातंत्र्याच्या घटना तसेच क्रांतिकाऱ्यांचे स्वातंत्र्य कार्य, यांबद्दल भाषणे देतात. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. सर्व विद्यार्थी अभिमानाने भारावून जातात.

स्वातंत्र्यानंतर ज्यांनी भारतीय समाज घडवण्याचा प्रयत्न केला त्या राष्ट्रपुरुषांच्या देखील स्मृती उजागर केल्या जातात. तसेच समाजसेवक, सुधारक, नेते मंडळी, क्रीडापटू आणि कलाकार यांचा सत्कार केला जातो.

स्वातंत्र्यदिनी सर्वांच्या मनात देशाप्रती प्रेम आणि भक्ती जागवण्याचा प्रयत्न केला जातो. सद्यस्थितीत ज्यांनी देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावला, त्यांना मानवंदना दिली जाते. काही ठिकाणी प्रत्येक विभागातील सैनिक, पोलिस व सुरक्षा रक्षक यांचादेखील सत्कार केला जातो.

स्वातंत्र्यदिन हा सर्वांनाच प्रेरणा देणारा ठरतो. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला लहान मुलांना खाऊ वाटप केले जाते. देशभक्तीपर संगीत, कला, क्रीडा आणि लष्कर कवायत प्रकार आयोजित केले जातात. सायंकाळी भारतीय तिरंगा उतरवला जातो आणि स्वांतत्र्यदिनाची सांगता केली जाते.

भारताची राजधानी दिल्ली येथे लष्कर संचालन आणि प्रत्येक राज्यनिहाय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. भारतीय प्रधानमंत्री ध्वजारोहण करतात. सर्व आदरणीय लोक आणि मान्यवर नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात.

तुम्हाला स्वातंत्र्यदिन हा मराठी निबंध (Independence Day Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा…

The post स्वातंत्र्यदिन – मराठी निबंध 2 | Independence Day Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/independence-day-essay-in-marathi-2/feed/ 0 2432
गुरुपौर्णिमा मराठी निबंध | Guru Pornima Essay In Marathi | https://dailymarathinews.com/guru-pornima-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/guru-pornima-essay-in-marathi/#respond Sun, 01 Aug 2021 00:32:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=2421 प्रस्तुत निबंध हा गुरुपौर्णिमा आणि गुरूचे महत्त्व स्पष्ट करणारा आहे. गुरुचे महात्म्य कळण्यासाठी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा हा मराठी निबंध (Guru Pornima Essay In Marathi) लिहावा लागतो. ...

Read moreगुरुपौर्णिमा मराठी निबंध | Guru Pornima Essay In Marathi |

The post गुरुपौर्णिमा मराठी निबंध | Guru Pornima Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत निबंध हा गुरुपौर्णिमा आणि गुरूचे महत्त्व स्पष्ट करणारा आहे. गुरुचे महात्म्य कळण्यासाठी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा हा मराठी निबंध (Guru Pornima Essay In Marathi) लिहावा लागतो. या निबंधातून गुरुविषयी असणाऱ्या सर्व संकल्पना नक्कीच स्पष्ट होत जातील.

गुरुपौर्णिमा मराठी निबंध | Guru Pornima Marathi Nibandh |

भारतीय संस्कृतीत आई, वडील आणि गुरू हे देवासमान मानले गेले आहेत. आई – वडील जन्म देतात मात्र जीवनाला सार्थक दिशा देण्याचे काम मात्र गुरू करत असतो. त्याचीच प्रचिती म्हणून गुरु – शिष्य ही परंपरा भारतात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा संबोधले जाते. ज्या व्यक्तींना आपण गुरु मानत असू, आणि ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला आकार मिळत गेला त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करण्याचा हा एक समर्पक दिवस आहे.

भारतात शिक्षक आणि गुरू यांमध्ये नेहमीच फरक करण्यात आलेला आहे. शिक्षक हा पुस्तकी ज्ञान देतो तर गुरू हा जीवनाचे आत्मिक आणि पारमार्थिक ज्ञान देत जीवनच बदलून टाकतो. अशा गुरूप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी गुरू पौर्णिमेच्या दिवशी गुरूवंदन, गुरूपूजन आणि गुरूआरती केली जाते.

गुरुपौर्णिमा साजरी करताना नेहमी स्वतः शिष्य बनून सेवा करावी. व्यक्तिमत्त्वातील स्व बाजूला ठेवून गुरुप्रती संपूर्ण निष्ठा आणि समर्पण दाखवावे. विशिष्ट व्यक्तीला गुरू मानले नसल्यास आपले जीवन ज्यांनी घडवले अशा महान लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.

गुरू – शिष्य परंपरेत गुरूने शिष्यांसाठी जो जीवनमार्ग सांगितलेला असतो त्याचे आचरण करणे हे शिष्याचे परम कर्तव्य असते. प्रेम, साधना, प्रार्थना आणि समर्पण अशा अनेक मार्गांनी गुरू हा शिष्याचे जीवन बदलण्याचा प्रयत्न करीत असतो.

प्रत्येक महान व्यक्तीसाठी गुरूंनी केलेलं कार्य हे अनमोल असेच आहे. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस, श्री कृष्ण आणि ऋषी संदिपनी, श्री राम आणि ऋषी वशिष्ठ, अर्जुन आणि गुरू द्रोणाचार्य, अशी काही महान उदाहरणे देता येतील ज्यांद्वारे आपल्याला गुरूचे महत्त्व कळून येते.

महर्षी व्यास यांना आद्य गुरू मानले जाते. महर्षी व्यास यांचा जन्म याच दिवशी झाल्याने काही जण गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे देखील संबोधतात. भगवान बुद्धांनी देखील आत्मज्ञानानंतर याच दिवशी सारनाथ येथे आपले पहिले प्रवचन दिले गेल्याचा इतिहास आहे.

सध्या अध्यात्मिक अधिष्ठान लयाला जात असल्याचे सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे नकली आणि कामचलाऊ बाबा, भोंदू महाराज यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे स्वतःच समर्पित वृत्तीने आणि मनोभावे खऱ्या गुरूची ओळख करून घेणे आवश्यक झाले आहे.

प्रेम, प्रार्थना आणि भक्ती जागृत होण्यासाठी गुरूपौर्णिमेचा हा दिवस सर्वांसाठी एक अध्यात्मिक आणि अलौकिक जीवनाची सुरुवात घेऊन येवो. सर्वांना गुरूकृपा लाभो आणि सर्वांचे भले होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

तुम्हाला गुरुपौर्णिमा हा मराठी निबंध (Guru Pornima Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post गुरुपौर्णिमा मराठी निबंध | Guru Pornima Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/guru-pornima-essay-in-marathi/feed/ 0 2421
लोकमान्य टिळक – मराठी निबंध | Lokmanya Tilak Essay In Marathi https://dailymarathinews.com/lokmanya-tilak-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/lokmanya-tilak-essay-in-marathi/#respond Sat, 31 Jul 2021 23:18:48 +0000 https://dailymarathinews.com/?p=2424 स्वातंत्र्यलढ्यातील एक जहाल व्यक्तिमत्त्व, लेखक – संपादक, कर्मयोगी बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी लोकमान्य टिळक हा मराठी निबंध (Lokmanya Tilak Essay In ...

Read moreलोकमान्य टिळक – मराठी निबंध | Lokmanya Tilak Essay In Marathi

The post लोकमान्य टिळक – मराठी निबंध | Lokmanya Tilak Essay In Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
स्वातंत्र्यलढ्यातील एक जहाल व्यक्तिमत्त्व, लेखक – संपादक, कर्मयोगी बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी लोकमान्य टिळक हा मराठी निबंध (Lokmanya Tilak Essay In Marathi) लिहावा लागतो.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – मराठी निबंध | Lokmanya Tilak Marathi Nibandh

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे आणि लोकमान्य या उपाधीने प्रसिद्ध असणारे टिळक हे एक थोर भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, लेखक आणि संपादक होते.

लोकमान्य टिळकांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीतील टिळक आळीत एका ब्राह्मण कुटुंबात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव, तालुका दापोली हे टिळकांचे मूळ गाव होय.

लोकमान्य टिळकांनी इ. स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून तर मराठा हे इंग्रजीमधून प्रसिद्ध होत होते. सुरुवातीला आगरकर केसरीचे व टिळक हे मराठाचे संपादक होते.

इ. स. १८८४ मध्ये टिळक व आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. परंतु त्यापुढे टिळक आणि आगरकर या दोघांमध्ये वैचारिक मतभेद झाले.

टिळकांचे अग्रलेख हा केसरी वृत्तपत्राचा आत्मा होता. महाराष्ट्रात १८९६ साली मोठा दुष्काळ पडला होता. टिळकांनी त्यांच्या वृत्तपत्रांमार्फत शेतकऱ्यांना आणि समाजातील इतर घटकांना कर्तव्याची जाणीव करून दिली.

स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढताना जहालवाद व मवाळवाद असे दोन मतप्रवाह होते. लोकमान्य टिळक हे जहालवादी नेते होते. स्वातंत्र्यासाठी संघर्ष करा, मतभेद असल्यास आंदोलन करा, अशा मतावर लोकमान्य टिळक कायमच ठाम राहिले.

लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांचे राजकीय धोरण आणि स्वभाव एकसारखेच असल्याने या तिघांना लाल-बाल-पाल असे संबोधले जात असे.

लोकमान्य टिळक हे अतिशय द्रष्टे विचारक, लेखक, शिक्षक आणि संपादक तर होतेच शिवाय त्यांचा संस्कृत, गणित आणि खगोलशास्त्र या विषयांतील गाढा अभ्यास देखील होता. मंडालेच्या तुरुंगात लिहलेला “गीतारहस्य” हा त्यांचा ग्रंथ खूपच प्रसिद्ध झाला.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली, तसेच महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शिवजयंती उत्सवाला व्यापक स्वरूप दिले. अशा या थोर महापुरुषाचा मृत्यू दिनांक १ ऑगस्ट १९२० रोजी पुणे येथे झाला.

तुम्हाला लोकमान्य टिळक – मराठी निबंध (Lokmanya Tilak Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा…धन्यवाद!

The post लोकमान्य टिळक – मराठी निबंध | Lokmanya Tilak Essay In Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/lokmanya-tilak-essay-in-marathi/feed/ 0 2424
फुलाची आत्मकथा – मराठी निबंध | Fulachi Atmkatha Essay in Marathi | https://dailymarathinews.com/fulachi-atmkatha-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/fulachi-atmkatha-essay-in-marathi/#respond Thu, 15 Jul 2021 02:06:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=2400 फुलांना बोलता आले असते तर त्यांनी स्वतःचे मनोगत किंवा आत्मकथा कशी मांडली असती. त्याचेच वर्णन करणारा फुलाची आत्मकथा हा निबंध (Fulachi Atmkatha Essay in Marathi) ...

Read moreफुलाची आत्मकथा – मराठी निबंध | Fulachi Atmkatha Essay in Marathi |

The post फुलाची आत्मकथा – मराठी निबंध | Fulachi Atmkatha Essay in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
फुलांना बोलता आले असते तर त्यांनी स्वतःचे मनोगत किंवा आत्मकथा कशी मांडली असती. त्याचेच वर्णन करणारा फुलाची आत्मकथा हा निबंध (Fulachi Atmkatha Essay in Marathi) प्रस्तुत लेखात देण्यात आलेला आहे.

फुलाची आत्मकथा / फुलाचे मनोगत | Fulachi Atmkatha Marathi Nibandh |

मनुष्याच्या दैनंदिन जीवनात फुलांचा वापर पूर्वीपासून होत आलेला आहे. फुलांचा फक्त उपयोग केला जातो परंतु त्यानंतर कोमेजलेल्या अवस्थेत कोणी ढुंकून सुद्धा पाहत नाही. माझ्याबरोबर घडलेल्या प्रसंगांचे वर्णन म्हणजेच माझी आत्मकथाच मला तुम्हाला सांगायची आहे.

मला सर्वजण गुलाब म्हणून ओळखतात. माझा रंग गुलाबी आहे. परंतु सध्या लाल, पांढरा, केशरी, पिवळा अशाही रंगांचे गुलाब अस्तित्वात आहेत. अनेकांचे गुलाब हे आवडते फूल असते पण ज्यांना ते आवडते तेच मला तोडतात आणि माझा वापर करतात.

मी जेव्हा कळी होतो तेव्हा माझी खूप स्वप्नं होती. मी उमलावे, सुगंधित व्हावे आणि वाऱ्यासोबत इकडे तिकडे डोलावे! त्यानंतर दोन ते तीन दिवसात पूर्णपणे जीवनाचा आनंद घेऊन मिटून जावे. जवळजवळ प्रत्येक गुलाबाचे असेच स्वप्न असते.

मनुष्य मात्र हे स्वप्न पूर्ण होऊन देत नाही. मी कळीतून फूल म्हणून विकसित होत होतो. मला असंख्य किरणांची अनुभूती होत होती. माझा विकास पूर्णत्वास जात होता. माझ्या कायेला सुगंध प्राप्ती होत होती. एके दिवशी पहाटे पहाटे मी पूर्ण बहरात आलो आणि एकदाचा उमललो.

तो दिवस माझ्यासाठी खूपच सुंदर व्यतित होत होता. परंतु ते सुख काही क्षणांचे होते. ज्या घरासमोर मी उमललो होतो त्या घरातील स्त्री आली आणि मला तोडले. माझे प्राण माझ्या झाडापासून वेगळे केले. मी तिच्या केसातील शोभा बनून राहिलो परंतु माझे जीवन मात्र शोभनीय राहिले नाही.

सर्व पूजाविधी तसेच मंगल प्रसंगी माझा वापर केला जातो. मला फुलांचा राजा म्हणून संबोधले जाते. ते माझ्यात असलेल्या गुणांमुळेच! मला सुगंध आणि सौंदर्याचे प्रतिक मानले जात असल्याने मनुष्य माझे अस्तित्व सतत त्याच्या घराच्या अंगणात जपत असतो.

मनुष्य पूर्वीपासून माझ्या कायेचा उपयोग करीत आलेला आहे. सुगंधी अगरबत्ती, अत्तर, गुलाबजल, गुलकंद तसेच साबण बनवण्यासाठी माझा उपयोग होतो. परंतु तो फक्त उपयोग झाला, माझे जीवन आणि माझी सुंदरता मनुष्याने कधीच अनुभवली नाही.

मनुष्य भावनांना शब्दांची कडा असते पण मी तर फूल आहे. माझ्या भावना मी कशा बोलक्या करू? मला मनुष्य फक्त वापरतो परंतु माझे संपूर्ण आयुष्य मला जगू दिलेले नाहीये. माझ्या व्यक्तिगत जीवनाचा कधी विचार झालेला नाहीये. माझा सुगंध आणि माझी काया सर्वत्र विलीन झाली नाहीये.

तुम्हाला फुलाची आत्मकथा हा निबंध (Fulachi Atmkatha Essay in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post फुलाची आत्मकथा – मराठी निबंध | Fulachi Atmkatha Essay in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/fulachi-atmkatha-essay-in-marathi/feed/ 0 2400