Daily Marathi News https://dailymarathinews.com Sun, 04 Feb 2024 11:56:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 IND vs ENG 2nd Test – शुबमन गिलसाठी आजचा दिवस ठरला शुभ! https://dailymarathinews.com/ind-vs-eng-2nd-test-today-was-auspicious-day-for-shubman-gill/ https://dailymarathinews.com/ind-vs-eng-2nd-test-today-was-auspicious-day-for-shubman-gill/#respond Sun, 04 Feb 2024 11:56:14 +0000 https://dailymarathinews.com/?p=6208 कालच्या २८/० या धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताने रोहित शर्मा (१३) आणि जैस्वालला (१७) स्वस्तात गमावले. त्यांनतर गिल आणि श्रेयस यांनी भारतीय डावाला सावरले. भारताची दुसरी ...

Read moreIND vs ENG 2nd Test – शुबमन गिलसाठी आजचा दिवस ठरला शुभ!

The post IND vs ENG 2nd Test – शुबमन गिलसाठी आजचा दिवस ठरला शुभ! appeared first on Daily Marathi News.

]]>
कालच्या २८/० या धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताने रोहित शर्मा (१३) आणि जैस्वालला (१७) स्वस्तात गमावले. त्यांनतर गिल आणि श्रेयस यांनी भारतीय डावाला सावरले. भारताची दुसरी विकेट गेली तेव्हा भारताचा स्कोअर ३० होता. त्यांनतर ८१ धावांची भागीदारी करण्यात अय्यर आणि गिल यशस्वी ठरले.

अय्यरने या डावात घाई केली आणि वैयक्तिक २९ या धावसंख्येवर हार्टलीच्या गोलंदाजीवर स्टोक्सकडे झेल देऊन बाद झाला. त्यांनतर फलंदाजीसाठी आलेला पाटीदार (९) देखील रेहान अहमदचा शिकार ठरला.

भारताची धावसंख्या १२२/४ अशी कमकुवत असताना अक्षर पटेल आणि गिल यांनी ८९ धावांची भागीदारी रचली आणि भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. २११ धावसंख्या असताना गिलचा (१०४) बळी गेला. गिलचा फॉर्म हा मागील काही कसोटीत तितकासा चांगला नव्हता परंतु त्याने आज शतक झळकावत सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली.

श्रीकर भरत या डावात अपयशी ठरला आणि ६ धावा काढून रेहान अहमदचा शिकार ठरला. भारताच्या तळातील फलंदाजांनी जास्त योगदान दिले नाही. त्यामध्ये आश्विन (२९) वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताच्या दुसऱ्या डावात २५५ धावा झालेल्या आहेत तर तब्बल ३९८ धावांची आघाडी घेतली.

३९९ चे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेली इंग्लंडची टीम पुन्हा एकदा जलद सुरुवात देण्यात यशस्वी ठरली. अर्धशतकी भागीदारी दिल्यानंतर डकेट (२८) हा आश्विनचा शिकार झाला. दिवसाखेर इंग्लंडची धावसंख्या ६७/१ अशी होती. क्रॉली आणि रेहान अहमद हे नाबाद तंबूत परतले.

उद्या विजयासाठी इंग्लंडला अजून ३३२ धावांची गरज आहे तर भारताला इंग्लंडचे ९ फलंदाज बाद करावे लागतील. दुसऱ्या कसोटीचे अजून दोन दिवस बाकी आहेत तरीही उद्याच कसोटी निकालात निघण्याची शक्यता आहे.

The post IND vs ENG 2nd Test – शुबमन गिलसाठी आजचा दिवस ठरला शुभ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/ind-vs-eng-2nd-test-today-was-auspicious-day-for-shubman-gill/feed/ 0 6208
इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत संपुष्टात – Ind vs Eng 2nd Test https://dailymarathinews.com/englands-first-test-253-runs-confirmed-ind-vs-eng-2nd-test/ https://dailymarathinews.com/englands-first-test-253-runs-confirmed-ind-vs-eng-2nd-test/#respond Sat, 03 Feb 2024 11:06:42 +0000 https://dailymarathinews.com/?p=6204 जसं की आपण सर्व जण जाणतो की इंग्लंडचे फलंदाज हे धडाकेबाज खेळी करत असतात. त्याचाच नमुना पुन्हा एकदा आजच्या डावात दिसून आला. क्रोली आणि डकेट ...

Read moreइंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत संपुष्टात – Ind vs Eng 2nd Test

The post इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत संपुष्टात – Ind vs Eng 2nd Test appeared first on Daily Marathi News.

]]>
जसं की आपण सर्व जण जाणतो की इंग्लंडचे फलंदाज हे धडाकेबाज खेळी करत असतात. त्याचाच नमुना पुन्हा एकदा आजच्या डावात दिसून आला. क्रोली आणि डकेट यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर ५९ धावसंख्येवर डकेट (२१) कुलदीप यादवचा शिकार ठरला.

इंग्लंडतर्फे क्रोलीने तुफान फटकेबाजी केली. त्याने अवघ्या ७८ चेंडूत ७६ धावा काढल्या. त्याचा अडथळा अक्षर पटेलने दूर केला. श्रेयस अय्यरने त्याचा झेल टिपला. इंग्लंडचा स्टार फलंदाज रूट (५) आणि त्यासोबत भन्नाट फॉर्ममध्ये असलेला पोप (२३) आणि बेयरस्टो (२५) या तिघांचा अडथळा जसप्रीतने दूर केला. 

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेले फोक्स (६) आणि रेहान (६) यांना कुलदीपने फिरकीच्या जाळ्यात अडकवले. रेहान बाद झाला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर १८२ – ७ असा होता. रेहान बाद झाल्यानंतर स्टोक्स आणि हार्टली यांनी आठव्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या. पुन्हा एकदा जसप्रीत गोलंदाजीसाठी आला आणि त्याने स्टोक्स (४७), हार्टली (२१) व अँडरसन (६) यांचा अडथळा दूर केला.

जसप्रीत बूमराहने या सामन्यात सहा बळी टिपले आणि सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. इंग्लंड देखील पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारेल असे वाटले असतानाच भारताची गोलंदाजी मात्र अप्रतिम अशी झाली. त्यामध्ये बूमराह आणि कुलदीप यांनी मोलाचा वाटा उचलला.

भारताचा दुसरा डाव

इंग्लंडचा डाव आटोपल्यावर भारताच्या दुसऱ्या डावातील ५ षटकांचा खेळ झाला ज्यामध्ये भारताने बिनबाद २८ धावा बनवल्या.

The post इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत संपुष्टात – Ind vs Eng 2nd Test appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/englands-first-test-253-runs-confirmed-ind-vs-eng-2nd-test/feed/ 0 6204
भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर संपुष्टात https://dailymarathinews.com/indias-first-innings-was-confirmed-with-396-runs/ https://dailymarathinews.com/indias-first-innings-was-confirmed-with-396-runs/#respond Sat, 03 Feb 2024 08:41:26 +0000 https://dailymarathinews.com/?p=6201 जमेची बाजू म्हणजे यशस्वी जैस्वालने शानदार द्विशतक झळकावले. भारताच्या पहिल्या डावात ३९६ धावा झालेल्या आहेत.

The post भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर संपुष्टात appeared first on Daily Marathi News.

]]>
नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय यशस्वी जैस्वाल या उदयोन्मुख डावखुऱ्या फलंदाजाने रास्त ठरवला. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय संघ सर्व बाद झाला खरा परंतु जमेची बाजू म्हणजे यशस्वी जैस्वालने शानदार द्विशतक झळकावले. भारताच्या पहिल्या डावात ३९६ धावा झालेल्या आहेत.

पहिल्या दिवशी भारताने ६ खेळाडूंच्या मोबदल्यात ३३६ धावा जमवल्या होत्या. त्या धावसंख्येवरून पुढे खेळाला सुरुवात झाली. जैस्वाल पहिल्या दिवशी १७९ धावांवर नाबाद खेळत होता. त्याने आज द्विशतक झळकावले आणि २९० चेंडूंचा सामना करत २०९ धावा पटकावल्या. 

आश्विन (२०) हा मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. त्यानंतर भारताची तळातील फलंदाजी लगेच बाद झाली आणि भारताला ३९६ धावांवर समाधान मानावे लागले. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असतानाही भारतीय फलंदाजी मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली. 

संपूर्ण पहिल्या डावात फक्त यशस्वी जैस्वालचाच डंका वाजत होता. इंग्लंडतर्फे बशीर, अँडरसन आणि रेहान या गोलंदाजांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले तर हार्टलीने एक बळी टिपला.

The post भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर संपुष्टात appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/indias-first-innings-was-confirmed-with-396-runs/feed/ 0 6201
अयोध्येत रामलल्लाच्या आरतीच्या वेळा जाहीर – https://dailymarathinews.com/ayodhya-ram-lalla-aarti-time-announced/ https://dailymarathinews.com/ayodhya-ram-lalla-aarti-time-announced/#respond Sat, 27 Jan 2024 02:32:34 +0000 https://dailymarathinews.com/?p=6198 रामदर्शन घेण्याची वेळ आणि आरतीची वेळ याबाबत सर्वांमध्ये संभ्रम होता. परंतु त्याबाबत सर्व प्रकारचा खुलासा करण्यात आलेला आहे.

The post अयोध्येत रामलल्लाच्या आरतीच्या वेळा जाहीर – appeared first on Daily Marathi News.

]]>
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून भाविकांची तुडुंब गर्दी उसळून आली. त्यामध्ये प्रामुख्याने राम दर्शन घेण्याची वेळ आणि आरतीची वेळ याबाबत सर्वांमध्ये संभ्रम होता. परंतु त्याबाबत सर्व प्रकारचा खुलासा करण्यात आलेला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता शरद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार रामलल्लाच्या एकूण सहा आरत्या केल्या जातील. पहिली आरती पहाटे साडे चार तर शेवटची आरती रात्री दहा वाजता घेण्यात येईल. भाविकांसाठी रामलल्लाचे दर्शन सकाळी सात वाजल्यापासून उपलब्ध असेल.

सर्वात अगोदर शृंगार आरती ही पहाटे साडे चार वाजता घेण्यात येईल. त्यानंतर मंगला आरती ही सकाळी साडे सहा वाजता घेण्यात येईल. भोग आरती दुपारी बारा, संध्या आरती रात्री साडे सात, पुन्हा एकदा भोग आरती रात्री आठ, तर सर्वात शेवटी शयन आरती रात्री दहा वाजता घेण्यात येईल. 

आरती आणि दर्शन घेण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्याने सर्व भाविकांना दर्शन सहज उपलब्ध झालेले आहे. तसेच सध्या एका नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सर्व कार्यक्रम पार पडत आहेत.

The post अयोध्येत रामलल्लाच्या आरतीच्या वेळा जाहीर – appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/ayodhya-ram-lalla-aarti-time-announced/feed/ 0 6198
Ind vs Eng : भारताची सामन्यावर मजबूत पकड – दिवसाखेर १७५ धावांची… https://dailymarathinews.com/ind-vs-eng-bharatachi-samanyawar-strong-catch-diwasakher-175-runs/ https://dailymarathinews.com/ind-vs-eng-bharatachi-samanyawar-strong-catch-diwasakher-175-runs/#respond Fri, 26 Jan 2024 14:26:49 +0000 https://dailymarathinews.com/?p=6195 के.एल. राहुल आणि रवींद्र जडेजाने अर्धशतकं ठोकून भारताला पहिल्या डावात १७५ धावांची आघाडी मिळवून दिली.

The post Ind vs Eng : भारताची सामन्यावर मजबूत पकड – दिवसाखेर १७५ धावांची… appeared first on Daily Marathi News.

]]>
के.एल. राहुल आणि रवींद्र जडेजाने अर्धशतकं ठोकून भारताला पहिल्या डावात १७५ धावांची आघाडी मिळवून दिली. पहिल्या डावाचा दुसरा दिवस ११० षटकांत ४२१/७ असा संपला. पहिल्या दिवशी ११९/१ अशी धावसंख्या उभारली होती आणि भारत हा इंग्लंड पेक्षा १२७ धावांनी पिछाडीवर होता. २४६ धावा इंग्लंडने पहिल्या डावात बनवल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी पहिल्याच ओव्हरमध्ये यशस्वी जैस्वालला ८० धावांवर गमावले. त्यानंतर सुरुवात मिळूनही श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल मोठी खेळी साकारण्यात अयशस्वी ठरले. त्यानंतर राहुल आणि जडेजाने भारताचा डाव सावरला. राहुलने 123 चेंडूत 86 धावा करत आपले 14 वे कसोटी अर्धशतक झळकावले.

त्यानंतर जडेजाने आपले 20 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. त्याने नाबाद राहत 155 चेंडूत 81 धावा केल्या. त्याने अक्षर पटेल (62 चेंडूत नाबाद 35) याच्यासोबत आठव्या विकेटसाठी 117 चेंडूत 63 धावांची अखंड भागीदारी केली. या डावात आश्विन दुर्दैवीरित्या धावचीत झाला.

इंग्लंडचे फिरकी गोलंदाज म्हणावे तेवढे प्रभाव टाकू शकले नाहीत. हार्टली आणि रूट यांनी प्रत्येकी दोन बळी तर अहमद आणि लिच यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. उद्याच्या दिवशी भारताचा मोठी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न असेल.

संक्षिप्त धावफलक –

इंग्लंड २४६/१०

भारत ४२१/७ (१७५ धावांची आघाडी)

The post Ind vs Eng : भारताची सामन्यावर मजबूत पकड – दिवसाखेर १७५ धावांची… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/ind-vs-eng-bharatachi-samanyawar-strong-catch-diwasakher-175-runs/feed/ 0 6195
फक्त संक्रांतीलाच गोड बोलावं का? https://dailymarathinews.com/just-sankranti-laach-god-bolavam-ka/ https://dailymarathinews.com/just-sankranti-laach-god-bolavam-ka/#respond Wed, 10 Jan 2024 04:18:48 +0000 https://dailymarathinews.com/?p=6192 या मकर संक्रांतीला सर्वांना वास्तविक आनंदाची दिशा सापडावी. स्वकर्माने जीवनात समाधान निर्माण व्हावे.

The post फक्त संक्रांतीलाच गोड बोलावं का? appeared first on Daily Marathi News.

]]>
‘तिळगुळ घ्या गोड बोला’ हे वाक्य सर्वजण पाठ करून आहेत. मकर संक्रांतीला तिळगुळ वाटताना बोलले जाणारे हे वाक्य फक्त त्या दिवशीच सार्थकता निर्माण करते का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून केला जाणार आहे.

माणूस हा आपल्या स्वभावाप्रमाणे जगत असतो. परंतु बाहेरील परिस्थितीत त्याचे वागणे बदलत असते. प्रत्येक वेळी एकाच प्रकारची वागणूक राखणे शक्य होत नसते. आपण इतरही लोकांच्या संपर्कात येत असल्याने आपली वागणूक बदलत असते.

आपला स्वभाव मात्र निश्चित राहत असतो. आपण आतून कसे आहोत हे त्यामार्फत कळत असते. आपण आनंदी राहावे असे प्रत्येकाला वाटते परंतु आनंदाच्या संकल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असल्याने आनंद मिळेलच याची मात्र निश्चित ग्वाही देता येत नाही.

खऱ्या आनंदाचे आणि उत्साहाचे मानकरी व्यक्ती नेहमीच गोड भासतात. तर आनंदाच्या खोट्या संकल्पना मनात ठेऊन आणि अहंकाराला दुजोरा देणाऱ्या व्यक्ती या आपल्याला कटू स्वभावाच्या भासत राहतात.

मनात प्रेम आणि आनंद असेल तर गोडवा जाणवतोच. याउलट मनात घृणा, ईर्ष्या असेल तर मात्र स्वभावात कटुता जाणवते शिवाय अशा व्यक्तींचा गोडवा हा फक्त अभिनय मात्र असतो. अशा खोट्या जगण्याचा त्रास हा त्यांचा त्यांनाच होत असतो.

सुख, समाधान, आनंद अशा गोष्टी बाहेरील जगात न शोधता अंतरंगात शोधाव्या लागतात. त्या एकदा सापडल्या की आपण खऱ्या अर्थाने गोड स्वरुपात व्यक्त होत असतो. त्यामध्ये अभिनय नसतो. आतून कटुता आणि बाहेरून गोडवा अशा वागणुकीने आपण जीवन चालवत नसतो.

या संक्रांतीला किंवा प्रत्येक सणाला, एवढेच नाही तर प्रत्येक दिवशी आपण दुहेरी भूमिकेतून सामोरे न जाता एका समग्रतेने, उत्साहाने सहभागी होणे गरजेचे आहे. तरच आपण दररोज स्वभावात गोडवा निर्माण करून आपले जीवन आनंदी बनवू शकू.

या मकर संक्रांतीला सर्वांना वास्तविक आनंदाची दिशा सापडावी. स्वकर्माने जीवनात समाधान निर्माण व्हावे. परिणाम स्वरूप म्हणून नेहमीच गोडवा निर्मित व्हावा. तो आतून बाहेरून अभिव्यक्त व्हावा. फक्त संक्रांतीलाच नाही तर वर्षातील प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी तो झळकावा.

The post फक्त संक्रांतीलाच गोड बोलावं का? appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/just-sankranti-laach-god-bolavam-ka/feed/ 0 6192
आयपीएल २०२४ लिलाव _ सर्व आयपीएल संघांच्या खेळाडूंची यादी https://dailymarathinews.com/ipl-2024-lilaav-_-all-ipl-league-players-list/ https://dailymarathinews.com/ipl-2024-lilaav-_-all-ipl-league-players-list/#respond Wed, 20 Dec 2023 03:10:49 +0000 https://dailymarathinews.com/?p=6188 आयपीएल लिलाव दिनांक १९ डिसेंबर २०२३ या दिवशी दुबई येथे पार पडला. हा लिलाव इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या सीझनसाठी झालेला आहे. पहिल्यांदाच हा लिलाव भारताबाहेर झाला.

The post आयपीएल २०२४ लिलाव _ सर्व आयपीएल संघांच्या खेळाडूंची यादी appeared first on Daily Marathi News.

]]>
आयपीएल लिलाव दिनांक १९ डिसेंबर २०२३ या दिवशी दुबई येथे पार पडला. हा लिलाव इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या सीझनसाठी झालेला आहे. पहिल्यांदाच हा लिलाव भारताबाहेर झाला.

एकूण ३३३ खेळाडू या लिलावात सामील होते. त्यापैकी मिचेल स्टार्क, ट्राविस हेड, कमिन्स, रचिन रविंद्र, गेराल्ड कोत्झे, मधूशंका या प्रमुख खेळाडूंवर सर्वांची नजर होती. लिलावात सर्वाधिक बोली मिचेल स्टार्कवर (२४.७५ कोटी) लागली. दुसऱ्या नंबरची बोली ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिंससाठी (२०.५० कोटी) लागली.

एका सीझनसाठी आतापर्यंत सर्वाधिक आयपीएल लिलावाची बोली या दोन खेळाडूंवर लागली आहे. या लेखात संपूर्ण संघांच्या खेळाडूंची यादी देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये कायम ठेवलेले खेळाडू आणि बोली लावून विकत घेतलेल्या खेळाडूंची लिस्ट आहे.

आयपीएल २०२४ – संघनिहाय विकत व कायम खेळाडूंची यादी (IPL 2024 Auction Players’ List)

१. चेन्नई सुपर किंग्ज

कायम खेळाडू – एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, राजनाथ पाटील, राजनाथ पाटील. शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश तिक्षना.

विकत घेतलेले खेळाडू – रचिन रवींद्र (१.८० कोटी), शार्दुल ठाकूर (४ कोटी), डॅरिल मिशेल (१४ कोटी)

२. मुंबई इंडियन्स

कायम खेळाडू – हार्दिक पांड्या (कर्णधार/ट्रेड), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमॅरियो शेफर्ड.

विकत घेतलेले खेळाडू – जेराल्ड कोएत्झी (५ कोटी), दिलशान मदुशंका (४.६ कोटी)

३. कोलकाता नाईट रायडर्स

कायम खेळाडू – नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर, जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

विकत घेतलेले खेळाडू – केएस भरत (५० लाख), चेतन साकारिया (५० लाख), मिचेल स्टार्क (२४.७५ कोटी)

४. गुजरात टायटन्स

कायम खेळाडू – शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, आर. साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा.

विकत घेतलेले खेळाडू – अजमतुल्ला उमरझाई (५० लाख), उमेश यादव (५.८० कोटी)

५. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

कायम खेळाडू – फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर (ट्रेड), विशख विजय कुमार, आकाशदीप, विजय कुमार. मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन (ट्रेड).

विकत घेतलेले खेळाडू – अल्झारी जोसेफ (११.५० कोटी)

६. दिल्ली कॅपिटल्स

कायम खेळाडू – ऋषभ पंत, प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नोर्टजे, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, ईशांत शर्मा, यश धुल, मुकेश कुमार.

विकत घेतलेले खेळाडू – हॅरी ब्रूक (४ कोटी रुपये), ट्रिस्टन स्टब्स (५० लाख)

७. राजस्थान रॉयल्स

कायम खेळाडू – संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, क्रुणाल राठौर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, अॅडम झाम्पा, आवेश खान (व्यापार).

विकत घेतलेले खेळाडू – रोव्हमन पॉवेल (७.४ कोटी)

८. लखनौ सुपर जायंट्स

कायम खेळाडू – केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेराक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, मार्कस वुड., मयंक यादव, मोहसीन खान, देवदत्त पडिक्कल (व्यापार).

विकत घेतलेले खेळाडू – शिवम मावी (६.४० कोटी)

९. सनरायझर्स हैदराबाद

कायम खेळाडू – अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम (कर्णधार), मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्र सिंह यादव, उमेद सिंह यादव. मलिक, नितीशकुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद (व्यापार).

विकत घेतलेले खेळाडू – ट्रॅव्हिस हेड (६.८ कोटी), वानिंदू हसरंगा (१.५ कोटी), पॅट कमिन्स (२०.५ कोटी), जयदेव उनाडकट (५० लाख)

१०. पंजाब किंग्ज –

कायम खेळाडू – शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम कुरान, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर. , हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग.

विकत घेतलेले खेळाडू – हर्षल पटेल (११.७५ कोटी), ख्रिस वोक्स (४.२० कोटी)

The post आयपीएल २०२४ लिलाव _ सर्व आयपीएल संघांच्या खेळाडूंची यादी appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/ipl-2024-lilaav-_-all-ipl-league-players-list/feed/ 0 6188
हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक – https://dailymarathinews.com/hardik-pandya-comeback-in-mumbai-indians/ https://dailymarathinews.com/hardik-pandya-comeback-in-mumbai-indians/#respond Mon, 27 Nov 2023 08:59:26 +0000 https://dailymarathinews.com/?p=6185 आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने मोठा सट्टा खेळला असून गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याला आपल्या संघात समाविष्ट केले आहे.

The post हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक – appeared first on Daily Marathi News.

]]>
इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. तर २६ नोव्हेंबर रोजी आयपीएल लिलावापूर्वी सर्व १० संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने मोठा सट्टा खेळला असून गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याला आपल्या संघात समाविष्ट केले आहे.

आता IPL २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ आणखी मजबूत दिसत आहे. मुंबईला मागच्या दोन वर्षांत एका भारतीय फास्टर ऑल राऊंडरची कमतरता जाणवत होती पण आता त्यांनी ती कमतरता भरून काढलेली आहे.

बुम्राह आणि हार्दिक पांड्या दाखवतील का यशाची वाट?

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आयपीएल २०१५ मध्ये पदार्पण केले. हार्दिक पांड्या २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळला. मात्र यानंतर हार्दिक पांड्याला मुंबईने सोडले. त्यानंतर गुजरात टायटन्स संघाने हार्दिक पांड्याला आपल्या संघात समाविष्ट केले. पण आता हार्दिक पांड्या आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा संघ आणखी मजबूत दिसत आहे.

यावेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स संघात खेळताना दिसणार आहे. आयपीएल २०२३ मध्ये जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर होता. मात्र जसप्रीत बुमराह या आयपीएलच्या पुढील सत्रात खेळताना दिसणार आहे. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी आणखी मजबूत होईल.

मुंबई इंडियन्स संघ २०२० मध्ये शेवटच्या वेळी चॅम्पियन बनला होता. मात्र मुंबई संघाची कामगिरी गेल्या ३ वर्षात काही विशेष झाली नाही. पण आता हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनानंतर मुंबई इंडियन्स संघातील प्लेइंग ११ खूप मजबूत दिसत आहे. त्याचा फायदा यावर्षी होतोय का ते पाहावे लागेल.

चेन्नई, आरसीबी, राजस्थान, गुजरात अशा मातब्बर संघांना मात देण्यात मुंबई यावर्षी यशस्वी ठरते का ते देखील पाहावे लागेल…

The post हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक – appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/hardik-pandya-comeback-in-mumbai-indians/feed/ 0 6185
आयपीएल २०२४ – सर्व संघांची कायम आणि सोडलेल्या खेळाडूंची लिस्ट – https://dailymarathinews.com/ipl-2024-all-sanganchi-kayam-and-sodelya-players-list/ https://dailymarathinews.com/ipl-2024-all-sanganchi-kayam-and-sodelya-players-list/#respond Mon, 27 Nov 2023 07:43:33 +0000 https://dailymarathinews.com/?p=6181 पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा लिलाव १९ डिसेंबरला होणार आहे. त्याअगोदर सर्व संघांनी आपली कायम खेळाडू आणि सोडलेले खेळाडू अशी यादी जाहीर केलेली आहे.

The post आयपीएल २०२४ – सर्व संघांची कायम आणि सोडलेल्या खेळाडूंची लिस्ट – appeared first on Daily Marathi News.

]]>
पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा लिलाव १९ डिसेंबरला होणार आहे. त्याअगोदर सर्व संघांनी आपली कायम खेळाडू आणि सोडलेले खेळाडू अशी यादी जाहीर केलेली आहे.

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या यावेळी चर्चेत होता. सर्वत्र अशी चर्चा चालू होती की हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा येणार आहे. परंतु तसे काही झाले नाही. गुजरातने आपल्या कर्णधाराला आपल्याकडेच ठेवलेलं आहे.

कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी –

१. मुंबई इंडियन्स –

कायम : रोहित शर्मा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, कॅमेरॉन ग्रीन, शम्स मुल्लानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड (ट्रेडिंग).

रिलीज (सोडलेले): अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॅन्सन, जे रिचर्डसन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन, संदीप वॉरियर.

२. चेन्नई सुपर किंग्ज :

कायम: महेंद्रसिंग धोनी, मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे (डब्ल्यूके), तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथिशा पाथिराना, अजिंक्य रहाणे, शेख सनेर , सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश तिक्षणा.

रिलीज: बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, अंबाती रायुडू, सिसांडा मगाला, काइल जेमिसन, भगत वर्मा, सेनापती आणि आकाश सिंग.

३. गुजरात टायटन्स :

कायम : हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, आर साई किशोर, राशिद खान, जोश लिटल, मोहित शर्मा.

रिलीज (सोडलेले): यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दासून शनाका.

४. सनरायझर्स हैदराबाद :

कायम: अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद (RCB कडून ट्रेड केलेले), अभिषेक शर्मा, मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, सनवीर सिंग. , भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन, फजाहक फारुकी.

रिलीज: हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विवरांत शर्मा, अकेल होसेन, आदिल रशीद.

५. लखनौ सुपरजायंट्स:

कायम: केएल राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, दीपक हुडा, के गौतम, क्रुणाल पंड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, प्रेरक मंकड, युधवीर सिंग, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवी बिश्नोई, यशक , अमित मिश्रा, नवीन-उल-हक.

रिलीज: डॅनियल सॅम्स, करुण नायर, जयदेव उनाडकट, मनन वोहरा, करण शर्मा, सूर्यांश शेडगे, स्वप्नील सिंग, अर्पित गुलेरिया.

व्यापार (ट्रेडिंग) : रोमारियो शेफर्ड, आवेश खान.

व्यापारातून घेतले – देवदत्त पडिक्कल.

६. कोलकाता नाइट रायडर्स:

कायम: नितीश राणा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, रहमानउल्ला गुरबाज, सुनील नरेन, जेसन रॉय, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

रिलीज: शाकिब अल हसन, लिटन दास, डेव्हिड विसे, आर्य देसाई, एन जगदीसन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टिम साऊदी, जॉन्सन चार्ल्स.

७. राजस्थान रॉयल्स:

कायम: संजू सॅमसन, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, आवेश खान (लखनौ संघातून ट्रेड केलेले), यशस्वी जैस्वाल, कुलदीप सेन, संदीप शर्मा, रायन पराग, ध्रुव जुरेल, कुणाल सिंग राठौर, जोस बटलर. , ट्रेंट बोल्ट, अॅडम झाम्पा, शिमरॉन हेटमायर, डोनोव्हन फरेरा.

रिलीज: देवदत्त पडिक्कल (लखनौ संघात ट्रेड केलेले), मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा, केएम आसिफ, आकाश वशिष्ठ, अब्दुल बाजिथ, कुलदीप यादव, जो रूट, जेसन होल्डर, ओबेद मॅककॉय.

८. दिल्ली कॅपिटल्स:

कायम: ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, मिचेल मार्श, एनरिक नॉर्सिया, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी, अभिषेक पोरेल, ललित यादव, यश धुल, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, खलील अहमद.

रिलीज: मनीष पांडे, सरफराज खान, रिली रोसौ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, अमन खान, प्रियम गर्ग, चेतन साकारिया, मुस्तफिजुर रहमान, फिल सॉल्ट, कमलेश नागरकोटी.

९. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर :

कायम: फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर (ट्रेड), विशाक विजयकुमार, दीप सिराज, आकाश , रीस टोपले , हिमांशू शर्मा , राजन कुमार.

रिलीज: वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव.

१०. पंजाब किंग्ज :

कायम: शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, सिकंदर रझा, मॅथ्यू शॉर्ट, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे, ऋषी धवन, शिवम सिंग, हरप्रीत सिंग, हरप्रीत सिंग. राहुल चहर, गुरनूर ब्रार, विद्वथ कवेरप्पा.

रिलीज : भानुका राजपक्षे, मोहित राठी, बलतेज ढांडा, राज अंगद बावा, शाहरुख खान

The post आयपीएल २०२४ – सर्व संघांची कायम आणि सोडलेल्या खेळाडूंची लिस्ट – appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/ipl-2024-all-sanganchi-kayam-and-sodelya-players-list/feed/ 0 6181
भारत विश्र्वचषक स्पर्धेत पराभूत होण्याची प्रमुख कारणे – https://dailymarathinews.com/main-reasons-for-indias-defeat-in-the-world-cup/ https://dailymarathinews.com/main-reasons-for-indias-defeat-in-the-world-cup/#respond Wed, 22 Nov 2023 10:10:30 +0000 https://dailymarathinews.com/?p=6178 2023 विश्वचषकात सर्व परिस्थिती भारताच्या बाजूने असतानाही भारत विश्वचषक जिंकू शकला नाही याचे दुःख सर्व भारतीयांना आहेच. परंतु

The post भारत विश्र्वचषक स्पर्धेत पराभूत होण्याची प्रमुख कारणे – appeared first on Daily Marathi News.

]]>
2023 विश्वचषकात सर्व परिस्थिती भारताच्या बाजूने असतानाही भारत विश्वचषक जिंकू शकला नाही याचे दुःख सर्व भारतीयांना आहेच. परंतु सामना ज्या अर्थी एकतर्फी झाला त्यामुळे अनेक कारणे समोर येतायेत ज्यांमुळे भारत हरला असावा असे तर्कवितर्क लावले जात आहेत.

अशा सर्व कारणांची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. एक सखोल चर्चा आणि रोहित शर्माच्या टीमने घेतलेले निर्णय आणि खेळाडूंची सामन्यातील मनःस्थिती याबद्दल सर्व बाबींची चर्चा आपण करणार आहोत.

भारत पराभूत होण्यामागची प्रमुख कारणे –

नाणेफेक –

नाणेफेक होताच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक ऑस्ट्रेलियन टिमच्या बाजूने आल्याने त्याचा पुरेपूर फायदा गोलंदाजांनी उठवला. खेळपट्टी संथ असल्याने भारतीय फलंदाज पॉवरप्लेनंतर धावगती वाढवू शकले नाहीत.

कोहलीच्या विकेटनंतर भारताची संथ फलंदाजी –

रोहितने नेहमीप्रमाणे धाकड फलंदाजी (47 धावा) करत आपली उपस्थिती जाणवून दिली. परंतु थोड्या अंतराने लगेच रोहित आणि श्रेयसची विकेट गमावल्याने धावगतीला लगाम लागला. त्यानंतर कोहली व राहुल यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला.

कोहलीची (54 धावा) विकेट गेल्यानंतर मात्र धावगती खूपच संथ झाली आणि भारत सर्वबाद 240 धावाच बनवू शकला. फलंदाजी करताना भारतीय फलंदाज अतिशय बचावात्मक पवित्र्याने खेळल्याने मोठी धावसंख्या उभारणे अशक्य झाले.

• गोलंदाजी क्रम आणि दवबिंदू –

भारताने संपूर्ण विश्वचषकात बुमराह व सिराज या गोलंदाजांनी सुरुवातीचा मारा केला होता. परंतु या सामन्यात बुमराहसोबत शामी गोलंदाजीला आला. पहिल्या पॉवरप्लेमध्ये 3 बळी टिपण्यात यशस्वी ठरलेली गोलंदाजी सामन्याच्या अखेरीस चौथा बळी घेऊ शकली.

सुरुवातीच्या स्पेलनंतर दव पडल्याने सिराज स्विंग गोलंदाजीने प्रभावी ठरला नाही. जडेजा व कुलदीप देखील स्पिन गोलंदाजीने फलंदाजांना बाद करण्यात अयशस्वी ठरले. तसेच बुमराह व शामी हे देखील दुसऱ्या – तिसऱ्या स्पेलमध्ये यशस्वी ठरले नाहीत.

The post भारत विश्र्वचषक स्पर्धेत पराभूत होण्याची प्रमुख कारणे – appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/main-reasons-for-indias-defeat-in-the-world-cup/feed/ 0 6178