मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 19 Oct 2023 05:42:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 गुलाबाची आत्मकथा निबंध • Gulabachi Atmkatha Nibandh • https://dailymarathinews.com/gulabachi-autobiography-essay-in-marathi-gulabachi-atmakatha-nibandh/ https://dailymarathinews.com/gulabachi-autobiography-essay-in-marathi-gulabachi-atmakatha-nibandh/#respond Thu, 19 Oct 2023 04:43:42 +0000 https://dailymarathinews.com/?p=6043 आपल्या सर्वांना गुलाबाचे फूल परिचित आहेच. गुलाबाच्या फुलाची सुंदरता आणि महत्त्व ओळखूनच मानवाने त्याला फुलांच्या राजाची उपमा दिलेली आहे.

The post गुलाबाची आत्मकथा निबंध • Gulabachi Atmkatha Nibandh • appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तावना –

आपल्या सर्वांना गुलाबाचे फूल परिचित आहेच. गुलाबाच्या फुलाची सुंदरता आणि महत्त्व ओळखूनच मानवाने त्याला फुलांच्या राजाची उपमा दिलेली आहे. प्रस्तुत लेख हा गुलाबाची आत्मकथा या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे.

गुलाबाचे अस्तित्व हे अत्यंत कमी कालावधीसाठी असले तरी ते अत्यंत जिवंत व समग्र असे भासत असते, अशा आशयाचा हा निबंध आपल्यातील संवेदना जागृत करणारा आहे.

गुलाबाच्या फुलाची आत्मकथा मराठी निबंध | Gulabachya Fulachi Atmkatha Nibandh Marathi |

सभोवताली घडलेल्या घटनांचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. अशा घटनांतून आपल्याला जे अनुभव मिळतात तेच आपले जीवन घडवत असतात. अशाच घटनांचा समावेश आणि माझी असलेली समज या आत्मकथेत मी सांगणार आहे. मी कोण? अहो मी फुलांचा राजा गुलाब!

जुन्या गुलाबांनी मला सांगितले त्याप्रमाणे श्री. अभ्यंकर यांनी गुलाबाचे झाड कुंडीत लावले आणि काही दिवसांनी त्याला बागेत जागा मिळाली. बागेत लावल्यानंतर गुलाबाला खरेखुरे जीवन लाभले असे म्हणावे लागेल. लागवडीनंतर माझा जन्म हा एक वर्षानंतर झाला.

मी सर्वप्रथम कळी म्हणून अस्तित्वात आलो तेव्हा माझे डोळे मिटलेले होते. परंतु अत्यंत आल्हाददायक असे स्वतःचेच बंद असलेले अस्तित्व मला जाणवत होते. हवेच्या माऱ्याने मी फक्त इकडेतिकडे डोलत होतो. कळी कधी खुलते फक्त याचीच वाट मी पाहत होतो.

पहाटे – पहाटे कळी खुलली अन् मी फूल म्हणून अस्तित्वात आलो. अगदी कोवळे असे फूल जसे छोटेसे मूल! सूर्याच्या किरणांचा स्पर्श होताच मी उबदार झालो आणि जीवनाची सुरुवात झाली असे वाटू लागले. मी सर्वत्र कुतूहल दृष्टीने पाहू लागलो.

माझ्या शेजारी माझे अनेक बंधू देखील उमललेले मला दिसले. त्यांना पाहून अत्यानंद झाला. माझ्या झाडाशेजारी मोगरा आणि जास्वंद देखील अगदी दिमाखात उमललेले मला दिसत होते. तेव्हा एक माळी आला आणि आम्हाला जल प्रदान केले. तो माळी मला छान मनुष्य वाटला.

सकाळ निघून गेल्यानंतर बागेतील श्री गणेशाच्या मंदिरात लोक दर्शनासाठी येऊ लागले. सोबतच लहान मुली देखील येत होत्या. मुली फुलांशेजारी येऊन फुले तोडण्याचा प्रयत्न करत होत्या. मी उंचीवर असल्याने त्यांच्या हाताला लागत नव्हतो. जी फुले थोड्या कमी उंचीवर होती त्यांना त्या मुलींनी तोडलेच!

मुली निघून जाताच मला शांत – शांत वाटू लागले. काही वेळाने मंदिरातील पुजारी येऊन बागेतील अनेक फुलांना तोडून घेऊन गेला. मी थोडा लहान असल्याने त्याने मला तोडले नाही. परंतु काल जन्मलेल्या फुलांना त्याने अगदी निर्दयीपणे तोडून नेले. मला आणि बागेतील इतर फुलांना असह्य अशा वेदना जाणवल्या.

आपल्यासोबत देखील उद्या असेच होणार आहे याची जाणीव मनात खोलवर रुतली. तरीही मी सौंदर्याने भारलेल्या अशा बागेत जिवंत आहे ही भावना खूपच छान होती. दुपारचे ऊन झेलत आणि बागेतील मोठ्या झाडांना न्याहाळत असताना मला सर्व प्रकृती मंगल भासू लागली.

प्राकृतिक औदार्य आणि मनुष्याची हिंसा या दोन्ही भावना खूपच विपरीत अशा जाणवल्या. जीवनाचा अधिकार निसर्गाने बहाल केलेला असताना मनुष्य अगदीच संवेदनहीन होऊन कशी काय अशी हिंसा करू शकतो, या प्रश्नाने देखील माझे मन दुखावले.

सायंकाळ होताच अगदी रम्य असा अनुभव आला. सकाळी उडून गेलेले पक्षी निवाऱ्यासाठी आपापल्या घरट्यात परतत होते. त्यांचे बोल मनाला खूप प्रसन्न करत होते. मावळत्या दिनकराला पाहताना आपलेही जीवन असेच समाप्त होईल यावी जाणीव तीव्र झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी बागेतील प्रवेश बंद होता. बागेतील रस्त्याचे काम होणार असल्याने इतर लोकांना प्रवेश नव्हता. हे समजताच मी अगदी आनंदाने हेलकावे घेऊ लागलो. माझा गुलाबी रंग हा अजूनच खुलला आहे असे शेजारील फुलेच बोलू लागली. मी त्या दिवशी स्वच्छंदपणे जगलो, डोललो आणि अगदी कोमेजलो देखील!

माझे शारिरीक अस्तित्व हे कितीही सुंदर असले तरी ते मला कधीकधी पूर्णतः जगता येत नाही. जर मी पूर्ण जगलोच तरी माझा जिवंतपणा हा अत्यल्प असतो. असे असले तरी पूर्ण समग्रतेने जगण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी अस्तित्वाचा ऋणी राहीन.


तुम्हाला गुलाबाची आत्मकथा हा मराठी निबंध (Gulabachi Atmkatha Nibandh Marathi) आवडला अशी आशा…संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल खूप – खूप धन्यवाद!

The post गुलाबाची आत्मकथा निबंध • Gulabachi Atmkatha Nibandh • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/gulabachi-autobiography-essay-in-marathi-gulabachi-atmakatha-nibandh/feed/ 0 6043
मी खेळलेली रंगपंचमी – मराठी निबंध • Mi Khelaleli RangPanchami https://dailymarathinews.com/mi-khelaleli-rangpanchami-marathi-essay-mi-khelaleli-rangpanchami/ https://dailymarathinews.com/mi-khelaleli-rangpanchami-marathi-essay-mi-khelaleli-rangpanchami/#respond Thu, 16 Mar 2023 07:48:56 +0000 https://dailymarathinews.com/?p=5641 रंगपंचमी हा रंगांचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. यावर्षी देखील आम्ही रंगपंचमी अगदी मनमुराद खेळलो.

The post मी खेळलेली रंगपंचमी – मराठी निबंध • Mi Khelaleli RangPanchami appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा मी खेळलेली रंगपंचमी (Mi Khelaleli RangPanchami Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. रंगपंचमी खेळताना येणारी मज्जा व घडलेले वास्तविक प्रसंग या निबंधात लिहणे अपेक्षित आहे.

मी खेळलेली रंगपंचमी – मराठी निबंध • Mi Khelaleli RangPanchami Nibandh Marathi •

रंगपंचमी हा रंगांचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. यावर्षी देखील आम्ही रंगपंचमी अगदी मनमुराद खेळलो. रंगपंचमी यायच्या अगोदर आठवडाभर तरी माझ्या मनात रंगपंचमीच्या प्रंसगांचे चित्र रेंगाळत होते.

यावर्षी रंगपंचमी रविवारी असल्याने शाळेला साहजिकच सुट्टी होती. दिवस सुरू होताच माझ्या भावाने मला नकळत अंथरुणातच रंग लावायला सुरुवात केली. मी खाडकन जागा झालो आणि पळतच बाहेर गेलो. मी ही त्याला कसा रंग लावायचा हा विचार करू लागलो.

काही वेळाने अंघोळ करून झाल्यावर मी जुनी कपडे परिधान केली. आज फक्त रंगच रंग, या कल्पनेने मी नुसता भारावून गेलो होतो. दुकानात पळतच जाऊन मी सर्व प्रकारचे रंग विकत घेऊन आलो आणि सर्वप्रथम मी माझ्या भावाला रंगवले.

आमच्या शेजारील गल्लीत मुले गाणी वाजवून आणि पाणी उडवून रंगपंचमी खेळत होते. मी आणि माझे मित्र त्यामध्ये सामील होऊन उड्या मारतच रंगपंचमी खेळलो. तेथे खेळताना नाच, पडापडी, धक्काबुक्की अशी सर्व प्रकारची मस्ती आम्ही केली.

मी दुपारी घरी जेवायला आलो आणि त्यानंतर माझी झोपच लागली. झोपून उठलो आणि बघतो तर काय, घड्याळात चार वाजले होते. आता ऊन जास्त नसल्याने मला रंग खेळण्यासाठी पुन्हा एकदा परवानगी मिळणारच होती.

मी आता आमच्या वर्गातील मुलांच्या घरी जाऊन त्यांना रंग लावण्याचे ठरवले. मी सर्वांना नकळत रंग लावण्यात यशस्वी ठरलो देखील, पण त्यांना रंग लावून झाल्यावर मला लवकर निसटता आले नाही आणि मी सापडलो. मला केतनने पकडले आणि सर्वांनी मिळून जवळजवळ मला रंग चारलाच!

माघारी आल्यावर मला घरी खूप बोल खावा लागला. पहिल्या अंघोळीत माझा रंग तर निघालाच नाही शिवाय दुसऱ्या दिवशी अंघोळ करून देखील माझा चेहरा हा रंगीबेरंगीच दिसत होता. यावर्षीची रंगपंचमी ही माझ्या चांगलीच लक्षात राहण्यासारखी होती.

रंगपंचमी खेळताना मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन हे कधीच होऊ शकत नाही. आपला स्व बाजूला ठेऊन आपण एकमेकांच्या रंगांत रंगून जात असतो. आपण इतरांना रंग लावतोच पण आपल्यालाही कोणीतरी रंग लावावा असे मनोमन वाटत असते. अशा एक अनेक कारणांनी रंगपंचमी मला खूप आवडते.

तुम्हाला मी खेळलेली रंगपंचमी हा मराठी निबंध (Mi Khelaleli RangPanchami Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post मी खेळलेली रंगपंचमी – मराठी निबंध • Mi Khelaleli RangPanchami appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/mi-khelaleli-rangpanchami-marathi-essay-mi-khelaleli-rangpanchami/feed/ 0 5641
शिक्षणातील बदलता दृष्कोन – मराठी निबंध https://dailymarathinews.com/changing-outlook-on-education-marathi-essay/ https://dailymarathinews.com/changing-outlook-on-education-marathi-essay/#respond Sun, 19 Feb 2023 04:00:18 +0000 https://dailymarathinews.com/?p=5577 आधुनिक युगात होत चाललेले बदल हे शिक्षण क्षेत्रावर प्रभाव टाकत आहेत. त्यामधील समस्या व उपाय काय असू शकतील याची चर्चा शिक्षणातील बदलता दृष्टिकोन या निबंधात केलेली आहे.

The post शिक्षणातील बदलता दृष्कोन – मराठी निबंध appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा शिक्षणातील बदलता दृष्टिकोन (Shikshanatil Badalta Drushtikon Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे.

आधुनिक युगात होत चाललेले बदल हे शिक्षण क्षेत्रावर प्रभाव टाकत आहेत. त्यामधील समस्या व उपाय काय असू शकतील याची चर्चा शिक्षणातील बदलता दृष्टिकोन या निबंधात केलेली आहे.

शिक्षणातील बदलता दृष्टिकोन निबंध मराठी | Shikshanatil Badalta Drushtikon Nibandh Marathi |

सध्या विद्यार्थी व तंत्रज्ञान यांची चांगलीच मैत्री झाल्याने विद्यार्थी हे शैक्षणिक बदल इच्छित आहेत. शिक्षण माणसाला घडवते हे अगदी सत्य असले तरी जबरदस्ती शिक्षणाचा आटापिटा होतोय याची जाणीव विद्यार्थ्यांना होऊ लागलेली आहे. म्हणजेच शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे आपण सध्या जीवनात जी प्रगती अनुभवत आहोत तिला आधार बनवूनच यापुढील कारकीर्द घडवली जाऊ शकते असा विश्वास शालेय मुलांना देखील वाटतो आहे. त्यामुळे अत्यंत प्रभावी असलेले पुस्तकी शिक्षण हे देखील विद्यार्थ्यांना नकोसे वाटते आहे.

विद्यार्थी आता मोबाईल, संगणक आणि इतर तांत्रिक उपकरणे वापरू लागल्याने दैनंदिन जीवनात सक्षमपणे व्यवहार आणि इतर उपयोगी कामे करू शकत आहेत. पुस्तकी गुणवत्ता व त्याचे कागदी प्रमाणपत्र हे कितपत योग्यपणे विद्यार्थ्यांची हुशारी ठरवू शकेल याबद्दलची जागरुकता निर्माण होऊ लागली आहे.

भविष्याची वाटचाल ओळखून जर शिक्षणाचा पाया कल्पकरित्या निर्मिला गेला तर शिक्षण हे सर्वांनाच प्रिय वाटू शकेल. तंत्रज्ञान विकसित झाल्याने त्याचा वापर आता शैक्षणिक उपक्रमांत होऊ शकतो व ते विद्यार्थ्यांना कितीतरी रंजक वाटू शकेल.

शारिरीक, मानसिक व बौद्धिक क्षमता यांचा विकास करणे हे देखील आवश्यक असल्याने तंत्रज्ञानाचा फक्त प्रभावी वापर करणे गरजेचे ठरेल. असा वापर केल्याने शिक्षण हे अति सोयीस्कर होईल आणि शिक्षणाचा उद्देश्यही पूर्ण होऊ शकेल.

विद्यार्थ्यांचे मन हे अपरिपक्व असल्याने ते लगेच भरकटू शकते. त्यामुळे त्यांना स्वभावाच्या विपरीत सवयी लागण्याच्या दाट शक्यता आहेत. तसे होऊ नये यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहण्याची दृष्टी त्यांच्यात निर्माण व्हायला हवी. तशा उद्देश्याने शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध असायला हवी.

शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण घटक ठरतील. शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रयत्न व सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो. तेव्हाच विद्यार्थी शिक्षणात रस घेऊन अभ्यास, खेळ, कला अशा विविध क्षेत्रांत सहभागी होतील.

शिक्षणातील रस निघून गेल्यास विद्यार्थी हे तंत्रज्ञानाच्या जाळ्यात असे काही गुरफटत जातील की त्यातून बाहेर पडणे हे त्यांच्यासाठी अशक्यप्राय बाब असेल. त्यासाठी भविष्यातील तोटे व धोके ओळखून सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा शिक्षणाप्रती असलेला दृष्टिकोन बदलणे आवश्यक ठरेल.

तुम्हाला शिक्षणातील बदलता दृष्टिकोन (Shikshanatil Badalta Drushtikon Nibandh Marathi) हा मराठी निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post शिक्षणातील बदलता दृष्कोन – मराठी निबंध appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/changing-outlook-on-education-marathi-essay/feed/ 0 5577
निसर्ग – माझा मित्र – मराठी निबंध • Nisarga Majha Mitra Nibandh • https://dailymarathinews.com/nisarga-majha-mitra-nibandh-marathi-essay-nisarga-majha-mitra-nibandh/ https://dailymarathinews.com/nisarga-majha-mitra-nibandh-marathi-essay-nisarga-majha-mitra-nibandh/#respond Mon, 30 Jan 2023 08:29:51 +0000 https://dailymarathinews.com/?p=5459 निसर्गाचा सहवास हा एखाद्या मित्रासारखाच असतो अगदी निरपेक्ष आणि स्वच्छंदी! अशा आशयाच्या या निबंधात निसर्गाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे.

The post निसर्ग – माझा मित्र – मराठी निबंध • Nisarga Majha Mitra Nibandh • appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा निसर्ग माझा मित्र (Nisarga Majha Mitra Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. निसर्गाचा सहवास हा एखाद्या मित्रासारखाच असतो अगदी निरपेक्ष आणि स्वच्छंदी! अशा आशयाच्या या निबंधात निसर्गाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे.

निसर्ग माझा सोबती निबंध मराठी | Nisarga Majha Sobati Nibandh Marathi |

पूर्ण आठवडाभर शाळेत व्यतित केल्यानंतर सुट्टी दिवशी मला माझे बाबा बाहेर फिरायला घेऊन जातात. जवळच्या एका निसर्गरम्य ठिकाणी जाणे हे आमचे प्रत्येकवेळचे नियोजन असते. लहानपणी मला समजत नसे की आम्ही का जातोय, परंतु सध्या निसर्गाविषयीची माझी समज वाढलेली आहे.

मला निसर्ग हा माझा खरा मित्र वाटतो. जसे आपण मित्राजवळ असताना एकदम निवांत आणि मुक्त वावरतो तसेच निसर्गात गेल्यावरही आपल्याला स्वच्छंदपणे विहरता येते. निसर्गात गेल्यावर मला थोडाही त्रास आणि कसलाच तणाव जाणवत नाही.

आपल्या आसपासची झाडे, नद्या, हवा, प्राणी – पक्षी, सूर्य – चंद्र, आकाश, जमीन, जे जे काही डोळ्यांनी दिसेल तो सर्व निसर्गच आहे. आपण स्वतःदेखील निसर्गाचाच एक भाग आहोत. त्यामुळे निसर्गात गेल्यावर आपल्याला एकदम ताजेतवाने वाटते आणि निसर्ग सौंदर्य पाहून कधीकधी अचंबितही होत असतो.

निसर्गाकडून अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या प्राथमिक गरजा भागवल्या जातात. पूर्वीपासून मनुष्य प्राणी हा आपले जीवन सुंदर व सोयीस्कर बनवण्यासाठी निसर्गाचा उपयोग करत आलेला आहे. त्यामध्ये बुद्धी व कलेचा विकास तसेच राहणीमानाचा स्तर अशा बाबी आपण निसर्गाकडूनच पूर्ण करत आलेलो आहोत.

निसर्गात आपल्याला पाऊस, थंडी, ऊन इत्यादी बाबी जाणवतात ज्या पृथ्वीवरील सजिवांसाठी अत्यंत आवश्यक आहेत. तसेच हवा, पाणी, अन्न अशा बाबी देखील निसर्गात सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे निसर्गाकडून आपल्याला जे जे काही मिळते त्याबद्दल आपण त्याचे नेहमी कृतज्ञ राहायला हवे.

मानवी अहंकार व स्वार्थ यांमुळे सध्या आपण निसर्गापासून खूप दूर होत चाललेलो आहोत. निसर्गाचा सहज उपयोग हा आता राहिलेला नाहीये. अगदीच औद्योगिक व यांत्रिक प्रकारचे जगणे झाल्याने खूप साऱ्या शारिरीक व मानसिक समस्या निर्माण झालेल्या आहेत.

सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी तज्ञ नेहमी निसर्गोपचार पद्धतीचा सल्ला देतात व निसर्गमय राहणीमान स्वीकारण्याचे सुचवतात. निसर्ग आपल्याला एवढा सहाय्यभूत असल्याने निसर्गाला आपण आपल्या जीवनशैलीत समाविष्ट करायलाच हवे.

मानवी स्वार्थ साधल्याने भविष्यात देखील नुकसानच होण्याची शक्यता आहे. आपण निसर्गावर नेहमीच आक्रमण करत असतो जसे की बेसुमार वृक्षतोड करणे, नद्यांचे प्रवाह रोखणे, जमिनीत व पाण्यात रासायनिक कचरा मिसळणे. अशा कृतींमुळे निसर्ग आपल्यावर कोपत असतो.

निसर्गाला सहाय्य करून जर आपण जीवन व्यतित केले तर आपले जीवन आनंदमय होण्याची शक्यता खूप वाढते. निसर्गाला मित्र मानून जर मानवी पिढ्यांनी भविष्याची वाटचाल केली तर सध्याच्या सर्व मानवी समस्या दूर होऊन एका उज्ज्वल भविष्याचे स्वप्न सहज पूर्ण होऊ शकते.

तुम्हाला निसर्ग माझा मित्र हा मराठी निबंध (Nisarga Majha Mitra Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post निसर्ग – माझा मित्र – मराठी निबंध • Nisarga Majha Mitra Nibandh • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/nisarga-majha-mitra-nibandh-marathi-essay-nisarga-majha-mitra-nibandh/feed/ 0 5459
प्राणी संग्रहालय – मराठी निबंध • Prani Sangrahalay Nibandh • https://dailymarathinews.com/zoological-museum-marathi-essay-prani-sangrahalay-nibandh/ https://dailymarathinews.com/zoological-museum-marathi-essay-prani-sangrahalay-nibandh/#respond Sat, 28 Jan 2023 07:12:07 +0000 https://dailymarathinews.com/?p=5446 प्राणी संग्रहालय हे जवळजवळ पाच एकर क्षेत्रात पसरले होते. प्राणी संग्रहालयाला एक भव्यदिव्य असे प्रवेशद्वार होते.

The post प्राणी संग्रहालय – मराठी निबंध • Prani Sangrahalay Nibandh •<br> appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा प्राणी संग्रहालय (Prani Sangrahalay Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी, प्रसंग व विविध विभागांचे वर्णन अपेक्षित असते.

प्राणी संग्रहालयाला भेट – मराठी निबंध | Zoo Essay In Marathi |

प्रत्येक वर्षी आमच्या शाळेची सहल ही कोणत्या ना कोणत्या निसर्गरम्य किंवा ऐतिहासिक ठिकाणी जात असते. यावर्षी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून प्राणी संग्रहालयाला भेट देण्याचे ठरवले. जिल्ह्यातील “अद्भुत प्राणी संग्रहालय” हे ठिकाण निश्चित करण्यात आले.

आम्ही सर्वजण सहलीच्या दिवशी शाळेतून एकत्र निघालो. फक्त एका तासाच्या प्रवासात आम्ही प्राणी संग्रहालयात पोहचलो. प्राणी संग्रहालय हे जवळजवळ पाच एकर क्षेत्रात पसरले होते. प्राणी संग्रहालयाला एक भव्यदिव्य असे प्रवेशद्वार होते. तेथील सुरक्षा रक्षकाने सर्वांचे तिकीट तपासून आम्हाला आत सोडले.

प्राणी संग्रहालयात प्रवेश करताच आम्ही धावतच सुटलो. निसर्गरम्य दृश्य व झाडांची दाटीवाटी अनुभवून आम्ही पुरते अचंबित झालो. तेथील एका झाडाला आजूबाजूने पिंजरा तयार केलेला होता. त्यामध्ये दोन अस्वले होती तर त्याच झाडावर माकडे खेळत होती. आम्ही माकडांना हुलकावण्या देत पुढे सरकलो.

तेथून उजव्या बाजूला गेल्यास एक भले मोठे तळे होते. त्या तळ्यात सुरेख अशी बदके पोहत होती. आजूबाजूला जिराफ व हरीण पाणी पित होते. पहिल्यांदाच जिराफ पाहत असल्याने मी खूपच आनंदीत झालो होतो. तेथून पुढे गेल्यावर हत्तींसाठी तयार केलेले क्षेत्र आम्ही पाहिले. त्यामध्ये त्यावेळी दोनच हत्ती होते.

प्राणी संग्रहालयात डाव्या बाजूला हिंस्र प्राण्यांसाठी पिंजरे तयार केले होते. त्यामध्ये प्रत्येक पिंजऱ्यात वेगवेगळा हिंस्र प्राणी ठेवला होता. चित्ता, वाघ, कोल्हा असे विविध प्राणी आम्हाला दुरूनच दाखवण्यात आले. काहीजणांनी त्यांचे फोटो सुद्धा काढले. तेथून थोडे घाबरतच आम्ही पुढे गेलो.

पुढे एक बाग होती. त्या बागेत आम्ही सर्वजण भोजनासाठी बसलो. भोजन करताना सर्वांच्या तोंडी फक्त प्राण्यांच्याच चर्चा होत्या. प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःचा अनुभव सांगत होता. भोजन झाल्यावर आम्ही तेथे खेळू लागलो. खेळून झाल्यावर पुढच्या विभागात आम्हाला नेण्यात आले.

शेवटच्या विभागात आम्ही विविध प्रजातींचे साप व अजगर पाहिले. तेथून पुढे एका भल्या मोठ्या पिंजऱ्यात एक शहामृग होते. आम्ही त्याला आमच्याजवळील खाऊ दिला. त्यानेही तो खाल्ल्याने आम्ही खूपच आनंदीत झालो. प्राणी संग्रहालयात विविध ठिकाणी तेथे उपलब्ध नसलेल्या प्राण्यांचे व पक्षांचे पुतळे बनवलेले होते.

प्राणी संग्रहालयातील नैसर्गिक विविधता पाहून आम्ही खूपच उल्हासित होतो. घनदाट झाडी, सतत पक्षांचा होणारा कोलाहल, प्राण्यांचे आवाज व सुरक्षा रक्षकांची जबाबदारी इत्यादी सर्व बाबी आम्हाला अनुभवायला मिळाल्याने आम्ही भलतेच खुश होतो. आमची वेळ समाप्त झाल्याने आम्ही तेथून आता परतीच्या प्रवासाला निघालो.

तुम्हाला प्राणी संग्रहालय हा मराठी निबंध (Prani Sangrahalay Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post प्राणी संग्रहालय – मराठी निबंध • Prani Sangrahalay Nibandh •<br> appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/zoological-museum-marathi-essay-prani-sangrahalay-nibandh/feed/ 0 5446
खुर्ची बोलू लागली तर – मराठी निबंध • Khurchi Bolu Lagli Tar Nibandh Marathi • https://dailymarathinews.com/khurchi-bolu-lagali-tar-marathi-essay-khurchi-bolu-lagli-tar-nibandh-marathi/ https://dailymarathinews.com/khurchi-bolu-lagali-tar-marathi-essay-khurchi-bolu-lagli-tar-nibandh-marathi/#respond Sun, 22 Jan 2023 07:50:35 +0000 https://dailymarathinews.com/?p=5418 एखादी खुर्ची बोलायला लागल्यावर आपण त्या खुर्चीशी कसा काय संवाद साधू शकू, अशा कल्पनेचे वर्णन खुर्ची बोलू लागली तर या निबंधात करायचे असते.

The post खुर्ची बोलू लागली तर – मराठी निबंध • Khurchi Bolu Lagli Tar Nibandh Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
एखादी खुर्ची बोलायला लागल्यावर आपल्या जीवनात काय फरक पडेल आणि आपण त्या खुर्चीशी कसा काय संवाद साधू शकू, अशा कल्पनेचे वर्णन खुर्ची बोलू लागली तर (Khurchi Bolu Lagli Tar Nibandh Marathi) या मराठी निबंधात केलेले आहे.

खुर्ची बोलू लागली तर निबंध मराठी | Khurchi Bolu Lagli Tar Nibandh Marathi |

एकदा बाहेरगावी पाहुण्यांच्या घरी मला खूप वेळ थांबावे लागले. तेथे जास्त कोणी ओळखीचे लोक नसल्याने आणि मोबाईलही बंद झाल्याने मी फक्त सर्वत्र निरीक्षण करत होतो. मी बसलेल्या खुर्चीवरच सर्वप्रथम माझे लक्ष गेले आणि मला वाटले की ही खुर्ची जर बोलत असती तर…

खुर्ची बोलू लागली तर अगदीच मज्जा येईल. तिच्यासोबत देखील आपल्याला काही गप्पा मारता येतील. आपण सर्वजण नेहमीच खुर्चीवर बसत असतो. परंतु खुर्ची बोलू लागली तर खुर्चीवर बसताना तिची परवानगी घ्यावी लागेल. काहीवेळा तर परवानगी मिळणारही नाही.

दोन खुर्च्या एकत्र असल्या तर त्यांचे देखील एक वेगळेच विश्व निर्माण होईल. स्वतःचे अनुभव त्या एकमेकींना सांगतील. स्वतःची निर्मिती, स्वतःचा उपयोग, स्वतःचा आकार – रंग अशा अनेक बाबींविषयी त्या एकमेकींशी खूप – खूप बोलतील. एखाद्या कार्यक्रमात जर हजारो खुर्च्या असतील तर त्याबद्दल काही सांगायलाच नको.

खुर्ची बोलल्याने तिचा वापर अगदी व्यवस्थित होईल. खुर्चीला विनाकारण कोणीही मोडणार नाही. खुर्चीला जर कशाही प्रकारे हाताळले गेले तर खुर्ची तक्रार करेल. त्याचप्रकारे जर खुर्चीला एकदम व्यवस्थित वापरले तर खुर्ची आपल्यासोबत मैत्रीही करेल. आपल्याशी सुसंवाद साधेल.

खुर्ची बोलू लागली तर आपल्याला काही तोटेही जाणवतील. सर्वप्रथम खुर्चीचा वापर कमी होईल. खुर्चीला विचार प्राप्त होतील. खुर्ची सर्व काही स्मरणात ठेऊ शकेल. खुर्ची त्यानुसार संस्कारित होत जाईल आणि तिचे स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण होईल. एकदा तिचे स्वमत तयार झाल्यास ती असत्य देखील बोलेल.

खुर्ची बोलू लागली तर त्या गोष्टीचा लाभ तिला होईल. तिचे आयुष्य सुधारेल परंतु मानवी उपयोग हळूहळू नाहीसा होत जाईल. खुर्च्या देखील बोलत्या झाल्याने त्या एकमेकींशी नाते तयार करू लागतील. त्यांच्यात देखील नैसर्गिक विकासाची शक्यता निर्माण होईल.

खुर्ची बोलती झाल्याने आपण जरी आपल्या घरी शांत बसलो तरी खुर्ची मात्र बोलत राहील. त्यांच्यामुळे आपली झोप उडेल कारण खुर्च्या त्यांच्या मर्जीने कधीही बोलतील. खुर्च्यांच्या बोलण्याने त्यांची किंमत वाढत जाईल. खुर्ची ही एकदमच अनमोल वस्तू बनून जाईल.

आता मी खडबडून जागा झालो. विचारांतून बाहेर आलो कारण पाहुण्यांनी नुकताच चहा आणला होता. चहा पिताना पुन्हा एकदा “खुर्ची बोलू लागली तर..” याविषयीचे सर्व विचार मनात घुमत होते. पाहुण्यांचा निरोप घेऊन मी उठलो परंतु आता खुर्ची मला निरोप देते की काय, अशा विचारानेच मला हसू आले.

तुम्हाला खुर्ची बोलू लागली तर हा मराठी निबंध (Khurchi Bolu Lagli Tar Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post खुर्ची बोलू लागली तर – मराठी निबंध • Khurchi Bolu Lagli Tar Nibandh Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/khurchi-bolu-lagali-tar-marathi-essay-khurchi-bolu-lagli-tar-nibandh-marathi/feed/ 0 5418
आरसा नसता तर – मराठी निबंध • Aarasa Nasta Tar Nibandh Marathi • https://dailymarathinews.com/aarasa-nasta-tar-marathi-essay-aarasa-nasta-tar-nibandh-marathi/ https://dailymarathinews.com/aarasa-nasta-tar-marathi-essay-aarasa-nasta-tar-nibandh-marathi/#respond Sun, 22 Jan 2023 06:05:48 +0000 https://dailymarathinews.com/?p=5416 जर आरसा नसेल तर आपले भौतिक जीवन कसे असेल आणि कोणकोणत्या घटना घडतील व घडणार नाहीत अशा बाबींचे विस्तृत वर्णन या निबंधात केलेले आहे.

The post आरसा नसता तर – मराठी निबंध • Aarasa Nasta Tar Nibandh Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा आरसा नसता तर (Aarsa Nasta Tar Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. जर आरसा नसेल तर आपले भौतिक जीवन कसे असेल आणि कोणकोणत्या घटना घडतील व घडणार नाहीत अशा बाबींचे विस्तृत वर्णन या निबंधात केलेले आहे.

आरसा नसता तर निबंध मराठी | Aarasa Nasta Tar Nibandh Marathi

आज सकाळी माझ्या चेहऱ्याला जखम झाली आणि मी ती आरशात पाहिली. आरशात पाहून त्यावर मलम लावून थोडा आराम केला. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला. आत्ता आरसा होता म्हणून मला जखमेवर उपचार करणे शक्य झाले. परंतु जर आरसा नसताच तर काय झाले असते…

आरसा नसता तर आपण कसे दिसतो, आपली हालचाल कशी होते, आपली सुंदरता – कुरूपता अशा बाबी आपल्याला समजल्या नसत्या. आरसा नसता तर आपण आपल्या चेहऱ्याची व शरीराची व्यवस्थित काळजी घेतलीच नसती.

आरसा प्रत्येक व्यक्तीसाठी खूप उपयुक्त ठरत असतो. आपण कसे दिसतो, कसा पेहराव करतो यावरून सध्या आपले व्यक्तिमत्त्व पारखले जात असल्याने प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या सौंदर्याची काळजी घेत आहे. त्यामुळे आरशाचे महत्त्व खूपच वाढलेले आहे.

आपण सुंदर आणि नीटनेटके दिसावे अशी प्रत्येकाची इच्छा असल्याने बाजारात सौंदर्य प्रसाधनांची रेलचेल असते. ही सौंदर्य प्रसाधने आपण आरशाच्या मदतीनेच शरीरभर थोपत असतो. आरसा नसता तर सौंदर्य प्रसाधने कोणी विकतच घेतली नसती.

आज केशकर्तनालय, ब्युटी पार्लर्स, हॉटेल्स, मोठमोठे मॉल्स अशा सर्व ठिकाणी चकचकीत आरशांची सजावटच केलेली असते. आपले शरीर सुंदर असो की नसो, प्रत्येकजण हा आरशांत स्वतःला पाहून सुंदरतेचा दिलासा मात्र देत असतो. आरसा नसता तर अशा ठिकाणांचे महत्त्वच राहिले नसते.

सध्या प्रत्येकाच्या घरी आरसा आहे. काहींच्या घरी तर प्रत्येक खोलीत आरसा असतो. कोणालाही न पाहवणारे असे आपले नखरे, नृत्य आणि वेडेवाकडे चाळे आपण आरशात पाहूनच करत असतो. आरसा नसता तर असे नखरे आपण केलेच नसते.

आरसा असल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वात बरेच बदल झालेले आहेत. प्रत्येक मनुष्य केस, त्वचा आणि इतर शारिरीक अवयवांची काळजी घेऊ लागला आहे. स्वतःचे वागणे आणि असणे हे आपण आरशातच न्याहाळत असल्याने आरसा नसेल तर आपल्या शारिरीक अस्तित्वाची दिशा नक्कीच बदलून जाईल.

आरसा नसता तर काही फायदेही झाले असते. सध्या व्यक्ती आंतरिक सौंदर्यापेक्षा फक्त  शारिरीक सौंदर्याला महत्त्व देऊ लागला आहे. त्यामुळे शारिरीक अस्तित्व खूपच मजबूत होऊन स्वतःला सुंदर दाखवण्याची जणू स्पर्धाच सुरू झालेली आहे. आरसा नसेल तर या गोष्टी घडणारच नाहीत.

तुम्हाला आरसा नसता तर हा मराठी निबंध (Aarasa Nasta Tar Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post आरसा नसता तर – मराठी निबंध • Aarasa Nasta Tar Nibandh Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/aarasa-nasta-tar-marathi-essay-aarasa-nasta-tar-nibandh-marathi/feed/ 0 5416
चालण्याचे महत्त्व – मराठी निबंध • Chalanyache Mahattv Nibandh Marathi • https://dailymarathinews.com/importance-of-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%88%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%82-chalanyache-mahattv/ https://dailymarathinews.com/importance-of-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%88%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%82-chalanyache-mahattv/#respond Thu, 29 Dec 2022 07:06:31 +0000 https://dailymarathinews.com/?p=5264 या निबंधात चालण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आलेले आहे तसेच चालण्यामुळे आरोग्य कसे सुधारते याचीही चर्चा करण्यात आलेली आहे.

The post चालण्याचे महत्त्व – मराठी निबंध • Chalanyache Mahattv Nibandh Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा चालण्याचे महत्त्व (Chalanyache Mahattv Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात चालण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आलेले आहे तसेच चालण्यामुळे आरोग्य कसे सुधारते याचीही चर्चा करण्यात आलेली आहे.

चालण्याचे महत्त्व – निबंध मराठी | Importance of Walking Essay in Marathi

आपले शरीर हे एक यंत्र आहे. यंत्र जसे नियमित चालू असल्यावर सुरळीतपणे कार्य करते तसेच शारिरीक हालचाल नियमित होत असल्यास आपण स्वस्थ जगू शकतो. शारिरीक हालचाल होण्यासाठी चालणे हा एक सर्वोत्तम व्यायाम आहे. चालणे हा व्यायाम जवळजवळ कुठेही, कधीही केला जाऊ शकतो.

चालणे हा शारीरिक हालचालींचा एक महत्त्वाचा प्रकार आहे ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. चालणे हा एक कमी तीव्रतेचा व्यायाम आहे जो सर्व वयोगटातील आणि तंदुरुस्तीच्या स्तरावरील लोकांद्वारे केला जाऊ शकतो.

चालण्याच्या नियमित सवयीमुळे आपले शारिरीक व मानसिक आरोग्य अबाधित राहते. चालणे ही क्रिया तुमची हृदय गती वाढवून रक्तप्रवाह सुरळीत करते. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाचा धोका कमी करून तुमचे हृदय आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.

चालणे ही क्रिया हाडे आणि स्नायू, विशेषत: पाय, नितंब आणि मध्यभाग मजबूत होण्यास मदत करू शकते. चालल्याने पाय सुरळीतपणे कार्य करत राहतात. गुडघ्यातील हाडांची रचना व्यवस्थित सुरू राहते. अकाली गुडघे दुखणे व इतर हालचालीच्या समस्या जाणवत नाहीत.

चालणे हे शारिरीक आरोग्यासाठी चांगले आहेच शिवाय ते मानसिक ताणतणाव कमी करण्यास देखील मदत करते. चालल्याने आपल्या मेंदूत एंडोर्फिन हे रसायन स्रवते त्यामुळे आपल्यात उत्साह निर्माण होतो. एंडोर्फिन हे रसायन नैसर्गिकरित्या मूड एलिव्हेटर म्हणून काम करतात.

वजन जास्त असल्यास चालणे हा व्यायाम अगदी योग्य ठरतो. डॉक्टर वजन कमी करण्यासाठी नियमित चालण्याचा व्यायाम सांगतात. चालणे हे शरीरातील कॅलरीज बर्न करून तुमची चयापचय क्रिया वाढवून तुमचे वजन नियंत्रित करण्यात मदत करू शकते.

चालणे ही क्रिया आपले शारिरीक संतुलन सुधारण्यास मदत करते आणि संपूर्ण शरीरात समन्वय जाणवतो. पाठीचा कणा ताठ राहतो व अंगदुखी तसेच इतर शारिरीक रचनेचे विकार जडत नाहीत. चालल्याने शरीर नियमित हालचाल करते आणि योग्य प्रकारे आरोग्यप्राप्ती होते.

चालणे हे आपल्या शरीराला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा व्यायाम आहे. चालणे हे नियमित असावे ज्यामुळे आपण मुफ्तपणे शरीर आरोग्यदायी ठेऊ शकतो. चालणे हे शारीरिक हालचालींपैकी एक महत्त्वाचा प्रकार आहे जे आरोग्यावर अगदी सकारात्मक परिणाम करते.

तुम्हाला चालण्याचे महत्त्व हा मराठी निबंध (Chalanyache Mahattv Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post चालण्याचे महत्त्व – मराठी निबंध • Chalanyache Mahattv Nibandh Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/importance-of-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%88%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%82-chalanyache-mahattv/feed/ 0 5264
मोर – मराठी निबंध • Peacock Essay In Marathi • https://dailymarathinews.com/peacock-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/peacock-essay-in-marathi/#respond Sun, 25 Dec 2022 05:06:11 +0000 https://dailymarathinews.com/?p=5255 मोर हा त्याच्या रंगीबेरंगी आणि सुशोभित पंखांसाठी ओळखला जाणारा पक्षी आहे. मोराचा रंग आणि खुललेला पिसारा हा अधिक आकर्षणाचा मुद्दा असतो.

The post मोर – मराठी निबंध • Peacock Essay In Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा मोर (Mor Nibandh Marathi) या पक्षाविषयी माहिती देणारा मराठी निबंध आहे. मोराची शरीर रचना, त्याचे वैशिष्ट्य आणि अन्य स्वाभाविक बाबी या निबंधात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

माझा आवडता पक्षी – मोर निबंध मराठी | My favourite Bird Peacock Essay In Marathi |

मोर हा त्याच्या रंगीबेरंगी आणि सुशोभित पंखांसाठी ओळखला जाणारा पक्षी आहे. मोराचा रंग आणि खुललेला पिसारा हा अधिक आकर्षणाचा मुद्दा असतो. मोराचे पंख हे अधिक विस्तृत असतात. मोरामध्ये नर जातीला मोर तर मादीला लांडोर असे म्हणतात.

मोर हे मूळचे दक्षिण आशियातील आहेत आणि ते सामान्यतः भारताशी संबंधित आहेत, जेथे ते राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक मानले जातात. ते आशियातील इतर भागांमध्ये तसेच युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या काही भागांमध्ये देखील आढळतात.

मोर त्यांच्या चमकदार निळ्या आणि हिरव्या पंखांसाठी ओळखले जातात. मोरांचे डोळे देखील विशेष रंग दर्शवतात तसेच त्यांच्या डोक्यावर छोटे तुरे असतात. त्यांचे डोळे हे मादीला आकर्षित करण्यात आणि संभाव्य प्रतिस्पर्ध्यांना धमकावण्यात विशेष भूमिका बजावतात असे मानले जाते.

मोर हे सर्वभक्षी आहेत, म्हणजे ते वनस्पती आणि कीटक दोन्ही खातात. ते सामान्यत: लहान कीटक, फळे आणि धान्ये खातात, परंतु लहान उंदीर आणि सरपटणारे प्राणी देखील त्याच्या आहारात कधीकधी येतात. मोर हे रानावनात भटकणारे पक्षी आहेत. त्यांना जास्त उंच उडता येत नाही.

प्रेम, स्नेह आणि सौंदर्याचे प्रतिक म्हणून मोराला ओळखले जाते. मोराच्या प्रतिमेचा उपयोग हा नक्षीकामात केला जातो. विविध प्रकारच्या कपड्यांमध्ये त्याची प्रतिमा छापली जाते. भगवान श्री कृष्णाने मोरपंख हे मुकुटावर परिधान केल्याने मोराचे महत्त्व आणखीनच वाढते.

जगभरात अनेक मानवी संस्कृतींमध्ये मोराला पवित्र मानले जाते. मोराचे दर्शन हे देखील शुभ मानले जाते. मोराला मोकळ्या जागेत पाळले जाते तसेच जगभरातील प्राणीसंग्रहालयात त्यांचा वावर आढळतो. मोठ्याने हाक मारणे आणि पिके खाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे मोरांना काही भागात पकडले जाते आणि वन्य विभागात दिले जाते.

पावसाळ्यातील मोराचे नृत्य हे अगदी विहंगम आणि नयनरम्य असे असते. मोराची लोकप्रियता आणि सांस्कृतिक महत्त्व अत्यधिक असल्याचे आपल्याला इतिहासात देखील आढळते. प्राचीन चित्रकला आणि शिल्पकला यांमध्ये देखील मोराचे अस्तित्व आढळते.

मोर ही एक आश्चर्यकारक आणि प्रतिष्ठित प्रजाती आहे जी त्यांच्या विस्तृत पंखांच्या प्रदर्शनासाठी आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखली जाते. ते विविध अधिवासांमध्ये आढळतात आणि पारंपारिक पक्षी जातीत विशेष स्थान राखून आहेत.

तुम्हाला मोर – मराठी निबंध (Peacock Essay In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post मोर – मराठी निबंध • Peacock Essay In Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/peacock-essay-in-marathi/feed/ 0 5255
प्रामाणिकपणाचे महत्त्व – मराठी निबंध • Importance of Honesty Essay Marathi https://dailymarathinews.com/importance-of-honesty-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/importance-of-honesty-essay-in-marathi/#respond Wed, 21 Dec 2022 05:18:32 +0000 https://dailymarathinews.com/?p=5237 या निबंधात प्रामाणिकपणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आलेले आहे. प्रामाणिकपणा म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखातून नक्कीच मिळेल.

The post प्रामाणिकपणाचे महत्त्व – मराठी निबंध • Importance of Honesty Essay Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा प्रामाणिकपणाचे महत्त्व (Pramanikpanache Mahattva Nibandh) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात प्रामाणिकपणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आलेले आहे. प्रामाणिकपणा म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखातून नक्कीच मिळेल.

प्रामाणिकपणा मराठी निबंध • Honesty Essay In Marathi

प्रामाणिकपणा हा एक सद्गुण आहे ज्याचे प्रत्येक समाज आणि संस्कृतींमध्ये उच्च मूल्य आहे. एखाद्याच्या कृतीत आणि वाणीत सत्यता असण्याचा तो एक गुण आहे.

प्रामाणिकपणा हा बर्‍याचदा निरोगी आणि विश्वासार्ह नातेसंबंधाचा आधारस्तंभ म्हणून पाहिला जातो, मग तो मित्र, कुटुंब किंवा आपल्या भागीदारांसह असो.

प्रामाणिकपणा महत्त्वाचा असण्याची अनेक कारणे आहेत. प्रथम, प्रामाणिकपणा संबंधांमध्ये विश्वास आणि परस्पर आदर निर्माण करण्यास मदत करतो.

जेव्हा आपण इतरांशी प्रामाणिक असतो, तेव्हा आपण दाखवतो की आपण त्यांच्या भावना आणि मतांची कदर करतो आणि त्यांच्याशी मोकळेपणाने आणि पारदर्शकपणे वागण्यास तयार आहोत.

प्रामाणिकपणा हा अधिक मजबूत आणि अधिक अर्थपूर्ण नातेसंबंधांना कारणीभूत ठरू शकतो, कारण आपण सत्यवादी असण्यासाठी एकमेकांवर विसंबून राहू शकतो हे जाणून आपल्याला अधिक आरामदायक आणि सुरक्षित वाटते.

दुसरे म्हणजे, वैयक्तिक सचोटी आणि स्वाभिमान यासाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण अप्रामाणिक असतो, तेव्हा आपल्याला आपल्या कृतींबद्दल दोषी किंवा लाज वाटू शकते, ज्यामुळे आपला स्वाभिमान आणि आत्म-मूल्याची भावना खराब होऊ शकते.

स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहिल्याने आपल्याला स्वतःशी आणि आपल्या मूल्यांप्रती खरे राहण्याची परवानगी मिळते आणि आपल्याला अधिक आत्मविश्वास जाणवतो आणि इतरांना आत्मविश्वास वाटण्यास मदत देखील होत असते.

शेवटी, समाजाच्या मोठ्या भल्यासाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण इतरांशी आपल्या परस्परसंवादात प्रामाणिक असतो, तेव्हा आपण विश्वास आणि सचोटीची संस्कृती निर्माण करण्यास हातभार लावतो.

प्रामाणिक राहिल्याने अधिक सकारात्मक आणि सामंजस्यपूर्ण समाज निर्माण होऊ शकतो, जिथे लोक एकमेकांवर विसंबून राहू शकतात आणि समान ध्येयांसाठी एकत्र काम करू शकतात.

शेवटी, प्रामाणिकपणा हा एक महत्त्वाचा सद्गुण आहे जो निरोगी आणि अर्थपूर्ण नातेसंबंधांसाठी, वैयक्तिक अखंडतेसाठी आणि समाजाच्या अधिक चांगल्यासाठी आवश्यक आहे. आपल्या सर्व कृती आणि संवादांमध्ये प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणे आणि इतरांमध्ये प्रामाणिकपणाची कदर करणे महत्त्वाचे आहे.

तुम्हाला प्रामाणिकपणाचे महत्त्व हा मराठी निबंध (Pramanikpanache Mahattva Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post प्रामाणिकपणाचे महत्त्व – मराठी निबंध • Importance of Honesty Essay Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/importance-of-honesty-essay-in-marathi/feed/ 0 5237