दिनविशेष Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sun, 01 Oct 2023 05:26:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 दिनविशेष Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 आज राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन – १ ऑक्टोबर! https://dailymarathinews.com/today-is-national-voluntary-blood-donation-day-1-october/ https://dailymarathinews.com/today-is-national-voluntary-blood-donation-day-1-october/#respond Sun, 01 Oct 2023 05:23:49 +0000 https://dailymarathinews.com/?p=6030 रक्तदान दिनाला सर्वत्र रक्तपेढी संस्था रक्तदान शिबिरे आयोजित करतात व वेगवेगळ्या रक्त गटानुसार रक्त संकलन करण्याचे कार्य करतात.

The post आज राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन – १ ऑक्टोबर! appeared first on Daily Marathi News.

]]>
१ ऑक्टोबर या दिवशी ‘राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन’ साजरा केला जातो. तर प्रत्येक वर्षी संपूर्ण जगभरात १४ जून हा दिवस रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो.

रक्तदान दिनाला सर्वत्र रक्तपेढी संस्था रक्तदान शिबिरे आयोजित करतात व वेगवेगळ्या रक्त गटानुसार रक्त संकलन करण्याचे कार्य करतात. या दिनाच्या जाहिराती व संदेश हे सोशल मीडियाद्वारे सर्वत्र पाठवले जातात तसेच रक्तदान शिबिराचे मोठमोठे होर्डिंग्ज देखील लावले जातात.

रक्तदान दिनी रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. रक्तदानाविषयी सामाजिक जनजागृती निर्माण केली जाते. रक्तदान केल्याने एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतात. त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे असेही बोलले जाते.

रक्त घेण्याअगोदर आरोग्यदायी निकष व रक्तगट तपासणे अत्यावश्यक ठरते. व्यक्तीचे वय १८ – ६० वर्ष असणे गरजेचे आहे. हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा जास्त असावा, वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे, नाडीचे ठोके ८० ते १०० प्रति मिनिट असणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

स्वतःच्या आरोग्यदायी बाबी ठीक असल्यास रक्तदान करण्यास काहीही अयोग्य असे नाही. कारण रक्त पुनर्निर्मिती होतच असते आणि कृत्रिम रक्त बनवले जाऊ शकत नाही. रक्तदान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

The post आज राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन – १ ऑक्टोबर! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/today-is-national-voluntary-blood-donation-day-1-october/feed/ 0 6030
अभियंता दिन २०२३ – मराठी माहिती • Engineer’s Day 2023 • https://dailymarathinews.com/engineers-day-2023-marathi-information-engineers-day-2023/ https://dailymarathinews.com/engineers-day-2023-marathi-information-engineers-day-2023/#respond Thu, 14 Sep 2023 09:08:44 +0000 https://dailymarathinews.com/?p=6018 भारतात प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर या दिवशी अभियंता दिन साजरा केला जातो. भारताचे महान अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस आहे.

The post अभियंता दिन २०२३ – मराठी माहिती • Engineer’s Day 2023 • appeared first on Daily Marathi News.

]]>
• भारतात प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर या दिवशी अभियंता दिन साजरा केला जातो. भारताचे महान अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस आहे.

• एम. विश्वेश्वरय्या यांच्या अतुल्य योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन हा भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये आणि अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचा बहुमूल्य असा वाटा आहे.

• देशभरात बांधलेल्या अनेक नद्यांची धरणे आणि पूल यशस्वी करण्यात विश्वेश्वरय्या यांचे प्रयत्न यशस्वी ठरलेले होते. देशातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न कोणीही विसरू शकणार नाही.

• भारत सरकारने १९६८ मध्ये डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्म तारखेला ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा असे घोषित केले. तेव्हापासून दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो.

• एम. विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात झाला. अभियंता म्हणून काम पाहताना डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी देशात अनेक धरणे बांधलेली आहेत. म्हैसूरमधील कृष्णराज सागर धरण, पुण्यातील खडकवासला जलाशय आणि ग्वाल्हेरमधील तिग्रा धरण या प्रमुख धरणांचा समावेश आहे.

• हैदराबाद शहर बनवण्यामागे विश्वेश्वरय्या यांनाच श्रेय जाते. त्या शहराची पूर संरक्षण प्रणाली खूपच प्रसिध्द झाली. तसेच विशाखापट्टणम बंदराचे समुद्रापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी विकसित केलेली यंत्रणा देखील यशस्वी ठरली होती. त्याव्यतिरिक्त कारखाने, बँका, महाविद्यालये अशा कितीतरी रचना त्यांच्या हातून घडलेल्या आहेत.

विविध देशांमध्ये अभियंता दिन (Abhiyanta Din) साजरा केला जातो –

अभियंता दिन हा केवळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये देखील साजरा केला जातो. त्याची तपशीलवार माहिती खाली देण्यात आलेली आहे.

२४ फेब्रुवारी – इराण

२० मार्च – बेल्जियम

१६ जून – अर्जेंटिना

७ मे – बांगलादेश

१५ जून – इटली

१४ सप्टेंबर – रोमानिया

५ डिसेंबर – तुर्की

अभियंत्यांचे योगदान हे कोणत्याही देशाच्या वैज्ञानिक व भौतिक प्रगतीसाठी मोलाचे ठरत असते. त्यामुळे अभियंत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अभियंता दिन हा मुख्यत्वे साजरा केला जातो.

तुम्हाला अभियंता दिन मराठी माहिती (Engineer’s Day Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post अभियंता दिन २०२३ – मराठी माहिती • Engineer’s Day 2023 • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/engineers-day-2023-marathi-information-engineers-day-2023/feed/ 0 6018
वनसंवर्धन दिन _ मराठी माहिती _ Forest Conservation Day 2023 https://dailymarathinews.com/forest-conservation-day-_-marathi-information-_-forest-conservation-day-2023/ https://dailymarathinews.com/forest-conservation-day-_-marathi-information-_-forest-conservation-day-2023/#respond Wed, 19 Jul 2023 10:45:10 +0000 https://dailymarathinews.com/?p=5923 वनक्षेत्र संवर्धित झाल्याने पृथ्वीवरील बहुतांश भाग हा प्रदूषण मुक्त राहण्यास मदत होईल जेणेकरून स्वच्छ पर्यावरण निर्मित होईल आणि त्यामध्ये मानवी हस्तक्षेप असणार नाही.

The post वनसंवर्धन दिन _ मराठी माहिती _ Forest Conservation Day 2023 appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रश्न – वनसंवर्धन दिन (Van sanvardhan Din) कधी साजरा केला जातो?
उत्तर – वनसंवर्धन दिन प्रत्येक वर्षी २३ जुलै रोजी साजरा केला जातो.

प्रस्तावना – मानवी लोकसंख्या वाढल्याने वनक्षेत्र कमी होत आहे. विकासाच्या आणि आधुनिकतेच्या नावाखाली अमाप वृक्षतोड केली जात आहे. त्याचा दुष्परिणाम हा पृथ्वीवरील सजीव सृष्टीला भोगावा लागत आहे.

ही ज्वलंत समस्या ओळखून सार्वत्रिक वनसंवर्धन व्हावे अशी आशा ठेऊन आणि वृक्ष लागवडीचे उपक्रम राबवून वनसंवर्धन दिन साजरा केला जाऊ शकतो.

वनसंवर्धन दिनाचे महत्त्व – Importance of Forest Conseravtion Day

• लोकसंख्या वाढ आणि त्यासोबतच विज्ञान – तंत्रज्ञान देखील विकसित झाल्याने मानवी गरजा वाढल्या. उच्चस्तरीय राहणीमान, आधुनिकता, भौतिक विकास हे जीवनाचे निकष बनून गेले.

• जीवनातील स्वकेंद्रित वृत्तीने निसर्गातील विविध घटकांचे नुकसान होत आहे याचे भानदेखील माणूस विसरत चालला असल्याने वनक्षेत्रे संवर्धित करण्याची गरज येऊन ठेपली आहे.

• वनक्षेत्र संवर्धित झाल्याने पृथ्वीवरील बहुतांश भाग हा प्रदूषण मुक्त राहण्यास मदत होईल जेणेकरून स्वच्छ पर्यावरण निर्मित होईल आणि त्यामध्ये मानवी हस्तक्षेप असणार नाही.

• निसर्ग आपल्या पूर्ण स्वरूपात बहरू शकेल. पाऊस – वारा, पशुपक्षी, नद्या – नाले इ. सर्व प्रकारचे पर्यावरणीय घटक संतुलन साधू शकतील.

• वृक्षतोड विरोधात कायदे निर्मिती होणे गरजेचे आहे. सर्व जनसंख्या ही वृक्ष लागवड आणि त्यांची जोपासना याबाबतीत जागरूक व्हायला हवी. तसेच विकासाची संकल्पना ही आधुनिकता नसावी तर त्यामध्ये पर्यावरणीय समतोल देखील असावा.

• लोकसंख्या वाढ ही ज्वलंत समस्या असल्याने त्यावर देखील काम करणे गरजेचे आहे. त्यामुळेच असजग रूपाने मानव निसर्गावर हल्लाबोल करत आहे.

• अशा सर्व प्रकारची विध्वंसक कारणे जाणून घेऊन आपल्याला नैसर्गिकरीत्या जगता येईल अशी एक समतोल दृष्टी निर्माण करावी लागेल.

• प्रत्येक पिढी ही पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असावी असे वाटत असेल तर वनसंवर्धन दिन आणि अन्य पर्यावरणीय दिन मोठ्या प्रमाणावर साजरे व्हायला हवेत.

• वनक्षेत्र वाढले तर अन्य प्रकारची सजीव सृष्टी देखील बहरेल. प्रत्येक प्रकारचा जीव येथे श्वास घेऊ शकेल. अशी दृष्टी ठेऊन आपण काम केल्यास येणारी काही वर्षे ही अत्यंत नैसर्गिक समतोल निर्माण करणारी असतील.

• वनसंवर्धन दिनाचे महत्त्व हे असाधारण पद्धतीने समजून घेणे आवश्यक आहे. फक्त जीवन जगण्याचा स्तर वाढवणे आणि त्यासाठी नैसर्गिक आपत्ती येईल अशी स्थिती निर्माण करणे याबाबतीत जागृती आवश्यक आहे.

• चला तर मग आपण २३ जुलै रोजी वन संवर्धित करण्याचा संकल्प करूयात आणि आपापल्या परीने वृक्ष लागवड, त्यांची जोपासना करणे याबाबतीत कृतिशील होऊयात…


तुम्हाला वनसंवर्धन दिन – मराठी माहिती (Van Sanvardhan Din Mahiti Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post वनसंवर्धन दिन _ मराठी माहिती _ Forest Conservation Day 2023 appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/forest-conservation-day-_-marathi-information-_-forest-conservation-day-2023/feed/ 0 5923
जागतिक योग दिवस 2023 _ मराठी माहिती • International Yoga Day 2023 https://dailymarathinews.com/world-yoga-day-2023-_-marathi-information-international-yoga-day-2023/ https://dailymarathinews.com/world-yoga-day-2023-_-marathi-information-international-yoga-day-2023/#respond Tue, 20 Jun 2023 04:39:16 +0000 https://dailymarathinews.com/?p=5834 मानवाच्या विकासासाठी योग ही संकल्पना खूपच फायदेशीर ठरत आहे. मानवासाठी शारिरीक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावर योग जीवनपद्धती उपयुक्त ठरलेली आहे.

The post जागतिक योग दिवस 2023 _ मराठी माहिती • International Yoga Day 2023 appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रश्न – जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – जागतिक योग दिवस हा प्रत्येक वर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो.

प्रश्न – जागतिक योग दिवस 2023 ची संकल्पना (theme) काय आहे?
उत्तर – वसुधैव कुटुम्बकम या सिद्धांतानुसार “वन वर्ल्ड, वन हेल्थ” ही 2023 सालची संकल्पना आहे.

जागतिक योग दिन – World Yoga Day

• मानवाच्या विकासासाठी योग ही संकल्पना खूपच फायदेशीर ठरत आहे. मानवासाठी शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर योग जीवनपद्धती उपयुक्त ठरलेली आहे. प्राचीन काळापासून भारतात योगा ही संकल्पना प्रचलित आहे.

• योग जीवनपद्धतीचा उपयोग संपूर्ण जगभरात व्हावा आणि मानवी जीवन निरोगी, उत्साही आणि आनंदी व्हावे यासाठी संपूर्ण जगभरात 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा केला जातो.

• भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत जागतिक योग दिनाची घोषणा केली. त्यानंतर जागतिक योग दिन हा सर्वप्रथम 21 जून 2015 रोजी जगभरात अत्यंत उत्साहात आणि उपक्रमशील पद्धतीने साजरा करण्यात आला.

• योगाचे महत्त्व सर्व जनमानसांत कळावे आणि त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात व्हावा यासाठी जागतिक योग दिवस विशेष महत्त्व ठेवतो. योगविषयी जागरूकता निर्माण होऊन मानवाने एका आरोग्यदायी जीवनाची सुरुवात करावी अशी धारणा योग दिनानिमित्त निर्मित होत असते.

• मागील काही वर्षातील जागतिक योग दिनाच्या संकल्पना पुढीलप्रमाणे –

2017 – आरोग्यासाठी योग

2018 – शांततेसाठी योग

2019 – हृदयासाठी योग

2020 – कौटुंबिक योग

2021 – कल्याणकारी योग

2022 – मानवतेसाठी योग

• जागतिक योग साजरा करताना सोशल मीडियाचा भरपूर वापर होताना दिसत आहे. जागतिक योग दिवस निमित्त सर्वजण स्वतः एखादा योगा प्रकार करताना स्वतःचे फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर अपलोड करताना दिसतात. तसेच योग दिनाचे शुभेच्छा संदेश सर्वत्र पाठवले जातात.


तुम्हाला जागतिक योगा दिवस 2023 – मराठी माहिती (International Yoga Day 2023 Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post जागतिक योग दिवस 2023 _ मराठी माहिती • International Yoga Day 2023 appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/world-yoga-day-2023-_-marathi-information-international-yoga-day-2023/feed/ 0 5834
जागतिक पर्यावरण दिन 2023 _ मराठी माहिती https://dailymarathinews.com/world-environment-day-2023-marathi-information/ https://dailymarathinews.com/world-environment-day-2023-marathi-information/#respond Thu, 08 Jun 2023 06:57:37 +0000 https://dailymarathinews.com/?p=5812 पर्यावरण मानवासाठी आणि इतर संपूर्ण सजीव सृष्टीसाठी अत्यावश्यक आहे. अशा पर्यावरणाचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

The post जागतिक पर्यावरण दिन 2023 _ मराठी माहिती appeared first on Daily Marathi News.

]]>
जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) हा दिवस 5 जून रोजी संपूर्ण जगभरात अत्यंत उत्साहात आणि उपक्रमशील पद्धतीने साजरा केला जातो. यावर्षी पर्यावरण दिन साजरा करताना दिनाचा विषय काय आहे तसेच त्याविषयीची माहिती या लेखात चर्चा करण्यात आलेली आहे.

जागतिक पर्यावरण दिन 2023 – World Environment Day 2023

• पर्यावरण मानवासाठी आणि इतर संपूर्ण सजीव सृष्टीसाठी अत्यावश्यक आहे. अशा पर्यावरणाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. ते संवर्धन होण्यासाठी आणि तशी समज विकसित होण्यासाठी पर्यावरण दिन साजरा करण्यात येत असतो.

• पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा उद्देश्य समोर ठेऊन दरवर्षी ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक शक्य अशा पद्धतीने लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती केली जाते.

• भारत सरकारने ‘मिशन लाइफ’ हे ध्येय समोर ठेवून ‘जागतिक पर्यावरण दिन – 2023’ साजरा करण्याचे योजिले आहे. संपूर्ण देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हा दिन अत्यंत उत्साहात साजरा केला गेला.

मिशन लाईफ काय आहे?

मिशन लाईफ ही भारताच्या पंतप्रधानांनी ग्लासगो येथे UNFCCC COP261 च्या जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेत सुरू केलेली संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत जीवनशैली आणि पद्धतींचा अवलंब करण्याचे उद्दिष्ट जाणवून दिले.

अनावश्यक उपभोग टाळून एका जाणीवपूर्वक जीवनशैली कशी असू शकेल आणि तिचा अवलंब करण्यावर भर दिला. शाश्वत जीवनशैलीसाठी त्यांनी पाच तत्त्वे मांडली.

1. जीवनाच्या सर्व प्रकारांचा आदर
2. मातृ निसर्गाचा आदर
3. विविधतेचा आदर
4. स्थानिक उपायांसाठी आदर
5. वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचा आदर

मिशन LiFE हे केवडिया, गुजरात येथे 20 ऑक्टोबर 2022 रोजी पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEFCC) सुरू केलेली एक जनसंघटन मोहीम आहे. या मोहिमेत सहा थीम्स समाविष्ट आहेत –

1. कमी कचरा
2. पाणी संरक्षित
3. उर्जेची बचत करणे
4. हिरवी गतिशीलता
5. हिरव्या जागा
6. हिरवा आहार

जागतिक पर्यावरण दिन अर्थपूर्ण करण्यासाठी MoEFCC इतर केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे, संस्था आणि खाजगी संस्था यांच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावर मिशन LiFE चे कार्य पूर्ण होत आहे.

1. missionlife-moefcc.nic.in
2. merilife.org

COP26 मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
MoEFCC ने 15 मे 2023 रोजी “मेरी लाइफ” (माय लाइफ) नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन देखील लॉन्च केले आहे.


पर्यावरण दिन 2023 –

मिशन लाइफसाठी 5 जून 2023 रोजी भारतात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. यावेळी स्वच्छता मोहीम, लाइफ मॅरेथॉन, प्लास्टिक संकलन मोहीम, सायकल रॅली, वृक्षारोपण मोहीम, कंपोस्टिंग अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक पर्यावरण दिन 2023 थीम –
“Beat Plastic Pollution”

यावर्षी पर्यावरण दिनाची थीम ही प्लास्टिकचा समूळ नाश (प्लास्टिकला हरवा/ प्लास्टिक हटाव) अशी आहे. प्लास्टिकचा वापर दैनंदिन स्तरावर वाढलेला आहे. त्यामुळे त्याचा वापर न करता त्याचा वापर टाळणे गरजेचे असल्याने त्यानिमित्ताने जनजागृती करण्याचा उद्देश्य यावर्षी पर्यावरण दिनानिमित्त ठेवण्यात आलेला आहे.

The post जागतिक पर्यावरण दिन 2023 _ मराठी माहिती appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/world-environment-day-2023-marathi-information/feed/ 0 5812
घटस्थापना २०२२ – मराठी माहिती | Ghatasthapana Mahiti Marathi | https://dailymarathinews.com/ghatasthapana-2022-marathi-mahiti-ghatasthapana-mahiti-marathi/ https://dailymarathinews.com/ghatasthapana-2022-marathi-mahiti-ghatasthapana-mahiti-marathi/#respond Tue, 27 Sep 2022 04:18:16 +0000 https://dailymarathinews.com/?p=5013 घटस्थापना कशी केली जाते आणि घटस्थापनेची पूजा अशा विविध बाबींचे वर्णन या लेखात करण्यात आलेले आहे.

The post घटस्थापना २०२२ – मराठी माहिती | Ghatasthapana Mahiti Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा घटस्थापना (Ghata Sthapana) या विषयावर आधारित मराठी माहिती आहे. घटस्थापना कशी केली जाते आणि घटस्थापनेची पूजा अशा विविध बाबींचे वर्णन या लेखात करण्यात आलेले आहे.

घटस्थापना म्हणजे काय? Ghatasthapana Information In Marathi |

26 सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सव सणाला पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. संपूर्ण देशभरात दुर्गादेवीची पूजा केली जाते.

आदिशक्ती देवीची विविध रूपांत मनोभावे सेवा केली जाते. देवीची नऊ दिवस स्थापना करून हा उत्सव साजरा केला जातो.

घटस्थापना कशी करावी?

घटस्थापना करण्यासाठी माती अथवा पितळेचा तांब्या घ्यावा. पूजेसाठी व स्थापनेसाठी पुढील बाबी जमा कराव्यात – तीळ, जव, मध, सप्तमृतिका, सर्वोषधी, लाल कापड, कुंकू, नारळ, सुपारी, जल, आंब्याचे डहाळे, विड्याचे पान, नाणी इत्यादी.

घटस्थापनेचा मंत्र –

‘ॐ अपवित्रः पवित्रोवा सर्वावस्थां गतोऽपिवा। यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः॥’

वरील मंत्राचा उच्चार करून कलशातील पाणी स्वतःवर आणि पूजा साहित्यावर थेंब थेंब वहावे.

उजव्या हातात पूजा साहित्य जसे की फूल, जल, विडा, नाणी आणि सुपारी घेऊन देवीच्या पूजनाचा आरंभ करावा.

नवरात्र घटस्थापना पूजा विधी –

• दुर्गा देवीची मूर्ती किंवा प्रतिमेची स्थापना करावी. मातीत जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी अशी सप्तधान्ये ठेवावी आणि त्यामध्ये सप्तमृतिका मिसळावे.

• मातीवर कलश ठेवावा. फुले, अक्षता, व जल वाहून देवीचे आवाहन करावे. कलशात सर्वोषधी आणि पंचरत्न ठेवावे.

• आंब्याची पाने कलशात ठेवावीत. कलशावर एक पात्र ठेवावे. त्या पात्रात धान्य भरावे. त्यावर एक दीप ठेवावा. कलशाला लाल रंगाचे कापड गुंडाळावे.

• शेवटी पूजा घरातील सर्व देवांना नमस्कार करावा. देवीची पूजा करून दुर्गा सप्तशतीचे पठण करावे.

*टीप – पूजाविधी व धार्मिक संकल्पना या माहिती स्वरूपात प्रस्तुत लेखात मांडलेल्या आहेत. येथे कोणाच्याही भावना दुखावण्याचा अथवा खोटी माहिती पसरवण्याचा हेतू नाही.

तुम्हाला घटस्थापना – मराठी माहिती (Ghatasthapana Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post घटस्थापना २०२२ – मराठी माहिती | Ghatasthapana Mahiti Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/ghatasthapana-2022-marathi-mahiti-ghatasthapana-mahiti-marathi/feed/ 0 5013
धूम्रपान निषेध दिन – मराठी माहिती | No Smoking Day Mahiti https://dailymarathinews.com/no-smoking-day-marathi-mahiti/ https://dailymarathinews.com/no-smoking-day-marathi-mahiti/#respond Mon, 04 Jul 2022 01:20:52 +0000 https://dailymarathinews.com/%e0%a4%a8%e0%a5%8b-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%a1%e0%a5%87-2022-%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%ae-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%96/ धूम्रपान निषेध दिनाचे महत्त्व, तो कसा साजरा केला जातो आणि या दिनाची थीम म्हणजे काय, अशा विविध बाबींची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.

The post धूम्रपान निषेध दिन – मराठी माहिती | No Smoking Day Mahiti appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा धूम्रपान निषेध दिनाविषयी मराठी माहिती (No Smoking Day Marathi Mahiti) आहे. धूम्रपान निषेध दिनाचे महत्त्व, तो कसा साजरा केला जातो आणि या दिनाची थीम म्हणजे काय, अशा विविध बाबींची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.

धूम्रपान निषेध दिवस | No Smoking Day

धुम्रपानाच्या आहारी गेलेल्या लोकांना सावध करण्यासाठी धूम्रपान निषेध दिवस पाळला जातो. युनायटेड किंगडममधील हा एक प्रमुख आरोग्य जागरूकता दिवस आहे जो वार्षिक आधारावर आयोजित केला जातो. या दिनाप्रमाणेच जागतिक पातळीवर जागतिक तंबाखू निषेध दिन साजरा केला जातो.

धूम्रपान निषेध दिनाचे महत्त्व | No Smoking Day Importance

लोकांना तंबाखूच्या वापरापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती मोहीम म्हणून जगभरात सर्वत्र धूम्रपान निषेध दिवस पाळला जातो. धुम्रपान आणि तंबाखू सेवनाच्या इतर प्रकारांमुळे आरोग्यावर होणाऱ्या हानिकारक प्रभावांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. धूम्रपान करणाऱ्यांना त्यांच्या धूम्रपानाच्या सवयी सोडण्यात मदत करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

नो स्मोकिंग डे तारीख –

प्रत्येक वर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नो स्मोकिंग डे साजरा केला जातो. जागतिक धूम्रपान दिवस 2022 साली दिनांक 9 मार्च रोजी साजरा केला गेला, जो बुधवारी होता.

नो स्मोकिंग डे 2022 थीम | धूम्रपान निषेध दिनाची रूपरेषा |

युनायटेड किंगडममधील लोक प्रत्येक वर्षी एक थीम जाहीर करतात आणि ती वर्षभर पाळली जाते. त्याप्रमाणेच जागतिक स्तरावर 31 मे रोजी जागतिक आरोग्य संघटना (WHO) जागतिक तंबाखू विरोधी (निषेध) दिन साजरा करते.

दरवर्षी, तंबाखूजन्य आजारांमुळे 6 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे वर्षभर जाणवलेल्या समस्ये नुसार आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन एखादी थीम तयार केली जाते.

धूम्रपान निषेध दिन कसा साजरा केला जातो?

प्रत्येक वर्षी, मोहिमेच्या उद्दिष्टाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वेगळा विषय निवडला जातो. 2010 मध्ये निवडलेला विषय, उदाहरणार्थ, ‘ब्रेक फ्री’ होता. धूम्रपान करणार्‍यांना आणि धूम्रपान न करणार्‍यांना त्यांचा सोडण्याचा प्रवास सुरू करण्याची किंवा पुढे चालू ठेवण्याची आठवण करून देण्यासाठी विशिष्ट संदेश, जाहिराती आणि जाहिराती तयार केल्या जातात. ‘नो स्मोकिंग डे’ ने गेल्या काही वर्षांमध्ये काही प्रभावशाली परिणाम पाहिले आहेत. दहामधील एका व्यक्तीने या दिनी धूम्रपान सोडलेले आहे.

धूम्रपानाचे धोके काय आहेत?

• धूम्रपान ही एक घातक सवय आहे जी धूम्रपान करणाऱ्यांना आणि त्यांच्या सभोवतालच्या इतरांना प्रभावित करते.

• सिगारेट ओढणे व्यसनाधीन आहे आणि ते नेहमीच अल्प आणि दीर्घकालीन आर्थिकदृष्ट्या विनाशकारी असते आणि विविध प्रकारचे कर्करोग आणि हृदयविकार यासारख्या गंभीर आरोग्य परिस्थितींचा धोका वाढवते.

• असा अंदाज आहे की प्रत्येक दोन धूम्रपान करणार्‍यांपैकी एक व्यक्ती धूम्रपानाशी संबंधित आजाराला बळी पडेल.

तुम्हाला धूम्रपान निषेध दिन – मराठी माहिती (No Smoking Day Information In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post धूम्रपान निषेध दिन – मराठी माहिती | No Smoking Day Mahiti appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/no-smoking-day-marathi-mahiti/feed/ 0 4413
जागतिक अन्न सुरक्षा दिन – मराठी माहिती | Jagatik Ann Suraksha Din https://dailymarathinews.com/world-food-safety-day-2022/ https://dailymarathinews.com/world-food-safety-day-2022/#respond Fri, 24 Jun 2022 02:34:43 +0000 https://dailymarathinews.com/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8-2022/ अन्न सुरक्षेचे महत्त्व, अन्न सुरक्षेविषयीचे संदेश आणि अन्न सुरक्षा दिनाची रूपरेखा (थीम) अशा विविध मुद्द्यांची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.

The post जागतिक अन्न सुरक्षा दिन – मराठी माहिती | Jagatik Ann Suraksha Din appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रश्न – जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर – जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी ७ जून रोजी साजरा केला जातो.

प्रस्तुत लेख हा जागतिक अन्न सुरक्षा दिन (Jagatik Ann Suraksha Din Mahiti Marathi) याविषयी मराठी माहिती आहे. अन्न सुरक्षेचे महत्त्व, अन्न सुरक्षेविषयीचे संदेश आणि अन्न सुरक्षा दिनाची रूपरेखा (थीम) अशा विविध मुद्द्यांची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.

अन्नजन्य धोके टाळण्यासाठी, ओळखण्यासाठी आणि अन्न हाताळण्यासाठी जागरुकता निर्माण करणे आणि त्या दिशेने कृती करण्यास प्रेरित करणे हा यामागचा उद्देश आहे. हा दिवस मानवी आरोग्य, अन्न सुरक्षा, कृषी, आर्थिक समृद्धी, बाजारपेठेत प्रवेश, पर्यटन आणि शाश्वत विकासासाठी योगदान देण्यासाठी समर्पित आहे.

जागतिक अन्न दिनाचे महत्त्व – Importance of Food Safety Day

जागतिक अन्न दिन हा पुरेशा प्रमाणात सुरक्षित अन्न मिळवण्याचा दिवस आहे जो जीवन टिकवून ठेवण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक गुरुकिल्ली म्हणून काम करेल.

अन्नजन्य आजार हे सहसा निसर्गातील जीवनासाठी धोकादायक असतात. दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे मानवी शरीरावर परिणाम करणारे विषाणू, जीवाणू, परजीवी किंवा रासायनिक पदार्थ हे सहसा लवकर नष्ट होत नाहीत. त्यामुळे अन्नाच्या सुरक्षेबाबत जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. अशी जनजागृती अन्न सुरक्षा दिनावेळी केली जाते.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना (FAO) सदस्य राष्ट्रे आणि इतर संबंधित संस्थांच्या सहकार्याने एकत्रितपणे जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यात येतो.

जागतिक अन्न सुरक्षा दिनाचा इतिहास – Food Safety Day History In Marathi

20 डिसेंबर 2018 रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षित अन्नाच्या फायद्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी तो चिन्हांकित करण्यात आला.

डब्ल्यूएचओ आणि संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना (FAO) संयुक्तपणे हा दिवस साजरा करण्याच्या गरजेचा प्रचार करतात. मानवी शरीराचे चांगले आरोग्य निश्चित करण्यात अन्न सुरक्षिततेची मुख्य भूमिका असते. कापणी, साठवण, वितरण आणि कापणीपासून उत्पादनाच्या सर्व टप्प्यांसाठी अन्न सुरक्षा आवश्यक असते.

जागतिक अन्न सुरक्षा दिन थीम 2022 – Food Safety Day Theme 2022

“सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य” ही 2022 मधील जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ही थीम जाहीर केलेली आहे आणि ही थीम दर्शवते की सुरक्षित अन्न हे मानवी आरोग्याच्या चांगल्या विकासाचे मूळ आहे.

जागतिक अन्न सुरक्षा दिवस कोट्स – Food Safety Day Quotes

दरवर्षी फूड सेफ्टी डे सेलिब्रेशनची थीम बदलली जाते. त्यानिमित्ताने अन्न सुरक्षेबाबत अनेक संदेश लोकांपर्यंत पोहचवले जातात. असे काही सुविचार आहेत जे अन्न सुरक्षेची आवश्यकता परिभाषित करतात. ते पुढीलप्रमाणे आहेत –

“अन्न सुरक्षिततेमध्ये अन्न साखळीतील प्रत्येकाचा समावेश होतो” – माईक जोहान्स

“जेव्हा माझ्या ताटात कमी असते तेव्हा मी एक चांगला माणूस असतो.” – एलिझाबेथ गिल्बर्ट

“सभ्यता, ज्याला आज ओळखले जाते, पुरेशा अन्न पुरवठ्याशिवाय ती उत्क्रांत होऊ शकली नसती किंवा जगू शकत नाही.” – नॉर्मन बोरलॉग

“माफ करा, कोणतीही जादूची गोळी नाही. निरोगी राहण्यासाठी आणि निरोगी दिसण्यासाठी तुम्हाला निरोगी खाणे आणि निरोगी जगणे आवश्यक आहे.” – मॉर्गन स्परलॉक

“तुमचे अन्न तुमचे औषध होऊ द्या आणि तुमचे औषध तुमचे अन्न असू द्या.” – हिपोक्रेट्स

“लोकांना स्वयंपाकघरात परत आणा आणि प्रक्रिया केलेले अन्न आणि फास्ट फूडकडे असलेल्या प्रवृत्तीचा मुकाबला करा.”

तुम्हाला जागतिक अन्न सुरक्षा दिन – मराठी माहिती (Food Safety Day Mahiti Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post जागतिक अन्न सुरक्षा दिन – मराठी माहिती | Jagatik Ann Suraksha Din appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/world-food-safety-day-2022/feed/ 0 4211