आत्ताच आलय Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 27 Jan 2024 02:32:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 आत्ताच आलय Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 अयोध्येत रामलल्लाच्या आरतीच्या वेळा जाहीर – https://dailymarathinews.com/ayodhya-ram-lalla-aarti-time-announced/ https://dailymarathinews.com/ayodhya-ram-lalla-aarti-time-announced/#respond Sat, 27 Jan 2024 02:32:34 +0000 https://dailymarathinews.com/?p=6198 रामदर्शन घेण्याची वेळ आणि आरतीची वेळ याबाबत सर्वांमध्ये संभ्रम होता. परंतु त्याबाबत सर्व प्रकारचा खुलासा करण्यात आलेला आहे.

The post अयोध्येत रामलल्लाच्या आरतीच्या वेळा जाहीर – appeared first on Daily Marathi News.

]]>
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून भाविकांची तुडुंब गर्दी उसळून आली. त्यामध्ये प्रामुख्याने राम दर्शन घेण्याची वेळ आणि आरतीची वेळ याबाबत सर्वांमध्ये संभ्रम होता. परंतु त्याबाबत सर्व प्रकारचा खुलासा करण्यात आलेला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता शरद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार रामलल्लाच्या एकूण सहा आरत्या केल्या जातील. पहिली आरती पहाटे साडे चार तर शेवटची आरती रात्री दहा वाजता घेण्यात येईल. भाविकांसाठी रामलल्लाचे दर्शन सकाळी सात वाजल्यापासून उपलब्ध असेल.

सर्वात अगोदर शृंगार आरती ही पहाटे साडे चार वाजता घेण्यात येईल. त्यानंतर मंगला आरती ही सकाळी साडे सहा वाजता घेण्यात येईल. भोग आरती दुपारी बारा, संध्या आरती रात्री साडे सात, पुन्हा एकदा भोग आरती रात्री आठ, तर सर्वात शेवटी शयन आरती रात्री दहा वाजता घेण्यात येईल. 

आरती आणि दर्शन घेण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्याने सर्व भाविकांना दर्शन सहज उपलब्ध झालेले आहे. तसेच सध्या एका नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सर्व कार्यक्रम पार पडत आहेत.

The post अयोध्येत रामलल्लाच्या आरतीच्या वेळा जाहीर – appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/ayodhya-ram-lalla-aarti-time-announced/feed/ 0 6198
राज्यात या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ लागू! _ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता _ https://dailymarathinews.com/orange-alert-applicable-to-the-state-or-districts-_-heavy-rain-is-expected-in-the-state-_/ https://dailymarathinews.com/orange-alert-applicable-to-the-state-or-districts-_-heavy-rain-is-expected-in-the-state-_/#respond Wed, 28 Jun 2023 04:43:13 +0000 https://dailymarathinews.com/?p=5857 Daily Marathi News दिनांक – २८ जून २०२३ : मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता असल्यास एखाद्या विभागाला, जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात येतो. तेथील ...

Read moreराज्यात या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ लागू! _ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता _

The post राज्यात या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ लागू! _ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता _ appeared first on Daily Marathi News.

]]>
Daily Marathi News

दिनांक – २८ जून २०२३ : मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता असल्यास एखाद्या विभागाला, जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात येतो. तेथील प्रशासन, नागरिक यांच्यासाठी तो सतर्कतेचा इशारा असतो.

हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच मागील दोन दिवसांत पुणे, मुंबई मध्ये देखील मुसळधार पाऊस झालेला आहे. आजही पुण्यात आणि मुंबईत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

मराठी बातम्या – ऑरेंज अलर्ट या जिल्ह्यांना लागू –

नाशिक, पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या विभागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला. तर मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

येत्या आठवडाभरात पाऊसाची चांगलीच शक्यता आहे. पुढील ४ – ५ दिवस तर मान्सून महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. मागील चार दिवसांत राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लागलेली आहे. राज्यात सुरु झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग मात्र अति आनंदात आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

Latest Marathi News साठी dailymarathinews.com या आमच्या वेबसाईटला वारंवार भेट देत राहा…

The post राज्यात या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ लागू! _ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता _ appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/orange-alert-applicable-to-the-state-or-districts-_-heavy-rain-is-expected-in-the-state-_/feed/ 0 5857
Gadchiroli Police Bharti 2022 | 10 वी/ 12 वी उत्तीर्णांना गडचिरोली पोलीस दलात नोकरीची संधी. https://dailymarathinews.com/gadchiroli-police-bharti-2022/ https://dailymarathinews.com/gadchiroli-police-bharti-2022/#respond Thu, 19 May 2022 02:35:44 +0000 https://dailymarathinews.com/?p=3848 नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पोलीस भरती संबंधी नवीन जाहिरात. गडचिरोली जिल्हा पोलीस विभागाने Gadchiroli Police Bharti 2022 अंतर्गत शिपाई पोलीस पदांसाठी ...

Read moreGadchiroli Police Bharti 2022 | 10 वी/ 12 वी उत्तीर्णांना गडचिरोली पोलीस दलात नोकरीची संधी.

The post Gadchiroli Police Bharti 2022 | 10 वी/ 12 वी उत्तीर्णांना गडचिरोली पोलीस दलात नोकरीची संधी. appeared first on Daily Marathi News.

]]>
नमस्कार मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पोलीस भरती संबंधी नवीन जाहिरात.
गडचिरोली जिल्हा पोलीस विभागाने Gadchiroli Police Bharti 2022 अंतर्गत शिपाई पोलीस पदांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक अर्जदार त्यासाठी अर्ज करु शकतात. अधिक तपशील खाली दिलेला आहे.

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवा प्रवेश) अधिनियम 2011 आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार पोलीस अधीक्षक, गडचिरोली आस्थापना 31/12/2020 रोजी 136 रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित करण्यात येत आहे.

गडचिरोली पोलीस भरती 2022

विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी गडचिरोली पोलीस (गडचिरोली जिल्हा पोलीस विभाग) कडून भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. शिपाई पोलीस पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 136 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. या भरतीचे रोजगार ठिकाण गडचिरोली आहे.

गडचिरोली पोलीस भरती २०२२ साठी अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 5 जून 2022 आहे. गडचिरोली शिपाई पोलीस भरती 2022, गडचिरोली शिपाई पोलीस भरती 2022 बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.

पद:शिपाई पोलीस
शैक्षणिक पात्रता:उमेदवार 10 वी/ 12 वी उत्तीर्ण असावा.
पदसंख्या:136
अर्ज पद्धती:Offline
नोकरी ठिकाण:गडचिरोली
अर्ज शुल्क:खुला प्रवर्ग – रु. 450/-
मागास प्रवर्ग – रु. 350/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता:गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता
अर्ज करण्याची शेवटची तारीख:5 जून 2022 

गडचिरोली शिपाई पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी दिनांक ०५/०६/२०२२ रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे. 

१. खुला : किमान १८ वर्षे, कमाल २८ वर्षे.

२. मागास प्रवर्ग (अ.जाती, अ.जमाती) : किमान १८ वर्षे, कमाल ३३ वर्षे.

३. प्रकल्पग्रस्त उमेदवार: किमान १८ वर्षे, कमाल ४५ वर्षे.

भूकंपग्रस्त उमेदवार: किमान १८ वर्षे  कमल ४५ वर्षे.

सविस्तर माहितीसाठी तुम्ही official website पाहू शकता. त्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे.

गडचिरोली शिपाई पोलीस भरती 2022 कसा अर्ज करावा?

  • शिपाई पोलीस पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज gadchirolipolice.gov.in व mahapolice.gov.in. वरून डाउनलोड करता येईल.
  • अर्ज 21 मे 2022 पासून उपलब्ध होतील.
  • उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखे पूर्वी दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Gadchiroli Police Recruitment 2022 महत्वाच्या लिंक्स

संपूर्ण जाहिरात READ
Official WebsiteCLICK HERE

The post Gadchiroli Police Bharti 2022 | 10 वी/ 12 वी उत्तीर्णांना गडचिरोली पोलीस दलात नोकरीची संधी. appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/gadchiroli-police-bharti-2022/feed/ 0 3848
Best Marathi Books of All time | सर्वोत्तम मराठी पुस्तके आणि कादंबऱ्या https://dailymarathinews.com/best-marathi-books/ https://dailymarathinews.com/best-marathi-books/#respond Thu, 09 Jan 2020 05:16:22 +0000 https://dailymarathinews.com/?p=1168 अजरामर मराठी साहित्य किती वेळा जरी वाचले तरी कमीच पडते. अशीच काही Best Marathi books, ग्रंथ आहेत जे तुम्हाला खूप उदात्त करून जातील. ही पुस्तके ...

Read moreBest Marathi Books of All time | सर्वोत्तम मराठी पुस्तके आणि कादंबऱ्या

The post Best Marathi Books of All time | सर्वोत्तम मराठी पुस्तके आणि कादंबऱ्या appeared first on Daily Marathi News.

]]>
अजरामर मराठी साहित्य किती वेळा जरी वाचले तरी कमीच पडते. अशीच काही Best Marathi books, ग्रंथ आहेत जे तुम्हाला खूप उदात्त करून जातील. ही पुस्तके फक्त पुढच्या पिढीपर्यंत गेली की त्याचा अर्थ आणि स्पष्टीकरण बदलत जाते. समाजाला अपेक्षित अशी व्यक्तिमत्त्व आणि विचार या सर्व पुस्तकांतून मांडण्यात आला आहे.

ही पुस्तकं नवीन स्वरूपात, नव्या आवृत्तीत प्रकाशित होत राहतील परंतु त्या शब्दांचा गाभार्थ आणि स्वरूप मात्र कधीच बदलणार नाही. अशाच काही सर्वोत्तम पुस्तकांची आज आम्ही माहिती देणार आहोत. जी मराठी साहित्यात मानाचे स्थान घेऊन उभी आहेत.

Best Marathi Books (सर्वोत्तम मराठी पुस्तके)

१. युगंधर

Image result for yugandhar book

लेखक- शिवाजी सावंत

भगवान श्री कृष्ण यांच्या जीवनात एक भगवत्ता असण्याबरोबरच मानवी जीवनात असणारे सामंजस्य देखील होते. असे शिवाजी सावंत यांचे लिखाण श्री कृष्णाला आपल्यासमोर उभे करते. श्री कृष्णाच्या आयुष्यातील विविध टप्पे व्यवस्थितरीत्या मांडण्यात आलेले आहेत. प्रेम किती व्यापक असू शकते याचा सारासार विचार शिवाजी सावंत यांच्या लेखनातून मिळतो. 

२. श्रीमान योगी

Image result for श्रीमान योगी  book

• लेखक- रणजित देसाई

महाराष्ट्राचा जिवंत इतिहास म्हणजेच मराठ्यांचा इतिहास. जर काही पराक्रम आणि विक्रम प्रस्थापित झाले असतील तर ते शिवाजी महाराजांच्या काळातच झालेले आहेत. महान छत्रपती राजे शिवाजी यांचे कर्तृत्व किती अफाट होते याची जाणीव आपल्याला या ग्रंथातून करून दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र ” श्रीमान योगी ” या ग्रंथात मांडण्यात आले आहे.

३. मृत्युंजय

Image result for मृत्युंजय book

• लेखक- शिवाजी सावंत 

महाभारतातील कर्णाची प्रतिमा आणि व्यक्तिरेखा खूपच विधायक स्वरूपात मांडण्यात आली आहे. कर्ण महापराक्रमी, सर्वोत्तम धनुर्धर कसा बनतो आणि त्याचा महाभारतातील सहभाग हा पूर्णपणे संघर्षमय कसा होता याचे उत्तम शब्दलेखन शिवाजी सावंत यांनी केले आहे.

लहानपणापासूनची अवहेलना, युद्धकला, मित्रप्रेम आणि कुटुंबातील नात्यातील गुंतागुंत यामध्ये घडलेले त्याचे आयुष्य व त्याचा सत्याप्रती असलेला विश्वास ” मृत्युंजय ” कादंबरीत मांडला गेला आहे. असा हा ‘ दानवीर कर्ण ‘ वाचकाला खूपच भावतो. 

४. पानिपत 

Image result for पानिपत  book

• लेखक- विश्वास पाटील

मराठे आणि अफगाणी सम्राट अब्दाली यांच्यातील युद्ध व त्याची कहाणी विश्वास पाटील यांनी “पानिपत” या कादंबरीत मांडली आहे. दिल्लीजवळील पानिपत नावाच्या ठिकाणी झालेले हे युद्ध व त्याची रोचकता ही लेखकाने पूर्णपणे अभ्यास करून मांडली आहे. आपण कादंबरी वाचताना त्या काळाशी समरस होऊ शकतो. 

 ५. राधेय 

Image result for राधेय  book

• लेखक- रणजित देसाई 

कर्ण जरी कर्तव्याचे पालन करण्यात समर्थ असला तरी त्याची निवड आणि निर्णय हेच त्याच्या लयाला कारणीभूत ठरतात. जीवनाचे ध्येय जाणून न घेता कर्तव्यात स्वतःला बांधून घेऊन समतोल जीवन न जगता फक्त महत्वकांक्षी जीवन जगण्याकडे कल असणारा राधेय कर्ण सामंजस्य दाखवण्यात कसा अपयशी ठरतो याचे वर्णन “राधेय” या कादंबरीत करण्यात आले आहे.

आलेले पेचप्रसंग, अडचणी व आपला प्रतिसाद कसा बुद्धिमान पूर्ण असावा व परिणामांना सामोरे जाण्याची कुवत सुद्धा असली पाहिजे. याची जाणीव रणजित देसाई वाचकांना व युद्धकारांना करवून देतात.

६. महानायक

Image result for महानायक book

• लेखक- विश्वास पाटील.

सुभाषचंद्र बोस यांचे जीवन म्हणजे एक संघर्षच होता. नायक आणि महानायक यातील फरक आपल्याला जसा शब्दशः समजतो तसेच आपल्या कादंबरीचा महानायक विश्वास पाटील सुभाषचंद्र बोस यांना बनवतात. भारत स्वतंत्र व्हावा याचा ध्यास एखाद्याला किती असू  शकतो याची प्रचिती आपल्याला या कादंबरीतून येते.

बुद्धीची प्रखरता, संघर्षाची जाणीव, चिकाटी या गुणांचे नेतृत्व म्हणजे सुभाषचंद्र बोस अशी मांडणी आपल्याला विश्वास पाटील यांच्या लेखणीतून आपल्याला जाणवते.

७. कोसला

Image result for कोसला book

• लेखक- भालचंद्र नेमाडे

कथेचा नायक पांडुरंग सांगवीकर याचे आयुष्य कसे काळानुरूप बदलत जाते. याचे ज्वलंत कथन भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या “कोसला” या कादंबरीत केलेले आहे. एक युवक आपली स्वप्ने आणि आदर्श घेऊन बाहेर पडतो आणि वास्तववादी दुनियेचा त्याचा सामना होतो. याचे दीर्घ लेखन या कादंबरीत आहे. वाचनाचा एक अमूर्त अनुभव आपल्याला या कादंबरीतून मिळतो.

८. उपरा 

Image result for उपरा  book

• लेखक- लक्ष्मण माने

भटक्या विमुक्त जातींचे प्रश्न व त्यांचा दाह किती असतो याची जाणीव लक्ष्मण माने ” उपरा ” या पुस्तकातून आपल्याला करवून देतात. माणूस असूनदेखील फक्त जातीमुळे आणि परंपरेमुळे कष्टाचे जीवन जगणारे काही लोक एक विशिष्ट मर्म देऊन जातात. या पुस्तकाचे वाचन झाल्यावर अनेक प्रश्न सोडवले गेले आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी यामध्ये पुढाकार घेतला.

९. दासबोध 

Image result for दासबोध book

• लेखक- समर्थ रामदास स्वामी

“दासबोध” हा ग्रंथ समर्थ रामदासांनी रचला. त्याचे लिखाण त्यांचे शिष्य कल्याण स्वामींनी केले. दासबोध या ग्रंथाचा एकूण २० दशकांमध्ये विस्तार आहे, प्रत्येक दशकात १० समास आहेत. समर्थांनी सांसारिकांच्या, साधूंच्या, सर्व मानवजातीच्या मनाला उपदेश केला आहे. मानवी जीवन कसे उन्नत प्राप्त करू शकते याचे अपूर्व वर्णन या ग्रंथात आहे. या ग्रंथाचे पारायण देखील महाराष्ट्रात होत असते. 

१०. गीता रहस्य 

Image result for गीता रहस्य  book

• लेखक- बाळ गंगाधर टिळक

गीता हा धर्मग्रंथ आयुष्याच्या शेवटी अभ्यासायचा असतो अशी समजूत खोडून काढत ” गीता रहस्य ” या ग्रंथात लोकमान्य टिळकांनी “निष्काम कर्म” हा मुद्दा पटवून सांगितला आहे. आयुष्याला कंटाळून आणि जबाबदारीला झटकून टाकून काहीजण वैराग्य निवडतात मात्र आधी कर्म करा आणि मग संन्यास घ्या असे परखड मत लोकमान्य टिळक यांचे आहे.

११. ग्रामगीता

Image result for ग्रामगीता book

लेखक- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

खूप नैसर्गिक, अध्यात्मिक आणि साधे जीवन हे गावाकडचे असते. भारत हा गावागावात वसलेला आहे. त्याची नाळ ओळखून भौतिक सुखांच्या मागे न लागता व नुसती उठाठेव न करता ग्रामीण जीवन हे कितीतरी पटीने चांगले आहे. याचेच कथन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ” ग्रामगीता ” या ग्रंथात केले आहे.

१२. श्यामची आई

Image result for श्यामची आई book

लेखक- साने गुरुजी

स्वतःचे जीवन घडवण्यामागे आईचा किती मोलाचा वाटा होता याचे कथन साने गुरुजी आपल्या लहानपणीच्या प्रसंगातून करतात. श्यामचे निखळ जीवन वाईट प्रवृत्तींपासून अलिप्त राहावे यासाठी आईचे एक वेगळेच संस्करण होते. वेगवेगळे प्रसंग वाचकांना भावनात्मक बनवतात.” श्यामची आई ” पुस्तकातून मानवी गुण व संस्कार यांचे महत्त्व कळून येते. 

तर हि Best Marathi books of all time ची पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.

हे सुद्धा वाचा- 151+ Famous Marathi Quotes | मराठी सुविचार संग्रह

The post Best Marathi Books of All time | सर्वोत्तम मराठी पुस्तके आणि कादंबऱ्या appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/best-marathi-books/feed/ 0 1168
प्रेसिडेंट ट्रम्प यांचे धक्कादायक विधान! जाणून घ्या काय म्हणाले ट्रम्प! https://dailymarathinews.com/president-trump-on-irans-strike/ https://dailymarathinews.com/president-trump-on-irans-strike/#respond Wed, 08 Jan 2020 17:57:57 +0000 https://dailymarathinews.com/?p=1161 इराण आर्मी चीफला मारल्यानंतर इराणचा प्रतिहल्ला आज झाला. इराणने केलेल्या प्रतिहल्ल्यात अमेरिकी आणि ब्रिटिश सैनिक मारले गेल्याची बातमी होती. इराणने या हल्ल्यानंतर युनायटेड नेशन्सला पत्र ...

Read moreप्रेसिडेंट ट्रम्प यांचे धक्कादायक विधान! जाणून घ्या काय म्हणाले ट्रम्प!

The post प्रेसिडेंट ट्रम्प यांचे धक्कादायक विधान! जाणून घ्या काय म्हणाले ट्रम्प! appeared first on Daily Marathi News.

]]>
इराण आर्मी चीफला मारल्यानंतर इराणचा प्रतिहल्ला आज झाला. इराणने केलेल्या प्रतिहल्ल्यात अमेरिकी आणि ब्रिटिश सैनिक मारले गेल्याची बातमी होती. इराणने या हल्ल्यानंतर युनायटेड नेशन्सला पत्र लिहीत आपण हा हल्ला आत्मरक्षेसाठी केला असल्याचे सांगितले. यावर अमेरिकेचे उत्तर ऐकण्यास आज सर्व जण आतुर होते. डोनाल्ड ट्रम्प यांचा मुद्दा काय असेल यावरच सर्वांचे लक्ष होते.

आत्ताच झालेल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सजगतेचा सल्ला दिला. इराणने केलेल्या प्रतिहल्ल्यात कुठलाही अमेरिकी सैनिक मारला गेला नाही आणि नुकसान देखील थोडेसेच झाले असे त्यांनी सांगितले. इराणचा हा हल्ला निषेधार्थ आहे असे म्हणताना इराणला वेळ पडल्यास स्वतःची ताकत दाखवण्याची देखील तयारी ट्रम्प यांनी दाखवली.

GST Information in Marathi | जीएसटी म्हणजे काय?

इराणला ज्यापद्धतीने नैसर्गिक संसाधने लाभली आहेत त्याप्रकारे तो एक शांत आणि प्रगत देश बनू शकेल. आयएसआय आता पुन्हा जन्म घेता कामा नये. इराणला आतंकवाद सोडावा लागेल. शस्त्रांचा उपयोग करणे अमेरिकेचा उद्देश्य नाही. अमेरिकेची सेना अगोदरपेक्षा खूप सक्षम आहे. सर्व देशांनी विशेषकरून चीन, रशिया , फ्रान्स आणि जर्मनी, आणि अमेरिका या राष्ट्रांनी एकत्र या संकटाचा सामना केला पाहिजे.

आतंकवाद समूळ नष्ट करणे हे सर्व लोकशाही देशांचे कर्तव्य असले पाहिजे. इराण या
सल्ल्यानंतर जर ऐकणार नसेल तर आम्ही आमचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. तसेच इंधन आणि गॅस बाबतीत अमेरिका आज कोणावरही अवलंबून नाही असेही ट्रम्प यापुढे म्हणाले.

The post प्रेसिडेंट ट्रम्प यांचे धक्कादायक विधान! जाणून घ्या काय म्हणाले ट्रम्प! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/president-trump-on-irans-strike/feed/ 0 1161
Latest New Year Messages in Marathi | नवीन वर्षाचे शुभेच्छा संदेश. https://dailymarathinews.com/new-year-messages-in-marathi/ https://dailymarathinews.com/new-year-messages-in-marathi/#respond Mon, 23 Dec 2019 06:02:43 +0000 https://dailymarathinews.com/?p=1097 नवीन वर्षाचे शुभेच्छा संदेश | New Year Messages in Marathi आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत New Year Messages in Marathi. आम्ही काही जबरदस्त ५१+ ...

Read moreLatest New Year Messages in Marathi | नवीन वर्षाचे शुभेच्छा संदेश.

The post Latest New Year Messages in Marathi | नवीन वर्षाचे शुभेच्छा संदेश. appeared first on Daily Marathi News.

]]>
नवीन वर्षाचे शुभेच्छा संदेश | New Year Messages in Marathi

आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत New Year Messages in Marathi. आम्ही काही जबरदस्त ५१+ मराठी मॅसेजेस चे संकलन करून या आर्टिकल मध्ये अपलोड केले आहेत. तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा इमेजेस देखील यामध्ये आम्ही दिलेल्या आहेत तरी त्या message किंवा image वर क्लिक करून ती डाउनलोड करू शकता.

“हे नवीन वर्ष आपल्याला खूप आनंद आणि मजा आणू शकेल. तुम्हाला शांती, प्रेम आणि यश मिळेल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!”


“मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल. आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!”


“मी आशा करतो की नवीन वर्ष सुरू होणार आहे तेव्हा आपले आयुष्य आश्चर्य आणि आनंदाने भरलेले असेल. आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आशीर्वाद मिळावा”


“आपण केलेल्या सर्व चांगल्या आठवणी लक्षात ठेवा आणि हे जाणून घ्या की येत्या वर्षात आपले आयुष्य आश्चर्यकारांनी भरलेले असेल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२०”


“अजून एक अद्भुत वर्ष संपणार आहे. पण काळजी करू नका, आणखी एक वर्ष आपल्या जीवनास अमर्याद आनंदांनी सजावटण्याच्या मार्गावर आहे! नवीन वर्षाच्या शुभेच्छा!”


“नवीन वर्ष आपल्यास खरोखर पात्र असलेल्या जीवनात सर्व चांगल्या गोष्टी आणेल. आपल्याकडे आधीपासूनच आश्चर्यकारक वर्ष आहे आणि आपल्याकडे आणखी एक आश्चर्यकारक वर्ष आहे!”


“माझ्या आयुष्यात तुमची उपस्थिती खुल्या दाराप्रमाणे आहे जी मुबलक प्रमाणात आनंद आणि आनंदाचे स्वागत करते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२०!”


“आयुष्य खूप चढउतारांनी भरलेले आहे परंतु धन्यवाद लोकांनो, मी कधीही निराश होऊ शकत नाही. माझे समर्थन केल्याबद्दल धन्यवाद. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.”


“नवीन वर्ष आहे, नवीन आशा आहेत, नवीन संकल्प आहे, नवीन आहात पुन्हा एकदा सर्व दिवस! २०२० हे नवीन वर्ष एक आशादायक आणि परिपूर्ण वर्ष आहे!”


नवीन वर्षाचे १२ महिने आपल्यासाठी नवीन यशांनी परिपूर्ण होऊ शकतात. आपण आणि आपल्या कुटुंबासाठी हे सर्व महिने व नवीन वर्ष अनंतकाळच्या आनंदाने भरले जावो!


तुमच्या आयुष्यात नवीन वर्षाचा आनंद सर्वकाळ राहील. आपल्या इच्छित गंतव्यस्थानाकडे नेणारा प्रकाश आपल्याला सापडेल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

New Year Messages in Marathi

ताज्या आशा, ताज्या योजना, ताजे प्रभाव, ताजे परिणाम. नवीन वर्षामध्ये स्वागत आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा !


नवीन वर्ष हे कोरे पुस्तकासारखे असते.  कर्मरुपी पेन आपल्या हातात आहे. स्वत: साठी एक सुंदर कथा लिहिण्याची संधी आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!


“हे नवीन वर्ष आपल्यासाठी आणलेल्या रंगांनी आपले जीवन सजवण्याची वेळ आली आहे. हजारो विजेच्या तार्‍यांपेक्षा तुमचे जीवन उजळ होवो! नवीन वर्षाच्या शुभेच्छा!”


मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्यासाठी सकारात्मकतेने भरलेले असेल. आपल्यासाठी हे वर्ष आनंदाने स्वीकारण्याची वेळ आली आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!


माझ्या सर्व दु:खाचा आणि कसोटीच्या काळाचा शेवट करण्यासाठी प्रत्येक दिवस हा नव्याने येत असतो.सर्व दिवस असेच आनंदाने भरलेले असो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!


नवीन वर्षाची सुरुवात नवीन आनंद आणि शांतीने भरलेल्या जीवनासह होऊ द्या. आपणास समता, एकता आणि समृद्धी मिळो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!


जोपर्यंत आपण माझ्याबरोबर असता तोपर्यंत नवीन वर्ष साजरा करण्यासाठी मला इतर कोणत्याही कारणाची आवश्यकता नाही. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!


अजून एक वर्ष संपले, अजून एक वर्ष आले. मी तुमच्यासाठी अशी इच्छा करतो की, दरवर्षी तुम्ही तुमची सर्व स्वप्ने साध्य कराल. देव तुमच्यावर प्रेम आणि काळजी ओतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!


सहज मिळो न मिळो यश. परंतु प्रयत्न करे सहज. अशा प्रयत्नांसाठी तुम्हाला नवीन वर्षी यश जरूर मिळेल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


हा जमानाच धावपळीचा आहे. क्रिकेट असो की आयुष्य! आता वेळ आहे २०-२० ची! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


New Year Messages for family! नवीन वर्षाच्या कुटुंबीयांना शुभेच्छा संदेश!

New Year Messages in Marathi

कलह आणि वाद क्षणाचे असतात. नाती जीवनभर चालतात. सर्व रुसवे फुगवे सोडून देऊन नव्या वाटचालीची सुरुवात करा! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


एकत्र असल्याची भावना ही आणखीनच दृढ होत जावो आणि तुम्हा सर्वांना एक अथांग शांतता या नवीन वर्षी लाभो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


ही योजना का असावी की नवीन वर्ष असावे. काहीतरी नव्याने सुरुवात करण्याची आणि संकल्प पूर्ण करण्याची मुहूर्तमेढ असावी. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


एक कॅलेंडर बदलत जाते. त्याच्या आठवणी बदलत नाहीत. एक एक दिवस नवीनच असतो. जुने सारे विसरून एक नवीन चांगली आठवण या वर्षी कुटुंबासोबत जोडूया. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


लागते जणू स्थितप्रज्ञ कोणी. असेच आपण का होऊ नये. आनंद घेता घेता देऊ शकणारे कोणी आपण का होऊ नये! या नवीन वर्षात आपले कुटुंब आणखीनच समृद्ध, सुखी व आनंदी होवो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


अनुभूती आनंदाची व्हावी एकत्र आपल्या या कुटुंबात . लाभो सौख्य सगळ्यांना या नूतन वर्षात. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


New Year Messages on Resolution | नवीन वर्षाच्या शुभेच्छा – संकल्प!

New Year Messages in Marathi

लगेच मला वाटले की कॅलेंडर बदलावे. त्याबरोबरच एक दोन वाईट सवयीदेखील बदलाव्यात. संकल्प तर केला पण किती दिवस असेल काही सांगता येत नाही. तरीही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


हे मना ..न विचलित होता..सांगावे मज फक्त..चालू कोणत्या दिशा! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


नवीन वर्षात आपले सगळे संकल्प , इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत हीच प्रार्थना ! नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


अखंड धैर्य, अखंड विश्वास, अखंड धाडस या नूतन वर्षात तुमच्या पूर्ण आयुष्यात संचारो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


संकल्पाचा एक क्षण हा दुर्लक्षित असलेल्या आयुष्यात नवीन उमेद घेऊन येतो. अशीच उमेद या वर्षी तुम्हाला मिळो! नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!


सोज्वळ ते क्षण पराक्रमाच्या गर्तेत लोटून देऊन अथांग कर्तव्य आणि प्रयत्न आयुष्यात या नवीन वर्षी निर्माण होवो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


संकल्प तो तत्वांचा, स्वत्वाचा, आणि आकांशेचा पूर्णत्वास नक्कीच या नूतन वेळी जावो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


New Year Messages for Friends | नवीन वर्षाच्या शुभेच्छा – मित्रांसाठी

New Year Messages in Marathi

तुला भेटल्यावर प्रत्येक क्षण हे नवीन वर्षच असते. आपली मैत्री अशीच वर्षानुवर्षे चालत राहो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


जिवलग मित्र हे भावना आणि प्रेम दोन्ही वाटून देत आणि घेत असतात. या नवीन वर्षी खूप सारे मित्र असेच करो. नूतन वर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!


मैत्री नात्यातून फुलावी, बंधनाच्या पार जावी आणि आयुष्य समृद्ध करून जावी. हे वर्ष माझ्या सर्व मित्रांना सुखाचे आणि आनंदाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


जेव्हा अहंकार संपतो तेव्हा खरा मित्र बनतो. तो सगळ्यांचा सखा असतो अन् नात्यात सगळ्यांचा मुलगा! अशी मैत्री अन् नाती नवीन वर्षात आपल्या जीवनी येवो. नवीन वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा.


माझ्या सर्व मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना या नूतन वर्षी आरोग्य, समृद्धी, आणि शांती लाभो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


जरी असले अस्तित्व, तरी ते मित्ररुपी जाणवते. असतो तेव्हा एकच रस आणि स्वाद. असे प्रेम आणि जिव्हाळा मिळो सर्वांच्या आयुष्यात. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


New year Messages on Life in Marathi | नवीन वर्षाच्या शुभेच्छा – जीवन

New Year Messages in Marathi

जीवन असते सदाहरित, सदाबहार! आपला असावा फक्त तसा दृष्टिकोन! असे सर्वांचे जीवन नवीन वर्षी फुलत जावो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


आरोग्य, संपत्ती, आणि समृद्धी सतत सोबत राहणे हीच मनुष्याची गरज! जीवन त्याबरोबरच वाढत राहो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


संकल्प आणि प्रकल्प दोन्हींचा संगम म्हणजे हे जीवन. प्रत्येक क्षण फुलत जाणे हाच नियम. नवीन वर्षी आपले सर्व जीवनच रूपांतरित होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना! नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


वय कितीही असो. आपले नित्यकर्म प्रत्येक नवीन वर्षी जाणिवेने भरून गेले पाहिजे. ही जाणीव म्हणजे कृतज्ञता आणि स्वाभिमान. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


सारे ते सारे अरुप. रूपमयी जगते ते जीवन. अशा जीवनाचा प्रत्यक्षात साक्षात्कार म्हणजे प्रत्येक क्षण. असे क्षण आपल्या आयुष्यात वारंवार येवो हीच सदिच्छा. नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


सत्याचा प्रकाश, आणि ज्ञान आपल्या सगळ्यांच्या जीवनात दिपमान होवो. अशी प्रार्थना. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


खूप खूप आल्हादित होते मन जेव्हा येते नवीन वर्ष, नवीन महिना, नवीन दिवस, आणि नवीन क्षण. अशा या मंगलमयी वर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!


या नवीन वर्षी प्रत्येकाचे जीवन एका नवीन आशेने आणि कर्तुत्वाने गाजून जावे अशी देवाचरणी इच्छा! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


जिवाचे येणे जाणे जरी माहीत नसले तरी जीवनाचा उद्धार करून सत्याला प्राप्त करून घेणे या वर्षी सर्वांना जामो. नूतन वर्षी खूप खूप आभार!


गेलेले वर्ष अनुभव देऊन जाईल. येणारे वर्ष उमेद घेऊन येईल. येणाऱ्या वर्षात आरोग्य, सुख आणि आनंदाची प्राप्ती होवो हीच सदिच्छा! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


सदिच्छेच हे नवीन वर्ष सगळ्यांच्या आयुष्यात नवीन संकल्प, नवीन कर्तृत्व, नवीन जीवन घेऊन येवो हीच ईश्वरचरणी इच्छा! नूतन वर्षी सर्वांना मनापासून शुभेच्छा!


हे हि वाचा- GST Information in Marathi | जीएसटी म्हणजे काय?

The post Latest New Year Messages in Marathi | नवीन वर्षाचे शुभेच्छा संदेश. appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/new-year-messages-in-marathi/feed/ 0 1097
ही सर्पमैत्रीण महिला चक्क वासावरून साप पकडते… https://dailymarathinews.com/vidya-raju/ https://dailymarathinews.com/vidya-raju/#respond Thu, 19 Dec 2019 08:33:39 +0000 https://dailymarathinews.com/?p=1089 साप शोधणे व पकडणे ही एक कलाच आहे. या कलेत अनेक निपुण असतात. त्याबाबत त्यांनी प्रशिक्षण सुद्धा घेतलेले असते. साप पकडताना अनेक प्रकारची काळजी घ्यावी ...

Read moreही सर्पमैत्रीण महिला चक्क वासावरून साप पकडते…

The post ही सर्पमैत्रीण महिला चक्क वासावरून साप पकडते… appeared first on Daily Marathi News.

]]>
साप शोधणे व पकडणे ही एक कलाच आहे. या कलेत अनेक निपुण असतात. त्याबाबत त्यांनी प्रशिक्षण सुद्धा घेतलेले असते. साप पकडताना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. परंतु ती काळजी घेऊन चक्क वासावरून साप पकडणारी ‘सर्पमैत्रीण’ म्हणजे केरळमधील विद्या राजू.

सापांना पकडण्यासाठी घेतलेले प्रशिक्षण हे सर्पमित्रांना वास्तविकरीत्या साप पकडताना उपयोगी येते, परंतु यासाठी ते स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात. साप पकडताना त्याला शोधणेदेखील तेवढेच महत्त्वाचे असते. लोकांच्या माहितीनुसार साप इथे गेला, तिथे गेला, यावरून साप शोधावा लागतो. साप काही एकाच जागेवर थांबत नाही व लोक सांगतात तसे सर्पमित्राला अंदाज लावून साप शोधावा लागतो मात्र विद्या राजू हि सर्पमैत्रीण थोड्या वेगळ्या पद्धतीने साप पकडते तीदेखील चक्क वास घेत!

या वर्षी पावसामुळे केरळमध्ये अनेक प्रकारची नैसर्गिक हानी झालेली आहे. त्यातच वन्यजीवांचे अस्तित्व हे स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे अनेक सापांनी छोट्या मोठ्या घरात आश्रय घेतला आहे. यामुळे विद्या राजू यांचे काम खूपच वाढले आहे. त्यांना दिवसातून जवळजवळ पाच तरी कॉल येतात. विद्या राजू असल्यामुळे तेथील स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. साप आहे असे कळताच विद्या राजू यांना बोलावले जाते, त्या मग वासावरून सापाच्या जागेचा माग घेतात. त्यांनी अलीकडेच एका अजगराची देखील सुटका केलेली आहे. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. साप पकडण्याची पद्धत त्यांना नैसर्गिक मिळाल्याची त्यांचे म्हणणे आहे.

हि सर्पमैत्रीण साप पकडल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून देते. साप पकडण्यात विद्या राजू यांना चांगलेच कौशल्य प्राप्त झाले आहे. विद्या राजू यांचे सर्व स्थानिक खूपच आदर करतात. “एक महिला साप पकडते आणि तीदेखील वासावरून” ही बातमीच खूप विशेष आहे.

हे हि वाचा- ॲमेझॉन च्या जंगलांना वनवा, हे होतील जगावर त्याचे परिणाम…

The post ही सर्पमैत्रीण महिला चक्क वासावरून साप पकडते… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/vidya-raju/feed/ 0 1089
ऑस्ट्रेलियाला हरवणे खूपच अवघड पण… जाणून घ्या काय आहे मायकल वॉनचं मत. https://dailymarathinews.com/michael-vaughan-on-indian-cricket-team/ https://dailymarathinews.com/michael-vaughan-on-indian-cricket-team/#respond Fri, 06 Dec 2019 05:30:16 +0000 https://dailymarathinews.com/?p=1081 पूर्व इंग्लंड खेळाडू व कप्तान मायकल वॉन यांच्या समालोचकाच्या कारकिर्दीत अनेक वादविवाद त्यांनी ओढवून घेतले आहेत. भारतीय क्रिकेट बद्दल त्यांचे विचार हे सर्वश्रुत आहेत. परंतु हे ...

Read moreऑस्ट्रेलियाला हरवणे खूपच अवघड पण… जाणून घ्या काय आहे मायकल वॉनचं मत.

The post ऑस्ट्रेलियाला हरवणे खूपच अवघड पण… जाणून घ्या काय आहे मायकल वॉनचं मत. appeared first on Daily Marathi News.

]]>
पूर्व इंग्लंड खेळाडू व कप्तान मायकल वॉन यांच्या समालोचकाच्या कारकिर्दीत अनेक वादविवाद त्यांनी ओढवून घेतले आहेत. भारतीय क्रिकेट बद्दल त्यांचे विचार हे सर्वश्रुत आहेत. परंतु हे मत आता बदलताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, भारत असे तगडे संघ जर एकमेकांविरुद्ध उभे ठाकले तर चुरशीचा मुकाबला होतच असतो. परंतु ऑस्ट्रेलिया सारखा संघ त्यांच्या मायदेशात अशा रीतीने खेळतो की दुसरे संघ त्यांच्यासमोर हलकेच वाटतात.

मागील मालिकेत पाकिस्तानला ज्या पद्धतीने हरवले ते पाहता व भारतीय संघाची तुलना करताना मायकल वॉन यांचे मत असे आहे की, “ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशात हरवणे खूपच अशक्य आहे. आत्ता सद्यस्थिती पाहता टेस्ट क्रिकेट मध्ये नंबर १ ला असलेली विराट कोहलीची भारतीय क्रिकेट टीम हा कारनामा करू शकते.” 

मागील दोन वर्षातील भारतीय गोलंदाजीचा उंचावलेला स्तर हे त्यामागचे कारण आहे. भारतीय फलंदाजीचे सर्वजण नेहमीच कौतुक करत असतात परंतु आता ते चित्र पालटले आहे. भारतीय गोलंदाज हे कुठल्याही प्रतिस्पर्धी संघाचे वीस बळी टिपू शकतात. यामुळेच भारतीय संघ खूपच मजबूत बनला आहे. विराट कोहलीची पाच गोलंदाजांबरोबर खेळण्याची रणनीती यशस्वी ठरत आहे. पाचही गोलंदाज हे उच्चस्तरीय आहेत. त्यामुळे भारतीय संघ परदेशात जाऊन देखील विजय प्राप्त करू शकतो.

Idli recipe in Marathi । भरपूर आस्वाद घ्या! इडली रेसीपीचा

The post ऑस्ट्रेलियाला हरवणे खूपच अवघड पण… जाणून घ्या काय आहे मायकल वॉनचं मत. appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/michael-vaughan-on-indian-cricket-team/feed/ 0 1081
ह्या दिवाळीत खरेदी करा स्मार्ट टीव्ही फक्त सहा हजारात… https://dailymarathinews.com/smart-tv-under-six-thousand/ https://dailymarathinews.com/smart-tv-under-six-thousand/#respond Fri, 25 Oct 2019 10:54:43 +0000 https://dailymarathinews.com/?p=1022 ऐन दिवाळीत Samy Informatics या भारतीय कंपनीने एक स्वस्त स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. दिल्लीत Constitution Club मध्ये हा टीव्ही लाँच करण्यात आला. या टीव्हीची ...

Read moreह्या दिवाळीत खरेदी करा स्मार्ट टीव्ही फक्त सहा हजारात…

The post ह्या दिवाळीत खरेदी करा स्मार्ट टीव्ही फक्त सहा हजारात… appeared first on Daily Marathi News.

]]>
ऐन दिवाळीत Samy Informatics या भारतीय कंपनीने एक स्वस्त स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. दिल्लीत Constitution Club मध्ये हा टीव्ही लाँच करण्यात आला. या टीव्हीची निर्मिती भारतात करण्यात आली आहे असे कंपनीकडून सांगण्यात आलंय. टेक्निकल क्षेत्रातील स्पर्धा लक्षात घेता सर्व सामान्य लोकांना परवडेल अशा किमतीमध्ये हा टीव्ही दिवाळीमध्ये आणला आहे.

आतापर्यंतचा सर्वात स्वस्त टीव्ही असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अँड्रॉइड सिस्टम वर हा टीव्ही काम करेल. या टीव्ही मध्ये टफ्फेन गलासचा वापर करण्यात आला आहे. टणक ग्लासमुळे टीव्हीचा ग्लास तुटणार नाही. ३२ इंचाच्या या टीव्हीची किंमत फक्त ५९९९ रुपये असून केवळ ऑनलाइन पद्धतीनेच हा टीव्ही खरेदी करता येईल. ग्राहकांना जीएसटी आणि शिपिंग चार्ज वेगळा द्यावा लागणार आहे. 

एवढा स्वस्त?

जाहिराती दाखवण्यात येणार असल्यामुळे जाहिरातीचे पैसे हे कंपनीला मिळतील. जाहिराती हटवण्याचा पर्याय देखील ग्राहकांना मिळणार आहे. या कंपनीचे संकेतस्थळ आहे, पण टीव्हीची विक्री अॅपवरून करण्यात येणार आहे. त्यामुळे अॅप डाउनलोड करणे गरजेचे आहे. टीव्ही खरेदी करण्यासाठी अॅपवर आधार कार्डची नोंदणी करणे आवश्यक आहे.

आधार क्रमांक टाकल्यानंतरच हा टीव्ही ग्राहकांना खरेदी करता येईल. आधार कार्डवरील माहिती व अॅपवर भरलेली माहिती योग्य आहे का याची तपासणी केल्यानंतर ग्राहकांना हा टीव्ही खरेदी करता येईल. या दिवाळीत हा टीव्ही म्हणजे स्वस्त आणि मस्त अशी पाहण्याची फिलिंग!!!

हे सुद्धा वाचा- सरकारचा हा नवीन कॉम्प्युटर कोर्स नक्कीच आहे परिपूर्ण

The post ह्या दिवाळीत खरेदी करा स्मार्ट टीव्ही फक्त सहा हजारात… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/smart-tv-under-six-thousand/feed/ 0 1022
तारळे विभाग जरा जास्तच भिजला! रेकॉर्डब्रेक ३५०० मिलिमीटर पाऊस! https://dailymarathinews.com/record-break-monsoon-in-tarale-region/ https://dailymarathinews.com/record-break-monsoon-in-tarale-region/#respond Wed, 23 Oct 2019 06:32:19 +0000 https://dailymarathinews.com/?p=1011 पाटण तालुक्यात प्रतिवर्षी होणारा पाऊस हा बाकी विभागाच्या तुलनेत जास्तच असतो. पाटण तालुक्यातील तारळे विभाग हा अतिवृष्टीचा म्हणून ओळखला जातो. यावर्षी सलग पाच महिने पाऊस ...

Read moreतारळे विभाग जरा जास्तच भिजला! रेकॉर्डब्रेक ३५०० मिलिमीटर पाऊस!

The post तारळे विभाग जरा जास्तच भिजला! रेकॉर्डब्रेक ३५०० मिलिमीटर पाऊस! appeared first on Daily Marathi News.

]]>
पाटण तालुक्यात प्रतिवर्षी होणारा पाऊस हा बाकी विभागाच्या तुलनेत जास्तच असतो. पाटण तालुक्यातील तारळे विभाग हा अतिवृष्टीचा म्हणून ओळखला जातो. यावर्षी सलग पाच महिने पाऊस असल्याने शेतीचे नुकसानदेखील मोठ्या प्रमाणावर झाले आहे. दरवर्षी पंधराशे ते दोन हजार मिलिमीटर पडणारा पाऊस हा जास्तच आहे. परंतु यावर्षी गाठलेला उच्चांक म्हणजे ३५०० मिलिमीटर पाऊस.

महत्त्वाचे मुद्दे :

– रेकॉर्डब्रेक ३५०० मिलिमीटर पावसाची नोंद.
– २०१३ पासून ठेवलेल्या नोंदीनुसार यावर्षी तारळे भागात सर्वात जास्त पाऊस.
– १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट – दहा दिवसात तेराशे मिलिमीटर पाऊस. 
– ५ ऑगस्ट रोजी विक्रमी २२० मिलिमीटर पाऊस.
– तारळी धरणाचे दरवाजे पाच वेळा उघडावे लागले.
– पालमध्ये दोन वेळा घरात पाणी घुसण्याचा प्रसंग.
– शेतीचे व घरांचे जास्त प्रमाणात नुकसान.

मागील आठवड्यात असे वाटत होते की पाऊसाची सांगता झाली परंतु हा परतीचा पाऊस चांगलाच तग धरून आहे. आगामी काळात याचे नियोजन होणे गरजेचे आहे. तारळी धरण पूर्णवेळ भरलेलेच आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ओढे नद्या नाले दुथडी भरून वाहत होते.

हे सुद्धा वाचा- दिवसाची एक विधायक सुरुवात पहाटेच..!

The post तारळे विभाग जरा जास्तच भिजला! रेकॉर्डब्रेक ३५०० मिलिमीटर पाऊस! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/record-break-monsoon-in-tarale-region/feed/ 0 1011