थोडसं मनातलं Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 10 Jan 2024 04:19:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 थोडसं मनातलं Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 फक्त संक्रांतीलाच गोड बोलावं का? https://dailymarathinews.com/just-sankranti-laach-god-bolavam-ka/ https://dailymarathinews.com/just-sankranti-laach-god-bolavam-ka/#respond Wed, 10 Jan 2024 04:18:48 +0000 https://dailymarathinews.com/?p=6192 या मकर संक्रांतीला सर्वांना वास्तविक आनंदाची दिशा सापडावी. स्वकर्माने जीवनात समाधान निर्माण व्हावे.

The post फक्त संक्रांतीलाच गोड बोलावं का? appeared first on Daily Marathi News.

]]>
‘तिळगुळ घ्या गोड बोला’ हे वाक्य सर्वजण पाठ करून आहेत. मकर संक्रांतीला तिळगुळ वाटताना बोलले जाणारे हे वाक्य फक्त त्या दिवशीच सार्थकता निर्माण करते का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून केला जाणार आहे.

माणूस हा आपल्या स्वभावाप्रमाणे जगत असतो. परंतु बाहेरील परिस्थितीत त्याचे वागणे बदलत असते. प्रत्येक वेळी एकाच प्रकारची वागणूक राखणे शक्य होत नसते. आपण इतरही लोकांच्या संपर्कात येत असल्याने आपली वागणूक बदलत असते.

आपला स्वभाव मात्र निश्चित राहत असतो. आपण आतून कसे आहोत हे त्यामार्फत कळत असते. आपण आनंदी राहावे असे प्रत्येकाला वाटते परंतु आनंदाच्या संकल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असल्याने आनंद मिळेलच याची मात्र निश्चित ग्वाही देता येत नाही.

खऱ्या आनंदाचे आणि उत्साहाचे मानकरी व्यक्ती नेहमीच गोड भासतात. तर आनंदाच्या खोट्या संकल्पना मनात ठेऊन आणि अहंकाराला दुजोरा देणाऱ्या व्यक्ती या आपल्याला कटू स्वभावाच्या भासत राहतात.

मनात प्रेम आणि आनंद असेल तर गोडवा जाणवतोच. याउलट मनात घृणा, ईर्ष्या असेल तर मात्र स्वभावात कटुता जाणवते शिवाय अशा व्यक्तींचा गोडवा हा फक्त अभिनय मात्र असतो. अशा खोट्या जगण्याचा त्रास हा त्यांचा त्यांनाच होत असतो.

सुख, समाधान, आनंद अशा गोष्टी बाहेरील जगात न शोधता अंतरंगात शोधाव्या लागतात. त्या एकदा सापडल्या की आपण खऱ्या अर्थाने गोड स्वरुपात व्यक्त होत असतो. त्यामध्ये अभिनय नसतो. आतून कटुता आणि बाहेरून गोडवा अशा वागणुकीने आपण जीवन चालवत नसतो.

या संक्रांतीला किंवा प्रत्येक सणाला, एवढेच नाही तर प्रत्येक दिवशी आपण दुहेरी भूमिकेतून सामोरे न जाता एका समग्रतेने, उत्साहाने सहभागी होणे गरजेचे आहे. तरच आपण दररोज स्वभावात गोडवा निर्माण करून आपले जीवन आनंदी बनवू शकू.

या मकर संक्रांतीला सर्वांना वास्तविक आनंदाची दिशा सापडावी. स्वकर्माने जीवनात समाधान निर्माण व्हावे. परिणाम स्वरूप म्हणून नेहमीच गोडवा निर्मित व्हावा. तो आतून बाहेरून अभिव्यक्त व्हावा. फक्त संक्रांतीलाच नाही तर वर्षातील प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी तो झळकावा.

The post फक्त संक्रांतीलाच गोड बोलावं का? appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/just-sankranti-laach-god-bolavam-ka/feed/ 0 6192
खरे सौंदर्य म्हणजे काय? https://dailymarathinews.com/what-is-real-beauty/ https://dailymarathinews.com/what-is-real-beauty/#respond Fri, 10 Jun 2022 08:07:46 +0000 https://dailymarathinews.com/?p=4125 सौंदर्याची व्याख्या व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असते. कोणी बाहेरील जगात साैंदर्य शोधतो आणि त्यानुसार आपले जीवन घडवत जातो तर कोणी स्वतःमध्ये

The post खरे सौंदर्य म्हणजे काय? appeared first on Daily Marathi News.

]]>
सौंदर्याची व्याख्या व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असते. कोणी बाहेरील जगात साैंदर्य शोधतो आणि त्यानुसार आपले जीवन घडवत जातो तर कोणी स्वतःमध्ये साैंदर्य शोधतो आणि बाहेरील जगात त्याची प्रतिमा उमटते.

खरे सौंदर्य अनुभवण्यासाठी सूक्ष्म निरीक्षणाची गरज भासते. त्यावेळी आपल्याला मुख्य दोन बाबी जाणून घ्याव्या लागतील.

• शारिरीक अथवा भौतिक साैंदर्य (बाह्य)

• अंतर्दृष्टी व बाह्य दृष्टिकोन

१. शारिरीक / बाह्य साैंदर्य

शारिरीक साैंदर्य हे सुरुवातीला आकर्षणाचा बिंदू ठरत असते. परंतु कोणतेही व्यक्तिमत्त्व हे मानवी मूल्यांनी सजले नसेल तर असे सौंदर्य इतर व्यक्तींसाठी घातक ठरते.

शारिरीक साैंदर्य हे एका वयोमर्यादेपर्यंतच छान वाटते. परंतु त्याचा लाभ मात्र इतर लोकांना होत असतो. आयुष्यभर आपण शारिरीक सौंदर्याचा पुरस्कार करून जगू शकत नाही.

स्वभावातील गुण म्हणजे आपली समज, आपला विवेक हेच आपल्याला वयासोबत वाढवावे लागतात.

स्वभावातील काही गुण हे सुरुवातीला छान वाटतात जसे की विनोदी बुद्धी, आत्मविश्वास ई. परंतु ते गुण अहंकारात रूपांतरित होत जातात हे आपणांस समजत देखील नाही. अशा व्यक्ती कर्तुत्वाने मोठ्या बनतात परंतु खऱ्या अर्थाने समाजासाठी घातक ठरत असतात.

उदा. एखादा व्यक्ती यशस्वी झालाच तर तो लगेच प्रसिद्ध होतो परंतु त्याचे साैंदर्य हे त्याचे कर्तृत्व होते. समजा आता तो स्वतःच्या अधिकार पदाचा गैरवापर करू लागला तर असा व्यक्ती हळूहळू स्वतःची प्रतिमा कुरूप बनवत जातो.

खरे सौंदर्य हे बाहेरील जगात आपण किती यशस्वी आहे यावर अवलंबून नाही तर ते आपण आतून कसे आहोत? आपण आनंदी आहोत का? आणि आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक आहे की नाही? अशा प्रश्नांच्या उत्तरांवर अवलंबून आहे.

२. अंतर्दृष्टी आणि बाह्य दृष्टिकोन

खऱ्या सौंदर्याचा विचार केल्यास आपणांस जाणवेल की आपण आनंदी व निरोगी असायला हवे. त्यासाठी शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवणे व ते वाढवत नेणे हा एक पर्याय सुरुवातीला आपल्या समोर उरतो.

शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्याच्या संकल्पना आपल्या समोर स्पष्ट होत गेल्या की आपण आपल्यासमोर त्याहीपेक्षा उदात्त जीवनाचे ध्येय ठेवू शकतो.

उदात्त जीवनाचे ध्येय ठरवताना आपली अंतर्दृष्टी विकसित होत जाणे अत्यावश्यक आहे. आपल्याला आपलेच जीवन समजत जाणे गरजेचे आहे.

जीवनाचे अंतर्बाह्य निरीक्षण आणि परीक्षण अशा बाबी आपल्याला स्वतःच्या आंतरिक विकासात उपयोगी ठरू शकतील. स्वतःचा आंतरिक विकास शक्य होत गेला की आपला सर्वांप्रती असलेला दृष्टिकोन सकारात्मक, स्पष्ट आणि सुंदर होत जातो.

सकारात्मक दृष्टिकोनच आपल्याला आनंदाची अनुभूती करून देत असतो. त्यासोबतच सर्वत्र सौंदर्याची जाणीव विकसित होत जाते. आपली नजर स्वच्छ होत जाते आणि त्यामध्येच खरे सौंदर्य असल्याचे समजते.

आपण इतरांना कोणत्या नजरेने पाहतो यातच अस्सल सुंदरता सामावलेली असते. अशा नजरेतून आपले व्यक्तिमत्त्व हे संवेदनशील आणि सुंदर बनत जाते. करुणा, कृतज्ञता असे गुण आपल्या व्यक्तिमत्त्वात झळकत जातात.

आपण दिवसेंदिवस शांत, आनंदी आणि समाधानी होते जाणे यातच जीवनाचे सौंदर्य सामावले असल्याने आपल्या दिवसातील बहुतांश वेळ हा अंतर्दृष्टी विकसित करण्यासाठी दिला गेला पाहिजे.

निष्कर्ष –

सुंदरता ही आंतरिक आणि बाह्य स्वरूपाची असते. बाह्य सौंदर्याचा लाभ हा इतरांना होत असतो. इतर लोक अशा बाह्य सौंदर्याचा लाभ स्वतःच्या स्वार्थासाठी घेऊ शकतात.

परंतु स्वतःचा स्वभाव, स्वतःचे जीवन समजून घेणे आणि आंतरिक विकास साधत जाणे यातून मानवी मूल्ये विकसित होत जातात आणि आपली दृष्टी सुंदर बनत जाते. वास्तविक पाहता अशा सौंदर्याचा लाभ सर्वस्वी स्वतःला आणि इतरांनाही होत असतो.

The post खरे सौंदर्य म्हणजे काय? appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/what-is-real-beauty/feed/ 0 4125
माझ्यातील वाईट सवयी मी कशा बदलल्या… https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/ https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/#respond Wed, 08 Dec 2021 07:13:42 +0000 https://dailymarathinews.com/?p=2919 आपल्याला वाईट अनुभव येतो ती सवय वाईट आणि ज्या सवयीने आपल्याला जीवनाचा चांगला अनुभव येतो ती सवय चांगली

The post माझ्यातील वाईट सवयी मी कशा बदलल्या… appeared first on Daily Marathi News.

]]>
सवय ही सवय असते. तिला वाईट आणि चांगली असे आपण म्हणत असतो. तरीही वाईट सवय म्हणजे ज्या सवयीने आपल्याला वाईट अनुभव येतो ती सवय वाईट आणि ज्या सवयीने आपल्याला जीवनाचा चांगला अनुभव येतो ती सवय चांगली!

उदाहरण

• चांगल्या सवयी –

१. व्यायाम / योगा करणे
२. मदत करणे
३. नाती सुधारणे
४. सकाळी लवकर उठणे
५. उत्साही, आनंदी राहणे
६. मैदानी खेळ
७. छंद जोपासणे

• वाईट सवयी –

१. रात्री जागरण करणे
२. मोबाईल आणि टीव्हीचा अतिवापर
३. व्यसन
४. आळस
५. कोणताही खेळ न खेळणे
६. निंदा करणे
७. अभ्यास न करणे
८. टाइमपास करणे

वरील सांगितलेल्या सवयी या अशा चांगल्या आणि वाईट सवयी आहेत ज्यामुळे तुम्हाला चांगला आणि वाईट अनुभव प्राप्त होऊ शकतो.

मी वाईट सवयी कशा बदलल्या ?

मी यापूर्वी देखील एका लेखात असे सांगितले होते की मी डायरी लिहतो. त्यामुळे स्वतःच्या वाईट सवयी, वाईट वर्तणूक, आणि वाईट अनुभव लगेच समजून घेता येतात. टीव्ही पाहणे हे वाटते तेवढे वरवरचे नाही. आपल्या स्वभावानुसार आणि सुप्त इच्छांनुसार आपण टीव्ही चॅनल्स पाहत असतो.

टीव्ही पाहणे –

प्रत्येक वयातील लोकांसाठी चॅनल्स उपलब्ध असल्याने लहान थोर असे सर्वजण टीव्हीचा आनंद घेत असतात परंतु यामध्ये त्यांच्या मनाची जडणघडण देखील त्याच पद्धतीने होत असते हे लक्षात घ्यावे लागेल. पूर्वी चित्रपट पाहण्याची सवय असल्याने चित्रपटातील आयुष्य जसे दाखवले जाते तसेच आयुष्य असते असा माझा गैरसमज खूप मोठे झाल्यावर तुटला.

वास्तविक जीवनात जगताना लोकांशी संवाद साधणे, एकमेकांची काळजी घेणे, उल्हासपूर्ण दिवस व्यतित करणे याबद्दल माझ्या संकल्पना चित्रपटात दाखवतात तशा होत्या. हिरो जे काही करेल तेच सत्य आहे असे वाटल्याने तो जो मूर्खपणा करेल तसेच आपणही आपल्या जीवनात करण्याचा प्रयत्न करत असतो.

टीव्हीत दाखवले जाणारे प्रेम, हिंसाचार, मानवी भावनांचा उद्रेक, या सर्व गोष्टी इतक्या रंजक पद्धतीने दाखवल्या जातात की नक्की मूर्ख कोण आहे तेच कळत नाही, टीव्हीवर जे लोक काम करत आहेत ते, जे मालिका / चित्रपट बनवत आहेत ते, की आपण! मी जेव्हा टीव्ही पाहण्याची सवय मोडली तेव्हा मला एका वास्तविक जीवनाची दिशा मिळत गेली.

टीव्ही पाहिल्याने एक काल्पनिक आणि अवास्तविक जग आपल्याला दिसत राहते. जीवनातील खरे अनुभव त्याहून खूप वेगळे असतात. ती सवय मोडण्यासाठी मी टीव्हीपेक्षा जास्त चांगला अनुभव कोणत्या गोष्टीतून घेऊ शकतो याचा सर्वप्रथम विचार केला.

मग मला मैदानी खेळ, चित्रकला, वाचन असे पर्याय दिसू लागले. ते मग मी हळूहळू जोपासू लागलो. काही महिन्यांतच टीव्ही पाहणे मला कंटाळवाणे वाटू लागले. मी जोपासलेल्या छंदातच मला गंमत वाटू लागली.

त्यानंतर फक्त टीव्हीच नाही तर मोबाईलवर टाइमपास करणे, इकडेतिकडे फालतू गप्पा मारणे, वादविवाद करणे, अभ्यास न करणे अशा कितीतरी गोष्टी आपोआप बदलल्या. सध्या मी खूप क्रिएटिव्ह आणि आनंद देणाऱ्या सवयी लावून घेतलेल्या आहेत.

त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या वाईट सवयी आणि चांगल्या सवयी समजून घेऊन त्यावर काम केलंत की तुम्हाला जीवनाचा एक अप्रतिम अनुभव येऊ शकेल.

The post माझ्यातील वाईट सवयी मी कशा बदलल्या… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/feed/ 0 2919
वय कोणतेही असो स्वतःची काळजी स्वतः घेणे | https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%83%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%83-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a5%87/ https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%83%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%83-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a5%87/#respond Tue, 09 Nov 2021 05:30:11 +0000 https://dailymarathinews.com/?p=2834 वय कोणतेही असो स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिकणे अनिवार्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सेवा भाव हा गुण

The post वय कोणतेही असो स्वतःची काळजी स्वतः घेणे | appeared first on Daily Marathi News.

]]>
वय कोणतेही असो स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिकणे अनिवार्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सेवा भाव हा गुण खूप महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. स्वतः सेवा करणे आणि त्याचे परिणाम म्हणून समाधानी आयुष्य जगणे ही संकल्पना पूर्वी असायची.

सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञान अति विकसित होत असल्याने मानव आळशी आणि परावलंबी बनत चालला आहे. सेवा करणे हा भाव तर सोडाच पण तो स्वतःची देखील काळजी घेणे विसरला आहे. मानवाला अशा काही सवयी आणि व्यसने जडलेली आहेत ज्यामुळे स्वतःचे होणारे नुकसान देखील त्याला समजत नाहीये.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत आसपास खूप सारे लोक असायचे जे एकमेकांची काळजी घेऊ शकतील. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लयास चालली आहे. बहुसंख्य लोकं एकलकोंडी बनत चालली आहेत. त्यामुळे होणारे नुकसान व फायदे हे ज्याचे त्यालाच पाहावे लागत आहेत.

अशा समाज रचनेत आपण इतरांकडून सेवेची आणि मदतीची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यामुळे जसजसे आपण मोठे होत जाऊ तसतसे स्वावलंबी बनणे अत्यावश्यक आहे. शारिरीक व मानसिक आरोग्य याबाबत सजग असणे ही काळाची गरज बनली आहे.

सुरुवातीला पालकांनी आपल्या मुलावर स्वावलंबी बनण्याचे संस्कार करणे गरजेचे आहे. त्यानंतर तीच मुले आयुष्यभर स्वतःची काळजी स्वतः घेण्यास सक्षम असतील. स्वावलंबी बनण्याचे संस्कार जर झाले नसतील तरी ते हळूहळू आपण व्यक्तिमत्त्वात रुजवू शकतो.

स्वतःची कामे स्वतः करणे आणि स्वतःची दैनंदिन पातळीवर काळजी घेणे याची सुरुवात आजपासून केल्यास भविष्यात बहुतांश नुकसान आणि इतरांकडून असलेली अपेक्षा आपण टाळू शकू.

काळजी घेणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रयत्नशील असणे, स्वतःच्या गरजा आणि अपेक्षा ओळखून जीवन व्यवस्थित आणि आनंदी व्यतित करणे. प्रत्येक व्यक्ती अशा जबाबदारीने भारावून गेल्यास तो नक्कीच स्वतःच्या कुटुंबासाठी आणि दुसऱ्या व्यक्तींसाठी प्रेरणा ठरू शकेल.

The post वय कोणतेही असो स्वतःची काळजी स्वतः घेणे | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%83%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%83-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a5%87/feed/ 0 2834
मित्रांचा दबाव जाणवतो … https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a4/ https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a4/#respond Tue, 26 Oct 2021 05:32:40 +0000 https://dailymarathinews.com/?p=2774 मित्रांच्या दबावाला बळी पडणे ही वरवरची गोष्ट नाही तर आपण तसे दबाव टाकणारे मित्रच निवडले आहेत ही सत्य परिस्थिती स्वीकारावी

The post मित्रांचा दबाव जाणवतो … appeared first on Daily Marathi News.

]]>
मित्रांच्या दबावाला बळी पडणे ही वरवरची गोष्ट नाही तर आपण तसे दबाव टाकणारे मित्रच निवडले आहेत ही सत्य परिस्थिती स्वीकारावी लागेल.

मित्र म्हटले की जीव की प्राण! असा गैरसमज आपणाला अनेकवेळा होत असतो. चित्रपट, मालिका, आणि वेबसीरिज मधून आपल्याला वारंवार तसे दाखवले सुद्धा जाते. अशा पद्धतीचे संस्कार सध्याच्या पिढीत खूप संक्रमित होत आहेत.

मित्र असणे ही खूपच सुखदायी गोष्ट आहे. ज्या लोकांच्या सवयी किंवा व्यसनं समान असतात असे लोक एकमेकांचे मित्र असतात. त्यामुळे मित्रता ही वेगवेगळ्या स्तरावर अनुभवली जाते.
      
काही लोक जे चांगल्या सवयींमुळे चांगले मित्र असतील ते दूर असले तरी त्यांची जवळीक मात्र कायम असते. ते स्वतःच्या फायद्यासाठी एकमेकांचा गैरवापर करत नाहीत. याउलट दोस्ती ही कल्पना काहीतरी भन्नाट आहे असे समजून जे लोक जीवन जगतात, ते एकमेकांच्या आयुष्यातील स्वातंत्र्य आणि वेळ हिरावून घेत असतात.
     
व्यक्ती जेवढी मनाने चांगली असेल तेवढीच विश्वासू देखील असते. अशा लोकांची मैत्री ही कधी दबाव वाटत नाही. याउलट जे लोक सतत कलहग्रस्त असतील, ज्यांच्या घरातील लोक उद्धट असतील आणि तशाच संस्कारांनी तेसुद्धा उद्धट बनले असतील, अशा लोकांची मैत्री म्हणजे नुसता टाईमपास आणि दबावच दबाव असतो.
    
त्यामुळे स्वतःचे जीवन घडवणे, जीवनात काहीतरी ध्येय असणे खूप गरजेचे आहे. अशा ध्येयाने प्रेरित लोक व्यर्थ आणि निरर्थक मैत्रीला बळी पडत नाहीत. उलट ते नेहमी उत्तम लोकांच्या संगतीत वेळ घालवतात. तुमच्या जीवनात काही चांगल्या सवयी आणि ध्येय असूद्या ज्यामुळे तुमचे जीवन चांगले होईल. मग अशाच सवयी असणाऱ्या व्यक्तींसोबत मैत्री करा.
    
ध्येय स्पष्ट नसेल, आयुष्यात महत्त्वपूर्ण असे काही करण्यास नसेल तर मात्र मित्रांच्या संगतीत वेळ घालवणे एवढे एकच काम उरते. मग तेही रिकामटेकडे आणि आपणही! मग जगण्यासाठी जी प्रेरणा आणि ऊर्जा आवश्यक असते ती नसल्याने एकमेकांवर दबाव टाकला जातो. विनाकारण भावनिक होऊन एकमेकांना मानसिक त्रास देणे सुरू होते.
     
अशा वर्तनातून मग व्यसन सुद्धा केले जाऊ शकते. तशा प्रकारचे चित्रण आपण टीव्ही, मोबाईलवर पाहतच असतो. मित्र म्हटले की उनाडक्या करत फिरणे, कॉलेजमध्ये देखील दंगामस्ती करणे, मोठ्या व्यक्तींचा आदर न करणे, भांडणतंटे करणे, वासनेला प्रेमाचे रूप देऊन फसवणूक करणे, अशा सर्व प्रकारच्या गोष्टी चित्रपटातून आपला आवडता हिरो करत असतो मग आपण कसे काय मागे राहू शकू?
    
अशा वर्तणुकीत मोबाईलवर सतत टाईमपास करणे, सोशल मीडियाचा अतिवापर, सिनेमे, वेबसेरीज मधून दाखवले गेलेले मैत्रीचे अवास्तव रूप खरे मानणे असे प्रकार सुरू होतात. अशा संस्कारांनी युक्त व्यक्ती मैत्रीत, प्रेमात, नात्यात फक्त दबाव आणि दबावच निर्माण करते.

आपण कधी दबावाला बळी पडू शकतो?

१. आपल्या सवयीच्या आणि स्वभावाच्या विपरीत व्यक्तीशी मैत्री केल्यावर आपण दबावाला बळी पडू शकतो.

२. नवीन मैत्री असेल तर नाही म्हणता येत नाही त्यामुळे सुरुवातीला अशा नाहक मैत्रीचा दबाव तुम्ही सहन करू शकता.

The post मित्रांचा दबाव जाणवतो … appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a4/feed/ 0 2774
प्रार्थनेचे महत्त्व | Importance of a Prayer In Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5/ https://dailymarathinews.com/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5/#respond Tue, 26 Oct 2021 05:27:10 +0000 https://dailymarathinews.com/?p=2771 सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना प्रार्थना करणे म्हणजे आपले जीवन कसे असावे याची रूपरेषा आपण नित्यनेमाने

The post प्रार्थनेचे महत्त्व | Importance of a Prayer In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रत्येक मंगळवारी किंवा रविवारी मंदिरात जाणे हा माझा आणि प्रदिपचा उपक्रम! ते दोन दिवस आम्ही तासभर तरी मंदिरात असतो. प्रार्थना करणे, तेथील भजन ऐकणे हे एवढे मनाला प्रसन्न करून जाते की टीव्हीवरील मनोरंजन त्यापुढे फिके पडते.

असाच एकदा प्रदिपची वाट पाहत मंदिराबाहेर उभा होतो. एक व्यक्ती भरभर चालत आला, मोबाईल वर बोलत होता तो, त्याने अशा गडबडीत चपला काढल्या न काढल्या तोच फोन वरून कोणालातरी अभद्र असे बोलू लागला. त्याचे ते शब्द मंदिराच्या वातावरणात अशोभनीय होते. प्रदीप येईपर्यंत मनात असा विचार आला की हा व्यक्ती जर सरळसरळ तोंडातून असे विचित्र शब्द बोलत असेल तर मनातून तो किती शिवीगाळ करत असेल.

तो पटकन मंदिरात गेला आणि 5 मिनिटात माघारी आला देखील! आता तर मला प्रश्नच पडला, का गेला असेल तो मंदिरात? पाच मिनिटे वेळ देऊन त्याने काय प्रार्थना केली असेल? प्रार्थनेसाठी किंवा देवदर्शनासाठी 5 मिनिट वेळ असावा तोदेखील मोबाईलवर शिवीगाळ करत करत!

प्रदीप आल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. पण तो प्रसंग माझ्या मनात अनेक प्रश्न ठेवून गेला. प्रार्थना जीवनात किती महत्त्वाची ठरू शकते? लहानपणी लागलेली एक सवय आपले पूर्ण जीवन बदलून टाकू शकेल का?

सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना प्रार्थना करणे म्हणजे आपले जीवन कसे असावे याची रूपरेषा आपण नित्यनेमाने स्वतः ला सांगत असतो. ते शब्द सातत्याने बोलले गेल्याने आपल्या मेंदूपर्यंत ती एक प्रकारे सूचना असते. त्या सूचनेचे पालन मनाला करावेच लागते. त्यामुळे प्रार्थना केल्याने खरोखरच मनःशांती लाभू शकते. असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

आपल्या अहंकाराला दुजोरा न देता प्रार्थनेत आपण देवाला उच्च स्थान देतो किंवा काही दैवी गुणांचा पुरस्कार करत असतो. त्यामुळे ते शब्द हे आपल्या जीवनात हळूहळू गुण बनून उतरत जातात. म्हणजेच आपण जे मनातल्या मनात बोलत राहतो तेच आपले वास्तविक जीवन बनत असते.

तो मंदिरातील 5 मिनिटांचा व्यक्ती जे शब्द फोनवर बोलताना वापरत होता त्याचे मन कसे असेल हे वेगळे काही सांगायची गरज नाही. अशा व्यक्तीच्या तुम्ही संपर्कात जरी आलात तरी तुमचे देखील मन अशातच होणार!

प्रार्थना केल्याने सुख समाधान लाभते कारण त्यासाठी तुमचे मागणे हे देवाकडे नसते तर स्वतःच्या चांगल्या जीवनासाठी तुम्ही केलेली मनोकामना असते. त्यामुळे प्रार्थना करताना देखील भौतिक वस्तूंची मागणी देवाकडे करू नये. ज्या गोष्टी मानवी प्रयत्नांनी शक्य आहेत त्या तर चुकूनही देवाकडे मागू नयेत. याउलट त्या गोष्टी मिळवण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांना यश येऊदेत… असं काही मागणं प्रार्थनेत असू शकेल.

प्रार्थनेने आपले विचार शुद्ध होत जातात. मन प्रसन्न आणि पवित्र बनत जाते. परिणामी जीवनात आनंद उतरू लागतो आणि खऱ्या मानसिक शांततेची अनुभूती येऊ लागते.

The post प्रार्थनेचे महत्त्व | Importance of a Prayer In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5/feed/ 0 2771
दिवाळीचा गृहपाठ | माझा दिवाळीचा अभ्यास | My Diwali Homework https://dailymarathinews.com/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8/ https://dailymarathinews.com/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8/#respond Tue, 26 Oct 2021 05:17:59 +0000 https://dailymarathinews.com/?p=2768 दिवाळीतील गृहपाठ म्हणजे करणे किंवा न करणे हा निर्णय घेण्यातच दिवाळीची सुट्टी संपून जायची.

The post दिवाळीचा गृहपाठ | माझा दिवाळीचा अभ्यास | My Diwali Homework appeared first on Daily Marathi News.

]]>
माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आहे परंतु गृहपाठ हा शब्द मला नेहमीच आठवणीत राहतो. त्यामध्ये दिवाळीतील गृहपाठ म्हणजे करणे किंवा न करणे हा निर्णय घेण्यातच दिवाळीची सुट्टी संपून जायची.

दिवाळीतील गृहपाठ थोडा दिला तर ठीक! पूर्ण 15 ते 20 दिवस लिहीत बसलो तरी पूर्ण होऊ शकणार नाही एवढा अभ्यास देऊन शिक्षक आपले काम करून जायचे. आम्हाला तर धक्क्यावर धक्के बसत असायचे कारण प्रत्येक विषयाचा अभ्यास लिहून घेण्यातच वहीची दोन ते तीन पाने संपलेली असायची.
दिवाळी सण सुरू होण्याअगोदर 5 – 6 दिवस सुट्टी सुरू व्हायची. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन करून आम्ही मोकळे!

पहिले एक दोन दिवस अभ्यास होईल तेवढं ठीक!नंतरचे दिवस म्हणजे किल्ला बनवणे, नवीन कपडे खरेदी, फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी बाजार, आकाश कंदील, अशा कितीतरी गोष्टींनी दिवस भराभर निघून जायचे.

अभ्यासाचे नियोजन आता पुढे ढकलले जायचे. आता अभ्यास दिवाळी झाल्यानंतर! दिवाळीतील फुल्ल धमाल करताना मात्र आमच्या वर्गातील मुली आम्हाला नेहमी काहीतरी अपराध करत असल्याचे जाणवून द्यायच्या. कारण त्यांना नियमित अभ्यास पूर्ण करणे म्हणजे सोप्पी गोष्ट वाटत होती आणि आम्हाला असे वाटायचे की अभ्यास केला तर खेळणे आणि मज्जा होणार नाही.

आता सुट्टीच्या शेवटच्या पाच सहा दिवसात अभ्यास सुरू केला तरी तो पूर्ण होणे अशक्यच! कारण खेळणे आणि मौजमजा करणे याची सवयच लागून गेलेली असायची. तरीही जड अंतःकरणाने केलेले गृहपाठ अजुन आठवतात.

एक प्रसंग नेहमी मला आठवतो. इयत्ता चौथीत असताना माझा दिवाळीचा अभ्यास दरवर्षीप्रमाणे पूर्ण नव्हता. त्यावेळी वर्गातील पहिला दिवस आणि मी तर पुरता घाबरलो होतो. आमच्या वर्ग शिक्षकांनी “अभ्यास दाखवा” असे बोलताच मला तर घामच फुटला.
        
वर्गातील इतर मुले माझ्याकडे बघून पुरती मज्जा घेत होत्या. शेवटी माझा मित्र विजय माझ्या कामी आला. शिक्षक गृहपाठ पाहताना कोणत्याही पेनाचा शेरा देत नव्हते त्यामुळे विजयची वही मीही दाखवणे साहजिकच होते. मी तसे केलेही परंतु शिक्षक ते शिक्षकच! मला वाटले होते की शिक्षकांना कळणार नाही. ते तेव्हा काही बोलले नाहीत पण सर्वांचा अभ्यास तपासून झाल्यावर मात्र मला पुढे घेऊन जो माझा अपमान केला तो विसरणे म्हणजे अशक्यच!

मला विजयची वही देऊन काही दिवसांची मुदत देण्यात आली आणि गृहपाठ पूर्ण करण्यास सांगितला. हा प्रसंग जेव्हा जेव्हा “दिवाळीचा अभ्यास” असेल तेव्हा तेव्हा आठवतोच! आजही आठवतो…

The post दिवाळीचा गृहपाठ | माझा दिवाळीचा अभ्यास | My Diwali Homework appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8/feed/ 0 2768
कर्माचे फळ तत्काळ मिळते | कर्म – फळ आणि संस्कार… https://dailymarathinews.com/%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%ab%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af/ https://dailymarathinews.com/%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%ab%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af/#respond Thu, 07 Oct 2021 08:41:03 +0000 https://dailymarathinews.com/?p=2642 आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत की आपण जे भोगतो ती आपल्या कर्माची फळे आहेत. ते वास्तविक सत्य आहेच

The post कर्माचे फळ तत्काळ मिळते | कर्म – फळ आणि संस्कार… appeared first on Daily Marathi News.

]]>
आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत की आपण जे भोगतो ती आपल्या कर्माची फळे आहेत. ते वास्तविक सत्य आहेच परंतु कर्माचे फळ तत्काळ त्याच क्षणी मिळते हेही तेवढेच सत्य आहे.

कर्म आणि फळ –

समजा आपण क्रोध केला तर त्याचे फळ आपल्याला त्याच क्षणी मिळत असते. त्याच क्षणी रक्तदाब वाढतो, त्याच हृदयाची धडधड वाढत असते. त्यानंतर काही वेळ तेच विचार त्याच भावना आपल्यावर परिणाम करत राहतात. अशा प्रकारची क्रोधाची घटना घडल्यावर आपल्याला दुःखद फळ तर त्याच क्षणी मिळते.

आपण कुटुंबात किंवा इतर ठिकाणी अधिकार पदावर असल्यास त्या रागाचा परिणाम म्हणजे आपल्या मनानुसार कामे तर होत राहतात पण व्यक्तिमत्व मात्र दूषित बनत जाते. आपण स्वतःचेच शत्रू बनत जातो.

क्रोध करणे हे व्यक्तीसाठी घातक आहेच परंतु काहीवेळा इतर जणांना त्या क्रोधाने आपण नियंत्रित ठेवू शकत असल्याने आपल्याला क्रोध करणे अत्यंत सवयीचे होऊन जाते. त्याचा परिणाम असा होतो की प्रेम, स्नेह, शांती, आदर, आनंद अशा गोष्टींचा स्पर्शही त्या व्यक्तीस होत नाही.

कर्म – फळ – संस्कार :

क्रोध केला म्हणजे त्याला आपण कर्म म्हणुयात, मन विषाक्त आणि दुःखी झाले तेव्हा आपल्याला त्याचे फळ मिळाले, असे समजुयात. आता सवय किंवा संस्कार कसा निर्मित होत असतो ते पाहुयात.

फळ मिळाल्यानंतर व्यक्ती त्या फळाची चिंता करत नाही तर बाहेर घडलेल्या परिणामाची काळजी करतो. म्हणजे क्रोधामुळे एखादे काम शक्य झाले तर ते काम वारंवार पूर्ण करवून घेण्यासाठी तो व्यक्ती क्रोधाचाच वापर करणार. भले त्याला माहीत असेल की क्रोध करणे ही वाईट गोष्ट आहे.

अशा प्रकारे बाहेर घडून येणाऱ्या परिणामासाठी तो आंतरिक कलह किंवा दुःख भोगण्यासाठी तयार असतो. अशाच प्रकारे जेव्हा जेव्हा क्रोध होतो तेव्हा त्याचा संस्कार मागे उरतो आणि तशी सवयच होऊन जाते.

वरील उदाहरण फक्त क्रोध या भावनेसाठी दिलेलं आहे. आनंद, सुख, चिंता, निराशा अशा अनेक भावनांसाठी आपण आपले कर्म, फळ आणि संस्कार तपासू शकतो.

कर्म – फळ – संस्कार यामुळे स्वभाव घडत जातो. त्यासाठी व्यक्तीने जर ठरवले की असे कोणते गुण असतील ज्याने आपले जीवन चांगले घडू शकते. त्यासाठी त्यापद्धतीचे कर्म करणे आवश्यक आहे. त्यानंतर कर्माचे फळ सुद्धा तत्काळ मिळेल, आणि त्याचेही संस्कारही घडत जातील.

समजा तुम्ही स्वतःहून कोणाची मदत केलीत, त्यावेळी तुम्हाला सुखाची अनुभूती होईल, तसेच संस्कार घडत जातील आणि तसाच तुमचा स्वभाव बनेल. मात्र कर्म हे सातत्याने होत राहिले पाहिजे.

आनंदी राहणे, प्रेमपूर्ण वागणे, शांततेने वागणे अशा काही सवयी असतील ज्या तुम्ही वारंवार केल्या तर तुमचा स्वभाव हळूहळू बदलू लागेल.

स्वतःहून चांगले वागणे जमत नसेल तर अशा व्यक्तींची संगत करा जे तुम्हाला चांगले वाटतात अथवा तशा पद्धतीचे वाचन करणे, तशी पुस्तके, ग्रंथ सतत वाचत राहणे यामुळे चांगले कर्म करण्याची प्रेरणा मिळत राहील.

The post कर्माचे फळ तत्काळ मिळते | कर्म – फळ आणि संस्कार… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%ab%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af/feed/ 0 2642
मनुष्य – वापराची वस्तू की कुतूहल? https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%95/ https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%95/#respond Wed, 21 Jul 2021 05:26:03 +0000 https://dailymarathinews.com/?p=2410 अंतर्दृष्टी विकसित नसल्याने आपल्याला स्वतःवर आणि इतर व्यक्तींवर विश्वास वाटत नाही. त्यामुळे जीवनातील व्यक्तिगत संबंध व इतर नाती काळानुरूप विकसित न होता बिघडत जातात. प्रस्तुत ...

Read moreमनुष्य – वापराची वस्तू की कुतूहल?

The post मनुष्य – वापराची वस्तू की कुतूहल? appeared first on Daily Marathi News.

]]>
अंतर्दृष्टी विकसित नसल्याने आपल्याला स्वतःवर आणि इतर व्यक्तींवर विश्वास वाटत नाही. त्यामुळे जीवनातील व्यक्तिगत संबंध व इतर नाती काळानुरूप विकसित न होता बिघडत जातात. प्रस्तुत लेखात मनुष्य वापराची वस्तू की कुतूहल? यासंदर्भात विचार मांडण्यात आलेले आहेत.

व्यक्तिगत संबंध बिघडण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यक्तीला आपण वापराची वस्तू म्हणून पाहतो. घरातील भावी पिढीतील मुलांना आपण प्रेमाचे संस्कार न देता अहंकार, स्वार्थ, ईर्ष्या वाढेल असे संस्कार देतो. मोठपणी देखील त्यांचा उपयोग होऊ शकेल, असेच आपले विचार असतात.

त्या संस्कारांचा आणि विचारांचाच परिणाम असा होतो की कोणतीही व्यक्ती आपल्यापासून मनाने दूर जाते. आपण जसे संस्कार देतो त्यांचाच उपयोग आपल्या विरुध्द होत असतो. त्यामुळे वस्तूंचा वापर कशासाठी आणि व्यक्तींचा वापर कशासाठी हे सर्वप्रथम जाणून घेतले पाहिजे.

वस्तूंचा वापर करून आपण जीवन आरामदायक बनवू शकतो. वस्तू आपल्याला जीवनात महत्त्वाच्या आहेत फक्त जीवन चालवण्यासाठी. परंतु व्यक्तींचे महत्त्व त्याहीपेक्षा उच्च आहे.

जिवंत व्यक्ती आपल्या जीवनात आनंद, प्रेम, सुख निर्माण करू शकते. परंतु त्या आनंदाची व प्रेमाची आकांक्षा आपल्यात आहे का? त्यातून निर्माण होणाऱ्या उन्नत जीवनाला आपण प्राप्त होऊ शकतो का? असे विचार मनात डोकावले पाहिजेत.

कोणतीही व्यक्ती ही फक्त उपभोगाची किंवा वापर करून घेण्याची गोष्ट नाही तर प्रेमाचा विकास घडवण्याची गोष्ट आहे. दोन व्यक्तींच्या संबंधात दोन्ही बाजूंनी अशा प्रेमाचा विकास शक्य होतो जर आपण व्यक्तींना प्रेम केले आणि वस्तूंचा उपयोग केला तर…

प्रत्येक व्यक्ती आनंद आणि कुतूहल वाढवू शकते. त्यासाठी तुम्ही स्वतः देखील त्या इच्छेने भारलेले असला पाहिजे. आनंदी आणि आश्चर्यपूर्ण आयुष्य जगण्याचा मंत्र म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कुतूहलयुक्त नजरेने पाहणे!

कुतूहल युक्त नजर म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या भल्याचा विचार मनात असणे. अशी कुतूहलयुक्त नजर कशी काय निर्माण होऊ शकते? त्यासाठी प्रत्येक व्यक्तीतील सौंदर्य बघण्याचा प्रयत्न करा. तशी सुरुवात केली तर हळूहळू पुढचा व्यक्ती तुम्हाला सुंदर आणि प्रेमपूर्ण वाटू लागेल.

तुम्हाला प्रेमपूर्ण वाटलेला व्यक्ती ही तुमच्या मनातील भावना आहे. त्या समोरील व्यक्तीच्या मनात काय चालले आहे त्याच्याशी तुमचे काही देणे घेणे नाही, परंतु तुम्ही त्याच्याप्रती दाखवलेले प्रेमच त्याचेही तुमच्या प्रती असलेले वागणे सरळ करून जाईल.

सद्यस्थितीत मनुष्य फक्त एकमेकांना वापरत आहे. काळजी, प्रेम आणि आनंदाचा कुठेही तपास नाही. स्वतःचा अहंकार आणि प्रतिष्ठा मोठी वाटत असल्याने व्यक्तिगत महत्त्व कमी झालेले आहे.

दुसऱ्या व्यक्तीला त्रास न देता, त्याला फक्त स्वतःच्या अहंकाराच्या पूर्तीची वस्तू न पाहता एक कुतूहल आणि नवीनतम नजरेने पाहता आले तर जीवन एक दुसऱ्याच मार्गाने गतीमय होईल ज्यामध्ये मनुष्य एकमेकांना प्रेम देऊ शकेल, खऱ्या पद्धतीची काळजी करू शकेल.

म्हणजेच मनुष्याचा फक्त वापर न करता त्यांच्याप्रती प्रेमाने भारले जाऊन कुतूहल निर्माण करणे हाच जीवन जगण्याचा योग्य मार्ग असू शकेल ज्यामध्ये तुम्हाला नाती आणि इतर व्यक्ती या बंधने वाटणार नाहीत तर स्वतःच्याच विकासातील सहाय्यक वाटतील.

दोन व्यक्तींतील असे कुतूहलयुक्त आणि प्रेमपूर्ण संबंध दोघांच्याही स्वभावात विवेक निर्माण करतात आणि एकमेकांच्या आयुष्यात आपोआप आनंद आणि शांतीची निर्मिती होते.

मनुष्य – वापराची वस्तू की कुतूहल? हा लेख आवडला असल्यास तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post मनुष्य – वापराची वस्तू की कुतूहल? appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%95/feed/ 0 2410
विचारांचा घोळ | थोडंस मनातलं – विचार | https://dailymarathinews.com/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%b3/ https://dailymarathinews.com/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%b3/#respond Mon, 21 Jun 2021 05:14:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=2344 आपल्याला नित्य जीवनात विचारांचा घोळ सतत जाणवत राहतो. आपली वैचारिक विषमता आपल्यालाच सलते. त्याच्यावर आधारित हा लेख तुम्हाला नक्की नवीन दृष्टी देऊन जाईल. लेख वाचून ...

Read moreविचारांचा घोळ | थोडंस मनातलं – विचार |

The post विचारांचा घोळ | थोडंस मनातलं – विचार | appeared first on Daily Marathi News.

]]>
आपल्याला नित्य जीवनात विचारांचा घोळ सतत जाणवत राहतो. आपली वैचारिक विषमता आपल्यालाच सलते. त्याच्यावर आधारित हा लेख तुम्हाला नक्की नवीन दृष्टी देऊन जाईल. लेख वाचून झाल्यावर मात्र त्यातील मुद्द्यांवर नक्की विचार करा.

सकाळी उठल्यावर जी गती आणि तीव्रता जगण्यासाठी आपल्याला हवी असते ती गती न मिळाल्याने आपण एकदम सुस्त होऊ शकतो. आपले काम एकदम मंद गतीने होऊ लागते. मग सर्व जीवन ऊर्जा विचार करण्यात निघून जाते आणि खरोखर कृती करण्यासाठी शारीरिक पातळीवर ऊर्जा शिल्लक राहत नाही.

ऊर्जा सतत एका दिशेने प्रवाहित नसल्याने असंख्य प्रकारचे विचार मनात येत राहतात. दिवसाची सुरुवातच जर ध्येय अथवा कामाच्या दिशेने नसल्यास विचारांचा कल्लोळ माजू लागतो. त्यामुळे बुध्दी एका विचारावर स्थिर राहत नाही.

तुम्हाला जीवनात काय प्राप्त करायचे आहे, त्यानुसार विचारांची एका दिशेने वाटचाल होणे गरजेचे आहे. त्या एका दिशेने प्रवाहित झालेल्या विचारांनीच आपल्या ऊर्जेत नवा संचार होऊ लागतो आणि आपल्याकडून कृती केली जाते.

बहुतेक वेळा मनात आलेल्या विचारांचे फक्त निरीक्षण न करता आपण त्यांना प्रतिसाद देऊ लागतो, येथेच आपण फसतो. विचारांना प्रतिसाद न देता त्यातील आपल्या कामाचे आणि आवश्यक किती प्रकारचे विचार आहेत हे पाहावे लागेल. त्यानंतरच खऱ्या अर्थाने आपल्या मनात विचारांचा घोळ होणार नाही.

समजा आपल्या मनात दिवसभरात शंभर प्रकारचे विचार येत असतील, त्यातले कदाचित दहा विचार फक्त आपल्या कामाशी निगडित असतील. अशा विचारांनाच प्रतिसाद देणे गरजेचे आहे. तर आणि तरच आपल्या कामात आपल्याच विचारांचे आणि भावनांचे अडथळे येणार नाहीत.

जीवन ऊर्जा ही एका दिशेने प्रवाहित झाली की ध्येय प्राप्ती होईलच यात शंकाच नाही. परंतु ती गती आणि प्रवाह बाह्य प्रेरित नसले पाहिजेत. कोणी व्यक्ती किंवा परिस्थिती त्यासाठी कारणीभूत नसले पाहिजेत तर ती गती तुम्ही अंतर्गत प्रेरणेतून निर्माण केली पाहिजे.

विचारांचा घोळ का होतो ?

• आपले ध्येय निश्चित नसते. त्यानुसार कामाला प्राधान्य दिलेले नसते.

• दिवसातील काम नियोजित नसते.

• सर्व काही अनिश्चित असल्याने विचार, भावना आणि ऊर्जा या कोणत्याही दिशेला प्रवाहित होत राहतात.

• भावनामय वातावरण असेल तर आपले विचार देखील त्याच दिशेने जातात. तसेच आपले विचार जसे असतात तशाच भावना देखील निर्माण होत राहतात.

• त्यामुळे ऊर्जेची क्षमता ही अंतर्गत कार्यातच समाप्त होते आणि शारीरिक स्तरावर कोणतेही काम पूर्ण होत नाही.

• त्याचा परिणाम म्हणून विचारांचा घोळ मात्र वाढत जातो.

विचारांचा घोळ कसा थांबवायचा ?

• सर्वप्रथम जीवनात कामाचे नियोजन आणि त्यानुसार दिवसाची प्राधान्यता ठरवली गेली पाहिजे.

• रात्री झोपताना आपण जसा विचार करतो किंवा जी कृती करतो त्याचा सकाळी आपल्या वागण्यात परिणाम जाणवतो म्हणून रात्री झोपताना उद्याच्या महत्त्वाच्या आणि नियोजित कामाची कल्पना करायची आणि झोपी जायचे.

• सकाळी उठल्यावर आपली ऊर्जा, विचार आणि भावना त्या कामाच्या दिशेने प्रवाहित होतील अशा सूचना आणि वाक्ये मनातल्या मनात बोलावी लागतील. त्या सूचना बुद्धीला मान्य होईपर्यंत म्हणजेच मनातील इतर विचार शांत होईपर्यंत द्यायच्या आहेत.

• आता दिवसभर तुम्ही मनातून शांत आणि स्थिर अनुभव करू शकाल आणि आपल्या कामात ध्यान देऊ शकाल. विचारांचा घोळ बऱ्यापैकी कमी झालेला असेल.

• तुम्ही भविष्याचे निर्णय आणि कल्पना यांचा विचारही करू नका. एक – एक दिवस ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहा. एका दिवसाचे काम कसे पूर्ण होईल, त्या दिवसाचा अनुभव कसा काय चांगला असेल, त्याचाच विचार सतत राहुद्या.

The post विचारांचा घोळ | थोडंस मनातलं – विचार | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%b3/feed/ 0 2344