recipe in Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Tue, 24 Mar 2020 01:20:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 recipe in Marathi Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 Kothimbir Vadi Recipe in Marathi | स्वादिष्ट कोथिंबीर वडी रेसिपी ! https://dailymarathinews.com/kothimbir-vadi-recipe-in-marathi/ https://dailymarathinews.com/kothimbir-vadi-recipe-in-marathi/#respond Tue, 10 Mar 2020 09:59:40 +0000 https://dailymarathinews.com/?p=1520 वडी कोणाला आवडत नाही? एकदा तयार केलेली वडी दोन दिवस देखील आपण खाऊ शकतो. वडीचा स्वादच काही निराळा असतो. ज्या पद्धतीने वडी बनवली गेली पाहिजे ...

Read moreKothimbir Vadi Recipe in Marathi | स्वादिष्ट कोथिंबीर वडी रेसिपी !

The post Kothimbir Vadi Recipe in Marathi | स्वादिष्ट कोथिंबीर वडी रेसिपी ! appeared first on Daily Marathi News.

]]>
वडी कोणाला आवडत नाही? एकदा तयार केलेली वडी दोन दिवस देखील आपण खाऊ शकतो. वडीचा स्वादच काही निराळा असतो. ज्या पद्धतीने वडी बनवली गेली पाहिजे तशी एकदम सोप्पी पद्धत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. कोथिंबीर वडी बनवताना थोडी काळजी घ्यावी लागेल. चला तर मग सुरू करूया बनवायला – कोथिंबीर वडी!

Kothimbir Vadi Recipe Ingredients  साहित्य:

• कोथिंबीर – ३ जुड्या (बारीक चिरलेली)
• चण्याचे पीठ – एक वाटी
• हिरव्या मिरच्या – ५-६
• तांदूळ पीठ – १ चमचा
• हळद – १ चमचा 
• लसूण – ६-७ पाकळ्या
• आले – छोटा तुकडा किसून
• जिरे – १ चमचा
• तेल – २ चमचे
• मीठ – स्वादानुसार

How to make kothimbir Vadi कृती:

१ – अगोदर चणा पिठात पाणी आणि तांदूळ पिठ घालून घट्ट भिजवावे. गुठळ्या राहता कामा नये.
२ – लसूण, आले यांची पेस्ट करून घ्यावी. मिक्सरमध्ये मिरच्या बारीक करून घ्याव्या. सर्व लागणारे पदार्थ एकत्र ठेवावे.
३ – आता कढईत १ चमचा तेल गरम करावे. आले – लसूण पेस्ट, बारीक केलेल्या मिरच्या, हळद आणि जिरे या सर्वांची फोडणी द्यावी. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकावी. 
४ – भिजवलेले पीठ घालावे आणि सतत हलवत राहावे. चवीनुसार मीठ टाकावे. सर्व मिश्रण अशा प्रकारे ढवळावे की गुठळ्या होता कामा नये. गॅस मंद आचेवर ठेवावा. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळावे. एकदम घट्ट झाले की त्यावर झाकण ठेऊन वाफ काढून घ्यावी.
५ – मिश्रण वाफलायला थोडा वेळ लागतो. प्रत्येक पाच मिनिटानंतर मिश्रण वडी बनवण्यासारखे तयार झाले आहे का ते पाहावे. एका परातीला तेल लावून ठेवावे. सर्व मिश्रण त्या परातीत थापून घ्यावे.
६ – मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या हव्या तशा वड्या पाडाव्यात. आता तयार झाल्या कोरड्या वड्या..
७ – त्या वड्या तळण्यासाठी एका कढईत थोडे तेल टाका. वरचेवर तळून घ्या. झाल्या तयार लुसलुशीत आणि खमंग वड्या…
८ – वड्या जास्त वेळ टिकवून ठेवायच्या असतील तर जास्त तेलात चांगल्या तळून घ्या.

The post Kothimbir Vadi Recipe in Marathi | स्वादिष्ट कोथिंबीर वडी रेसिपी ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/kothimbir-vadi-recipe-in-marathi/feed/ 0 1520
Aloo paratha recipe in Marathi |आलू पराठा बनवा अगदी सोप्या पद्धतीने! https://dailymarathinews.com/aloo-paratha-recipe-in-marathi/ https://dailymarathinews.com/aloo-paratha-recipe-in-marathi/#respond Mon, 02 Mar 2020 09:22:13 +0000 https://dailymarathinews.com/?p=1440 उत्तर भारतात आलू पराठा खूपच प्रसिद्ध आहे. आता तर पूर्ण भारतभर देखील हा पदार्थ बनवला जातो. अगदी थोड्या वेळेत चपात्या बनवतो त्या पद्धतीने फक्त आत ...

Read moreAloo paratha recipe in Marathi |आलू पराठा बनवा अगदी सोप्या पद्धतीने!

The post Aloo paratha recipe in Marathi |आलू पराठा बनवा अगदी सोप्या पद्धतीने! appeared first on Daily Marathi News.

]]>
उत्तर भारतात आलू पराठा खूपच प्रसिद्ध आहे. आता तर पूर्ण भारतभर देखील हा पदार्थ बनवला जातो. अगदी थोड्या वेळेत चपात्या बनवतो त्या पद्धतीने फक्त आत बटाट्याचे सारण टाकून हा पदार्थ लगेच बनवू शकतो. ज्यांना नाश्ता पोटभरून करायची सवय आहे त्यांना हा पदार्थ खूपच आवडेल. हा पदार्थ बनवण्यासाठी अतिकष्ट घ्यायची गरज नसते. सोप्यात सोप्या पद्धतीने आलु पराठा कसा बनवायचा हे जाणून घेऊया.

Aloo Paratha Ingredients –
साहित्य:

• बटाटे – ४

• लसूण – ७ ते ८ पाकळ्या

• खोबरे – बारीक तुकडा

• लाल तिखट (चटणी) – २ बारीक चमचे

• कोथिंबीर

• जिरे

• हळद – अर्धा चमचा

• मीठ

• गव्हाचे पीठ

• तेल

How to make aloo paratha
कृती:

१ – गव्हाचे पीठ मीठ टाकून चांगले मळून घ्यावे. चांगली मऊसर कणिक तयार करावी.

२ – एका भांड्यात पाणी घेऊन त्यात बटाटे शिजवून घ्यावेत. आता हे बटाटे किसून बारीक करावे.

३ – लसूण – खोबरे मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत.

४ – आता किसलेल्या बटाट्यात लसूण – खोबरे पेस्ट, लाल तिखट, हळद, जिरे, कोथिंबीर आणि थोडे मिठ टाकून चांगले सारण बनवून घ्यावे.

५ – बटाट्याच्या सारणाचे लहान लहान गोळे करावेत.

६ – गव्हाच्या कणकेचे गोळे करून थोडेसे लाटून घ्यावे त्यावर बटाट्याचे सारण ठेवावे. लाटलेली चपाती सारणावरून बंद करून घ्या.

७ – पुन्हा अलगद लाटून घ्या. आता हा पराठा चपाती बनवतो तसा बनवून घ्या.

टीप:
• लाल तिखटऐवजी हिरवी मिरची पेस्टदेखील वापरू शकता.
• तेलाऐवजी तूपाचा वापर करून पराठा बनवू शकता.

The post Aloo paratha recipe in Marathi |आलू पराठा बनवा अगदी सोप्या पद्धतीने! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/aloo-paratha-recipe-in-marathi/feed/ 0 1440