मराठी बातम्या Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 28 Jun 2023 09:19:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 मराठी बातम्या Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 AUS vs ENG 2nd Test _ ऑस्ट्रेलियाचा दुसरा घाव की इंग्लंडचा असणार पलटवार _ https://dailymarathinews.com/aus-vs-eng-2nd-test/ https://dailymarathinews.com/aus-vs-eng-2nd-test/#respond Wed, 28 Jun 2023 06:13:45 +0000 https://dailymarathinews.com/?p=5860 दिनांक – २८ जून २०२३ Daily Marathi News | Latest Marathi News ऑस्ट्रेलिया विरूध्द इंग्लंड ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला निसटता पराभव स्वीकारावा लागला. क्षेत्ररक्षण ...

Read moreAUS vs ENG 2nd Test _ ऑस्ट्रेलियाचा दुसरा घाव की इंग्लंडचा असणार पलटवार _

The post AUS vs ENG 2nd Test _ ऑस्ट्रेलियाचा दुसरा घाव की इंग्लंडचा असणार पलटवार _ appeared first on Daily Marathi News.

]]>
दिनांक – २८ जून २०२३

Daily Marathi News | Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया विरूध्द इंग्लंड ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला निसटता पराभव स्वीकारावा लागला. क्षेत्ररक्षण आणि खेळाची रणनीती थोडीशी चुकल्याने अगदी पाचव्या दिवशी सामना रंगतदार स्थितीत पोचला असतानाही यजमानांना पराभवाचा स्वाद चाखावा लागला.

इंग्लंड मागच्या सामन्यातील पराभवाचा ओरखडा या सामन्यात नक्कीच ओढेल अशी शक्यता आहे. इंग्लंड संघाचा खेळ अप्रतिम झाला असतानाही फक्त ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिंसच्या खेळीने त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. ऍशेस मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाईल.

इंग्लंड संघ यावेळी मजबूत अवस्थेत आहे. सर्व खेळाडू फॉर्ममध्ये दिसत आहेत आणि तिच स्थिती ऑस्ट्रेलियन संघाची आहे. ऑस्ट्रेलियन संघ हा प्रत्येक खेळाडूच्या मानसिकतेवर काम करतो आणि खेळ पुढे नेत असतो तर इंग्लंड संघाची आक्रमकता पाहण्याजोगी असते.

दोन्ही संघांत अगदी नावाजलेले आणि जगप्रसिध्द असे खेळाडू असल्याने उभय संघांतील सामना म्हणजे क्रिकेट शौकिनांसाठी एक वेगळीच पर्वणी असते. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रांत मजबूत असलेले हे दोन संघ एकमेकांविरुद्ध आज पुन्हा एकदा उभे राहणार आहेत.

स्मिथ आणि लबुशेनची जबाबदारी –

कसोटी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. त्यामध्ये स्मिथ, लबुशेन आणि हेडचा समावेश आहे. स्मिथ आणि लबुशेन हे अनुभवी आणि पूर्ण जगभरात नावाजलेले फलंदाज असल्याने त्यांच्याकडून धावांची अपेक्षा ऑस्ट्रेलियन संघ ठेऊन आहे.

अँडरसन आणि ब्रॉड –

ऑस्ट्रेलियन संघ जसा आपल्या फलंदाजीत अपेक्षा ठेऊन असतो तसेच इंग्लंड संघ आपल्या दोन हुकुमी गोलंदाजांवर सतत नजर ठेऊन असतो. ते गोलंदाज म्हणजे जिमी अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड!

या दोन गोलंदाजांनी आपल्या क्रिकेटिंग कारकीर्दीत अनेक सामने आपल्या कमालीच्या प्रदर्शनाने पालटलेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात या दोन गोलंदाजांवर चांगलेच लक्ष राहील.

The post AUS vs ENG 2nd Test _ ऑस्ट्रेलियाचा दुसरा घाव की इंग्लंडचा असणार पलटवार _ appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/aus-vs-eng-2nd-test/feed/ 0 5860
राज्यात या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ लागू! _ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता _ https://dailymarathinews.com/orange-alert-applicable-to-the-state-or-districts-_-heavy-rain-is-expected-in-the-state-_/ https://dailymarathinews.com/orange-alert-applicable-to-the-state-or-districts-_-heavy-rain-is-expected-in-the-state-_/#respond Wed, 28 Jun 2023 04:43:13 +0000 https://dailymarathinews.com/?p=5857 Daily Marathi News दिनांक – २८ जून २०२३ : मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता असल्यास एखाद्या विभागाला, जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात येतो. तेथील ...

Read moreराज्यात या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ लागू! _ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता _

The post राज्यात या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ लागू! _ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता _ appeared first on Daily Marathi News.

]]>
Daily Marathi News

दिनांक – २८ जून २०२३ : मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता असल्यास एखाद्या विभागाला, जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात येतो. तेथील प्रशासन, नागरिक यांच्यासाठी तो सतर्कतेचा इशारा असतो.

हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच मागील दोन दिवसांत पुणे, मुंबई मध्ये देखील मुसळधार पाऊस झालेला आहे. आजही पुण्यात आणि मुंबईत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

मराठी बातम्या – ऑरेंज अलर्ट या जिल्ह्यांना लागू –

नाशिक, पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या विभागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला. तर मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

येत्या आठवडाभरात पाऊसाची चांगलीच शक्यता आहे. पुढील ४ – ५ दिवस तर मान्सून महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. मागील चार दिवसांत राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लागलेली आहे. राज्यात सुरु झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग मात्र अति आनंदात आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

Latest Marathi News साठी dailymarathinews.com या आमच्या वेबसाईटला वारंवार भेट देत राहा…

The post राज्यात या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ लागू! _ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता _ appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/orange-alert-applicable-to-the-state-or-districts-_-heavy-rain-is-expected-in-the-state-_/feed/ 0 5857
बजेट 2023 – काय झाले स्वस्त आणि काय झाले महाग https://dailymarathinews.com/budget-2023/ https://dailymarathinews.com/budget-2023/#respond Thu, 02 Feb 2023 00:17:03 +0000 https://dailymarathinews.com/?p=5470 • 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन नरेंद्र मोदी 2.0 सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला. • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ...

Read moreबजेट 2023 – काय झाले स्वस्त आणि काय झाले महाग

The post बजेट 2023 – काय झाले स्वस्त आणि काय झाले महाग appeared first on Daily Marathi News.

]]>
• 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन नरेंद्र मोदी 2.0 सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला.

• अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा पाचवा अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2023) सादर करत होत्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. सामान्य बजेटमध्ये काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले ते जाणून घेऊया.

स्वस्त झालेल्या बाबी –

एलईडी टीव्ही

कापड

भ्रमणध्वनी (मोबाईल्स)

खेळणी

मोबाइल कॅमेरा लेन्स

इलेक्ट्रिक वाहने

हिऱ्याचे दागिने

बायोगॅसशी संबंधित गोष्टी

लिथियम पेशी

सायकल


बजेटमध्ये या गोष्टी महागल्या –

सिगारेट

दारू

छत्री

झोप

प्लॅटिनम

हिरा

विदेशी स्वयंपाकघर चिमणी

एक्स-रे मशीन

आयात केलेली चांदीची भांडी

• करदात्यांना आनंदाची बातमी –

√ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात आयकराचा नवा स्लॅब आणला आहे.

√ वास्तविक, आतापर्यंत 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर भरावा लागत नव्हता. मात्र आता सरकारने ही मर्यादा वाढवून सात लाख रुपये केली आहे.

√ वैयक्तिक आयकराचा नवीन कर दर: 0 ते 3 लाखांपर्यंत शून्य, रु. 3 ते 6 लाखांपर्यंत 5%, रु. 6 ते 9 लाखांपर्यंत 10%, रु. 9 ते 12 लाखांपर्यंत 15%, रु. 12 ते 15 पर्यंत 20% लाख आणि 15 लाख वरील 30% असेल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली घोषणा –

√ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिक खाते योजनेची मर्यादा 4.5 लाखांवरून 9 लाख करण्यात येणार आहे.

√ महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू होणार आहे. यामध्ये महिलांना 2 लाखांच्या बचतीवर 7.5% व्याज मिळेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पीएम आवास योजनेचा परिव्यय 66% ने वाढवून 79,000 कोटी करण्यात येत आहे.

√ केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की पुढील तीन वर्षात सरकार आदिवासी विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या 740 एकलव्य मॉडेल स्कूलसाठी 38,800 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी नियुक्त करेल.

The post बजेट 2023 – काय झाले स्वस्त आणि काय झाले महाग appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/budget-2023/feed/ 0 5470